टाळूला फोड येणे

0
4403
टाळूला फोड येणे
टाळूला फोड येणे

नमस्कार मित्रांनो. बरेच जणांना आरोग्य विषयी काही ना काही समस्या उद्भवत असतात. शारीरिक समस्या अनेक जणांना असतात. कुणाला घसा खरखर करणे,  तर कुणाला तोंड येणे, तर कोणाला सर्दी होने,डोके दुखणे, अंग दुखणे, ताप येणे एक ना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. तर त्यात तोंडात फोड येणे फारच त्रासदायक असतात. अनेक कारणांमुळे तोंडाच्या आतील भागात फोड येऊ शकतात. बराच वेळ पोट साफ होत नसल्याने, संप्रेरकांचे संतुलन बिघडल्यामुळे, जखम झाल्यामुळे, मासिक पाळी किंवा कॉस्मेटिक सर्जरीमुळे तोंडात फोड येत असतात. तोंडात फोड येण्याचे एक ना अनेक कारणे सांगता येतील. तर मित्रांनो आज आपण टाळूला फोड येणे म्हणजेच तोंडात फोड येणे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग तोंडात फोड येण्याची कारणे कोणती? त्यावर काय उपाय करू शकतो? याविषयीची खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊ या.

तोंडाला फोड येण्याची कारणे :

माऊथ कॅन्सर म्हणजेच तोंडाला फोड येणे ही समस्या अनेकांना होत असते.अतिशय त्रासदायक आणि  वेदनादायी या समस्येत तोंडात लाल फोड येतात आणि पुरळ येते. सामान्य कारण मध्ये खाद्य पदार्थ तोंडात संक्रमणामुळे तोंडात फोड होतात किंवा पुरळ येते याला स्ट्रेप थरोट इन्फेक्शन असं देखील म्हटले जाते. strep घशात होणारे एक संक्रमण आहे पण यात आणि माउथ अल्सर मध्ये फारच बारीक असा फरक असतो जसे की माउथ अल्सर मध्ये पोटाच्या आतील बाजूस किंवा जिभेवर पुरळ येते पण हे इन्फेक्शन जेव्हा वाढतो तेव्हा घशा पर्यंत पोहोचतं त्यामुळे ते टॉन्सिल आणि वेदना वाढविण्याचा कारण ठरतं.

  • पोट साफ न होणे
  • अपचनामुळे
  • शरीरात पोषक तत्वांची कमतरता
  • तोंडाची अस्वच्छता
वाचा  टोमॅटो चेहऱ्याला लावण्याचे फायदे

वरील सर्व कारणांमुळे तोंडामध्ये फोड येऊ शकतात.

टाळूला फोड येण्याची लक्षणे :

Streptococcus नावाच्या बॅक्टेरिया  मुळे हे संक्रमण होते. यात  छोटे लाल तोंडाच्या आतील भागात पुरळ येतात, टाळूला फोड येतात. यालाच strep throat इन्फेक्शन देखील म्हटले जाते.

  • ताप येणे 
  • काही गिळताना त्रास होणे 
  • खाताना त्रास होणे
  • लाल आणि सुजलेले टॉन्सिल दुखणे
  • टेस्ट न लागणे म्हणजे अन्नाची चव न लागणे 
  • बोलण्यास समस्या होणे 

टाळूला फोड आल्यास वरील प्रमाणे टाळूला फोड येण्याची लक्षणे सांगता येतील. 

टाळूला फोड आल्यास घरगुती उपाय :

मित्रांनो, टाळूला फोड आला असेल तर जास्त घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण, टाळूला फोड येणे हा काही गंभीर आजार नाही. यावरही काही घरगुती उपाय करता येतील. यावर टाळूला फोड येणे कोणते घरगुती उपाय करता येतील, हे आपण खालील प्रमाणे जाणून  घेऊया.

थंड पाणी :

टाळूला फोड आला असेल तर या वर थंड पाणी हा एक चांगला घरगुती उपाय मानला जातो. जर कुणाला ही अशा प्रकारची समस्या होत असेल तर त्यांनी दहा मिनिटांसाठी तोंडात थंड पाणी ठेवा. पाणी कोमट किंवा थंड झालं की थुंका. पुन्हा थंड पाणी तोंडात ठेवा. थंड पाण्याने गुळण्या करा. याने तोंडातील फोड लगेच बरे होतील.

 कोरफड :

त्वचेची जळजळ शांत करण्यासाठी कोरफडचे चा रस वापर नेहमीच केला जातो. पण कोरफडीचा रस त्वचेच्या वरच्या बाजूने वापरला जातो आणि त्वचेची जळजळ दूर होण्यास मदत होते. तसेच तुम्ही टाळूला फोड आले असतील तर कोरफडीचा रस तोंडात ही लावू शकतात. याने तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो.

दही किंवा दुध :

दही खाणे किंवा थंड दूध सेवन करूनही तोंडातील फोड कमी करण्यास मदत मिळते. दूध आणि दह्याने फोडांची होणारी जळजळ दूर होईल. तसेच प्रोटिन सोबतच कडधान्य, फळ-भाज्यांचा आहारात समावेश करावा. भरपूर पाणी प्यावे. याने तोंडाला आराम मिळतो.

वाचा  एंडोस्कोपी म्हणजे काय?

मध :

मध तोंडात आलेले फोड कमी करण्यासाठी मदत करते. तोडांवर मधाचा लेप लावा याने आराम मिळेल. यांतील अँटी-अक्सिडेंट खूप फायदेशीर ठरतात.

टी ट्री ऑइल :

टी ट्री ऑइल  मध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात. टी ट्री ऑइल चे तेल हे तोंडातील फोडांवर लावल्याने फरक पडतो. एका दिवसातून तीन ते चार वेळा फोड आलेल्या भागावर टी ट्री ऑइल तेल लावल्याने आराम मिळतो.

ज्येष्ठमधाचे चूर्ण :

ज्येष्ठ मधात anti-inflammatory प्रॉपर्टीज असतात. आपण ज्येष्ठमधाचे चूर्ण, हळद व गरम दुधातून दिवसातून तीन वेळा घेतले पाहिजे. यामुळे,तोंडातील फोड जाण्यास मदत होऊ शकते. तसेच ज्येष्ठमधाच्या चुरणा मध्ये थोडे मध घालून फोड आलेल्या ठिकाणी रात्रभर लावून ठेवाव, याने देखील आराम मिळेल.

लसुन :

तोंडात येणाऱ्या फोडांच्या इलाजासाठी लसुन अतिशय उपयोगी आहे. दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या ची पेस्ट बनवावी.ही पेस्ट फोड आलेल्या जागेवर लावावी. त्यानंतर पंधरा मिनिटांनी ही पेस्ट धुवावी. लसणात असलेल्या अँटी बायोटिक गुणामुळे तोंडातील फोड लवकर बरे होण्यास मदत होतात.

मित्रांनो, तुम्हालाही तोंडात फोड येण्याची समस्या उद्भवली असेल,तर तुम्ही वरील प्रमाणे घरगुती उपाय करून तुमच्या तोंडातील फोड घालवू शकतात किंवा तुमच्या तोंडाला फोड आल्यास वरील उपाय केल्याने आराम मिळू शकतो.

टाळूला फोड आल्यास काय काळजी घ्यावी :

तोंडाचे फोड बरे करण्यासाठी बाजारात विविध प्रकारची औषधे उपलब्ध आहे. परंतु, काही वेळा या औषधांचा चुकीचा परिणाम होत असतो. केमिकल युक्त औषधे गरम पडून अजुन जास्त तोंड येण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे अशावेळी काही घरगुती उपाय केल्याने देखील तुम्ही तोंडातील फोड घालवू शकतात अजून जास्त तोंड येण्याची शक्यता असते. मित्रांनो तुमच्या फोड आले असतील तर तुम्ही मात्र योग्य सावधगिरी बाळगली पाहिजे योग्य ती काळजी घेतली पाहिजे. 

  • टाळूला फोड आल्यास जास्त गरम जेवण करणे शक्यतो टाळावे.
  • जास्त तिखट पदार्थ खाणे टाळावे.
  • थंड पाण्याच्या गुळण्या कराव्या आणि  थंड पाणी प्यावे.
  • दुग्धजन्य म्हणजेच दूध व दही यांचा समावेश आहारात करावा.
वाचा  राईच्या तेलाचे फायदे

टाळूला फोड येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी :

मित्रांनो आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. आपण नियमित रोज जरी छोट्या गोष्टी केला तरी आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो. टाळूला फोड येऊ नये म्हणून आपण आपल्या आहारात योग्य त्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. तर यासाठी नेमके काय करावे हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

  • रोज सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध एकत्र करून घेतले पाहिजे.
  • तोंडाला फोड येऊ नये म्हणून आहारात व्हिटॅमिन सी चा समावेश करावा.
  • नियमित आहारात विटामिन बी ट्वेल आणि आयरण यांच्यासोबत विटामिन्स सी युक्त फळांचा आहारात समावेश केला पाहिजे.
  • बीड गाजर टोमॅटो आणि लिंबू यांचा एकत्रित समावेश रोजच्या आहारात करावा. 
  • आपण आपल्या आहारात खजूर, मनुका,बदाम,धने,जिरे, तुळस इत्यादी घटकांचा समावेश केला पाहिजे.
  •  वारंवार आपलं तोंड येऊ नये म्हणून आपल्या पोट साफ असणं फार आवश्यक आहे. तसेच आपले पचन होणे खूपच गरजेचे आहे.  त्यासाठी आपण रोज जेवणानंतर बडीशेप, धने हे नक्कीच खाल्ले पाहिजेत. यामुळे आपले पचन चांगले होईल.
  • तसेच आपण रोजच्या आहारात फायबर युक्त पदार्थ यांचा समावेश जरूर करावा.
  • फळे पालेभाज्या या नियमित आहारात घेतल्या पाहिजेत. आणि या सर्वांबरोबर भरपूर पाणी पिणे खूपच गरजेचे ठरते. 
  • पाण्यामुळे शरीरातील ब्लड सर्कुलेशन हे सुरळीत चालू राहते तसेच शरीरात पोषक तत्वांचा नीट पुरवठा होतो.

 मित्रांनो वरील प्रमाणे जर तुम्ही नियमित तुमच्या आहारात योग्य त्या फळांचा पोषक तत्त्वांचा समावेश केला तर नक्कीच तुमचे टाळूला फोड येण्यापासून तुम्ही दूर राहाल. वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here