नमस्कार मित्रांनो. हल्लीचा काळ हा खूप धावपळीचा काळ आहे. प्रत्येकाची सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कामातच धावपळ चाललेली असते. त्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष होत असते. अगदी आपल्या आरोग्याकडे देखील आपले दुर्लक्ष होत असते. कामाच्या धावपळीमुळे आपण स्वतःच्या खान्याकडे देखील दुर्लक्ष करत असतो. जे आले ते पटापट गपागपा खायचे आणि लगेच कामाला लागायचे. यामुळे शरीराचे वजन देखील वाढत जाते. रोजच्या धावपळीमुळे आपल्या स्वतःच्या शरीराकडे आपण दुर्लक्ष करतो अगदी काहींना तर व्यायामाला सुद्धा वेळ मिळत नसतो. परंतु मित्रांनो, काम हे रोजच करावे लागतील परंतु आपण आपल्या शरीराच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करणे हे फार चुकीचे ठरते. आपले शरीर स्वस्थ राहील तरच आपण काम योग्य प्रकारे करू शकू. अनेक जणांना तर श्वास घेण्यास देखील त्रास होत असतो. श्वास घेताना अंग दुखणे सारख्या समस्या होत असतात.
परंतु या धावपळीच्या कामांमध्ये त्यांचे स्वतःकडे दुर्लक्ष होत असते. आपल्याला काय त्रास होत आहे याकडे देखील त्यांचे लवकर लक्ष जात नाही. कारण श्वास घेण्याच्या समस्या लवकर लोकांना कळत नसतात. या समस्येची कारणे आणि लक्षणे हे लवकर लक्षात येत नाही त्यामुळे त्यांना आपल्याला श्वास घेण्याबद्दल त्रास होतेय की काय हे लवकर समजत नाही. म्हणून बरेच जण सुरुवातीला या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतात. आणि या समस्येकडे दुर्लक्ष केले तर ही समस्या पुढे जाऊन गंभीर स्वरूपाची होऊ शकते. म्हणून वेळीच सावधगिरी बाळगली पाहिजे.
मित्रांनो श्वास घेणे म्हणजे शरीरात ऑक्सिजन घेण्याची क्रिया घडून येत असते. जर आपण श्वास घेताना अडथळा निर्माण होत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, तसेच श्वास घेताना आपले अंग देखील दुखत असेल तर आपण वेळीच सावध झाले पाहिजे आणि वेळेस डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार घेतले पाहिजे. तर मित्रांनो आज आपण श्वास घेताना अंग दुखणे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग खालील प्रमाणे श्वास घेताना अंग दुखणे या विषयी माहिती जाणून घेऊयात.
Table of Contents
श्वास घेताना अंग दुखण्याची कारणे नेमकी कोणती ?
मित्रांनो,जोपर्यंत शरीरात श्वास घेण्याची क्रिया ही सुरळीतपणे चाललेली असते तोपर्यंत आपण बिनधास्त असतो. म्हणजे जोवर आपल्याला त्रास होत नाही, तोपर्यंत आपण याकडे दुर्लक्ष करतो. आणि श्वास घेताना अंग दुखणे ही क्रिया बरेच जणांना लवकर ही कळत नाही. कारण त्याची लक्षणे बऱ्याच जणांना माहीत नसतात. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे त्यामध्ये लाल पेशी असतात. आणि त्या लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. आणि हेच हिमोग्लोबिन आपल्या रक्तातून शरीरामध्ये ऑक्सीजन पुरवण्याचे काम करत असते. आणि जर हे हिमोग्लोबिन प्रमाणापेक्षा कमी असेल तर आपल्याला थकवा जाणवू शकतो. तसेच श्वास घेताना अंगदुखी होऊ शकते आणि श्वास घ्यायला देखील त्रास होतो. तर काही जण हे सतत आजारी पडू शकतात. म्हणून शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण हे योग्य प्रमाणात असेल तर हा त्रास उद्भवू शकत नाही. परंतु, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर आपला श्वास घेण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो तसेच श्वास घेताना अंगदुखीची समस्या निर्माण होते तर काहींना दम्याचा प्रॉब्लेम देखील होऊ शकतो. श्वास व्यवस्थित घेता न आल्यामुळे घाबरल्यासारखे देखील वाटायला लागते.
श्वास घेताना पाठ आणि पोट का दुखू शकते ?
मित्रांनो, शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण हे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्रास होत नाही. परंतु, हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी झाल्यामुळे श्वास घेताना देखील त्रास होऊ शकतो. श्वास घेताना त्रास होत असल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. एखादी व्यक्ती जर ही कामाच्या धावपळीत पाठीवर पडली तर पडल्यामुळे त्या व्यक्तीला श्वास घेताना त्रास होऊ शकतो. कारण, पाठीवर पडल्यामुळे पाठीच्या मणक्याला सूज येते. आणि परिणामी श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. शरीर हे असे असते की एका ठिकाणी इजा झाली तर दुसऱ्या ठिकाणी त्रास होऊ लागतो. पाठीवर पडल्यामुळे पाठीच्या मणक्याला सूज आल्यामुळे अथवा पाठीला सुज आल्यामुळे श्वास घेताना खूप त्रास होऊ लागतो. यासाठी श्वास घेताना हळुहळु पद्धतीने घ्यावा.
बरेच जणांचे बैठे काम असते. कामाचा इतका व्याप असतो की स्वतःकडे स्वतःच्या शरीराकडे देखील आपलं दुर्लक्ष होते. त्यामुळे जेवण झालं की बसा. बैठे काम यामुळे शरीराला स्थूलत्व प्राप्त होऊ शकते. थोडे आपण पायऱ्या चढलो किंवा धावपळ झाली की दमायला होते. आणि यामुळे देखील यामुळे श्वास घ्यायला अडथळा निर्माण होतो त्रास होत असतो. स्थूलत्व प्राप्त झाल्यामुळे पोटातील स्नायूंना त्याचा ताण पडत असतो. थोडी आपण पटापट चालायला लागलो अथवा पायऱ्या चढायला लागलो तरी दम लागून घाबरण्यासारखे होते त्यामुळे पोटातील स्नायूंवर ताण पडून श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, आपण नियमित व्यायाम करण्यावर भर घातला पाहिजे. श्वास संबंधीचे व्यायाम नियमितपणे न चुकता करणे योग्य ठरू शकेल.
श्वास घेण्यासाठी कुठल्या प्रकारचे घरगुती उपाय करता येतील अथवा व्यायाम करता येईल ?
मित्रांनो, श्वास घेणे म्हणजेच ऑक्सिजन शरीरामध्ये घेणे आणि कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर सोडणे ही प्रक्रिया चालू असते. बऱ्याच लोकांना शरीराला स्थुलत्व प्राप्त झाल्यामुळे थोडेही चालले तसेच थोड्याही पायऱ्या चढले तरी त्यांना दम लागतो. त्यांना श्वास घेण्यासाठी देखील अडथळा निर्माण होत असतो. म्हणून श्वास घेताना त्रास होऊ नये, यासाठी नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. तर मित्रांनो, श्वास घेण्यासाठी काही घरगुती उपाय करता येईल तसेच व्यायाम देखील करता येईल हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.
- मित्रांनो, श्वास घ्यायला त्रास होऊ नये यासाठी नियमित व्यायाम करणे योग्य आहे यासाठी तुम्ही अनुलोम-विलोम हा व्यायाम करणे आवश्यक ठरते. अनुलोम-विलोम व्यायाम करणे म्हणजेच डाव्या नाकपुडी वर अंगठा ठेवून उजव्या नाकपुडीतून हवा हवा आत घेणे. आणि थोड्या वेळानंतर उजव्या नाकपुडी वर अंगठा ठेवून दुसऱ्या डाव्या नाकपुडी वरचा अंगठा सोडून आत घेतलेली हवा हळुवारपणे बाहेर सोडणे. अशी क्रिया तुम्ही पाच ते पंधरा मिनिट करावी याने तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होणार नाही.
- तसेच शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढावे यासाठी तुम्ही तुमच्या नेहमीच्या आहारात पोषक घटकांचा समावेश करावा.
- शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी बीटरूट चा समावेश आवर्जून करावा कारण बीटमध्ये आयरण,फॉलिक ऍसिड आणि इतर पोषक तत्त्वांचा समावेश असतो. यामुळे हिमोग्लोबिन चे प्रमाण देखील वाढत असते.
- आहारात डाळिंबाचा समावेश जरूर करून बघावा कारण, डाळिंबाच्या रसामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वांचा समावेश असतो ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढू शकते.
- हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढावे यासाठी संध्याकाळी कोमट पाण्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करून ते पाणी प्यावे. यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढून शरीरातील ऑक्सिजन पातळी वाढत असते.
- शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढण्यासाठी आवळ्याचा रस आणि जांभूळ याचा रस समप्रमाणात घेऊन कोमट पाण्यात प्यावे. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
- तसेच, खजूर चे देखील सेवन करावे यामुळे शरिरातील अशक्तपणा दूर होऊन शरीरातील ऑक्सिजन पातळी वाढते.
- तसेच रोज सकाळी लवकर उठून नियमित वॉकिंग ला जाणे देखील फायदेशीर ठरते यामुळे सकाळची शुद्ध व फ्रेश हवा ही शरीरात जात असते त्यामुळे ऑक्सिजन पातळी वाढते. आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो.
- तुमच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी ही व्यवस्थित असावी यासाठी तुम्ही नियमित आहारात फ्रेश हिरव्या पालेभाज्यांचा समावेश जरूर करावा. यामुळे तुमचे आरोग्य देखील चांगले राहील.
- अधिक वजन वाढल्यामुळे देखील श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून नियमित व्यायामावर भर द्यावा रोज किमान एक तास तरी चालण्याचा व्यायाम करावा.
- तान तनाव अधिक घेतल्यामुळे देखील श्वास घ्यायला त्रास होत असतो आणि अधिक ताण तणाव घेणे आपल्या शरीरासाठी देखील हानिकारक आहे. म्हणून तुम्ही तुमची जीवनशैली ही तणाव मुक्त करायला हवी. कामाचे टेंशन तर हे सगळ्यांनाच असते. परंतु यातून ही तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टीसाठी वेळ काढला पाहिजे. विनोद ऐकले पाहिजेत. कॉमेडी मुव्हीज बघितले पाहिजे, याने तुम्ही ताणतणाव रहित रहाल.
- तुम्ही स्वतःला जेवढे खूश होणार तेवढे तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल. नेहमी स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे यामुळे तुम्ही तणावरहित राहाल.
- तसेच तुम्ही नियमितपणे ध्यान करायला हवे याने तुम्ही तणाव मुक्त राहू शकाल.
मित्रांनो, श्वास घ्यायला त्रास होऊ नये यासाठी तुम्ही प्राणायाम, ध्यान, योगासने नियमितपणे केले पाहिजे. सकाळी लवकर उठून ताज्या हवेमध्ये जाऊन वॉकिंग केली पाहिजे. यामुळे दिवस हा फ्रेश आणि उत्साही राहतो. तुमच्या घरातील दारे-खिडक्या उघडे राहू द्यावे, जेणेकरून घरातील दूषित हवा बाहेर जाऊन बाहेरील शुद्ध हवा घरात येण्यास मदत होईल. शरीरातील फुफ्फुसांचे कार्य हे व्यवस्थित राहावे यासाठी नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक ठरते. नेहमी स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न देखील केला पाहिजे. मित्रांनो, श्वास घेण्यासाठी जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार घ्यावा. पुढे भविष्यात जाऊन आजार जास्त वाढण्यापेक्षा तत्काळ डॉक्टरांना दाखवलेले बरे ठरू शकते.
मित्रांनो, वरील प्रमाणे आपण श्वास घेताना अंग का दुखू शकते? तसेच श्वास घेताना पाठ आणि पोट दुखू शकते? याविषयी माहिती जाणून घेतले आहे. तुम्हालाही या बाबतीत जर जास्त त्रास होत असेल तर तुम्ही तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो सल्ला घेऊन उपचार घ्यावा. वरील प्रमाणे, आम्ही सांगितलेली माहिती आहे तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.
धन्यवाद !