लहान बाळ रडत असल्यास काय करावे

0
1167
लहान बाळ रडत असल्यास काय करावे
लहान बाळ रडत असल्यास काय करावे

नमस्कार, मित्रांनो एकदा मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो, त्याचा दीड वर्षाच्या मुलगा आणि माझा दोन वर्षाचा मुलगा, हे दोघे एकत्र खेळत होते. पण खेळता-खेळता त्याच्या मुलाला अचानक काय झाले, काय माहित, तो सारखा रडायलाच लागला. मी सुध्दा घाबरून गेलो. मग मी म्हणालो, काय झाले त्यावेळी, माझ्या मित्राची बायको म्हणाली, पोटात दुखत असेल, किंवा काही झाले असेल. हा केव्हाही सारखा रडायला लागतो. तसेच रात्रीच्या वेळी झोपेतही रडायला लागतो, त्याचे रडणे काही कळतच नाही, काय झाले, समजतच नाही, त्याची फार चिंता वाटते. रडून-रडून तो किती बारीक होऊन गेला, त्याला काय त्रास होतोय, ते पण सांगता येत नाही. दवाखान्यात गेलो, की डॉक्टर म्हणतात, काही नाही झाले, तो एखाद्या वस्तूला घाबरला असेल, त्यामुळे तो रडायला लागला असेल. अशा वेळी आपण त्यांच्याशी काय बोलावे, ते ही समजतच नाही. काही वेळेला  खेळता खेळता लहान बाळ अचानक रडतात.

तर काही रडण्याचे नाटक करतात, आपल्याला कळतच नाही, अशा वेळी मुलं कोणत्या कारणामुळे रडतात, तसेच घरात जेवढे व्यक्ती, त्यांचे तेवढे त्यांचे तर्क असतात, की याच्यामुळे रडतोय, त्याच्यामुळे रडतो, याने घाबरला असेल, किंवा येणे फटका दिला असेल, कोणी म्हणतात, पोटात दुखत असेल, बाबा म्हणतात पडला असेल, प्रत्येकाचे वेगवेगळे कारण असतात. अशावेळी आपण सुद्धा  कन्फ्युज होऊन जातो, तसेच ते रडत असल्यास आपण काय करावेत, त्यांना कोणत्या प्रकारे हसवावे, हे आज आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घ्या लहान बाळ का रडतात ? 

लहान मुले या कारणांमुळे रडू शकतात ? 

लहान मुले रडण्याची आणि कारण आहे, ती आपण आता जाणून घेऊयात ! 

  • जर तुमच्या लहान मुलाला, म्हणजेच बाळाला भूक लागली असेल, असे वेळी त्याला सांगता येत नसेल, तर त्या कारणाने ही लहान मुल रडतात. 
  • तसेच जर त्याला एखादी वस्तू हवी असेल, तर ती बोलता येत नसेल, तर त्यासाठी जिद्द करून ते रडतात. 
  • खेळता खेळता एखाद्या वस्तूला घाबरणे, किंवा घरात  नवीन व्यक्तीला बघणे, किंवा घाबरणे, त्यामुळे मुल अचानक रडायला लागतात. 
  • किंवा त्यांना झोप लागत असेल, अशावेळी त्याची चिडचिड होते, आणि रडतात. 
  • जर त्यांना पोटात दुखत असेल, किंवा एखादा अवयव दुखत असेल, अशा वेळी रडतात. 
  • रात्रीच्या वेळी झोपेमध्ये एखादे स्वप्न बघितले, की ते रडतात. 
  • म्हणतात ना, लहान मुलांना झोपेत देव हसवतो आणि रडवतो. 
  • तसेच, जर त्यांनी अंथरूण मध्ये किंवा डायपर मध्ये लघवी किंवा संडास केली असेल,  ते त्यांना सहन होत नाही, अशा वेळी ते रडतात. 
  • कधीकधी नवीन व्यक्तीचा चेहरा बघून, ते घाबरतात व रडतात. ज्यावेळी त्यांची ओळख होते, तेव्हाच ते त्यांच्याकडेही जातात. 
  • तसेच लहान मुलांना पोट साफ होत नसेल, जर दोन झाले, तरी त्यांचे पोट साफ होत नसेल, तर त्यांच्या पोटात मुरड येतात, आणि पोट दुखते आणि ते रडतात. 
  • लहान मुलांच्या पोटात गॅसेसचे प्रमाण जास्त असते, ज्यावेळी त्यांच्या पोटात गॅसेस हे असतात, त्यावेळी पोटात सारखे गोळे/मुरड येतात, आणि त्यांना ते कळत नाही, त्यामुळे त्यांचे पोट दुखते, त्यामुळे सुद्धा लहान मुले रडतात. 
  • तसेच बाळाची किंवा लहान मुलांची झोप अपूर्ण झाली असेल, म्हणजे थोड्याच वेळात ते लगेच उठले असतील, किंवा आवाजामुळे उठले असतील, अशावेळी ते अपूर्ण झोपेमुळे ही त्यांची चिडचिड होते व ते रडतात. 
  • तसेच त्यांना जर झोपेत गरम होत असेल, त्यावेळी त्याची चिडचिड होऊन ते रडतात. 
वाचा  निरोगी व्यक्तीच्या हृदयाचे ठोके प्रति मिनिट किती असावे

लहान मुले रडत असल्यास, त्यांना कसे शांत करावेत ? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला लहान मुले किंवा बाळ कोणत्या कारणांमुळे रडतात, ते सांगितलेले आहेत. अशावेळी त्यांना शांत कशा प्रकारे करावेत, हे आपण जाणून घेऊयात! 

  • अशावेळी तुम्ही ते कोणत्या कारणांमुळे रडत आहेत, पहिले ते समजून घ्यायला हवेत. 
  • त्याने त्याच्या चड्डीत किंवा डायपर मध्ये संडास किंवा लघवी केली नाही, ते तपासून घ्यावेत. 
  • काही वेळेस लहान बाळाला भूक तर लागली नाही ना, त्याची काळजी करून घ्यावी, त्याला लगेच खायला द्यावेत. 
  • ज्यावेळी बाळ झोपले असेल, तेव्हा बाळाच्या आजूबाजूला जास्त कोणाला फिरू देऊ नका, त्याने बाळाची झोप मोड होते व तो रडतो. 
  • बाळ विनाकारण घाबरून रडत असेल, तेव्हा तुम्ही त्याला बाहेर मोकळ्या हवेत, फिरायला न्यावेत. 
  • किंवा गार्डन मध्ये हे घेऊन जाऊ शकतात. तिथे दुसरे इतर लहान मुले बघून, त्यांना आपोआप बरे वाटते, व हसू येते व त्यांचा मूड चांगला होतो. 
  • बाळ रडत असेल, अशावेळी तुम्ही त्यांना त्यांच्यासोबत खेळणी खेळायला द्यावेत, व तुम्ही त्यांच्यासोबत खेळावेत. 
  • गर्मी मुळे जर बाळ रडत असेल, तर अशावेळी तुम्ही तुम्ही त्याला फॅन लावून द्यावेत, व लाईट गेली असेल तर हाताच्या पंख्याने हवा घालावी. 
  • तसेच लहान मुले रडत असेल, अशा वेळी तुम्ही त्यांना चॉकलेट, आइस्क्रीम यासारखे पदार्थ देऊन, त्यांना हसवण्याचा प्रयत्न करू शकतात. 
  • लहान मुले रडत असतील, अशा वेळी तुम्ही त्यांना गाडीवर फिरायला न्यावे, म्हणजे त्यांना फिरायची मजा वाटते. 

तसेच मुलं रडत असतील, तर डॉक्टरांना किंवा दाखवावे ? 

बऱ्याच वेळेला आपल्याला लहान मुलाचे रडणे हे समजून येत नाही. तसेच आम्ही वरील दिलेल्या माहितीमध्ये लहान मूल रडत असल्यास, त्यांना कशाप्रकारे शांत करावेत ते सांगितले आहे, तसे करूनही जर लहान मुलांचे रडणे थांबत नसेलच, ते चिडचिड करत असतील, जेवणही करत नसतील, अशा वेळी तुम्ही डॉक्टरांना दाखवावे. कारण त्यांच्या पोटात दुखत असेल, किंवा त्यांना काही त्रास होत असेल, हे आपल्याला लवकर कळून येत नाही. त्यामुळे तुम्ही त्वरित वेळ न घालवता, डॉक्टरांना दाखवून द्यावेत. 

वाचा  डोळ्यांसाठी उपयुक्त व्यायाम कोणते ?

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला लहान मुले रडत असल्यास, काय करावेत, त्यांना कशाप्रकारे शांत करावे, व डॉक्टरांना किंवा दाखवावे, हे सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही  शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

                          धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here