स्वप्नात कोरफड दिसणे शुभ की अशुभ

0
451

 

नमस्कार, मित्रांनो, स्वप्नशास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पडू शकतात. तसेच आपण सभोवतालचे जे काही घटक द्रव्य आहे, त्या गोष्टी आपल्या स्वप्नांमध्ये येऊन आपल्याला भविष्य काळामध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देत असतात. मित्रांनो, स्वप्न शास्त्राच्या दुनियेमध्ये असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये कोरफड दिसणे. मित्रांनो, कोरफडला  कुमारी असेही म्हणतात. कोरफड आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर असते. त्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. तसेच प्रत्येक आयुर्वेदिक औषधांमध्ये कोरफड चा वापर केला जातो. कोरफड ही सौंदर्यासाठी ही फार महत्त्वाची असते. सर्दी खोकल्यावर कोरफड खाल्ल्याने आपल्याला आराम मिळतो. मित्रांनो,  कोरफड चवीला कडू जरी असली, तरी तिचे गुण आपल्यासाठी फार फायदेशीर असतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये कोरफड दिसत असेल, तर तुम्ही मनात प्रश्न निर्माण करतात की, मला स्वप्नात कोरफड का बरं दिसली असेल? तसेच स्वप्नात कोरफड दिसणे हे शुभ असते की अशुभ असते यासारखे प्रश्न तुमच्या मनात गोंधळू लागतात. तर त्याच प्रश्नाचे समाधानकारक उत्तर जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात… ! 

स्वप्नात कोरफड दिसणे
स्वप्नात कोरफड दिसणे

स्वप्नात कोरफड दिसणे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये कोरफड दिसणे  हे मिश्र स्वरूपाचे स्वप्न मानले जाते. तसेच तुम्हाला स्वप्नात कोरफड कशाप्रकारे दिसते? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात. 

वाचा  लहान मुलांना कोरडा खोकला घरगुती उपाय

स्वप्नात कोरफड दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात काटेरी झाड दिसणे, हे सहसा करून अशुभ संकेत देतात. पण जर तुम्हाला स्वप्नात कोरफड दिसत असेल, तर त्याचा असा अर्थ होतो की, तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप संघर्ष करावे लागणार आहेत. खूप मेहनत करावी लागणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नामध्ये तुम्हाला कोरफडचा काटा लागणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्न जर तुम्हाला कोरफडचा काटा लागलेला दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळामध्ये काहीतरी तुम्हाला काहीतरी सुखद धक्का बसणार आहेत. काहीतरी अचानक बदल तुमच्या जीवनात घडणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात कोरफड खाताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्ही कोरफड खाताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. कारण कोरफड आयुर्वेद औषधांमध्ये वापरले जाते आणि कडू औषध आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तर तुम्ही जर स्वप्नात कोरफड खात असाल, तर त्याचा असा अर्थ होतो की, तुमचे आरोग्य उत्तम व ठणठणीत राहणार आहे. तुमच्या जुन्या व्याधी, त्रास आता कमी होणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नामध्ये कोरफड सुकलेल्या अवस्थेत दिसणे

मित्रांनो,  स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्हाला कोरफड सुकलेल्या अवस्थेत दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ होतो की, येत्या काळात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहेत. नुकसानदायक स्थिती तुम्हाला बघावी लागणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात कोरफड चा ज्यूस पिताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्ही कोरफडचा ज्यूस पिताना दिसत असाल, तर ते मिश्र स्वरूपाचे स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळात तुमच्या आरोग्यावर काहीतरी परिणाम होणार आहेत. त्रासदायस्थिती निर्माण होणार आहेत. पण त्यातून तुम्ही लवकरच बाहेर पडणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  ऑईली स्कीनची काळजी व त्यासाठी फेस वॉश

स्वप्नामध्ये कोरफडचा जेल चेहऱ्याला लावताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्ही कोरफडचा जेल चेहऱ्याला लावताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नात शास्त्रानुसार या स्वप्नाचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळात तुम्ही एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. काहीतरी शुभकार्य तुमच्या घरात होणार आहेत. तसेच तुमचे प्रसिद्धीचे योग संभावत आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही कोरफड तोडताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्ही कोरफड तोडताना दिसत असाल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ होतो की, काही काळात तुमच्या परिवारामध्ये वादविवाद होऊ शकतात. मतभेद होऊ शकतात. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नामध्ये कोरफडपासून तुम्ही औषधी तयार करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात कोरफड पासून जर तुम्ही औषधी तयार करताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळामध्ये तुम्हाला खूप मोठे काम किंवा जबाबदारी मिळणार आहे. तसेच तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची संकेतही हे स्वप्न देत आहे. तसेच तुमच्या कामाचे कौतुक केले जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला मानसन्मानाचे किंवा बढोतरीचे योग येत आहे, तुमच्या इच्छापूर्ती होणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नात कोरफड दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

 

                         धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here