नमस्कार, मित्रांनो टीबी आजार हा सगळ्यांना जाणूनच आहे. टीबी म्हणजे क्षयरोग होणे. म्हणजे कोणता गंभीर आजार नाही. पण त्यावर उपचारही करता येतात. पूर्वीच्या काळी जर माहिती पडायचे, की तुम्हाला टीबी म्हणजेच क्षयरोग आहे, तर ते तुमच्या पासून चार हात लांब जायचे. कारण पूर्वीच्या काळी क्षयरोग वर उपचारही नव्हते. पण आता बदलत्या जीवनशैलीमध्ये, तसेच वैज्ञानिकांनी नवीन शोधलेल्या उपायांमध्ये, टेक्नॉलॉजी नुसार, उपचार निघालेले आहेत. त्यामुळे घाबरण्यासारखे कारण नाहीत. टीबी आजाराची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. टीबी हा एक संसर्गजन्य आजार आहे, म्हणजेच शंभरातले 75 लोकांना होऊ शकतो, अशी त्याची क्षमता असते.
म्हणून कधीही टीबी सारखी लक्षणे जाणवल्यास, त्वरित डॉक्टरांना दाखवून त्यावर उपचार करून घ्यायचे. तसेच आपल्या दरवर्षी २४ मार्च हा दिन म्हणून साजरा केला जातो, या दिवशी क्षयरोगा विषयी तुमच्या मनात असलेले गैरसमज स्पष्टपणे सांगितले जातात, त्यामध्ये सांगितले जातात, की टीबीवर आता उपचार निघालेले आहेत, झाल्यास त्वरित डॉक्टरांना सांगावेत. तसेच त्याची लक्षणे ही जाणवल्यास तर लगेच, आपल्या टेस्ट करून घ्याव्यात, जेणेकरून त्यावर आपण उपाय लवकर करू शकतो. जर तुम्ही लपवून ठेवले, तर तुम्हाला तो घातक ठरू शकतो, तसेच इतरांना ही होऊ शकतो. ही जनजागृती त्या दिवशी केली जाते. चला तर मित्रांनो टीबी हा रोग कसा होतो ? टीबी आजाराची लक्षणे ? त्याची कारणे ? त्यावर काही उपाय ? आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात !
Table of Contents
टीबी कसा होतो ? त्याची कारणे ?
खूप जणांना प्रश्न पडतात, की टीबी म्हणजे क्षयरोग कसा होतो? टीबी आजाराची सुरुवात कशी होते ? तर मित्रांनो टीबी हा तुमच्या शरीरात मायक्रो बॅक्टेरियल जीवाणूंमुळे होतो. हा तुमच्या श्वसन नलिकेत इन्फेक्शन तयार करतो. त्यानंतर तो तुमच्या फुफ्फुसांमध्ये आघात करतो. फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर, पूर्ण शरीरात त्याचे जिवाणू पसरतात. त्यामुळे तुम्ही कमकुवत होऊन जातात, तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. टीबी हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस या जंतूंमुळे तुमच्या शरीरात पूर्ण पसरतो, व एकापेक्षा अनेक जंतू तुमच्या शरीरात निर्माण होतात.
टीबी कसा प्रकारे पसरतो :
वरील दिलेल्या माहितीमध्ये टीबी कसा होतो, आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत, त्याचे तसेच तसे पसरण्याची कारणे ?
- सहसा करून टीबी हा संसर्गजन्य आजार आहे.
- जर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती अगदी कमी झाली, तर तुम्हाला टीबी सारखे आजार लवकर होतात.
- जर तुम्हाला खोकला असेल, तर त्याचे जंतू बाहेर निघतात व तो पसरतो.
- तसेच तुमच्या थुंकी द्वारे त्याचा प्रसार होतो. तुमच्या थुंकी मधुन बेडखाही येतात, त्यामध्ये त्याची जिवाणू असतात.
- शिंका आल्याने हे टीबी पसरतो
- श्वास घेण्याच्या क्रियांमध्ये हवेमध्ये त्याचे जंतू पसरतात.
- बोलतांना ही त्याचे संक्रमण होते आणि तो बाहेर निघते, पसरतो.
- टीबी होतो, त्यावेळी तुम्हाला खोकला फार लागतो, खोकला येऊन तो बाहेर पसरतो.
टीबी ची लक्षणे :
मित्रांनो टीबी कसा व कोणत्या कारणांमुळे होतो, व तो कसा पसरतो, हे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. आता त्याची काही लक्षणे जाणून घेऊयात.
- टीबी होतो, त्यावेळी तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. तुम्हाला थकवा जाणवतो.
- तुम्हाला खोकला खूप प्रमाणात लागतो, अक्षरशः खोकून खोकून पोटात आतड्यांना ही ताण पडतो.
- तुम्हाला खूप घाम येतो.
- तुमचे वजन कमी होते.
- तुम्हाला आता सारखा ताप येत राहतो.
- तसेच त्याचा परिणाम तुमच्या भूकेवरही होतो, तुम्हाला भूक लागत नाही, जेवण जात नाही.
- छातीमध्ये भरल्यासारखे वाटते आणि छातीत जाम दुखते.
- अक्षरशः उठून चालायची हिम्मत होत नाही.
टीबी आजारावर काही घरगुती उपाय :
मित्रांनो वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही टीबी होण्यामागील कारणे, त्याची पसरण्याची कारणे, तसेच लक्षणे सांगितली आहेत. सहसा करून टीबी आजाराची सुरुवातीला त्याची लक्षणे जाणून आल्यास, तुम्ही त्यावर आम्ही काही घरगुती उपाय सांगत आहोत, ते करून बघा, तसेच आम्ही सांगितलेले उपाय, तुम्ही डॉक्टरांनाही खात्री करून घेऊ शकतात. चला तर मग जाणून या काही घरगुती उपाय !
भरपूर प्रमाणात फळे, व हिरव्या भाज्या खा :
हो, फळांमध्ये विटामिन्स, मिनरल, खनिजे, जीवनसत्त्वे, तसेच अँटी ऍक्सीडेन्ट, ऑंटी बॅक्टरियल गुणधर्म असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात भरपूर प्रमाणात फळे खायला हवेत, दिवसातून एक फळ तुम्ही जरी खाल्ले, तरी तुम्हाला तुमच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते, तसेच हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने तुम्हाला अँटीइन्फेक्शनल गुणधर्म मिळतात.
त्यामध्ये झिंक, लोह, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन यासारखे गुणधर्म असल्यामुळे, तुम्हाला रोग प्रतीकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. तसेच शरीरात टीबीसारखे जंतू हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने मरतात, व तुमच्या रोगावर प्रबंध मिळण्यास मदत मिळते. तसेच हिरव्या पालेभाज्या आणि फळे खाल्ल्याने, आपल्या शरीरातील लढाऊ पेशी असतात, त्या वाढण्यास मदत मिळते व तुम्ही क्षयरोग म्हणजे टीबी रोगावर मात करू शकतात.
भिजवलेले अंजीर खा :
भिजवलेले अंजीर हे टीबी या आजारावर फायदेशीर राहते, कारण जर तुम्हाला टीबी होतो, म्हणजेच क्षयरोग होतो. अशा वेळी तुम्हाला अशक्तपणा येतो, खुप थकवा येतो, अगदी गळून पडल्या सारखे वाटते, वजन कमी होते, अशा वेळी जर तुम्ही भिजवलेले अंजीर खाल्ले तर तुमच्या शरीरात उत्साह येतो. एनर्जी येते. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर मात करण्यास लवकर तयार राहतात. त्यासाठी तुम्ही रात्री दुधात अंजीर भिजवून ठेवावेत, व सकाळी उठल्यावर उपाशीपोटी खावेत. तसेच तुम्ही अंजीर कुस्करून त्यामध्ये जेष्ठमध टाकून ते खाल्ल्याने तुम्हाला सारखा येणारा ताप कमी होतो, त्यामुळे शरीरात एनर्जी आणि ऊर्जा टिकून राहते, व रोगाची लढायला तुम्ही सक्षम राहतात.
आहारामध्ये नियमित मधाचा वापर करा :
मित्रांनो, मध निसर्गाने चे वैद्य मधमाशा पासून बनवलेले आहे, मध हे आपल्या शरीरासाठी फायदेशीरच ठरते. तसेच जर क्षयरोगावर तुम्हाला उपाय करायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात नियमित मध वापरा, कारण मधामुळे टीबी लवकर जाण्यास मदत मिळते. तसेच मध खाल्ल्याने शरीरात एनर्जी टिकून राहते, ऊर्जा टिकून राहते. त्यासाठी तुम्ही नियमित पाण्यामध्ये मध पीत राहावे, त्यामुळे शरीरात तोंडाची भूक न लागणे, वजन कमी होणे, यासारख्या समस्या कमी होतात. तसेच तुम्ही मध सोबत दालचिनी पावडर, किंवा काळेमिरे पूड तसेच सुंठ पावडर मिक्स करून, त्याचे चाटण केले की तुमच्या भुकेवर त्याचा परिणाम होतो. तुमची भूक वाढते व तुमच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. खोकल्यावर आराम मिळतो.
मनुका आणि खडीसाखर चा वापर करून बघा :
क्षयरोगामध्ये सारखे खोकून-खोकून छाती मध्ये दुखते तसेच पोटातही दुखते, अशा वेळी जर तुम्ही मनुका+ खडीसाखर व पिंपळ पावडर हे यांना एकत्र घेऊन, त्याचे चाटण दिवसातून तीन वेळेस सकाळ-दुपार-संध्याकाळ केल्यास, तुम्हाला छातीत दुखणे, तसेच पोटात दुखणे, खोकल्यामुळे घशात दुखणे, यासारखा त्रास कमी होतो व त्यावर आराम मिळतो.
आहारात लसूण युक्त पदार्थांचा वापर करा :
लसणामध्ये अँटीबॅक्टरियल, ऑंटीसेप्टीक तसेच एंटीबायोटिक, फंगल इन्फेक्शन गुणधर्म असतात. त्यावेळी तुम्हाला टीबी सारखे बॅक्टेरियल जीवाणू तुमच्या शरीरात तयार होता, अशा वेळी जर तुम्ही तुमच्या आहारात लसणाचा वापर केला, तर तुम्हाला फरक पडेल. कारण लसुन हा टीबी वर मात करण्यास प्रभावशाली ठरतो. त्यासाठी तुम्ही नियमित तळलेले लसून, त्यावर कोमट पाणी प्यावेत. त्यामुळे खोकल्यावर ही आराम मिळतो. तसेच तुम्ही तुमच्या आहारामध्ये लसुन चा वापर जास्त प्रमाणात करावा.
तुमच्या आहारात केळी खा :
क्षयरोग सारख्या आजारावर जर तुम्ही तुमच्या आहारात केळी खाल्ल्याने तर तुम्हाला फायदा मिळेल. त्यासाठी तुम्हाला दोन कच्ची केळी घ्यायची आहे, त्यांना शिजवून नंतर त्यांना, कुस्करून त्यामध्ये सेैधंवमीठ, काळी मिरपूड यांचे एकत्र कालवून करून ते तुम्हाला खायचे आहे. त्यामुळे तुमच्या मध्ये आराम मिळतो. केळ्यामध्ये कॅल्शियम चा स्त्रोत भरपूर प्रमाणात असतो. त्यामुळे आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो. शिवाय आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
आवळा चूर्ण घ्या :
टीबी चे प्रमाण झाल्यास तुम्ही आवळा चूर्ण घ्या. कारण त्यामुळे तुम्हाला फायदा मिळतो. कारण आवळ्यामध्ये अंतीबॅक्टरियल तसेच इन्फेक्शनल गुणधर्म असतात. तुमच्या शरीरातील जिवाणू मारण्यात हे फायदेशीर ठरते. त्यासाठी तुम्ही आवळा चूर्ण कोमट पाण्याबरोबर दिवसातून तीन वेळा घ्या. त्यामुळे तुम्हाला त्यावर आराम मिळेल व शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होईल. शरीरात ऊर्जेचा स्त्रोत म्हणून ,आवळा पावडर फार प्रभावशाली ठरते.
डॉक्टरांनी दिलेले औषधी उपचार घ्या :
आम्ही वरील सांगितलेले उपचारासोबत तुम्ही डॉक्टरांना दाखवून त्यावर औषधे उपचार घ्यायला हरकत नाही. कारण औषधे उपचार घेतल्यामुळे तुमचा टीबी हा आजार पूर्णपणे नायनाट होण्यास मदत मिळते. शिवाय तो तुमच्या शरीरात जास्त पसण्यापेक्षा, त्यावर ताबडतोब प्रबंध मिळण्यास मदत मिळते, व तुमची तब्येत जास्त खालच्या पातळीला जात नाही. तुम्ही लवकर बरे होण्यास मदत मिळते. शिवाय डॉक्टर तुमची औषधी उपचारांमध्ये तुमच्या थुंकीची तपासणी करतात, तुमच्या तपासतात, टीबीचे जिवाणू कुठपर्यंत पसरले आहे ते सांगतात, व त्यावर आपल्याला त्यानुसार औषधी उपचार देतात.
टीबी झाल्यास घ्यावयाची काळजी ?
- तुम्हाला जाणवले की तुम्हाला टीबी आहे, अशावेळी तुम्ही तुमच्या शरीराची स्वच्छता राखायला हवी.
- बाहेर जाताना तोंडावर मास्क किंवा रुमाल लावावा.
- तसेच खोकला येत असेल, तर तोंडावर रुमाल लावूनच खूप लावा.
- आपले वापरते कपडे, रुमाल हे डेटॉल च्या पाण्यात क्लीन करूनच घ्यावे.
- शरीरासाठी पुरेसे पाणी प्यायला हवे.
- आपल्या उष्ट्या वस्तू, ताटली हे दुसऱ्या पासून दूर ठेवावे.
- तसेच बोलताना अंतरावरून बोलावे.
- टीबी आजार घाबरल्यासारखा नाही, पण ही काळजी घेतल्यास तो आपल्यामुळे दुसऱ्याला नाही होत नाही, शिवाय आपण हे उपचार करून, त्यावर मात करू शकतो. ही ही गोष्ट लक्षात ठेवण्या जोगती आहे.
चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला टीबी कसा होतो, कोणत्या कारणांनी होतो, कसा पसरतो, टीबी आजाराची लक्षणे, त्यावर काही उपाय व त्यावर काय काळजी घ्यावी, हे सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये, तुम्हाला शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगावेत. तसेच तुम्ही हे उपचार करताना डॉक्टरांना दाखवून घेऊ शकतात. तसेच तुम्हाला आम्ही सांगितलेल्या माहिती आवडली असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगावेत.
धन्यवाद !