कानातून पाणी व पू का येतो कारणे व उपाय

0
5152
कानातून पाणी व पू का येतो कारणे व उपाय
कानातून पाणी व पू का येतो कारणे व उपाय

नमस्कार, आज आपण जाणून घेणार आहोत, की कानातून पू व पाणी येण्याचे कारणे काय असतात. ज्यावेळी मी लहान होती  अशा वेळी मी माझ्या कानात खेळता-खेळता पेन्सिल घातली होती, आणि त्यानंतर माझा कान असा दुखायला लागला, त्यातून पाणी यायला लागले, मी खूप रडायची, मला आईने खूप रागावलेले, व डाॅक्टराकडे नेले तेव्हा, त्यानी मला समजले, की कानात असे बारीक वस्तू घालू नये, त्याने आपल्या कानाला इन्फेक्शन होऊन जखम होऊन व पाणी येते. त्यापासून मी स्वतः ती काळजी घेते, आणि इतर लहान मुलांनाही सांगते, की असे करू नये त्यामुळे कान दुखतो. येथे आम्ही तुम्हाला कानातून पाणी व पू का येतो कारणे व उपाय बद्दल सर्व काही माहिती सांगीतलेली आहे.

कान हा शरीराचा एकदम नाजूक भाग आहे. त्याला जर थोडी ही दुखापत झाली की, तो सुजतो, त्याच्यातून पु, पाणी येते, कानामध्ये किडा ही जाण्याची संभावना असते. आपण आपल्या कानाची काळजी घ्यायला हवी. कानात पाणी जाऊ देऊ नये. तर मग अजून कानातून पु व पाणी येण्याची नेमकी कोणती कारणे आहेत, ते  आज आपण जाणून घेऊयात. 

कानातून पू व पाणी येण्याची कारणे? 

कानातून पू व पाणी येण्याची अनेक कारणे असतात, चला तर मग जाणून घेऊयात. 

  • कानात फंगल इन्फेक्शन झाल्यास, कानातून पु व पाणी येऊ शकते.
  • सर्दी-पडसे मध्ये, कानातून पू व पाणी येऊ शकते. 
  • इयर बर्ड्स व बोट किंवा काडी घातल्याने, कानाच्या पडद्याला धक्का लागून, कानातून पू व पाणी येऊ शकते. 
  • टॉन्सिल्स वाढल्याने ही कानातून पु व पाणी येणे, सारख्या समस्या होऊ शकतात. 
  • बाहेरील प्रदूषणामुळे, ही इन्फेक्शन होऊन, कानातुन पाणी येऊ शकते. 
  • धूम्रपान करणाऱ्यांना एलर्जी होऊन, कानातून पू व पाणी होऊ शकते. 
  • तसेच कानामध्ये किडा वगैरे गेल्यास कानाला इन्फेक्शन होऊन कानातून पू व पाणी येऊ शकते. 
  • नाक व घशाचे  संबंधित आजार असल्यामुळे, कानातून पू व पाणी येऊन त्याचा वासही येऊ शकते. 
वाचा  गरोदर आहे हे किती दिवसात कळते

कानातून पू व पाणी येण्याची लक्षणे कोणती? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही कोणत्या कारणांमुळे कानातून पू व पाणी येऊ शकते. हे सांगितले आहेत. आता कानातून पू  , पाणी येण्यापूर्वीची काही लक्षणे, आम्ही तुम्हाला सांगत आहोत , ते जाणून घेऊयात! 

  • कानातून पू व पाणी येते, त्यावेळी डोकेदुखी होते. 
  • अशावेळी कान भरल्यासारखा वाटतो, आणि कानातून पाणी येते, आणि त्याचा वासही येतो. 
  • ऐकायला कमी येते. 
  • कान सुजतो, लालसर होतो. 
  • ताप येतो. 
  • सर्दी सारखे वाटते, व अंगात कणकण होते. 

कानातून पू व पाणी आल्यास कोणते घरगुती उपाय करावे ते जाणून घेऊयात! 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, कानातून पू व पाणी येण्याचे काही कारणे, आम्ही सांगितले आहेत. आणि त्यापूर्वीची काही लक्षणेही सांगितली आहेत. आता आपण त्यावर कोणते, घरगुती उपाय करू शकतो, हे जाणून घेऊयात! 

तुळशीचा रस वापरून बघा

तुळशीमध्ये ऑंटीसेफ्टीक, ऑंटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात.    जर कानावर इन्फेक्शन झाले, तर तुळशीचा रस हा फायदेशीर ठरतो, कानातून पू येत असेल, आणि तो थांबल्यावर कापसाच्या बोळ्याने पुसून त्यात, तुम्ही तुळशीचा रस टाकू शकतात. त्यासाठी तुम्हाला तुळशीची पाने दोन कप पाण्यात टाकून, खळखळून अर्धा होईपर्यंत उकळावे. त्यानंतर त्यात एक कापराची वडी घालावें, व  दोघांचे मिश्रण एकजीव करून, कानात एकेक थेंब टाकावे. त्याने तुम्हाला आराम मिळेल. हा उपचार करताना तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. 

लिंबाचा पाला वापरून पाहा

हो, लिंबाच्या पायाला मध्ये अंटीबॅक्टरियल गुणधर्म असतात. जर तुम्ही खोबरेल तेलामध्ये कडुलिंबाच्या पाला उकळून घेतला, आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी, त्यानंतर ते वस्त्रगाळ करून, त्यात दोन थेंब मधाचे टाकावे. यांचे मिश्रण एकजीव करून, एका बाटलीत भरून ठेवावे. ज्यावेळी तुम्हाला कानातून पू येणे, किंवा कान दुखी ची समस्या होईल, त्यावेळी तुम्ही ते दोन थेंब दिवसातून दोन वेळेस कानात टाकू शकतात. त्यांनी तुम्हाला फरक पडेल. 

वाचा  डाळिंब खाल्ल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे व तोटे :-

लसुण वापरून बघा

लसूण हा अँटिबायोटिक फंगल इन्फेक्शन, वर मात करणारा असतो. फंगल इन्फेक्शन, कानातून पू येणे, पाणी येणे यासारख्या समस्या होत असतील, अशा वेळी जर तुम्ही लसनाचे तेलाचे दोन थेंब काना टाकले, तर तुम्हाला फरक मिळू शकतो, पण तुमच्या कानाला सूज आली असेल, तुम्ही लसणाचे तेल कानाच्या आजूबाजूला लावू शकतात. त्यांने तुम्हाला फरक पडेल. तसेच जर कोणाला लसुन ची ऍलर्जी असेल, तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. 

कानातून पू व पाणी येत असेल, तर कोणती काळजी घ्यावी? 

वरील दिलेल्या माहिती मध्ये, आम्ही तुम्हाला सांगितले, की कानातुन पाणी येत असल्यास, कोणते घरगुती उपचार करावेत. पण हे घरगुती उपचार करताना, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. कारण कोणाला कानात जास्त इन्फेक्शन असेल, तर जास्तीत जास्त रिएक्शन होण्याची संभावना येऊ शकते. आता कानातून पाणी येत असेल, तर काय काळजी घ्यावी? ती आपण जाणून घेऊयात. 

  • कानातून ज्यावेळी पाणी येते, त्यावेळी कान कापसाच्या बोळ्याने पुसून, नेहमी स्वच्छ ठेवावा. 
  • कानाला खोबरेल तेलाने आजूबाजूचा भाग पुसून घ्यावा. 
  • आंघोळ करताना कानात पाणी जाऊ देऊ नये. 
  • कानात बोटे व काडी, इयर बर्ड्स घालू नये, 
  • कानात इयरफोन्स लावू नये. 
  • बाहेर जाताना कानावर व डोक्यावर रुमाल बांधावा, म्हणजे कानात बाहेरची धूळ जाणार नाही, याची काळजी घ्यावी. 
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही तेल व स्प्रे वापरू नये. 
  • जास्ती आवाजाच्या ठिकाणी जाऊ नये. 
  • डॉक्टरांना विचारून पेन किलरची गोळी तुम्ही घेऊ शकतात. 

जाणून घ्या :नाकावर असलेले काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला कानातून पाणी व पू का येतो कारणे व उपाय सांगितले आहेत, की कानातून पू व पाणी येण्याची कारणे, लक्षणे व त्यावर उपचार व कोणती काळजी घ्यावी. हे सांगितले आहेत. जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. अजून माहिती साठी येथे पाहू शकता.

वाचा  खोबरेल तेल पिण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

धन्यवाद !!    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here