वारंवार भूक लागणे या समस्येची करणे व त्याचे दुष्परिणाम

0
878
वारंवार भूक लागणे
वारंवार भूक लागणे

 

नमस्कार मित्रांनो हल्ली बदलत्या जीवनशैलीमध्ये बदलत्या वातावरणामध्ये भूक लागणं हे स्वाभाविकच आहे. शारीरिक थकवा आल्यावर आपल्याला भूक लागल्यावर आपण आपले जेवण पोटभर करायला हवे. पण काही जणांची असे असते की, थोडेसे खाल्ल्यानंतर परत थोड्या वेळात भूक लागते. सतत भूक लागणे याची काही कारणे असू शकतात. हल्ली काही पालकांच्या तक्रारी बघायला मिळतात की, माझ्या मुलाला भूक लागत नाही. तसेच मी एकदा माझ्या मुलाला दवाखान्यात घेऊन गेलेली होते, त्यावेळी तिथे माझ्यासमोर एका मुलाचे आई-वडील आले. आम्ही सोबत बसलेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला विचारले, काय झाले बाळाला. त्यावेळी मी बोलली, अहो हा जेवतच नाही त्याला भूकच लागत नाही, किती बारीक होऊन गेला आहे. मग त्यांनी थोडावेळ त्यांनी  स्मितहास्य केले मग मी त्यांना विचारले, की काय झाले हसायला, त्यावेळी ते म्हणाले की आमची तक्रार आहे की आमचा मुलगा सारखा-सारखा खायलाच मागत राहतो. त्याला दिवसभर भूक लागते. थोडसं खाल्ल्यानंतर, लगेच खायला मागतो. आम्ही घाबरून गेलो आणि त्याला दवाखान्यात दाखवायला आणलेले आहे. की त्याला काही गंभीर आजार तर नाही ना झाला! त्यावेळी मला माहित पडले, की भूक न लागणे ही एक समस्या आहे, आणि भूक जास्त लागते, ही समस्या असू शकते का? तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत, की वारंवार भूक लागणे यामागील कारणे नेमकी कोणती असू शकतात? चला तर मग जाणून घेऊयात! 

वारंवार भूक लागणे यामागील कारणे? 

 

मित्रांनो, वारंवार भूक लागल्या मागील, काही कारणे आहेत. चला तर मग जाणून घेऊया. 

  • मधुमेहाची लक्षणे असतात.

हो तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल. पण जर तुम्हाला सारखी वारंवार भूक लागत असेल, तर त्यामागील कारण मधुमेह ही असू शकतो. कारण जर तुमच्या शरीरातील इन्सुलिन पातळी कमी झाली, तर तुम्हाला भूक लागण्यासारखा समस्यांना तोंड द्यावे लागते. इन्सुलिन हे आपल्या शरीरातील मुख्य घटक आहे जे आपल्या रक्तामधील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते. जर शरीरातील इन्सुलिन कमी झाले, तर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे ग्लूकोज आपल्या शरीराला पुरेसे मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला सारखी भूक लागण्याच्या समस्या होते. अशावेळी जर तुम्ही साखरेचे पदार्थ कमी खाल्ले, तर शरीरातील इन्सुलिन सुरळीत राहते व तुम्हाला भूक वारंवार भूक लागणे, या समस्येपासून आराम मिळतो. 

  • प्रोटिन्स ची कमतरता आल्यामुळे.
वाचा  जेवणानंतर गुळ खाण्याचे फायदे

आपल्या शरीराला लागणारे गुणधर्म यावर आपले शरीर नियोजित असते. जर तुमच्या शरीराला एखादा घटक जरी कमी झाला, तर तुम्हाला खूप सार्‍या समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच वारंवार भूक लागण्याचे आहे, जर तुमच्या शरीरात प्रोटिन्सची कमतरता आली, तर तुम्हाला यासारख्या समस्येवर तोंड द्यावे लागते. प्रोटीनच्या कमतरतेमुळे तुम्हाला चमचमीत खाणे, बाहेरचे खाणे, जंकफूड खाणे, यासारख्या गोष्टींची इच्छा होते. त्यामुळे तुम्हाला वजन वाढणे यासारख्या गोष्टींना तोंड द्यावे लागते. अशासाठी तुम्ही तुमच्या आहारात मोड आलेले कडधान्य खावेत. त्याने पोट भरल्यासारखे वाटते. व त्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. शिवाय भूकही जास्त प्रमाणात लागत नाही. 

  • शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळे.

जर तुम्ही नियमित पाणी पिले नाही तर तुम्हाला पोटात हलके-हलके वाटते. काहीच खाल्ल्या सारखे वाटत नाही. सारखी भूक लागते, अशा वेळी तुम्ही तुमच्या शरीरासाठी पुरेसे पाणी प्यायला हवेत. त्यामुळे तुमच्या तात्पुरत्या भुकेवर आराम मिळतो व सारखी भूक लागण्याच्या समस्येवर ही फरक पडतो, तसेच आपल्या शरीरात पाण्याची गरजही असते. पुरेसे पाणी नसल्यामुळे तुम्हाला अनेक व्याधींना ही सामोरे जावे लागते. त्यामुळे नियमित तुम्ही आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला हवे. तसेच पाणी पितांना तुम्ही निंबुपाणी, संत्रीचा ज्युस, कोकम सरबत या गोष्टी पिल्याने, त्याचे घटक द्रव्य तुमच्या शरीराला मिळते. 

  • अधिक ताणतणावामुळे ही होते. 

हल्ली आपल्याला या जगात ताणतणाव थोडी कमी आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष करून फ्री माइंड जगायला हवे. मोकळा श्वास घ्यायला हवा. पण काही लोक खूप टेन्शन घेतात, चिंता करतात त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर व मनावर ही होतो. त्यामुळे त्यांना जेवण व्यवस्थित जात नाही पण दिवसभर सतत काहीतरी खावेसे वाटते. तसेच आपल्या मेंदू जवळील अड्रेनल ग्रंथी या आपल्या कॉर्टिसोल नावाचे हार्मोन शरीरातून बाहेर टाकण्याचे काम करते, त्यामुळे तुम्हाला सारखी भूक लागण्याचे समस्या होतात. अशावेळी तुम्ही नियमित ताण-तणाव, चिंता सोडून मेडिटेशन करायला हवेत. त्यामुळे तुमचा ताणतणाव दूर होतो. शिवाय जेवताना पोटभर जेवण करायला हवेत. भरपूर विश्रांती घ्यायला हवी. या गोष्टी केल्या मुळे तुम्हाला वारंवार भूक लागण्याचे समस्येवर आराम मिळतो. 

  • पोटात जंत झाल्यामुळे ही होते. 
वाचा  शेंगदाणे व गुळ खाल्ल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

लहान मुलांना जर सारखी भूक लागत असेल तसेच भूक न लागणे ही एक समस्या आहे. या दोघी गोष्टींमध्ये एक गोष्ट स्वाभाविक आहे, की तुमच्या पोटात जंत झाले असतील. जर पोटात जंत झाले, तर सारखी भूक लागते किंवा भूक लागत नाही. या दोघी प्रतिक्रियांमध्ये तुम्ही जंताचे औषध नियमित सहा महिन्यातून घ्यायला हवेत. त्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागण्याच्या समस्येवर आराम मिळतो. तसेच तुम्ही कारली, शेवग्याच्या शेंगा या सारख्या गोष्टी खायला हव्यात, त्यामुळे पोटातील जंत जाण्यास मदत मिळते. 

  • थायरॉईड सारख्या समस्येवरही होते. 

जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल, तसेच तुमचा हायपरथायराॅइड झाला असेल अश्या वेळी तुमच्या हार्मोन्स इनबॅलन्स होतात व तुम्हाला भूक लागण्याच्या क्रिया सुरू होतात. अशा वेळी तुम्हाला सारखी भूक लागते. तसेच थायरॉइड मध्ये मेटाबोलिजम रेट वाढतो व तुमचे वजनवाढी सारख्या गोष्टीही व्हायला लागतात. अशावेळी तुम्ही त्वरित डॉक्टरांना दाखवावे व त्यावर उपचार घ्यावा. 

  • जास्ती प्रमाणात औषधांचं उपयोग करत, असाल तरीही होते. 

जर तुम्ही दीर्घकाळापासून आजारी आहात किंवा तुमच्या एखाद्या शारीरिक व्याधीवर तुम्ही औषधी गोळ्या घेत असाल, तर अशावेळी तुम्हाला भूक लागते. सारखे खावेसे वाटते ते स्वाभाविकच आहे. औषधांमध्ये पावरफुल गुणधर्म असल्यामुळे तुम्हाला भूक लागणे, या समस्या होऊ शकतात. पण काही कालांतराने त्या थांबतात व तुमच्या भुकेचे नियंत्रण हे कमी होत जाते व तुम्ही नॉर्मली जेवण करायला लागतात. 

  • जर तुम्हाला व्यसन असेल, तरीही त्याचा परिणाम होतो.

हो मित्रांनो जर तुम्हाला दारू, सिगरेट तसेच ड्रिंक्स करायची सवय असेल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर तसेच आरोग्यावरही होतो. या पदार्थामुळे तुमच्या शरीरातील पोषक तत्वे कमी होतात, तसेच तुमच्या शरीरातील हार्मोन्स इनबॅलन्स होतात. त्यामुळे तुमचे चिडचिड होणे, झोप पूर्ण न होणे, तसेच सारखी- सारखी भूक लागणे यासारख्या गोष्टी घडू शकतात. अशा वेळी तुम्ही तुमच्या व्यसनावर नियंत्रण मिळायला हवे. त्यामुळे तुमचे यासारख्या समस्या दूर होतात. 

वाचा  ओठ काळे का पडतात ?

सारखी भूक लागत असतील तर हे करा उपाय! 

मित्रांनो जर तुम्हाला सारखी सारखी भूक लागत असेल, तर तुम्ही या सारखे उपाय करून तुमची भूक भागवू शकतात. 

  • जर तुम्हाला सारखी भूक लागते, तर सतत पाणी प्यायला हवेत. 
  • सारखी भूक लागल्यावर बाहेरचे पदार्थ खाऊ नका, त्यामुळे वजन वाढीचे समस्यांना तुम्हाला सामोरे जाऊ लागू शकते. 
  • अशावेळी तुम्ही काकडी, सलाड सारख्या पदार्थ खाऊ शकतात. 
  • सारखी भूक लागत असेल, तर तुम्ही चहा किंवा कॉफी वर तुमची भूक भागवू शकतात. 
  • तसेच भूक सारखे लागत असेल तर तुम्ही लेमन ज्यूस, कोकम सरबत, संत्रीचा ज्युस, किंवा फळांचे ज्यूस घेऊ शकतात. 
  • अशावेळी तुम्ही पॉपकॉन, ओट्स, चुरमुर्याची भेळ, सारखे पदार्थ खाऊ शकतात. 

 

चला तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगितले आहे की वारंवार भूक लागणे, यामागील काही कारणे. तसेच काही उपाय. तसेच त्यावर काय खावे तेही सागितलेले आहेत. तसेच तुम्ही अशा वेळी डॉक्टरांनाही दाखवून द्यावे. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

                        धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here