मित्रांनो, अनेक लोक हे घर बांधण्याचे बाबतीत खूप काळजीपूर्वक बांधत असतात.घर बांधण्यापूर्वी प्रत्येकाचे सल्ले घेत असतात. जेव्हा आपण आपले घर बांधत तेव्हा पैशानं सोबत आपल्या भावना व आपली स्वप्ने देखील त्यासोबत जोडलेली असतात. घर बांधताना अनेक गोष्टींचा आपण त्यात विचार करत असतो. घर बांधण्यापूर्वी आजूबाजूचा परिसर कसा आहे, घराची जागा चांगल्या ठिकाणी तर घेतली आहे ना? या गोष्टी आपण बघुन घेत असतो. घर बनवताना ज्या गोष्टीची सर्वात जास्त काळजी घेतली जाते ती म्हणजे वास्तु. परंतु बरेच जण हे वास्तू शास्त्र म्हणजे अंधश्रद्धा होय असे मानत असतात. परंतु जेव्हा त्यांच्या समोर अनेक समस्या येत असतात अनेक अडचणींना अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते तेव्हा आपले घर बांधताना काही चुकले तर नाही ना? या गोष्टींचा ते विचार करू लागतात. आपण वास्तुशास्त्रानुसार घर बांधले पाहिजे होते का हे देखील विचार त्यांच्या मनात घोळू लागतात. जर घरातील वास्तू मध्ये काही कमतरता असतील तर ते केवळ नकारात्मक ऊर्जेला चालना देत नाही तर त्यामुळे घरातील सदस्यांना देखील हानी पोचू शकते. म्हणून घर बांधताना घर हे वास्तुशास्त्रानुसार बांधले तर उत्तम ठरते. घर बांधताना वास्तुशास्त्रानुसार ते कसे बांधावे? अनेक जण याविषयी जाणून घेऊन घर बांधत असतात. वास्तुशास्त्रानुसार घराचा हॉल कसा असावा? वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घर कसे असावे ? वास्तुशास्त्रानुसार बेडरूम कसा हवा? देवघर कसे हवे? याविषयी माहिती मिळून आपण ते घराचे बांधकाम करत असतो. तर वास्तुशास्त्रानुसार घराचे दरवाजे कसे असावे? याविषयी देखील आपल्या माहिती जाणून घ्यायला हवी. चला तर मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घराचे दरवाजे कसे असावे या विषयावर माहिती जाणून घेऊया.
Table of Contents
दिशा
वास्तुशास्त्रानुसार, घराचा मुख्य दरवाजा हा केवळ कुटुंबासाठी येण्याचा मार्ग नसून ऊर्जा येण्याचा मार्ग देखील असतो. मुख्य दरवाजा हे असे एक संक्रमण क्षेत्र आहे ज्याद्वारे आपण बाह्य जगापासून घरामध्ये प्रवेश करतो. ही अशी एक जागा आहे ज्यामधून आनंद व शुभेच्छा घरात प्रवेश करत असतात. म्हणून मुख्य दरवाज्यास महत्त्व दिले गेले पाहिजे. कार्यामुळे आरोग्य संपत्ती सुसंवाद वाढवणारा वैश्विक ऊर्जा प्रवाह कमी होऊ शकतो किंवा स्थिर राहू शकतो. याशिवाय मुख्य दरवाजा ही घराची पहिली छाप पाडत असतो. असे सांगितले जाते.
मुख्य दरवाजा हा घराच्या इथे कोणते दारा पेक्षा मोठा असावा आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने प्रमाणे उघडला पाहिजे. मुख्य दरवाजाला समांतर एकावेळी तीन दरवाजे असण्याचे टाळा कारण हा एक गंभीर वास्तुदोष मानला जातो यामुळे घरातील आनंद प्रभावित होऊ शकतो.
मित्रांनो, प्रामुख्याने चार महत्त्वाच्या दिशा असतात. पूर्व ,उत्तर ,पश्चिम आणि दक्षिण या होय. तर घराचे दरवाजे बांधताना प्रत्येक दिशेचे महत्त्व कोणते आहे म्हणजेच कोणत्या दिशेला दरवाजा उत्तम ठरू शकतो हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच दरवाजा कोणत्या दिशेला असावा हे देखील माहीत असणे गरजेचे असते. चला तर मग याविषयी आपण जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार घराचे दरवाजे पूर्व दिशेस असावेत का?
व्यावहारिक दृष्टीने पूर्व दिशेला दरवाजा असणे शुभ मानले जाते. जर तुमचा मुख्य प्रवेश द्वार हा पूर्व दिशेला असेल तर सर्वात शुभ मानला जातो. सूर्य हा पूर्व दिशेकडून उगवत असतो. आणि तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा पूर्वेकडे असेल तर सूर्याची किरणे तुमच्या घरात येऊ शकतात. सूर्याची किरणे घरात आल्यामुळे वास्तुदोष निर्माण वास्तुदोष कमी होत असतो. तसेच अध्यात्मिक दृष्टीकोनातून पूर्वदिशा आहे विशेष मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार या दिशेने दरवाजा असणे चांगले मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार घराचे दरवाजे उत्तर दिशेस असावेत का?
मित्रांनो असे मानले जाते की हे स्थान कुटुंबातील संपत्ती आणि शुभ नशीब आणू शकते आणि म्हणूनच आपला मुख्य दरवाजा किंवा प्रवेशद्वार निवडण्याची ही दुसरी सर्वोत्तम दिशा आहे. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेकडील दरवाजा देखील शुभ मानला जातो. वास्तूत उत्तर दिशेला देव मानले जाते. ही दिशा वास्तुशास्त्रात खूप शुभ मानली जाते. असे म्हटले जाते की जर तुमच्या घरातील मुख्य दरवाजा हा उत्तर दिशेने असेल तर लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागेल जास्त फलदायी मानले जाते. या दिशेला घराचा मुख्य दरवाजा असेल तर तुमच्या मनात अध्यात्मिक विचार येत असतात.
वास्तुशास्त्रानुसार घराचे दरवाजे पश्चिम दिशेस असावेत का?
पश्चिम दिशेकडे दरवाजा देखील वास्तुशास्त्रानुसार चांगला मानला जातो. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा जर पश्चिमेकडे असेल तर अत्यंत शुभ होणार आहे असे, वास्तुशास्त्र सांगते. असे लोक आयुष्यात हळूहळू प्रगती करतात परंतु त्यांचे मिळणारे यश हे कायमचे असते. अशा लोकांना कधीही धोका नसतो.
वास्तुशास्त्रानुसार घराचे दरवाजेदक्षिण दिशेस असावेत का?
दक्षिण दिशेकडे दरवाजा हा वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानला जातो. ही दिशा ही यमाची मानली जाते. घराचा मुख्य दरवाजा हा दक्षिण दिशेने असणे फार अशुभ मानले जाते. या दिशेने मुख्य दरवाजा बनवल्यास घरातील व्यक्ती ही दुखी राहते त्या घरातील स्त्रिया देखील आनंदी नसतात. असे म्हटले जाते की पूर्वज या या दिशेने घरात येतात म्हणून हे दिशा अशुभ मानले जाते. या दिशेचा मुख्य दरवाजा अजिबात चांगला मानला जात नाही, असे वास्तुशास्त्र सांगते. दक्षिण किंवा नैऋत्य दिशेचा दरवाज्याचा दोष शिसे या धातूचे पिरॅमिड आणि पितळी हेलिक्स वापरून वायव्य दिशेकडील दरवाजाचे दोष दुरुस्त केले जाऊ शकतात.
मित्रांनो, वरील प्रमाणे घराचा दरवाजा हा कोणत्या दिशेकडे असावा हे तुम्ही जाणून घेतलेले आहे. तसेच प्रत्येक देशाकडे दरवाज्याचे कोणते महत्त्व आहे याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे.तसेच घरातील मुख्य दरवाजा लागणारी शेळीचे संख्या आणि विषम म्हणजे3,5,7 याप्रमाणे असली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्याच्यावर सावली पडली नाही पाहिजे जेव्हा तुम्ही घर बांधत असतात त्यावेळी तुम्ही आपल्या मुख्य दरवाज्यासमोर कोणते झाड किंवा पोल नसला पाहिजे हे लक्षात घेऊन घराचे काम केले पाहिजे .तसेच घराचा मुख्य दरवाजा घराच्या अन्नद्रव्याच्या पेक्षा उंच असला पाहिजे वास्तूमध्ये याचा उल्लेख केला जातो मुख्य दरवाजा उत्तरेकडे ठेवल्याने पैसे मिळतात पूर्वेकडील व मुख्य दरवाजे ठेवल्यास घरात शांतता होते मुख्य दरवाजा पश्चिमेस असलेल्या शुभेच्छा वाढतात. घरामध्ये दोन मुख्य दरवाजे असले पाहिजेत एक मोठा आणि दुसरा लहान मुख्य दरवाजा घराच्या कोपऱ्यात ठेवू नका कचरा घर जीर्ण इमारत किंवा अशा कोणत्याही नकारात्मक गोष्टी घराच्या समोर असू नयेत दरवाज्याच्या समोर घडते जाण्यासाठी जिना नसला पाहिजे.
या बाबींकडे लक्ष द्या.
- घराचा मुख्य दरवाजा हा लाकडाचा असणे हे शुभ मानले जाते.
- दक्षिण दिशेला दरवाजा चे मिश्रण हे लाकूड आणि लोखंडे यांचे असले पाहिजे
- पश्चिम दिशेला दरवाजा लोखंडाचा असला पाहिजे.
- उत्तर दिशेला दरवाजा मध्ये सिल्वर रंग असला पाहिजे.
- पूर्व दिशेचा दरवाजा हा लाकडाच्या आणि मध्यम आकारांमध्ये धातूचा असला पाहिजे.
मित्रांनो, वरील प्रमाणे काही बाबींकडे देखील तुम्ही लक्ष देऊ शकतात. वरील प्रमाणे वास्तुशास्त्रानुसार घराचे दरवाजे कोणत्या दिशेला हवे, तसेच प्रत्येक विषयाचे महत्त्व काय आहे, याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे. याविषयी अजून सखोल माहिती तुम्हाला जाणून घ्यावयाचे असेल तर तुम्ही वास्तुतज्ञ यांचा सल्ला घेऊ शकतात.वरील प्रमाणे, आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून करू शकतात.
धन्यवाद.