मित्रांनो, आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग म्हणजे टाळू अर्थातच डोके. डोक्याच्या कवटीत आपला मेंदू असतो व हा मेंदू सर्व शरीराचे नियंत्रण करीत असतो. डोके दुखीचा त्रास झाला नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. डोके दुखायला लागले की कांही सुचेनासे होते. अशावेळी चटकन एखादी वेदनाशामक गोळी घेण्याकडे आपला सहजच कळ वळतो. पण डोकेदुखी नेमक्या कोणत्या कारणाने होते, हे कळले तर त्यावर अगदी सोपे उपाय करूनही डोकेदुखी थांबवता येते. हल्लीच्या काळात तर टाळू दुखणे ची समस्या सगळ्यांनाच निर्माण होत आहे.
हल्लीच्या धावपळीचे जगामध्ये कामाचा व्याप हा खूप वाढलेला आहे.वेळ कमी आणि काम जास्त, असे सर्वांचे झालेले आहे. बरेच लोकांचे जेवण याकडे देखील लक्ष होत राहत नाही आणि कामाच्या व्यापामुळे काही लोक जेवण करायला ही वेळ मिळत नाही. तर काही लोक काही घाईघाईने जेवण करतात यामुळे अपचनाची समस्या निर्माण होते आणि अपचन झाले म्हणजेच डोकेदुखीचा त्रास हा आलाच.
आपण डोकेदुखीच्या वेदना गंभीर्याने घेतल्या पाहिजे. अशी काही निदाने आहेत जी घेतले पाहिजे आणि जर आपण त्याकडे लक्ष दिले नाही तर आणखी तीव्र होऊ शकते. दुखीडोके अनेक कारणांमुळे होत असते. मित्रांनो तुम्हाला ही डोकेदुखीचा त्रास होत आहे का ? तसेच डोकेदुखीची नेमके कारणे कोणती ? लक्षणे कोणती ? डोकेदुखी वर इलाज काय करावे ? तसेच डोके दुखण्यावर घरगुती उपाय करता येतील काय ? डोके दुखल्यास कुठल्या प्रकारे काळजी घ्यावी ? या विषयी आपण आज जाणून घेणार आहोत.
Table of Contents
टाळू दुखणेची कारणे कोणती ?
मित्रांनो, हल्लीच्या धावपळीच्या जगात डोकेदुखी सर्वसामान्य समस्या बनलेली आहे. असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही की ज्याचे डोके दुखत नसेल. डोकेदुखीची नेमकी कारणे कोणती डोके दुखी ही नेमकी कशामुळे होते ह्या विषया पण आता जाणून घेणार आहोत.
- रात्री उशिरापर्यंत झोपणे म्हणजे जागरण करणे हे डोकेदुखीला कारणीभूत ठरते.
- कामाचा अतिशय ताण तणाव असणे
- ऍलर्जीमुळे देखील डोकेदुखी होते.
- सर्दी झाल्यास
- मानेवरील ताण
- टीव्ही मोबाईल किंवा लॅपटॉप समोर सतत बसल्याने डोळ्यांवर पडणारा ताण
- रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे यामुळे होणारी डोकेदुखी
- अनियमित मासिक धर्म
- सतत निरंतर चिंता व मानसिक तणाव
- सतत दुःखी राहणे शरीरातील आम्ल यांचे प्रमाण कमी-अधिक झाल्यामुळे
- कडक उन्हात फिरणे, थकवा
- मादक पदार्थांचे सेवन
- अनिद्रा
तर वरील सर्व कारणांमुळे डोकेदुखी ची समस्या निर्माण होत असते. हल्ली कामाचा खुप ताण तणाव होत असतो. या कारणामुळे देखील डोकेदुखी होऊ शकते. सर्दी खोकला झाल्यास देखील डोकेदुखी होत असते. असे एक ना अनेक कारणांमुळे डोकेदुखी होऊ शकते. डोकेदुखी होत असल्यास त्यावर काही घरगुती उपाय देखील करता येतात. तर मित्रांनो डोकेदुखी वर काय – कुठल्या प्रकारचे घरगुती उपाय करता येतील या विषयी आपण जाणून घेऊया.
टाळू दुखणे वर घरगुती उपाय :
डोकेदुखी ही सर्वसामान्य समस्या बनलेली आहे. टाळू दुखणे ही अनेक कारणांमुळे होत असते. कामाचा अति थकवा आल्याने देखील तसेच, सतत एखादी चिंता मनात असल्याने,सतत टीव्ही, मोबाईलसमोर असणे, लॅपटॉप समोर बसून काम केल्याने त्याचा डोळ्यावर ताण पडतो आणि त्यामुळे देखील टाळू दुखणे उद्भवू शकते, असे एक ना अनेक कारणांमुळे डोकेदुखीची समस्या ही येत असते. तर या डोकेदुखीचे समस्यांवर खालील काही घरगुती उपाय तुम्ही करून बघू शकतात.
- डोकेदुखीवर वेलची खूपच उपयुक्त ठरते. 2 -3 वेलदोडे कुटून घ्यावे व त्याचे चूर्ण करावे आणि त्यात दोन चमचे पिंपळी चूर्ण आणि मध घालून एकत्र करून घेतल्याने कुठल्याही प्रकारची डोकेदुखी असल्यास ती पळून जाते, म्हणजेच टाळू दुखणे थांबते.
- डोकेदुखी पासून पटकन आराम मिळावा असे वाटत असेल, तर त्यावर लिंबू खूपच उपयुक्त ठरतो. एक कप कोरा चहा मध्ये लिंबू पिळून घेतल्याने पटकन आराम मिळतो. त्यात आपण हळद किंवा आलं देखील घालून घेऊ शकतो.
- लिंबाच्या सुक्या सालींना वाळवून त्यांची पूड करून ठेवावी आणि ज्या वेळेला डोके दुखत असेल त्यावेळेला त्यात थोडेसे पाणी घालून ही पेस्ट कानशिलेला लावल्याने पटकन आराम मिळतो.
- डोकेदुखी वर बदामाचं दुध देखील खूपच परिणामकारक ठरते. एक कप दुधामध्ये चार-पाच भिजवलेले बदाम घालून ते चांगले उकळून घ्यावे. आणि हे दूध घेतल्याने आराम मिळतो.
- डोकेदुखी सुरू झाल्या झाल्या पटकन जर बदाम खाल्ले तर डोकेदुखी वाढणार नाही, पटकन थांबेल.
- बादाम तेलामध्ये थोडं कापूर घालून तेलाने कपाळावर मसाज केल्याने सुद्धा डोकेदुखी थांबते.
- कुठल्याही प्रकारची डोकेदुखी असो त्यावर सफरचंद खूपच उपयोगी ठरतात. सफरचंदाची साल काढून त्यावर थोडेसे मीठ लावून रोज सकाळी उपाशी पोटी खाल्ल्याने कुठल्याही प्रकारची डोकेदुखी असेल, तसेच जुनाट डोकेदुखी असेल तरी बरी होऊन जाते.
- जर थंड हवेमुळे डोकं दुखत असेल तर दालचिनी पाण्यात उगाळून त्याचा लेप कपाळावर आणि कानशिलावर लावल्याने लवकर आराम मिळतो.
- जर उन्हामुळे डोकं दुखत असेल तर दोन्ही नाकपुड्यामध्ये साजूक तुपाचे दोन ते तीन थेंब घातल्याने आराम मिळतो.
- त्याचबरोबर टरबुजाचा गर व साखर घालुन घेतल्याने सुद्धा डोकेदुखी लवकर थांबते. आणि झोपही चांगली लागते.
- ताणतणाव किंवा थकव्यामुळे डोकं दुखत असेल तर जायफळ उगाळून त्यात थोडीशी वेलचीची पूड घालून एक लेप तयार करावा तो कपाळावर आणि कानशिलावर लावा याने डोकेदुखी थांबते.
- सर्दीमुळे डोकं दुखत असेल तर तसेच सायनस आणि पोकळ्यांमध्ये कफ साठला असेल तर ओवा तव्यावर भाजून त्याची वाफ घ्यावी त्यामुळे आराम मिळतो त्याचबरोबर ओव्याची पुरचुंडी करून कपाळावर आणि नाकाच्या आजूबाजूला शेक घेतल्याने सुद्धा डोकेदुखी थांबते.
- आहारात नेहमी आपण आलं लसूण हळद या गोष्टींचा समावेश करावा जास्त वेळ उपाशी राहू नये. यांनीसुद्धा डोकेदुखी होत असते आणि त्याच बरोबर भरपूर पाणी लिंबू पाणी पिल्याने सुद्धा डोकेदुखी मध्ये खुपच आराम मिळतो.
- जर तुम्ही वारंवार डोकेदुखीच्या त्रासाने कंटाळा आला असेल तर रोज एक ग्लास गाईच्या दुधाचे सेवन केले पाहिजे त्यामुळे नक्कीच आराम मिळतो.
तर मग डोकेदुखी थांबविण्यासाठी आपल्या आहार-विहाराची काळजी घ्या आणि आपली तब्येतही सांभाळा. मित्रांनो उखाणे उपवास व बराच काळ उपाशी राहणे याने पित्त वात वाढते आणि बरेच वेळा त्यामुळे निखिल डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते या समय सर तुम्ही गार दुध पिणे योग्य ठरते ऑक्सिजनची कमतरता यामुळे देखील डोकेदुखीची समस्या उद्भवत असते यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी जास्तीत जास्त झाडे असतील त्या ठिकाणी गेले पाहिजे ज्याने करून डोकेदुखीची समस्या कमी होऊ शकेल. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आपण डोके दुखी वरील काही घरगुती उपाय जाणून घेतले आहेत. वरील प्रमाणे उपाय तुम्ही करून बघू शकतात,यामुळे तुम्हाला तुमच्या डोकेदुखी वर घेऊ शकतो.
डोके दुखत असल्यास काय काळजी घ्यावी :
मित्रांनो डोकेदुखी ही बाब सामान्य असली तरी त्याच्या होणाऱ्या वेदना मात्र असहाय्य असतात. तीव्र उन्हामुळे सुद्धा अनेकांना डोकेदुखीचा त्रास होत असतो. तसेच अनेकदा तणावामुळे देखील डोकं दुखत असते. लवंग आणि लवंगेच्या तेलात वेदनाशामक गुण असतात. दहा ते पंधरा लवंग यांची बारीक पूड करा ही पूड एका कपड्यात बांधून त्याचा वास घेतल्याने सुद्धा व डोके दुखी पासून आराम मिळतो. ज्यांना सर्दी खोकला किंवा सायनस डोकेदुखीचा त्रास होत असेल तर एक चमचा ओवा भाजून तो सुती कापडात बांधावा आणि वेदना होत असल्याने या ठिकाणी त्यांनी शेक घ्यावा यामुळे देखील डोकेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. अनेकदा डिहायड्रेशन मुळे डोकं दुखत असतं. म्हणून मित्रांनो यासाठी तुम्ही तुळशीच्या च्या पानांचा रस एक ग्लास भर पाण्यात घालून उकळून घ्या आणि पाणी जास्त उळल्यानंतर एक चमचा मध त्यात मिसळा आणि हे पाणी प्या. यामुळे देखील तुमचे डोकेदुखी थांबेल. डोकेदुखीचा त्रास होऊ नये यासाठी तुम्ही तुमचे जेवणाच्या वेळा या नियमितपणे ठरवून घ्या. तसेच जेवण झाल्यावर योगासने करा जेणेकरून पचनाची क्रिया सुलभ होईल व डोकेदुखीचा त्रास कमी होईल. कामाचा ताण तणाव हा अनेकांना असतो. परंतु, काम जरी तुम्ही हसत खेळत केली तर तुम्ही डोकेदुखीची समस्या पासून दूर रहाल. काम हसत-खेळत केली तर नक्कीच तुम्ही टेन्शन फ्री रहाल. कुठलाही मानसिक ताण घेणे शक्यतो तुम्ही टाळावे. जास्तीत जास्त पाणी प्या. ही सर्व काळजी तुम्ही नियमितपणे घेतली तर नक्कीच तुम्ही डोकेदुखीपासून दूर राहाल.
मित्रांनो वरील प्रमाणे टाळू दुखणेची कारणे कोणती, त्यावर काय उपाय आहे, टाळू दुखणे होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या विषयी सर्व माहिती आपण जाणून घेतलेली आहे. वरीलप्रमाणे काळजी घेऊन जर तुमची डोकेदुखी थांबत नसेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.डोकेदुखी या विषयी आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.
धन्यवाद.