पालेभाज्या खाण्याचे फायदे

0
1322
पालेभाज्या खाण्याचे फायदे
पालेभाज्या खाण्याचे फायदे

नमस्कार, मित्रांनो पालेभाज्या म्हटले, की डोळ्यासमोर लगेच हिरव्या पालेभाज्या येतातच. मला तर हिरव्या पालेभाज्या आवडतात. पण तुम्हाला आवडतात का ? तसेच आजकालच्या तरुण पिढीला तर पालेभाज्या बघितल्या की ते नाक मुरडतात, त्यांना हिरव्या पालेभाज्या बघितल्या की म्हणतात. मी नाही खाणार, जेवण करणार नाही, असे त्यांचे नखरे असतात. तसेच आता हल्ली गृहीनी काम करतात, जॉब करतात. त्यावेळी त्यांना हिरव्या पालेभाज्या निवडायला वेळ मिळतच नाहीत. त्यामुळे त्या त्यांच्या आहारात या भाज्या डायरेक्ट वगळून टाकतात.

पण खरं सांगू, हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे, तुमच्या शरीरासाठी ते खूप फायदेशीर आहे. तुमच्या शरीराला त्यातून आवश्यक ते विटामिन्स मिळतात. हिरव्या पालेभाज्या म्हणजे नेमक्या कोणत्या भाज्या? तर हिरव्या भाज्या  म्हणजे मेथी, पालक, शेपू, चाकवत, अंबाडी, तांदूळजा, घोळ, यासारख्या भाज्या होय. यासारख्या भाज्या मध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोदके, आयरन, लोह, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, अशी अनेक घटक द्रव्य आपल्या शरीरात मिळतात. कित्येक आजारांपासून लढण्यास, आपल्याला मदत होते.

हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हल्ली लहान मुल ही भाजी आवडत नाही ना! म्हणून ओरडतात. अशावेळी तुम्ही त्यांना हिरव्या पालेभाज्यांचे वेगवेगळे प्रकार, करून खाऊ घालू शकतात. कारण हिरव्या भाज्या खाल्ल्याने, त्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच डॉक्टर आपल्याला हिरव्या पालेभाज्या व त्यांची सूप प्यायला लावतात. चला तर मग हिरव्या पालेभाज्या मधून आपल्याला अजून काय काय गोष्टी मिळतात? व कोणत्या भाजी पासून आपल्याला काय फायदे होतात ? ते जाणून घेऊयात ! 

पालेभाज्यांचे फायदे कोणकोणते ? 

हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने, आपल्याला भरपूर फायदे होतात. तर जाणून घेऊया, की कोणत्या कोणत्या भाज्या पासून, आपल्या शरीराला कोणते फायदे होऊ शकतात? चला तर मग जाणून घेऊया! 

वाचा  बाळ गुटगुटीत होण्यासाठी

पोट साफ होते :

हो, बऱ्याच जणांना संडास न होणे, पोट साफ न होणे, पोटात गॅसेस होणे, यासारख्या समस्या असतात. अशा वेळी जर त्यांनी त्यांच्या आहारात हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने त्यांच्या शरीराला त्याने भरपूर फायदे मिळतात. कारण हिरव्या भाज्या खाल्ल्याने खनिजे व मिनरल्स आपल्या शरीरात मिळतात, तसेच ते पचण्यास हलके असतात. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे, तुम्हाला पोट साफ होण्याचे काम होते, व शौचास साफ होते शिवाय हलके हलके वाटते. 

वजन कमी होण्यास मदत मिळते :

जर तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या, तर तुमचं वजन कमी होईल. शिवाय तुम्ही हिरव्या पालेभाज्या सोबत, ज्वारीची किंवा नाचणीची भाकर आवर्जून खा. त्याने तुमची वजन कमी होण्यास मदत मिळते. 

शरीराला जीवनसत्वे मिळतात :

हिरव्या भाज्या खाल्ल्यामुळे, तुम्हाला जीवनसत्वे मिळतात. कारण हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम, लोह, सोडियम, विटामिन्स भरपूर प्रमाणात असतात. ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. 

हिमोग्लोबिनची कमी दूर होते :

बऱ्याच वेळेला खूप जणांना शरीरात हिमोग्लोबिन कमी असते. जर शरीरात हिमोग्लोबिन कमी असल्याने, तुम्हाला ॲनिमिया त्रास होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या, तर या त्रासापासून तुम्ही दूर राहू शकाल. तुम्ही तुमच्या आहारात पालक चा वापर करावा. पालक खाल्ल्याने तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते, व रक्ताची कमतरता दूर होते. शिवाय पालक मध्ये लोह आणि झिंक चे प्रमाण मुबलक असल्यामुळे, त्याने तुम्हाला भरपूर फायदा मिळतो. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढते :

हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कारण हिरव्या पालेभाज्यांमध्ये झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, कार्बोदके, यासारखे विटामिन्स व गुणधर्म असल्यामुळे, तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. तसेच हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने, तुमचे आरोग्य उत्तम राहते. 

अजून काही पालेभाज्यां व त्यांचे महत्त्व ? 

हिरवे पालेभाज्या वेगवेगळे असतात. त्यानुसार ते त्यांचे महत्त्व देतात. चला तर मग जाणून घेऊयात ! 

वाचा  डोळे खोल जाणे

मेथीची भाजी :

मेथीची भाजी ही उत्तम असते. हिवाळ्यात मेथीची भाजी खाल्ल्याने शरीरासाठी ती फायदेशीर असतेच. तसेच मेथीच्या भाजीत लोहाचे प्रमाण असते. तसेच मेथीची भाजी ही वात विरहित असते. म्हणूनच तर बाळांतीन झालेल्या स्त्रियांना मेथीचे भाजी चे सूप तसेच मेथीची भाजी चे पराठे हे खायला देतात. तसेच त्यांना मेथीचे बी आणि त्यांच्यापासून  बनवलेले लाडू मुळे त्यांना पौष्टिक घटक द्रव्ये मिळतात. शिवाय बाळालाही त्यामधील विटामिन युक्त दूध हे मिळते. 

पालक ची भाजी :

पालकच्या भाजीमध्ये झिंक, लोह  सोडियम, मॅग्नेशियम, कार्बोदके, यासारखे गुणधर्म असतात. पालकच्या भाजी खाल्ल्यामुळे, तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते व तुमचे हिमोग्लोबिन वाढते. 

शेपूची भाजी :

शेपूची भाजी ही शरीरासाठी फायदेशीर असते. त्यामध्ये ही विटामिन्स युक्त आहार असतो. तसेच शेपूची भाजी खाल्ल्यामुळे, तुमच्या पोटात दुखणे, पोटात जंत यासारख्या समस्या असतील, तर त्या दूर होतात. तसेच लहान मुलांच्या पोटात जंत भरपूर बघण्यास मिळतात. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखते. व त्यामुळे त्यांना जेवण जात नाही. अशा वेळी जर तुम्ही मुलांना शेपूची भाजी किंवा त्याचे सुप खाऊ घातले, तर मुलांना फायदेशीर ठरते. 

चाकवत ची भाजी :

चाकवत ची भाजी खाल्ल्याने, तुम्हाला भरपूर प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखे गुणधर्म मिळतात. तसेच चाकवत ची भाजी खाल्ल्याने जर तुमचे तोंडाची चव गेली, तुमची तुम्हाला जेवण जात नाहीये, अशक्तपणा आल्यासारखे वाटत आहे, अशा वेळी जर खाल्ली, तर तुम्हाला यासारख्या समस्या पासून दूर राहता येते. तसेच काही जणांना पित्त, ऍसिडिटी या सारख्या समस्या असतील, तर त्यांना त्या सारख्या समस्या झाल्यामुळे, पोटात आग होणे, घशात जळजळ होणे, यासारख्या समस्या होतात. जर त्यांनी ही भाजी खाल्ली, तर यांना समस्ये पासून दूर राहता येते. 

तांदुळजाची भाजी :

तांदुळजाची भाजी ही बाळंतिणीसाठी तर फार लाभकारी असतेच, तसेच तांदळाची भाजी खाल्ल्याने डोळ्यांचे विकार होत नाही, तसेच ज्यांना खाज येण्याची समस्या आहे, त्यांना त्यावर आराम मिळतो. 

वाचा  डोळे लाल होणे घरगुती उपाय

घोळची भाजी :

घोळची भाजी अन्नपचनासाठी फार फायदेशीर असते. तसेच घोळची भाजी खाल्ल्याने, तुमचे यकृताचे कार्य सुधारते. तसेच ही भाजी करताना ती स्वच्छ पाण्याने धुऊनच करावी. ही काळजी घ्यावी. तसेच तुम्ही घोळच्या भाजी पासून पराठे ही बनवू शकतात. 

अंबाडीची भाजी :

अंबाडीच्या भाजी मध्ये विटामिन क जीवनसत्व असतात. जर तुम्ही अंबाड्याची भाजी खाल्ली, तर तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते व अनेक आजारांपासून लढण्यास तुम्हाला मदत मिळते. तसेच ज्यांना सर्दी व कफ प्रवृत्ती आहे, अशा लोकांनी त्यांच्या आहारात तिचा समावेश केला, तर त्यांना या समस्येपासून आराम मिळतो. 

हिरव्या पालेभाज्या कशा खाव्यात ? 

हिरव्या पालेभाज्या स्वच्छ धुवून खाव्यात. तसेच धुण्यापूर्वी तुम्ही त्यांना मिठाच्या पाण्याने धुऊन घ्याव्यात. तसेच काही जणांची सवय असते, की भाज्या उकळून ते पाणी फेकून देतात. मग भाजी करतात. पण तसे करू नका, कारण त्यामुळे त्याचे आवश्यक ती पोषक द्रव्य बाहेर निघून जातात. तसेच हिरव्या पालेभाज्यांचा वापर हा जास्तीत जास्त हिवाळ्यात करावा, कारण हिवाळ्यात त्याचे गुणधर्म जास्ती प्रमाणात आपल्याला मिळतात. तसेच पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचा वापर कमी प्रमाणात करावा. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला हिरव्या पालेभाज्यांचे महत्व काय असते, ते सांगितलेले आहेच. तसेच कोणकोणत्या भाज्यांपासून तुम्हाला कोणकोणते फायदे होऊ शकतात, तेही सांगितले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला, आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here