पायातील अंगठ्यामध्ये नखोला होणे म्हणजे काय?

0
768
पायातील अंगठ्यामध्ये नखोला होणे म्हणजे काय?
पायातील अंगठ्यामध्ये नखोला होणे म्हणजे काय?

आपले आरोग्य चांगल्या राहण्यासाठी आपण आपल्या शरीराची वेळोवेळी काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक अवयवांची विशिष्ट प्रकारची काळजी घेतली पाहिजे. जर आपले शरीर सुदृढ असेल, प्रत्येक अवयव हे निरोगी असतील, तर आपण आपले सर्व काम सहजरीत्या पूर्ण व्यवस्थितपणे पार पाडू शकतो. म्हणून कामातून थोडासा वेळ काढून तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. नियमितपणे व्यायाम केले पाहिजेत व्यायामावर भर दिला पाहिजे. जेणेकरून, आपल्या शरीरातील सर्व अवयव हे लवचिक आणि मजबूत राहतील. शिवाय, आपण आपल्या आहारामध्ये सर्व प्रकारचे विटामिन युक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे. जेवणातून आपल्याला सर्व प्रकारचे पोषक तत्व पोषक घटक मिळाले पाहिजे.वातावरण बदलानुसार देखील अनेक प्रकारच्या समस्या या येत असतात. त्यामुळे वातावरण बदलानुसार, ऋतूंच्या बदलानुसार आपण आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. परंतु अनेक वेळा काळजी घेऊन देखील अनेक प्रकारच्या समस्यांना आपला सामोरे जावे लागत असते. मित्रांनो, आज आपण अशाच एक प्रकारच्या समस्ये बद्दल जाणून घेणार आहोत, ते म्हणजे पायातील अंगठ्यामध्ये नखोला होणे म्हणजे काय? आणि ही समस्या का निर्माण होते यावर काय उपाय आपण करू शकतो? याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग, पायातील अंगठ्यांमध्ये नखोला होणे म्हणजे काय? आणि त्यावरील उपाय याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

पायातील अंगठ्यांमध्ये नखोला होणे म्हणजे काय?

पायातील अंगठ्यामध्ये अनेक वेळा नखोला होण्याची शक्यता असते. पायातील अंगठ्यामध्ये नखोला होणे म्हणजेच एक प्रकारे हे फंगल इन्फेक्शन असते. ज्या व्यक्ती शेतामध्ये सतत कार्य करत असतात सतत त्यांच्या पायांच्या संपर्क हा पाण्याशी ओल्या जमिनीशी होत असतो तर अशा व्यक्तींना ही समस्या येण्याची शक्यता असते. ऑफिसला जाण्यासाठी अनेक जण शूज घालत असतात शूज आणि जर वापर करत असतात तर दिवसभर कुठं घातल्यामुळे त्यामुळे तळपायांना पायाच्या बोटांना घाम येत असतो आणि त्यामुळे बॅक्टेरिया देखील वाढत असतात आणि यामुळे देखील फंगल इन्फेक्शन होऊ शकते. धावपटू यांना देखील ही समस्या जास्तीत जास्त होण्याची शक्यता असते कारण सतत धावण्यामुळे धावण्याची प्रॅक्टिस केल्यामुळे त्यांच्या पायांवर, तळ पायांवर तसेच पायातील बोटांच्या घर्षणामुळे त्यांना हे इन्फेक्शन लवकर होत असते. तसेच, दिवसभर आपल्या पायांची बोटही एकमेकांना चिकटलेली असतील,तर त्यामुळे घाम येऊ शकतो आणि घाम आल्यामुळे ही समस्या येण्याची शक्यता असते. पावसाळ्याच्या दिवसात देखील ही समस्या जास्त प्रमाणात उद्भवत असते सतत पावसाच्या संपर्कात आल्यामुळे पाय ओळीचिंब झाल्यामुळे शिवाय ते व्यवस्थित कोरडे न केल्यामुळे पायाच्या अंगठ्यामध्ये नखोला होण्याची शक्यता असते. मित्रांनो, तुम्हाला देखील ही समस्या आली आहे का? जर अशी समस्या आली असेल, तर या समस्या कडे आपण वेळीच लक्ष दिले पाहिजे. या समस्या कडे दुर्लक्ष करायला नको. कारण हे एक प्रकारचे फंगल इन्फेक्शन असते आणि आपण जर याकडे दुर्लक्ष केले तर हे इन्फेक्शन अजून इतरत्र ठिकाणी पसरण्याची शक्यता असते. आणि त्या ठिकाणी खाज देखील सुटू लागते वेदना सहन करावे लागतात. तरी या इन्फेक्शन पासून आपल्याला सुटकारा मेळावा हे इन्फेक्शन दूर व्हावे यासाठी आपण काही उपाय देखील करू शकतो चला तर मग यासाठी आपण कुठल्या प्रकारचे घरगुती उपाय करू शकतो याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

वाचा  नासपती खाण्याचे फायदे व तोटे
पायातील अंगठ्यामध्ये नखोला
पायातील अंगठ्यामध्ये नखोला होणे

पायातील अंगठ्यांमध्ये नखोला झाल्यास घरगुती उपाय:- Gharguti Upyog 

टी ट्री ऑइल चा वापर करा : Tea Tree Oil Cha Vapar

पायातील अंगठ्यामध्ये नखोला म्हणजेच फंगल इन्फेक्शन झालेले असल्यास टी ट्री ऑइल चा वापर हा अत्यंत फायदेशीर ठरतो. टी ट्री ऑइल हे एक प्रकारे अँटिक सेप्टिक क्रीम प्रमाणे काम करते. तर मित्रांनो, याचा वापर कसा करायचा, त्यासाठी तुम्ही एक चमचा नारळाच्या तेलामध्ये ती ट्री ओईल चे दोन ते तीन थेंब व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यावे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालेले आहे त्या ठिकाणी तुम्ही हे व्यवस्थित कापसाच्या साह्याने लावून घ्यावे. असे दिवसातून तुम्ही दोन वेळा करावे असे केल्यास तुमची ही समस्या जाण्यास मदत होऊ शकते.

कडुनिंबाच्या पानांचा उपयोग : Kadunimbachya Panancha Use

मित्रांनो, फंगल इन्फेक्शन साठी कडुलिंबाच्या पानांचा उपयोग हा अत्यंत गुणकारी ठरतो. जर तुम्हाला तुमच्या पायांच्या बोटांमध्ये फंगल इन्फेक्शन झालेले असेल तर त्यासाठी तुम्ही कडुनिंबाची पाने व्यवस्थित स्वच्छ करून मिक्सर च्या साह्याने पेस्ट बनवून घ्यावी. कडुलिंबाच्या पानांची पेस्ट तयार झाल्यावर तुम्हाला चिमूटभर त्यामध्ये हळद टाकायची आहे. व्यवस्थित मिश्रण एकजीव करून ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झाले आहे, तर कापसाच्या बोळ्याच्या सहाय्याने व्यवस्थित लावून घ्यावे,असे केल्यामुळे देखील तुमचे पायांच्या पोटातील फंगल इन्फेक्शन झाल्यास मदत होणार आहे.

पायांना हवा लागू द्यावी : Payana Hava Lagu Dyavi

अनेक जण ऑफिसला किंवा इतर कामांसाठी जाताना बूट घालत असतात परंतु जर तुम्ही बुटातून थोड्या वेळासाठी देखील पाय बाहेर काढले नाहीत तर यामुळे तुम्हाला पायांच्या बोटांमध्ये अधिक फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. यासाठी तुम्ही अधून मधून सॅंडल घालावी. जर तुम्ही बूट घालत असाल तर थोड्या काळासाठी तुम्ही बुटातून पाय बाहेर काढावेत त्यांना बाहेरील हवा लागू द्यावी जेणेकरून तुमच्या पायांना अतिरिक्त प्रमाणात घाम येणार नाही आणि घाम आला असेल तर तो जाण्यास मदत होईल रात्री झोपताना तुम्ही तुमच्या पायांना स्वच्छ थंडगार पाण्याने धुऊन त्यांना तेलाने मसाज करून झोपावे. आणि जास्तीत जास्त तुम्ही तुमचे पायांना घाम येऊ न देता पाय कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करावा.

वाचा  मासे खाल्ल्यानंतर काय खाऊ नये ?

फिटकरी चा उपयोग करा : Fitkari Cha Use Kara

जर तुमच्या पायातील बोटांमध्ये नखोला झाला असेल, म्हणजेच इन्फेक्शन झालेले असेल, तर त्यासाठी तुम्ही फिटकरीचा देखील उपयोग करू शकतात. आंघोळीच्या पाण्यात तुम्ही नेहमी फिटकरी फिरवून त्या पाण्याने अंघोळ केली पाहिजे. तसेच, पायांच्या बोटांमध्ये ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालेले असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही फिटकरीचे पाणी बनवून फंगल इन्फेक्शन ला व्यवस्थितपणे लावून घ्यावे आणि ते कोरडे होऊ द्यावे. असे केल्यामुळे देखील तुमचे फंगल इन्फेक्शन लवकर जाण्यास मदत होऊ शकते.

एलोवेरा जेल चा उपयोग करा : Aleovera Gel Cha Upyog

मित्रांनो, एलोवेरा म्हणजेच कोरफड ही सर्वांच्याच घरात उपलब्ध असते. जर तुमच्या पायांच्या बोटांमध्ये फंगल इन्फेक्शन झालेले असेल, तर त्यासाठी तुम्ही कोरफडीच्या रसाचा उपयोग केला पाहिजे. कोरफळीचा रस व्यवस्थित काढून ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालेले आहे, त्या ठिकाणी व्यवस्थित लावून घ्यावे. यामुळे त्या ठिकाणी आग होणार नाही. थंडावा मिळेल आणि त्या ठिकाणी खाजही सुटणार नाही आणि तुमचे फंगल इन्फेक्शन लवकर बरे होण्यास मदत होऊ शकते.

मित्रांनो, पायातील अंगठ्यामध्ये नखोला होणे म्हणजे काय आणि त्यावर आपण कुठल्या प्रकारचे उपाय करू शकतो, याबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

धन्यवाद..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here