नारळ पाणी पिण्याचे फायदे व तोटे माहिती आहे का ? जाणून घ्या

0
1237
नारळ पाणी पिण्याचे फायदे व तोटे
नारळ पाणी पिण्याचे फायदे व तोटे

नमस्कार, मित्रांनो नारळ म्हणजे श्रीफळ होय. नारळाची पूजा अगदी पूर्वीच्या काळापासून आपल्या देवघरामध्ये केली जाते. श्रीफळ म्हणजे लक्ष्मीचे फळ होय. तसेच कोणतेही पूजा असो, नारळ शिवाय पूर्ण होत नाही. अगोदर कलश ठेवावा लागतो, नंतर पूजा आरंभ होते. तसेच  नारळ फोडून खोबऱ्याचा प्रसाद, नारळ पाणी, आपल्या दिले जाते, ते शरीरासाठी फायदेशीर असते. तसेच नारळाचे पाणी आपण पितो, नारळाच्या पाण्याची चवही गोड असते, कधीकधी ती थोडी खळवट ही असते, आमची आजी त्याला खौट नारळ म्हणायची, खौट झालेला नारळ आपण नदीमध्ये अर्पण करून देतो, काहीजण त्याला नारळ खराब झाले, असंही म्हणतात.

तसे नारळाचे पाणी पिण्यास योग्य नसते. नारळाचे पाणी चांगले असेल, तरच घ्यावे. तसेच नारळ पाणी पिण्याचे फायदे हे अनेक जणांना माहिती नसतात. आपल्याकडे एक प्रथाच बनवून गेलेली आहेत. जर कोणी आजारी असेल, तर अशा पेशंटला आपण नारळ पाणी घेऊन जातो. तसेच डॉक्टरही त्यांना नारळाचे पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण नारळाचे  पाणी पिण्यामागे फायदे नेमके काय असू शकतात? नारळ पाणी आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते ? त्यामध्ये गुणधर्म आपल्याला ऊर्जा आणि उत्साह देणारे असतात. तर चला, मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत, की नारळाचे पाणी पिल्याने तुम्हाला काय फायदे होतात ? चला जाणुन घेऊयात ! 

नारळाचे पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे ? 

मित्रांनो, नारळाचे पाणी हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. पण त्यापासून कोणते फायदे होतात, हे आपल्याला माहित नाहीत, त्यामुळे चला जाणून घेऊया. 

वाचा  दही खाण्याचे फायदे व तोटे

नारळाच्या पाण्यातील गुणधर्म –

नारळाच्या पाण्यामध्ये खूप सारे गुणधर्म असतात. म्हणजेच पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, मिनरल्स, इलेक्ट्रोलाईट, विटामिन सी, जीवनसत्वे, प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर ,सोडियम, कॅल्शियम, खनिजे, फोलेट, हे ऊर्जा देणारे घटक असल्यामुळे आपल्या शरीराला दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास, मदत मिळते. त्यामुळे थकवा जाणवत नाही. 

तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते –

नारळाचे पाणी पिल्याने तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. ज्यावेळी तुम्ही एखाद्या आजारातून निघतात. अशक्त असतात, अशावेळी डॉक्टर तुम्हाला नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. कारण त्यामधील गुणधर्म तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्या गुणधर्मामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. शिवाय प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही जर नियमित एक नारळाचे पाणी पिले, तर तुम्हाला त्याचे साईड  फायदे जास्त होतात. 

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते –

नारळ पाणी मध्ये पोटॅशियमचे प्रमाण असते. तसेच या मधील गुणधर्म आपले हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यास मदत मिळते. त्यामुळे हृदयाशी संबंधित तक्रारी तुम्हाला होत नाही. त्यासाठी जर तुम्ही नियमित नारळ पाणी प्यायला हवे. 

रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास फायदेशीर ठरते –

नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम, फायबर, मॅग्नीज या सारखे गुणधर्म असल्यामुळे, तुमच्या शरीरातील वाढता रक्तदाब कमी करण्यासाठी मदत होते. तुमच्या उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो. शिवाय रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. त्यासाठी तुम्ही नियमित नारळ पाणी प्यायला हवेत. तसेच घेण्यापूर्वीच तुम्ही डॉक्टरांना विचारून ही घेऊ शकतात. 

मुतखड्याच्या त्रासावर आरामदायी ठरते –

जर तुम्ही नियमित नारळाचे पाणी पिले, तर तुम्हाला मूतखड्याचा त्रास असेल, तर तो जाण्यास मदत मिळते. कारण नारळाचे पाणी पिल्याने पोटातील सगळी घाण बाहेर निघते. शिवाय मूत्रमार्गात आलेली अडचण दूर होण्यास मदत मिळते. त्यामध्ये येणारे अडथळे, खडे हे बाहेर येण्यास मदत मिळते. त्यासाठी तुम्ही नियमित नारळाचे पाणी प्यायला हवेत, त्यामुळे तुमच्या मुतखड्याच्या त्रासावर आराम मिळतो. 

वाचा  सिझेरियन नंतर घ्यावयाची काळजी.

मधुमेहींसाठी फायदेशीर ठरते –

हो, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल. पण नारळ पाणी हे मधुमेहींसाठी फायदेशीर ठरते. कारण आपल्या शरीरात वाढत्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात आणण्यास मदत मिळते. शिवाय त्या आपल्या शरीरातील इन्सुलिनची पातळीत जर कमतरता आली असेल, तर तुम्ही नियमित नारळाचे पाणी प्यावे. त्यामुळे तुमची इन्सुलिन लेवल सुरळीत राहते. तसेच  त्यामध्ये नैसर्गिक गोडवा असतो. त्यामुळे त्याची आपल्याला साईड इफेक्ट होत नाही. 

गरोदरपणात फायदेशीर ठरते –

गरोदरपणामध्ये, नारळाचे पाणी फायदेशीर ठरते. कारण  त्यावेळी तुम्ही एका जीवाचे दोन जीव झालेले असतात. नारळ पाण्यामधील खनिजे तत्वे, मिनरल्स, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम गुणधर्म त्या स्त्रीला व बाळाला दोघांना मिळते. म्हणून गरोदरपणात तुम्ही नियमित नारळ पाणी पिले, तर तुमच्या शरीराला ऊर्जा टिकून ठेवण्याचे काम मिळते. म्हणून डॉक्टर गरोदरपणामध्ये तुम्हाला नारळ पाणी प्यायला सांगतात. 

अशक्तपणा थकवा आल्यास नारळपाणी योग्य ठरते –

बऱ्याच वेळेला खूप जणांना कमजोरी असते, त्यांना जेवण जात नाही, अशक्तपणा येतो थकवा येतो. अशा वेळी जर त्यांनी नारळ पाण्याचा वापर त्यांच्या आहारात केला, तर त्यांच्या शरीराला त्याचे फायदे होतात. कारण नारळ पाण्यामधील गुणधर्म हे माणसाला सुदृढ व निरोगी राहण्यास मदत करतात. तसेच नारळ पाणी पिल्याने, शरीरात ऊर्जा निर्माण होते व आपण दिवसभर तार पाणी पीत राहीले, तर ताजेतवाने देखील वाटते. थकवा व कमजोरी असल्यास जाण्यास मदत मिळते. 

वयस्कर लोकांसाठी फायदेशीर ठरते –

वाढत्या वयामध्ये वृद्ध वयस्कर लोकांना त्यांच्या शारीरिक समस्या भरपूर लवकर उद्भवतात. जेवण न जाणे, थकवा येणे, अशक्तपणा जाणे, कमजोरी होणे, त्यांच्या शरीरातील ऊर्जा ही हळूहळू कमकुवत होऊन जाते. अशा वेळी त्यांनी रोज एक नारळ पाणी पिले, तर त्यांच्या शरीराला ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते. शिवाय त्यांच्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे ते लवकर आजारी पडत नाही. 

वाचा  स्वप्नात सोयाबीन दिसणे शुभ की अशुभ

तुमच्या सौंदर्यात भर पडते –

जर तुम्ही नियमित नारळाचे पाणी पिले, तर त्याचा परिणाम तुमच्या सौंदर्यावर ही पडतो. त्यामुळे तुमच्या चेहर्‍यावर एक प्रकारची चकाकी येते. तसेच केसांसाठीही फायदेशीर असते. तसेच जर तुम्ही नारळाचे पाणी चेहर्‍यावर लावले, किंवा नारळ पाण्याने केस धुतले, तरी केसांना चकाकी व चमक येते. केस सॉफ्ट आणि मुलायम होतात. 

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते –

हो, आता हे काय? तुम्ही म्हणाल, की नारळाचे पाणी पिल्याने कसे वजन कमी होणार, तर होणार! नारळाचे पाणी पिल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. कारण नारळ पाण्यामध्ये ऊर्जा, नैसर्गिक ड्रिंक म्हणून त्याचा वापर केला जातो. त्यामधील पोषक तत्व आपल्या शरीराला मिळतातच, पण जर तुम्ही रोज सकाळी एक नारळाचे पाणी पिले, तर तुम्हाला भुकही कमी लागते, आणि भूक कमी लागल्यामुळे, तुमचा त्याच्या वजनावर परिणाम होतो. वजन कमी होण्यास मदत मिळते. 

नारळ पाणी पिल्याने होणारे तोटे :

मित्रांनो, नारळाचे पाणी हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. पण म्हणतात ना ! कोणतीही गोष्ट प्रमाणात घ्यावी, तिचे प्रमाण वाढले, की त्याचे आपल्या शरीराला त्याचे दुष्परिणाम दिसून येण्यास मदत मिळते. तसे नारळाचे पाणी चे ही आहेत. तसेच त्याची पिण्याची  वेळ असते, नारळाचे पाणी हे सकाळच्या वेळी घ्यावे, तसेच ज्यांना सर्दी-खोकला आहे, अशा लोकांनी नारळाचे पाणी त्यावेळी पिऊ नये. तसेच तुम्हाला जुलाब होत आहे, मळमळणे यासारखे वाटते, अशा वेळी नारळ पाणी पिऊ नये. तसेच तुम्हाला पोटदुखी पोटफुगी सारखे, समस्या असेल, त्यावेळी नारळाचे पाणी पिऊ नये. सहसा करून नारळाचे पाणी सकाळी प्यावेत. रात्री पिऊ नयेत. ही काळजी घ्यावीच. तसेच आम्ही सांगितलेले उपायांमध्ये जर तुम्हाला नारळ पाण्याची ऍलर्जी असेल, तर त्या डॉक्टरांना विचारूनच द्यावेत. 

चला, तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला नारळ पाणी पिण्याचे तुमच्या शरीराला होणारे फायदे, तसेच तोटेही सांगितलेले आहेतच. नारळाचे पाणी हे आपल्या शरीरासाठी फायदेशीरच असतेच. पण त्याचा वापर करण्यापूर्वी तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला घेतला, तर अगदी चांगले होईल. तसेच आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, तसेच आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असेल, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here