नमस्कार मित्रांनो. जेव्हा घरात लहान बाळ जन्माला येत असते तेव्हा ते घर आनंदाने भरलेले असते. त्यामुळे बाळ आणि बाळाच्या आईची खूप काळजी घेतली जात असते. अगदी बाळाचा जन्म झाल्यानंतर तेव्हापासून बाळाची खूप काळजी घेतली जात असते. लहान बाळ हे खूप नाजूक आणि कोमल असते त्यामुळे त्याला पकडताना देखील व्यवस्थित प्रकारे पकडले पाहिजे. तसेच बाळाला आपल्या हातांचा डायरेक्ट स्पर्श न करता बाळाच्या अंगाखाली एखादा सॉफ्ट कपडा घेतला पाहिजे किंवा मुलायम शाल यावर बाळाला घेतले पाहिजे. कारण नवजात बाळ हे खूप नाजूक असतात. लहान मूल म्हटले की खूपच काळजी घ्यावी लागते असते कारण आपल्या मुळे वाला इन्फेक्शन होणार नाही त्यामुळे खात्री घेतलेली बरी. सर्व प्रकारची काळजी घेऊन देखील कधीकधी लहान मुलांच्या अंगावर पुरळ येण्याची समस्या उद्भवत असते.
काही लहान बाळांना तर जन्मताच बारीक बारीक पुरळ असतात परंतु ते काही कालांतराने आपोआप निघून जातात. तर काहींना जन्म झाल्यानंतर पुरळ येत असतात. त्यामुळे लहान बाळाची पालक खूप घाबरत असतात. बाळाला पुरळ कशामुळे आले असतील? नेमके आपण काळजी घेणे मध्ये कोणती चूक केली? असे एक ना अनेक प्रश्न पालकाला उद्भवत असतात. लहान बाळाला पुरळ येण्याची एक ना अनेक कारणे असू शकतात. याबद्दल देखील आपल्या जाणून घ्यायला हवे. तर मित्रांनो आज आपण लहान मुलांच्या अंगावर पुरळ येणे याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग, लहान मुलांच्या अंगावर पुरळ येणे या बद्दल खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.
लहान मुलांच्या अंगावर पुरळ येण्याची नेमकी कोणती कारणे असू शकतात ?
लहान बाळाचा जन्म झाल्यापासून त्याचे आई-वडील खूप काळजी घेत असतात. तसेच त्याला डायरेक्ट म्हणजेच हातांचा स्पर्श न करता लहान बाळाच्या अंगाखाली काहीतरी शाल वगैरे घेऊनच पकडले जात असते. परंतु एवढे सर्व प्रकारची काळजी घेऊन देखील लहान मुलांना अंगावर पुरळ येण्याची समस्या निर्माण होत असते. अंगावर पुरळ येणे ही समस्या लहान बालकांमध्ये जास्त प्रमाणात आठवण येत असते. लहान बाळाचा जन्म झाल्यावर देखील चेहऱ्यावर पिंपल दिसून येऊ शकतात तसेच काही बालकांना दोन-तीन आठवड्यांमध्ये देखील पुरळ येत लहान बालकांच्या अंगावरचे पुरळ हे काही गुलाबी, नाहीतर पिवळसर, नाहीतर लालसर रंगाचे असल्याचे आढळून येत असतात. आणि हे अंगावरील पुरळ घामोळ्या पेक्षा खूप लहान आकाराचे जर कामाला झाले असतील तर ते सर्वत्र ठिकाणी असतात परंतु अंगावरचे पुरळ हे शरीरावरील काही भागातच दिसून येतात. तर लहान मुलांच्या अंगावर पुरळ येणे, कोणत्या समस्येमुळे येऊ शकतात, याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.
- डिलिव्हरी नंतर बाळाच्या आईला टाके रिकव्हर करण्यासाठी गोळ्या औषधे घ्यावे लागत असतात. आणि या गोळ्या औषधींचा परिणाम म्हणून बाळाच्या अंगावर पुरळ येण्याची शक्यता असते. कारण बाळ हे आईच्या अंगावरचे दूध पीत असते त्यामुळे बाळाच्या आईने घेतलेल्या गोळ्या औषधींचा परिणाम हा बाळावर होताना दिसून येत असतो. परिणामी बाळाच्या अंगावर पुरळ येण्याची समस्या येऊ शकते.
- लहान बाळाचा जन्म झाल्यावर त्याला बाहेरील जगातील वातावरणाशी मिळतेजुळते करून घ्यायला खूप कालावधी लागत असतो. कारण बाळ जेव्हा आईच्या पोटात असतो तेव्हा तेथील वातावरण आणि जन्म झाल्यानंतर बाहेरील वातावरण या दोघांमध्ये खूप फरक असतो. त्याचप्रमाणे बाळाची त्वचा ही खूपच नाजूक आणि कोमल असते. त्यामुळे जर वातावरणाशी व्यवस्थित जुळवून घेता आले नाही तर बाळाच्या त्वचेवर पुरळ येण्याची समस्या होत असते.
- तसेच बाळाच्या अंगावर पुरळ येणे याचे एक कारण म्हणजेच घाम. घामामुळे देखील बाळाच्या अंगावर पुरळ येण्याची शक्यता असते त्यालाच घामोळ्या येणे असे देखील म्हटले जाते. त्यामुळे बाळाच्या शरीरावर ज्या ठिकाणी थांबले आले असतील ती जागा पुन्हा लालसर होताना दिसून येते.
- तसेच एखादी एलर्जी म्हणून देखील बाळाच्या अंगावर पुरळ येण्याची समस्या होत असते. बऱ्याच वेळा आंघोळ करताना जो आपण साबण लावत असतो त्या साबणाची ऍलर्जी म्हणून देखील बाळाच्या अंगावर पुरळ येण्याची शक्यता असते.
- बाळाच्या अंगावर पुरळ येणे याचे एक कारण म्हणजे बाळा ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणाची अस्वच्छता. बाळाला पण ज्या ठिकाणी झोपत असतो तेथील जागाही स्वच्छ ठेवली पाहिजे तसेच बाळाचा अंथरूण हे अस्वच्छ असले तर त्यामुळे देखील बाळाला पुरळ येण्याची समस्या उद्भवते.
- तसेच बाळाचं डिहायड्रेशन होत असेल म्हणजेच बाळाच्या शरीरातील पाणी हे कमी पडत असेल तर त्यामुळे देखील बाळाला पुरळ येण्याची समस्या उद्भवू शकते.
- जर एखादं बाळ हे थोडा मोठा असेल आणि तो जर आईच्या दुधा व्यतिरिक्त वरचं खाणं चालू केलं असेल तर त्याला एखाद्या पदार्थाची ऍलर्जी झाल्यामुळे देखील बाळाच्या अंगावर पुरळ येण्याची शक्यता असते.
- लहान बाळाला जर तुम्ही मसाज करत असाल म्हणजेच मालिश करत असाल आणि जर ते महान लहान बाळाच्या शरीराला सुट झाले नाही, तर त्या एखाद्या तेलामुळे देखील पुरळ येण्याची शक्यता असते.
मित्रांनो, लहान बाळाच्या अंगावर पुरळ येणे ही समस्या वरील सर्व कारणांमुळे येऊ शकते. दर लहान बाळाच्या अंगावर पुरळ येणे ची समस्या असेल तर तुम्ही जास्त घाबरून जाऊ नका. त्यावर काही उपाय देखील करता येतील. आणि उपाय करून देखील पुरळ जात नसतील तर तुम्ही डॉक्टरांना दाखवणे योग्य ठरते. तर लहान बाळाच्या अंगावर पुरळ येणे यावर कोणते उपाय करता येतील याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.
लहान मुलांच्या अंगावर पुरळ आल्यास कोणते उपाय करता येतील ?
लहान मुलांच्या अंगावर पुरळ येणे मागचे कारणे कोणती हे आपण वरीलप्रमाणे जाणून घेतलेले आहे. तर लहान मुलांच्या अंगावर पुरळ आल्यास कोणते उपाय करता येतील याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.
- तुम्ही लहान बाळाला ज्या ठिकाणी झोपत असाल म्हणजेच लहान बाळाची झोपेची जागा ही नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. तसेच लहान बाळाचे कपडे हे दिवसातून दोन-तीन वेळा तरी बदलले पाहिजे जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचे ऍलर्जी होऊ नये. लहान बाळाचे अंथरूण हे जर स्वच्छ असेल तर लहान बाळाला पुरळ येण्याची समस्या उद्भवत नाही.
- ज्यात मी लहान बाळाला तेलाने मसाज करतात म्हणजेच मालिश करतात आणि जर त्यातील सूट होत असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने लहान बाळाला कोणत्या तेलाने मालिश करावी याबद्दल जाणून घ्यावे जेणेकरून लहान बाळाला पुरळ येण्याची समस्या होणार नाही.
- त्याचप्रमाणे तुम्ही लहान बाळाला आंघोळ करताना एखाद्या साबणाची ऍलर्जी होत असेल तर तुम्ही त्या बाबतीत देखील डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते जेणेकरून लहान बाळाला फळे येण्याची समस्या होणार नाही.
- बऱ्याच वेळा लहान बाळांना घाम आल्यामुळे देखील घामोळ्या होण्याची शक्यता असते म्हणजे सांगाल पूर येण्याची शक्यता असते त्यामुळे प्रत्येक ऋतूनुसार बाळाचे कपडे व्यवस्थित असायला हवेत. म्हणजेच पायाला कपडे घातल्यावर त्याला घाम येणार नाही अशा प्रकारचे त्याची ड्रेस घालावेत. उन्हाळ्यात जास्त करून लहान बाळांना घाम येण्याची शक्यता असते त्यामुळे उन्हाळा ऋतूनुसार लहान बाळाचे काळजी खूप घ्यायला हवी. जेणेकरून लहान बाळाला पुढे येण्याची समस्या उद्भवणार नाही.
- बाळाला तुम्ही जे बेबी प्रोडक्ट्स वापरणार आहेत त्याबद्दल डॉक्टरांकडून जाणून घेऊनच मग ते बेबी प्रोडक्ट वापरायला सुरुवात करावी. जेणेकरून, लहान बाळाला त्याची एलर्जी होणार नाही.
- लहान बाळाला जर अंगावर पुरळ आले असतील तर तुम्ही काही दिवस तरी तेलाने मसाज करायला नको नाहीतर अजून वाढण्याची शक्यता असते.
- बाळाला पुरळ आले असतील तर तुम्ही ते नखाणे फोडण्याचा प्रयत्न करू नका. तसेच तुम्ही त्याला योग्य त्या प्रमाणात स्तनपान करू द्यावे. जेणेकरून,आलेले पुरळ हे आपोआप जाण्यास मदत होईल.
- जर लहान मुलांच्या शरीरातील पाणी हे कमी झाले असेल आणि त्यामुळे जर येत असतील तर तुम्ही लहान मुलाला पाणी जास्त पिण्यास द्यावे. तसेच पिण्याचे पाणी हे उकळून थंड केलेले स्वच्छ पाणी असावे. लहान मुलांना पाणी मुबलक प्रमाणात द्यावे. जेणेकरून ते डिहायड्रेशन होण्यापासून त्यांचा बचाव होऊ शकेल.तसेच, त्यांची त्वचा देखील निरोगी राहण्यास मदत होईल आणि अंगावरील पुरळ देखील जाण्यास मदत होईल.
- बऱ्याच वेळा बाळाच्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे देखील पुरळ येण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही बाळाला योग्य त्या पद्धतीने स्तनपान करू द्यावी जेणेकरून बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल.
- जर बाळाच्या अंगावर आलेले पूर हे लालसर झालेले असतील आणि त्यामुळे बाळाला खूप खाज येत असेल किंवा बाळ चिडचिड अथवा रडत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे बाळाला घेऊन जायला हवे जेणेकरून डॉक्टर तुम्हाला योग्य तो मलम v लोशन देतील. जेणेकरून बाळाक्या अंगावर आलेले पुरळ जाण्यास मदत होईल.
मित्रांनो, लहान मुलांच्या अंगावर पुरळ येण्याची नेमके कोणते कारणे असू शकतात ? तसेच लहान मुलांच्या अंगावर पुरळ आल्यास कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी? कोणत्या प्रकारचे उपाय करावे ? याबद्दल आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहे. याबद्दल अजून तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही डॉक्टरांची भेट घ्यावी व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.
धन्यवाद !