फास्टफुड खाण्याचे नुकसान

0
523
फास्टफुड खाण्याचे नुकसान
फास्टफुड खाण्याचे नुकसान

नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया फास्टफुड खाण्याचे शरीराला होणारे नुकसान. हल्लीच्या धावपळीच्या जगात आपल्यावर कामाचा लोड येत असतो. सतत काम करत राहणे कामासाठी धावपळ करणे यामध्ये आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. आपण आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी घरगुती अन्न खाल्ले पाहिजे. त्यामध्ये हिरव्या पालेभाज्यांच्या फळभाज्यांचा समावेश हा आवर्जून केला पाहिजे. शिवाय नियमितपणे काही फळांचे तरी सेवन केले पाहिजे ज्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होते.

परंतु हल्ली कामाच्या घाईगडबडीत, ऑफिसला जायला त्व कामाला जायला उशीर होऊनही या गडबडीत आपण घरचे आणण्याचा डबा घ्यायला विसरतो अथवा राहून जातो. आणि अशा वेळेस आपण बाहेरील अन्न खाणे पसंत करतो. परंतु मित्रांनो तुम्हाला माहित आहे का ? बाहेरचे अन्न हे आपल्या शरीरासाठी किती धोकादायक ठरू शकते. बाहेरचे फास्टफुडखाल्ल्यामुळे त्यापासून आपल्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्तीचे होत असतात.

आजकाल सर्वजण पासपोर्ट खाण्याला पसंती देत असतात. सुट्टीचा दिवस आला म्हणजे रविवारी आला तर काहीजण घरी न जेवता बाहेर जाऊन फास्ट फूड खाणे पसंत करतात. फास्टफुड म्हणजे काय ? याविषयी तरी तुम्हाला माहित आहे काय ? फास्टफुड म्हणजेच रवा, मैदा, नमक, साखर, तेल इत्यादींचा वापर त्यामध्ये जास्त होत असतो. यासारख्या पदार्थांची जास्तीचे सेवन जर आपण केले तर आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

तुम्ही सतत बाहेरील फास्ट फूड खाणे पसंत करत असाल तर त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. फास्टफुड यामधून तुम्हाला फायदा तर होणारच नाही कारण यामधून आवश्यक ती जीवनसत्वे, प्रोटिन्स मिनरल्स, आयर्न, पोटॅशियम, विटामिन्स, कॅल्शियम या सर्व महत्त्वपूर्ण घटकांचा अभाव असतो. तर मित्रांनो, आता तुम्हीच सांगा बरे नेहमी फास्टफूड खाणे यातून तुम्हाला नेमका फायदा तरी कशाचा होऊ शकतो? यातून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पोषकतत्वे पोषक घटक मिळत नाही. तर मित्रांनो, फास्टफूड खाल्ल्यामुळे अजून कोणत्या प्रकारचे नुकसान तुम्हाला होऊ शकतात?  या विषयाबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी.

मित्रांनो आज आपण फास्ट फूड खाण्याचे नुकसान या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग खाल्ल्यामुळे कोणत्या प्रकारचे नुकसान होऊ शकतात याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

वाचा  जेवण झाल्यावर पोटात दुखणे कारणे व उपाय

फास्ट फूड खाण्याचे नुकसान:-

मित्रांनो घरातील अन्न खाणे, त्यामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा, फळभाज्यांचा आवर्जून समावेश असायला हवा. यामधून तुम्हाला आवश्यक ती जीवनसत्वे तुमच्या शरीराला मिळण्यास मदत होत असते. शिवाय, प्रोटिन्स, विटामिन्स तुमच्या शरीराला चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. जर तुम्ही तुमच्या आहारात योग्य त्या पोषक घटकांचा पोषक तत्वांचा समावेश करत असाल तर तुमचे आरोग्य हे दीर्घकाळ चांगले राहण्यास मदत होते शिवाय तुम्ही दीर्घकाळ चिरतरूण दिसण्यासाठी देखील मदत होते. परंतु मित्रांनो शरीराला योग्य आहार न घेता आपण खाल्ले तर त्यामुळे अनेक प्रकारचे नुकसान आपल्या शरीराला भोगावे लागतात. तर फास्टफुड खाण्याचे नुकसान याबद्दल आपण आता जाणून घेऊयात.

 • आज कल कॉलेज मधले तरुण-तरुणी मधल्या वेळेमध्ये बाहेर जाऊन फास्ट फूड खाणे पसंत करत असतात. परंतु घरातील अन्न खाता तुम्ही सतत बाहेरील फास्टफूड खाणे पसंत करत असाल तर यामुळे तुमच्या शरीराला तर फायदा होणार नाही परंतु नुकसान हे मोठ्या प्रमाणात होऊ शकते.
 • नियमित फास्टफूड खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरात अतिरिक्त चरबी जमू लागते. शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते.
 • सतत फास्टफूड खाल्ल्यामुळे आपल्या शरीराचे वजन हे अधिक वाढत जाते. शिवाय, खाल्लेले अन्न व्यवस्थित पचन न झाल्यामुळे त्याचे रूपांतर हे चरबीमध्ये होत असते. जेणेकरून चरबी ही वाढत जाते व लठ्ठपणा येऊ लागतो.
 • नेहमीच फास्टफूड खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही लवकर कमी होत जाते. कारण फास्ट फूड खाण्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा होत नसतो त्यातून कुठल्याही प्रकारचे पोषकतत्व पोषक घटक आपल्या शरीरात मिळत नाही उलट आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रकारे वाढलेली असते ती लवकर कमी होत जाते. तुम्हाला तर माहीतच असेल, की आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे कोण – कोणते फायदे होऊ शकतात तर?
 • सतत बाहेरील फास्टफूड खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे संसर्गजन्य आजार देखील लवकर होण्याची शक्यता असते.
 • नेहमी फास्टफूड खाल्ल्यामुळे आपल्याला पोटाचे विकार देखील जडू शकतात खाल्लेले अन्न हे व्यवस्थित पचन होऊन त्यामुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
 • मित्रांनो, फास्ट फूडयामध्ये पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा जास्तीत जास्त वापर केलेला असतो. तुम्हाला तर माहीतच आहे पांढऱ्या वस्तू कोणत्या ते? होय मित्रांनो, त्या पांढऱ्या वस्तू म्हणजे मीठ साखर मैदा इत्यादी. तर फास्ट फूड मध्ये या तीन पांढरा पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश असतो आणि या पदार्थांचे सतत आपण सेवन केल्यामुळे अनेक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागू शकते.
 • घरगुती अन्न न खाता फास्टफूड खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची एनर्जी देखील कमी होत जाते. शिवाय, शरीराला लवकर थकवा येऊ लागतो.
 • नेहमी फास्ट फूड चे सेवन न केल्यामुळे आपल्या बुद्धीचा विकास देखील होत नाही शिवाय शरीरातला आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो.
 • सतत फास्ट फूड खाल्ल्यामुळे आपल्या शरीराचा आकार बिघडतो. म्हणजेच शरीराचा आकार बिघडून शरीराला लठ्ठपणा येऊ लागतो.
 • फास्ट फूड म्हटले तर त्यामध्ये तेलकट पदार्थ हे आलेच. सतत तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील आतड्यां यामध्ये विषारी घटक जमू शकतात. म्हणजेच फास्टफक जे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील आतड्यात बिघडू शकतात. खराब होऊ शकतात. म्हणून तुम्ही तेलकट पदार्थांचे सेवन जितके टाळले तेवढे तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
 • फास्ट फूड यामध्ये फक्त तिखट पदार्थांचा आणि जास्तीत जास्त तेलकट पदार्थांचा समावेश असतो. तसेच यामध्ये गोड पदार्थांचा समावेश असतो. यांचे नेहमी सतत जर आपण सेवन करत राहिले तर यामुळे आपल्या आरोग्य धोक्यात येऊ शकते.
 • लहान मुले देखील फास्ट फूड हे आवडीने खाणे पसंत करतात. शिवाय मॅगी पिझ्झा बर्गर यांचे नियमित सेवन केल्यामुळे त्यांना पोटाचे विकार देखील जळू शकतात त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही लवकर कमी होते. त्यामुळे ते नेहमी नेहमी आजारी पडू शकतात.
 • जर तुम्ही सतत फास्ट फूड याचे सेवन करत राहिलात तर हृदयरोग यासारख्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात.
 • नियमित फास्ट फूड याचे सेवन करत राहिल्यामुळे कॅन्सर सारख्या आजाराने देखील बळी पडावे लागते.
 • जर तुम्हाला तुमचे आरोग्य हे चांगले ठेवावे असे वाटत असेल शिवाय तुमच्या शरीराला आवश्यक ते जीवनसत्त्वांचा पुरवठा व्हावा शरीरातील कॅल्शिअम वाढावे असे वाटत असेल तर तुम्ही फास्ट फूड खाणे ऐवजी घरातील पौष्टिक आहार घेतला पाहिजे.
 • हिरव्या पालेभाज्या फळभाज्या यांची नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या पट्टीने वाढण्यास मदत होऊ शकते परंतु तुम्ही फास्ट फूड खाणे टाळायला हवे.
 • फास्ट फूड हे पदार्थ बनवताना योग्य त्या स्वच्छतेची काळजी घेतली जात नसते. शिवाय ते कशा प्रकारे बनवतात असतील याविषयी आपल्याला माहीत नसते. म्हणून असले पदार्थ खाण्यामुळे आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो.
 • पाणीपुरी इतर सर्व जण आवडीने खातात. परंतु पाणी पुरी बनवताना स्वच्छता बाळगली गेली आहे का? पाणी पुरी बनवताना पाणीपुरीचे पाणी हे स्वच्छ वापरलेले आहेत का? याबद्दल आपल्याला कल्पना नसते. आणि आपण एक एन्जॉय म्हणून त्याचे सेवन करत असतो परंतु, यामुळे आपण आजारी देखील करू शकतो.
वाचा  बाळ गुटगुटीत होण्यासाठी

तर मित्रांनो, आपले शारीरिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी आपण घरातील पदार्थ खाल्ले पाहिजेत. बाहेरील फास्ट फूड खाणे हे तुम्ही जेवढे टाळले तेवढे तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकते. फास्ट फूड हे तुम्ही एक एन्जॉय म्हणून त्याचे सेवन करत असतात. परंतु हे फास्ट फूड खाणे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते शिवाय, त्यामधून तुम्हाला कुठल्याही पोषक तत्वांचा, पोषक घटकांचा पुरवठा होत नाही. फास्ट फूड यामधून जीवनसत्व देखील मिळत नाहीत.

याउलट, फास्टफुड च्या मध्ये तुम्हाला तेलकट, गोड, आंबट,तिखट, मैदा युक्त पदार्थांचे सेवन करावे लागते, जे आपल्या शरीरासाठी खूपच घातक ठरू शकते. फास्ट फूड हे सतत खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणात चरबी साठायला लागते. म्हणून मित्रांनो तुम्ही घरगुती जेवण जितके खाल तेवढे तुमचे आरोग्य चांगले राहील व इतर आजारांपासून तुमचा बचाव होईल 

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कसे वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे कळवू शकतात.

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here