वास्तुशास्त्रानुसार घरातील किचन कसे असावे

0
1046
वास्तुशास्त्रानुसार घरातील किचन
वास्तुशास्त्रानुसार घरातील किचन

वास्तुशास्त्रानुसार घरातील किचन

 

नमस्कार, मित्रांनो वास्तुशास्त्र म्हणजे प्रत्येक वास्तूचे शास्त्र असते. किचन, हॉल, बेडरूम, टॉयलेट, बाथरूम, हे त्याच्या शास्त्रानुसार असतात. आज आपण बघणार आहोत. की घरातील किचन कसे असावे? आता तुम्ही म्हणणार की किचन सारखे किचन, आणि त्यात काय वेगळे बघायचे. पण तसे नसते, किचन मध्ये सुद्धा शास्त्र असते, हो तुम्हाला जाणून खरंच आश्चर्य वाटेल! पण आपला किचन कोणत्या दिशेला आहे, किचन मधील गॅस कुठल्या दिशेला आहे, तसेच पाणी कुठे ठेवले, तसेच त्यामधील वस्तूंची रचना तुम्ही कशा प्रकारे केली आहे, किचनमधील चिमणी कशी, एक्झिट फॅन कोणत्या दिशेला, या वस्तूंचे सुद्धा शास्त्र असते. आज आपण ते बघणार आहोत, आणि त्यावर आपले घरात सुख समृद्धी नांदुन राहते. कारण किचन हे घरातील अशी एक जागा आहे, त्यावर सगळ्यांचे पोट भरते. त्यात एक आई, गृहिणी, आजी, आत्या, मावशी हे सगळे किचनमध्ये स्वयंपाक करतात. त्यामध्ये त्यांचे सात्विक प्रेम आपल्याला मिळते. मग त्यांचे तोंड किचन मध्ये कोणत्या दिशेला असावे? हेही फार मुद्द्याचे आहे. चला तर मग जाणून घेऊया की, वास्तुशास्त्रानुसार घरातील किचन कसे व कोणत्या दिशेस असावे? चला मग बघुयात! 

वास्तुशास्त्रानुसार घरातील किचनची दिशा कशी असावी? 

वास्तुशास्त्रानुसार किचन म्हणजे, तुमचे स्वयंपाक घर हे पूर्व दिशेस असले, तर चांगले असते. तसेच स्वयंपाक घरात जो कोणी स्वयंपाक करत असेल, त्याचे तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असले, तर अति उत्तम असते. हल्ली जागेअभावी तुम्हाला या दिशा मिळणे फार कठीण असते, कारण कधी कधी कोणाची स्वयंपाक घर हे उत्तर, तर कोणाची दक्षिण, पूर्व, पश्चिम असते. पण सहसा करून तुम्हाला त्यामध्ये बदल करता आला, तर अतिउत्तम. त्यासाठी जर तुमचे स्वयंपाकघर पूर्व-पश्‍चिम दिशेला असले तरीही चालेल, आणि स्वयंपाक जेवण बनवणाऱ्या चे तोंड पूर्वेला नसेल  तर पश्चिमेकडे राहिले तरी चालेल. 

वाचा  लिंबू चेहऱ्याला लावण्याचे फायदे

वास्तुशास्त्रानुसार घरातील किचन मधील शेगडी कोणत्या दिशेस असावे? 

किचन मधील शेगडी उत्तर भिंतीला कधीही लावून ठेवू नये, किचनमधील शेगडी  पूर्व किंवा पश्चिम दिशेला असले, तरी चालेल. 

तसेच रोज सकाळी उठल्यावर शेगडीची पूजा करून, स्वयंपाक करायला आरंभ करावा. जेणे तुमचा दिवस चांगला जाईल. 

वास्तुशास्त्रानुसार घरातील किचन मध्ये कोणता कलर द्यावा? 

किचन मध्ये मनाला फ्रेश उत्साही वाटेल, असे कलर द्यावे. किचनमध्ये काळपट, लालसर, भडक, कलर कधीही देऊ नये. त्याने नकारात्मक ऊर्जा यांचा प्रभाव किचन मध्ये राहतो. त्यासाठी तुम्ही किचन मध्ये नेहमी ऐवरी, पिस्ता, लाईट वेट, हिरवा, पोपटी, व्हाईट, लाईट गुलाबी, असे कलर द्यावेत. त्याने मनाला एकदम फ्रेश वाटते, आणि सकारात्मक ऊर्जा यांचा तिथे प्रभाव राहतो. 

 किचन मध्ये कडप्पा यांचेही कलर असतात. जसे की लाल, हिरवा, ब्राऊन, काळा कलर चे ग्रॅनाईट आपल्याला बघायला मिळतात. अशा वेळी काळपट गॅस टेबल घेणे शक्यतो टाळावेत. 

किचन मधील वस्तुंच्या काही टिप्स! 

किचन मध्ये आपल्या बारीक-सारीक वस्तूंच्या काही टिप्स, आम्ही आपल्याला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात. 

  • जसे की  सगळ्यांच्या किचन मध्ये फ्रिज असतेच, आता फ्रिज ला सुद्धा दिशा असते, तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया, किचन मधील फ्रीज हे नेहमी वायव्य दिशेस ठेवावे. 
  • तसेच किचन मधील एक्झॉस्ट फॅन हा, किचन मधील गरम वाफ बाहेर काढण्याचे काम करतो, म्हणजे ते एक प्रकारे किचनमध्ये थंडावा देतो, असा एक्झॉस्ट फॅन हा तुमचा ईशान्य दिशेत असावा. 
  • काही काही लोकांच्या किचन मध्ये डायनिंग टेबल असतो. किचन मोठा असेल, तर तुम्ही तशी सोय करू शकतात. त्यासाठी तुम्ही किचनमधील डायनिंग टेबल हा पश्चिमेकडे असल्यास चांगले असते. 
  • किचन मधील ओट्यावर, भिंतींवर, देवांचे फोटो व मूर्ती असू नयेत. तुम्ही भिंतीवर फक्त स्वस्तिक काढून ठेवावा. तसेच किचन समोर टॉयलेट बाथरूम नसावेत, आणि समजा जागे  अभावी किचन च्या समोर टॉयलेट बाथरूम असतील, तर तुम्ही त्यांची दार नेहमी ओढून लावून ठेवावेत. जेणेकरून नकारात्मक ऊर्जा, तुमच्या  किचनमध्ये  प्रवेश  करणार नाहीत. 
  • किचन मधील पाणी पिण्याची तसेच वापरावयाचे नळ हे गळते नसावेत. 
  • तसेच किचन म्हणजे स्वयंपाक घरातील पाण्याची सिंक हे उत्तर व पूर्व असावेत. 
  • किचन मधील पाण्याचा माठ हा अग्नी म्हणजे गॅस जवळ नसावा. 
  • किचन मधील गॅस टेबल खालील, ट्रॉल्या व कपाटांची नेहमी स्वच्छता ठेवावी. जेणेकरून तेथे कॉकरोच होणार नाहीत, झाले तर ते अन्नपदार्थांवर फिरून, तुम्हाला आजाराचे माहेर ते आणू शकतात. 
  • तसेच किचन मध्ये उतरते फॉलसीलिंग असू नयेत. 
वाचा  उशिरा गर्भधारणा होण्याची कारणे व उपाय

स्वयंपाक घरात कसे वागावे कसे ठेवावे? 

“जैसी करिती अन्न तैसे मिळती आहार” ही म्हण आपल्याला लागू होऊ शकते. याचा अर्थ असा आहे, की आपण अन्न म्हणजे स्वयंपाक जशा मनाने करतो, तशा मनाने आपल्याला त्याचा आहार मिळतो. कारण अन्न बनवताना, अन्न बनवणाऱ्याची मन हे नेहमी चांगले व आनंदी असावे. जसे तुमचे मन शुद्ध असेल, तसा सात्विक आहार आपल्याला मिळतो. 

जर तुम्ही चिडचिडी करून स्वयंपाक करत असाल, तर घरातील वातावरण व खाणाऱ्या चे मनही चिडचिडे होते. त्यासाठी स्वयंपाक करताना तुम्ही एखादे भक्तीगीत किंवा एखादा नामजप लावून, जर स्वयंपाक केला, तर तुमच्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्या नांदुन राहते. 

तसेच तुम्ही किचन नेहमी स्वच्छ ठेवायला हवेत. किचन मध्ये खरकटे, भांडे ठेवू नयेत. त्यामुळे तिथे नकारात्मक ऊर्जा यांचा प्रभाव होतो. तसेच लक्ष्मी चा तिथे वास राहत नाही, तेथे लक्ष्मी रुसते. किचनमधील जाळे हे दर शनिवारी  काढायला  हवेत. किचन मध्ये तुम्ही नेहमी स्वच्छता ठेवायला हवी, असे केल्यास तुमचे घर सुख  समृद्धीने, भरायला तयार होते. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की वास्तुशास्त्रानुसार किचन ची रचना कशी हवी. किचन मधील स्वयंपाक करणाऱ्या ची दिशा, कशी असावी, किचन कसा असावा  तसेच सांगितलेल्या माहिती मध्ये जर तुम्हाला शंका येत असेल, तर तुम्ही एखाद्या वास्तुशास्त्रज्ञ कडून ते दाखवून द्यावेत. तसेच आम्ही दिलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

                       धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here