लहान मुलांना उन्हाळी लागणे या समस्येवर घरगुती उपाय

0
5019
लहान मुलांना उन्हाळी लागणे या समस्येवर घरगुती उपाय
लहान मुलांना उन्हाळी लागणे या समस्येवर घरगुती उपाय

लहान मुलांना उन्हाळी लागणे

 वातावरणातील होणारे वेगवेगळे बदल अनेक वेळा आपल्या शरीराला सहन होत नाही किंवा त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. यामधील उन्हाळ्यात आपल्याला हा त्रास अधिक प्रमाणात उद्भवतो. त्याच बरोबर ह्या वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आपल्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम देखील होऊ शकतात.

        उन्हाळा या ऋतूमध्ये बऱ्याच लोकांना विविध समस्या निर्माण होत असतात या समस्येची वेगळी कारणे देखील असू शकतात उन्हाळ्यात आपल्या शरीरात जास्त प्रमाणात उष्णता बाहेर पडते ज्यामुळे आपल्याला उन्हाळी लागणे अशा विविध समस्या निर्माण होऊ शकतात जसे तरुण मुलांना अनेक वेळा उन्हाळी लागणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते, तसेच लहान मुलांना  उन्हाळी लागणे अशा समस्या उद्भवतात. उन्हाळी लागणे म्हणजे लघवी करताना त्या ठिकाणी जळजळ होणे किंवा अस्वस्थ होणे.

       अनेक वेळा लहान मुले उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये उन्हात जास्त वेळ खेळत असतात आणि जर खूपच कडक ऊन असेल तर लहान मुलांना उन्हाळी लागणे अशा समस्या निर्माण होतात. प्रत्येक समस्या निर्माण होण्यामागे त्या समस्येची काही विविध कारणे देखील असते हीच कारणे आपण जाणून घेतली तर या समस्येवर आपल्याला उपचार करण्यास मदत मिळेल व त्याच बरोबर आपल्याला पुढच्या वेळी जर अशी कोणती समस्या उद्भवणार असेल तर त्याची काळजी घेण्यास देखील आपल्याला मदत होऊ शकेल.

        आपल्या प्रत्येकाचे शरीर हे वेगळे आहे प्रत्येकाला प्रत्येक ऋतू किंवा प्रत्येक वातावरण सहन होईलच असे नाही काही मुलांना उन्हाळ्याच्या दिवसातील कडकडून त्यांच्या शरीराला सहन होत नाही आणि त्यामुळे त्यांना उन्हाळी लागणे अशा समस्या उद्भवतात. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण खूप कमी झाल्यामुळे उन्हाळी लागणे अशा समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे शरीरातील क्षारांचे प्रमाण सुद्धा कमी होते. त्यामुळे लहान मुलांना लघवी करताना त्रास जाणवतो.

वाचा  स्वप्नात सरडा दिसणे शुभ की अशुभ

       उन्हाळ्यात बऱ्याच वेळा लहान मुलांना ही समस्या निर्माण होते त्यांना उन्हाळी लागल्यामुळे आपली पचन क्रिया सुद्धा अस्वस्थ होते आणि भूक न लागणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात अधिक प्रमाणात घराबाहेर पडले किंवा लहान मुलांना घराबाहेर जास्त वेळ खेळायला पाठवणे टाळावे. बरेच लोकं उन्हाळी लागणे या समस्येवर विविध उपाय करून बघतात पण योग्य सल्ला नसल्यामुळे ते बऱ्याच वेळा अपयशी ठरतात त्यामुळे  या समस्येवर आपण योग्य मार्गदर्शन घेऊन योग्य घरगुती उपचार करणे गरजेचे आहे

      तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत लहान मुलांना उन्हाळी लागण्याचे मुख्य कारणे कोणती आहेत? आणि त्यावर घरगुती व प्रभावशाली उपाय कोणकोणते करता येतात?चला तर मग बघुया!

लहान मुलांना उन्हाळी लागण्याची कारणे :

१. शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी होणे :-

      उन्हाळ्यात बराच वेळा आपल्या शरीरातील तापमान हे कमी-जास्त होत असते ज्यामुळे आपल्या शरीरातील क्षारांचे प्रमाण हे कमी होते ज्यामुळे बऱ्याच लोकांना किंवा लहान मुलांना उन्हाळी लागणे अशा समस्या निर्माण होतात. लहान मुलांना उन्हाळी लागण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या शरीरातील कमी झालेले क्षारांचे प्रमाण. उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील पाणी घामाच्या माध्यमातून बाहेर पडत असते. त्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि त्यांच्या शरीरातील क्षार कमी होण्यास सुरुवात होतात. यामुळे देखील हा त्रास होतो.

२. पचनक्रिया अनियंत्रित होणे :-

        जर तुम्हाला देखील वरील प्रमाणे लहान मुलाला उन्हाळी लागणे ही समस्या निर्माण होत असेल तर याचे हे देखील एक मुख्य कारण असू शकते उन्हाळ्यात बऱ्याच वेळा आपल्या शरीरावर त्याचे वेगवेगळे परिणाम होत असते. अनेक वेळा उन्हाळ्यात पचन क्रियेवर अधिक प्रमाणात दबाव पडतो. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील क्षार कमी झाल्यामुळे शरीरातील पचनक्रियेसाठी पुरेसे क्षार मिळत नाही. त्यामुळे पचन क्रिया अनियंत्रित होते आणि जास्त भूक लागत नाही आणि याचा परिणाम युरिनरी ब्लेंडर वर दिसून येतो.

वाचा   मासिक पाळी मध्ये काय खावे काय खाऊ नये.

३. आहारातील झालेले बदल :-

      उन्हाळ्यात बराच वेळा आपल्याला भूक लागली की आपल्या पचनक्रियेवर वेगवेगळ्या प्रमाणात जवा पडल्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये सतत बदल करत असतो त्याच बरोबर अनेक वेळा उन्हाळ्यात पौष्टिक आहार न घेतल्यामुळे सुद्धा लहान मुलांना उन्हाळी लागू शकते. उन्हाळ्यात आहारात झालेले वेगवेगळे बदल यामुळेसुद्धा लहान मुलांना उन्हाळी लागले अशा समस्या उद्भवतात.

लहान मुलांना उन्हाळी लागणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय :-

     वरील भागात आपण बघितली लहान मुलांना उन्हाळी लागण्याची कारणे कोणकोणते आहेत? आता आपण बघणार आहोत लहान मुलांना उन्हाळी लागणे थांबवण्यासाठी कोणकोणत्या घरगुती उपाय आपण करू शकतो?

  • लिंबू सरबत घ्यावे :-

       जर तुम्हाला  या समस्या वेळ घरगुती उपचार करायचे असेल तर तुम्ही या घरगुती उपाय याचा वापर करून बघावा उन्हाळ्यात उन्हाळी लागल्यामुळे आपल्या शरीरातील क्षार अधिक प्रमाणात कमी होतात आणि ह्यामुळे आपल्याला लघवी करताना जळजळ होते. जर तुम्ही लिंबू सरबत दिवसातून दोन वेळा घेतले तर तुमच्या शरीरातील क्षार वाढण्यास तुम्हाला मदत मिळेल आणि उन्हाळी लागणे ही समस्या दूर होण्यास तुम्हाला मदत होऊ शकते.

  • काकडीचा रस घ्यावा :-

      उन्हाळी लागणे या समस्येवर आपण काकडीचे देखील वापर करू शकतो काकडी ही आपल्या सर्वांना माहिती असेलच त्याचबरोबर विविध सलाड त्याचबरोबर जेवणामध्ये देखील काकडी चा वापर केला जातो काकडी पासून देखील विविध पदार्थ अनेक वेगवेगळ्या गोष्टी बनवले जातात उन्हाळी लागणे म्हणजेच आपल्या शरीरातील उष्णता अधिक प्रमाणात वाढणे. ही उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही काकडीचा रस घ्यावा. हा काकडीचा रस रोज दिवसातून एकदा घेतल्यामुळे तुमच्या शरीरातील अधिक प्रमाणात उष्णता कमी करण्यासाठी मदत करते. याचे मुख्य कारण म्हणजे काकडीमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध पोषक तत्त्वं मुळे लहान मुलांना उन्हाळी लागणे या नमस्ते पासून आपल्याला आराम मिळण्यास मदत मिळू शकेल 

  • हळदीचे दूध प्यावे :-

    हळद आपल्या सर्वांना माहिती असेलच हळदीचा वापर स्वयंपाक घरात विविध कामांमध्ये केला जातो त्याचबरोबर विविध पर्वती उपचारांमध्ये देखील या हळदीचा वापर केला जातो आपल्या आयुर्वेदानुसार हळद ही वेगवेगळ्या समस्यांवर गुणकारी ठरली आहे. जर तुम्हाला देखील लहान मुलांना उन्हाळी लागणे ही समस्या निर्माण झाली असेल तर आपण त्यांना हळदीचे दूध प्यावेला द्यावे लहान मुलांना जेवणानंतर हळदीचे दूध प्यावे. हळदीमध्ये असलेल्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे लहान मुलांना उन्हाळी लागणे अशा समस्या दूर होण्यास तुम्हाला मदत मिळेल. त्यामुळे लहान मुलांना उन्हाळी लागणे या समस्येपासून आराम मिळण्यासाठी हा घरगुती उपाय आपल्याला मदतगार किंवा फायदेमंद ठरू करू शकते

वाचा  बेंबीत तूप टाकण्याचे फायदे.

      आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले लहान मुलांना उन्हाळी लागण्याची कारणे कोणती आहे ? त्याचबरोबर त्याचा घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल ,तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here