पोटात गॅस होण्याची कारणे व उपाय

0
1482
पोटात गॅस होण्याची कारणे व उपाय
पोटात गॅस होण्याची कारणे व उपाय

 

नमस्कार, मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या जीवनात, आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही, कोणत्याही वेळी खातो, तसेच कोणत्याही वेळी झोपतो. आपण वेळेचे बंधन तर पाळतच नाही, तसेच आपण जेवण टायमावर करत नाही, आपला आहार व्यवस्थित घेत नाही, पुरेसे पाणी पीत नाही, जेवण चाऊन न खाने, जागरण करणे, पुरेशी झोप न होणे, तसेच काही लोक जेवणाच्या वेळा पाळत नाही, तर काही लोक  दोन जेवणाच्या वेळेमध्ये अंतर न ठेवता लगेच खातात. तसेच बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ, चायनीज पदार्थ, तेलकट पदार्थ, मसालेदार पदार्थ, उग्र पदार्थ, यासारखे पदार्थ खातो. त्याच्यामुळे आपल्याला पोट दुखी, पोट साफ न होणे, यासारख्या समस्या आपल्याला बघावयास मिळतात. पोटात गॅस होणे म्हणजे तुमची पचनसंस्था बिघडणे, त्यांच्यामुळे आपल्याला ऍसिडिटी गॅसेस होणे  आम्लपित्त होणे, पोटफुगी, डोकेदुखी यासारख्या समस्या आपल्याला बघावयास मिळतात.

तसेच ज्या लोकांना पोटात सारखे गॅसेस होतात त्यांना चार-चौघात फार लाजिरवाण्‍या सारखे वाटते, अशावेळी तुम्ही काय व कोणते, घरगुती उपाय करायला हवेत. ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तसेच आपण अशा वेळी आपल्या आहाराची योग्य काळजी घ्यायला हवी. जेवण वेळेवर करायला हवे. दोन जेवण चे अंतर व नियम पाळायला पाहिजे. मग ते नेमके कोणकोणते आहेत? 

चला तर जाणून घेऊया तुमच्या पोटात गॅसेस सारख्या समस्या होत असतील, तर नेमके कोणते नियम तुम्ही पाळायला हवे? त्यावर काय उपचार करायला हवेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

 पोटात गॅसेस ची कारणे ? 

पोटात गॅसेस होण्याची अनेक कारणे आहेत, ती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात. 

  • अतिशय जागरण करणे, 
  • पुरेशी झोप न होणे, 
  • सारखे सारखे चहा-कॉफी पिणे, 
  • अमली पदार्थ धूम्रपान तसेच तंबाखूचे, सेवन केल्यामुळे, पोटात गॅस होऊ शकतात. 
  • जेवण बारीक जाऊन न खाने, 
  • उग्र पदार्थ खाणे. 
  • जेवण वेळेवर न करणे. 
  • उपवास करणे, 
  • एकाच जागेवर बसून काम असल्यास, पोटात गॅसेस होऊ शकतात. 
  • दोन जेवणांच्या मध्ये अंतर न ठेवता लगेच खाणे.
वाचा  मोड आलेले मूग यांचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला वेगवेगळे फायदे :-

पोटात गॅस झाल्यास लक्षणे ? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की पोटात गॅसेस होण्याची कारणे, आता आपण लक्षणे जाणून घेणार आहोत! 

  • ज्यावेळी पोटात गॅसेस होतात, त्यावेळी पोटाचं आवाज येतो. 
  • पोटफुगी सारखे वाटते. 
  • पोटाचा आकार वाढले सारखे वाटते, 
  • मळमळ वाटणे, 
  • डोकेदुखी होणे, 
  • ऍसिडिटी सारखे वाटणे, 
  • काही खावेसे वाटत नाही, 
  • सारखे सारखे ढेकर येणे, 
  • पोटात गोळे येणे, 

पोटात गॅसेस होत असल्यास, काही घरगुती उपाययोजना ! 

अनेक जणांना पोटात गॅसेस पोटफुगी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते, अशा वेळी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात. 

नींबू चा वापर करून बघा :

हो, कारण नींबू मध्ये सायट्रिक ऍसिड असते. तसेच विटामिन सी असते, जे पोटातील गॅसेस दूर करण्यास मदत करतो. जर तुमच्या पोटात गॅसेस, पोट फुगी, पोट दुखी या सारख्या समस्या असतील, अशा वेळी, जर तुम्ही निंबु त्यात + काळे मीठ यांचे मिश्रण एकजीव करून पिले, तर तुमच्या पोटात गॅसेस होण्याच्या समस्यांवर, तुम्हाला त्वरित आराम मिळेल. 

जीरा वापरून बघा :

ज्यावेळी तुम्हाला अपचन, पोटात गॅसेस, पोट फुगी, पोट दुखी यासारख्या समस्या असतील, अशा वेळी जर तुम्ही जिऱ्याचे पाणी पिले, तर तुम्हाला फायदा होईल. त्यासाठी तुम्हाला जिरे भाजून  त्याची बारीक पावडर बनवून घ्यायची, आणि सकाळी उठल्यावर उपाशीपोटी ते पाणी पिल्याने, तुमच्या पोटातील गॅसेस हे कमी होण्यास मदत मिळते, व तुमची पचन संस्था ही सुरळीत होते. 

ओवा वापरून बघा :

आता तुम्ही म्हणाल की, मसाल्याचे पदार्थ तुमच्या पोटातील गॅसेस समस्या कशा दूर करू शकतात ? तर खरचं ! या पदार्थांमुळे तुमचे पोटातील गॅसेस लवकरात लवकर कमी होतात. जेव्हा तुमच्या पोटात गॅसेस होतात, तुम्ही ओव्यांचा वापर केला, तर तुम्हाला ताबडतोब फरक पडेल. त्यासाठी तुम्हाला ओवा ची पावडर करून घ्यायची आहे, त्यात काळे मीठ घालायचे आहेत, आणि कोमट पाण्यामध्ये टाकून ते पाणी पिल्याने, तुमच्या पोटातील गॅसेस व पोट दुखी सारख्या समस्या वर त्वरित आराम मिळेल.

वाचा  दाढ दुखीवर उपाय स्वागत तोडकर

अद्रक चा रस चा वापर करा :

ज्यावेळी तुमच्या पोटात गॅसेस, पोटफुगी सारखे होते, अशा वेळी जर तुम्ही अद्रक चा रस +त्यात काळे मीठ यांचे मिश्रण एकजीव करून, त्याचे चाटण करून, त्यावर कोमट पाणी पिल्याने, तुमच्या पोटाचे दुखणे व पोट फुगल्यासारखे वाटणे, यासारख्या समस्येवर तुम्हाला त्वरित आराम मिळेल. 

बडीशोप खात राहा :

बडिशोप ही पाचक असते, कधीही, कुठेही तुम्ही गेल्यावर तुम्हाला जेवणानंतर बडीशेप देतात. त्यामागील असे शास्त्र आहे, की तुमचे जेवण झाले, बडीशोप ही पचन संस्था सुरळीत करण्याचे काम करते, तुमच्या पोटात गॅसेस व पोटदुखी सारख्या समस्या असतील, अशा वेळी तुम्ही बडीशोप भाजून त्यात खडीसाखर मिश्रण करून ठेवावी. ज्यावेळी तुम्हाला वाटते की, तुमची पोटात गॅसेस सारखे वाटत आहे, तेव्हा तुम्ही यांचे मिश्रण खावे, त्याने तुम्हाला आराम मिळेल. शिवाय पोटातील वायू चा त्रास होणार नाही. 

जलजीरा पावडर चा वापर करा :

हल्ली मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला जलजीरा पावडर मिळते, जर तुम्हाला पोटात गॅसेस व पोटफुगी सारखे वाटत असेल, त्यावेळी ही जलजीरा ची पावडर पाण्यामध्ये मिसळून पिऊन घ्यावी, त्याने तुमच्या पोटातील गॅसेस लवकरात लवकर बाहेर निघून, मोकळे वाटेल व शौचास साफ होईल. 

त्रिफळा चा वापर करत जा :

त्रिफळा चूर्ण पोटातील गॅसेस, पोटफुगी, पोट दुखी, आम्लपित्त, यासारख्या समस्यांवर फार रामबाण उपाय आहे. कारण त्रिफळा हे तीन फळांनी बनलेले आहे, त्रिफळा हे आवळा, हरड आणि बेहडा या फळांनी बनलेले आहे. जी पचनसंस्था सुरळीत करण्याचे काम करते. शिवाय तुम्हाला पोटात गॅस असलेल्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. त्रिफळा चूर्ण तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन वेळेस घ्यायची आहे, सकाळी कोमट पाण्याबरोबर अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण टाकून पिल्यास, तुम्हाला अशा समस्यांवर आराम मिळेल. 

पोटात गॅसेस होऊ नये म्हणून काही टिप्स :

अनेक लोक व त्यांचे जेवण व्यवस्थित करत नाही, त्याने त्यांचे जेवण वेळेवर करायला हवे, आज आम्ही तुम्हाला पोटात गॅसेस होऊ नये, म्हणून काही टिप्स सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात! 

  • तुम्ही जेवण वेळेवर करावे, 
  • जेवण बारीक चाऊन करावे, 
  • तेलकट, मसालेदार, तुपकट पदार्थ खाणे टाळावेत. 
  • जेवणानंतर अर्धातास पाणी पिऊ नये, 
  • जर तुम्हाला ऍसिडिटी सारख्या समस्या असतील, अशा वेळी जर तुम्ही उग्र पदार्थ म्हणजेच डाळी, तुर दाळ, उडीद डाळ, चना दाळ यासारखे डाळीचे पदार्थ तुमच्या आहारात कमीत कमी घ्यावे, 
  • कठीण उपास करू नये, 
  • पुरेसे पाणी प्यायला हवे, 
  • जेवणानंतर लगेच झोपू नये, 
  • जागरण करू नये झोप पुरेशी घेणे 
वाचा  फास्टफुड खाण्याचे नुकसान

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला पोटात गॅसेस होण्याची कारणे व त्यावर काही उपाय सांगितलेले, आहेत. तसेच आम्ही सांगितलेले उपाय करूनही  जर तुम्हाला फरक पडत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकतात. तसेच आम्ही सांगितलेले उपायांमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

                         धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here