घराची अंतर्गत व बाह्य स्वच्छता कशी ठेवावी ?

0
1411
घराची अंतर्गत व बाह्य स्वच्छता कशी ठेवावी
घराची अंतर्गत व बाह्य स्वच्छता कशी ठेवावी

नमस्कार, मित्रांनो आज आपण जाणून घेऊया घराची अंतर्गत व बाह्य स्वच्छता कशी ठेवावी. जिथे घर स्वच्छ तिथे लक्ष्मीचा वास अशी म्हण आहे. ज्या घरात स्वच्छता राहते. त्या घरात सुखसमृद्धी, ऐश्वर्य प्राप्ती, तसेच समाधान मिळते. ज्या घरात स्वच्छता त्या घरात आरोग्यम् धनसंपदा ही राहते. म्हणजे घरात आरोग्याचा वास असतो. जर तुम्ही घरातील स्वच्छता ठेवली, तर तुम्ही कित्येक आजारांपासून दूर राहतात. शिवाय लक्ष्मी चा घरामध्ये वास राहतो. हल्ली घरात स्वच्छता करायला वेळ मिळत नाही, कारण आता हे करियरचे युग आहे. जिथे स्त्री आणि पुरुष दोघांना समान तर काम करावे लागते. पण, ज्या घरात गृहिणी असतात, त्या घराची स्वच्छता करतच राहतात.

पण ज्या कामावर राहतात, त्यांना घर आणि ऑफिस काम यांचा लोड त्यांच्या अंगावर येतो. त्यामुळे त्यांचं घरात स्वच्छता कडे त्यांचे दुर्लक्ष होते. कामावरून आल्यावर थकवा जाणवतो. त्यामुळे बाहेरून जेवण मागवतात आणि जेवण करून तसेच झोपतात. तसेच घरात काम करायला त्यांनी नोकरदार वर्ग लावलेले असतात. त्यामुळे आपले घरांमध्ये दुर्लक्ष होते. तसेच किचन मध्ये डब्यांमध्ये, डाळी वगैरे असेल, तर त्यामध्ये कीड लागून ते खराब होतात. तसेच साठवलेली धान्य असेल, तर त्यामध्ये कीड लागते. तसेच घरातील , परदे, बेडशीट, पिलो कवर हे एक हप्ताच्यावर बदलले नाही, तर त्यावर धूळ साचून ते खराब दिसतात.

त्यामुळे घराची स्वच्छता राखणे, फार महत्त्वाचे आहे. आज आपण याच बाबतीत जाणून घेणार आहोत की, तसेच, बाहेरची स्वच्छता म्हणजे तुमच्या घराबाहेरील प्रवेशद्वार, तसेच त्याचा पॅसेज, तसेच बिल्डिंग मध्ये राहत असल्यामुळे आपल्याकडे पॅसेज राहतो. जर तुम्ही गावी असणार, तर तुमचे अंगण, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा. कारण त्यामुळे तुमच्या घरात खेळती हवा येते, तसेच मच्छर वगैरेंचा तुम्हाला त्रास होत नाही. जर बाहेर प्रदूषण राहिले, आणि कचरा राहिला, त्यामुळे तुमच्या घरात दिवस जंतूंचा प्रसार होतो. त्यामुळे बाहेरची ही स्वच्छता ठेवायला हवे. चला तर मग जाणून घेऊया, की घराची अंतर्गत व बाहेरची स्वच्छता कशी ठेवावी? व कोणत्या रित्या ठेवावी? हे जाणून घेऊयात! 

घरातील स्वच्छता कशी ठेवावी ? 

मित्रांनो, आपण घराची स्वच्छता कशी ठेवावी ? याबाबतचे थोडे जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.

अगोदर हॉलची स्वच्छता कशी ठेवावी, ते जाणून घेऊया ! 

आता हॉलची रचना ही निरनिराळ्या प्रकारे आहे, जसे की काही जणांच्या हॉलमध्ये टीव्ही, सोपा, होम थेटर, देवघर असतो. तर काहीजणांच्या हॉलच्या एका साईडला डायनिंग टेबलची सुविधाही असते. त्यामुळे त्याची स्वच्छता नियमित करायला हवी. कारण येणारे गेस्ट, पाहुणे हे हॉल मध्येच बसतात. त्यामुळे स्वच्छता असल्यामुळे तुमचं घर एकदम प्रसन्न वाटते. 

  • हाॅल ला नियमित झाडू मारावा, तसेच सोपा सेट असेल, तर त्याच्यावर नवीन नवीन प्रकारचे कव्हर्स मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन मिळतात, ते कव्हर त्यावर टाकावेत. 
  • हे कव्हर हप्त्यातून एकदा धुवावेत. 
  • तसेच नियमित हॉलची लादी पुसावी. लादी पुसताना तसेच डेटॉल, लिक्विड, फिनाईल चा वापर करावा. त्यामुळे लादी म्हणजेच फरशी ला चमक येते. 
  • टीव्ही हप्त्यातून एकदा पुसावा, कारण त्यावर धूळ जमलेली असते, तसेच जाळे येते तो नियमित पुसावा. 
  • टीव्ही पुसताना ओलसर कपडा घेऊन, तो टीव्ही पुसावा. त्यामुळे त्याला चकाकी येते. 
  • सोप्या खाली कचरा अडकला असेल, तर व्याक्युम क्लिनर च्या साह्याने तो काढून घ्यावा. 
  • घरातील कोणतेही धुळीचे काम करत असाल, तर तोंडावर रुमाल बांधावा. कारण तुम्हाला घेऊन शिंका येऊ शकतात. 
  • हप्त्यातून वरचे सिलिंग फॅन पुसावेत. 
  • हॉलच्या बाऱ्या म्हणजे जाळ्या, खिडक्या तसेच स्लायडिंग चे काच हप्त्यातून दोन ते तीन वेळेस धुवायला हवेत. जर तुम्हाला वेळ नसेल, तर हप्त्यातून एकदा धुतल्या तरी चालतात, त्यामुळे त्यावर साठलेली धूळ निघते. 
  • डायनिंग टेबल, चेअर्स हप्त्यातून एकदा ओल्या कपड्याने पुसावेत. त्यामुळे साठवलेली धूळ निघते. शिवाय डायनिंग टेबल वरचा रुमाल हा नियमित बदलावा. कारण आपण त्यावर जेवण करतो. त्याच्यात अन्नपदार्थ पडले असेल, त्यामुळे अन्नपदार्थ कुजून तिथे बारीक मच्छर होण्याची संभावना असते. त्यामुळे ते बदलत राहावे. 
  • हॉलमध्ये देवघर असल्यास, नियमित देव धुवावेत. तसेच संध्याकाळच्या वेळी देवासमोर कापूर जाळावा. त्यामुळे घरातील मच्छर हे जाण्यास मदत मिळते. शिवाय मनाला शांतता व प्रसन्नता वाटते. 
वाचा  कपाळावर गंध का व कुठे लावायचे ?

किचनची स्वच्छता कशी राखावी ? 

किचन, हा आपल्या घरातले मुख्य स्थान असते, त्याची स्वच्छता ठेवणे फार गरजेचे आहे. त्याची स्वच्छता तुम्ही नियमित ठेवायला हवे. कारण ती त्यांच्या स्वच्छतेवर आपल्या आरोग्य डिपेन्ड असते. अशा साठी तुम्ही किचनचा पुरेपुर स्वच्छता ठेवायला हवे. 

  • किचन मधील सामान, फ्रिज, मिक्सर, चिमणी, तसेच किचन मध्ये ट्रॉल्या, गॅस या सगळ्या वस्तूंची आपण नियमित स्वच्छता ठेवायला हवी. 
  • फ्रिजवर कव्हर असेल, तर हप्त्यातून एकदा बदलावे. कारण त्यामुळे त्यावर धूळ  साठत नाही, 
  • मिक्सर ग्राइंडर नियमित वापरल्यानंतर स्वच्छ पुसावे. कारण त्यावर मसाल्याचे पदार्थ पडल्यामुळे, त्यावर डाग पडू शकतात. 
  • घरातील किचन मधील ट्रॉल्या ह्या नियमित स्वच्छता ठेवावी. मध्ये त्यांचा प्रादुर्भाव बघायला मिळतो, जसे काही ते त्यांचे माहेर घरच असते. रोज रात्री येतात आणि किचन मधील भांड्यांवर चालतात. त्यामुळे त्यांची अंगावरील जंतू त्यावर पडतात आणि आपण आजारी पडतो. त्यामुळे तुम्ही महिन्यातून एकदा किचन मधील  आतील बाजूस पेस्ट कंट्रोल करून घ्यावे. 
  • फ्रिज मध्ये लागणाऱ्याच भाज्या ठेवाव्यात. ज्या जुन्या झाल्या असेल, तर टाकून द्याव्यात. 
  • किचन मधील बेसिंग हे नियमित स्वच्छ ठेवावे. त्याला लिक्विड किंवा बेकिंग सोडा, लिंबूने घालावेत, त्यामुळे त्याला चकाकी येते. 
  • तसेच गॅस हा दोघी टाइम सकाळ, संध्याकाळ पुसावा. कारण त्यावर, स्वयंपाक करतानाचे खरकटे पदार्थ असतात, दुसऱ्या वेळेस स्वयंपाक करताना आपल्याला स्वच्छता राहिल्यावर चांगले वाटते. 
  • किचन मधील खिडक्या तसेच गॅलरी ही रोज  धुवावीत. कारण त्यामध्ये धूळ येते आणि हवेमुळे ते आपल्या किचन मध्ये, तसेच स्वयंपाक करताना त्यावर ही बसते. 
  • तसेच किचन मधील वापर ते भांड्यांवर तसेच नॉन स्टिक भांड्यांवर, कुकर वर, तेलाचे डाग वगैरे पडले असतील, अशा वेळी जर तुम्ही विनेगर चा वापर करून ती भांडे घासू शकतात, किंवा बेकिंग सोडा आणि नींबू याने तुम्ही ते भांडे स्वच्छ धुवावेत. त्यामुळे तेलाचे डाग हे पटकन निघण्यास मदत होते. 
  • किचन मधील कचरा डब्बा असेल, तर नियमित स्वच्छ ठेवावा. तसेच ओला कचरा आणि सुका कचरा याचे दोन वेगवेगळे डबे ठेवावेत आणि त्याला बॅग लावावीत. 
  •  किचन घरात भिंतीवर तेलाचे डाग तसेच स्विच बोर्डावर तेलकट डाग चिकट पणा धूळ बसलेले असेल, तर  विनेगर लावून, तुम्ही त्याने घासावे, त्यामुळे चिकटपणा निघतो आणि त्याला चकाकी येते आणि स्वच्छता राहते. 
  • किचनचे भांडे नेहमी लिक्विड ने घासावेत. त्यामुळे त्यांना चकाकी राहते. 
  • किचनचा फ्लॉवर लादी ही नियमित पुसावी, त्यामुळे तिथे स्वच्छतेचा वास राहतो. 
वाचा  नासपती खाण्याचे फायदे व तोटे

बेडरूमची स्वच्छता :-

बेडरूम मध्ये, कपाट तसेच ड्रेसिंग वगैरे असेल, तर त्याची नियमित स्वच्छता ठेवायला हवी, चला तर जाणून घेऊया किती कशी ठेवावी? 

  • बेडरूममधील पलंग म्हणजेच कॉट हा महिन्याभरामधून पूर्ण झटकून घ्यावा. त्यामधील अंथरूण असेल, तर ते झटकून त्यामध्ये उन्हामध्ये वाळवून घ्यावे, कारण त्यामध्ये धुळ असेल, तर तीही जाण्यास मदत मिळते. 
  • तसेच त्यामध्ये डांबर गोळ्या ठेवाव्यात. त्यामुळे कीड लागत नाही, तसेच अंथरूण चा कुबट असा वास येत नाही. 
  • तसेच बेडवरील गाद्या या उन्हात वाळवून घेऊन मग बेडवर टाकाव्यात. 
  • बेडरूम मधील बेड वरील बेडशीट, तसेच पिलो कव्हर, हे हप्त्यातून एकदा बदलावेत. त्यामुळे मनाला अगदी फ्रेश वाटते. 
  • तसेच कपाटातील कपडे हे रोजच्या धावपळीमध्ये नीट रचायला भेटत नाही. त्यामुळे एखादा सुट्टीचा वार पाहून पूर्ण कपडे काढून झटकून रचावे. त्यामुळे त्यामध्ये तसेच कॉकरोचचे अंडे असतील, तर तेही बाहेर निघतात आणि कंपड्यामधील कुबट वास येत नाही. तसेच कपाटात तुम्ही डांबर गोळ्या आणि ठेवू शकतात. 
  • बेडरूम मधले पडदे महिना ते दोन महिन्यातून तुम्ही स्वच्छ धुऊन घ्यावेत. 
  • बेडरूममधील मधील ड्रेसिंग काच हा ओल्या कपड्याने किंवा पेपर च्या साह्याने स्वच्छ पुसावा. त्यामुळे त्याला चकाकी येते. 
  • ड्रेसिंग टेबल वरील रिकाम्या बाटल्या या फेकून द्याव्या. अडगळ पसारा ठेवू नये. 
  • बेडरूमची लादी स्वच्छ पुसावे. 
  • तसेच शनिवारी संपूर्ण घरांमधील जाळे काढून घ्यावे. कारण त्यामुळे घरातील लक्ष्मीचा वास राहतो. 
  • तसेच दिवसभरातून एकदा सगळ्या घरातील खिडक्या, उघड्या राहू द्या. त्यामुळे घरातील खूप हवा बाहेर निघते व खेळती हवा घरात राहते. 

मुलांचा स्टडी रूम कसा ठेवावे ? 

  • मुलांचे स्टडी रूम नियमित स्वच्छ ठेवावा. तसेच लादी ही नियमित पुसावी. 
  • मुलांच्या स्टडी रूम मधील कॉम्प्युटर, सीपीयू ,तसेच लॅपटॉप ठेवण्याचे टेबल, नियमित पुसावेत. तसेच कम्प्युटरवर धूळ आली असेल, तर ती नियमित पुसावी. 
  • मुलांची बुक्स, पुस्तक हे व्यवस्थित रचावे. रिकामे अडगळ, फाटलेली पुस्तकं असतील, तर ते तपासून मुलांना विचारून रद्दीमध्ये द्यावे. 
  • मुलांच्या रूम मध्ये वस्तू खेळणे एका बॉक्समध्ये ठेवावे. 
वाचा  छाती कमी करण्यासाठी घरगुती उपाय व विविध व्यायाम :-

बाथरूम व टॉयलेट ही स्वच्छता कशी ठेवावी ? 

मित्रांनो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने संडास आणि बाथरूमची स्वच्छता राखणे, हे फार जरुरी आहे. तर ते कसे ठेवावे, हे जाणून घेऊयात. 

  • टॉयलेटची स्टाईल तसेच, खालची लादी ही नेहमी लिक्विड तसेच डिटर्जंट पावडर ने स्वच्छ धुवावीत. कारण त्यावर डाग पडलेले असतील, तर ते निघून जाण्यास मदत मिळते व टॉयलेट स्वच्छ दिसतो. 
  • टॉयलेट नियमित धुताना हार्पिक, डिटर्जंट वापरून स्वच्छ धुवावा. 
  • टॉयलेट मध्ये ओडोनील तसेच सुगंधित सोप तसेच एअर फ्रेशनर लावावेत. 
  • बाथरूमची लादी आणि स्टाइल नियमित स्वच्छ धुवावी. 
  • बाथरूम मध्ये लागणारे ब्रश, तसेच शाम्पू,यांची जागा स्वच्छ धुवावी व त्यांना त्यांच्या जागेवर व्यवस्थित ठेवावे.  रिकाम्या बॉटल्स असतील, त्या फेकून द्याव्यात. रिकामा पसारा बाथरूममध्ये ठेवू नये. 
  • हप्त्यातून बाथरूमला डेटॉल लिक्विड ने स्वच्छ धुवावेत. त्यामुळे जंतू असेल, तर ते जाण्यास मदत मिळते. 
  • बाथरूम मध्ये गिझर असेल, तर ते स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यावे. 
  • टॉयलेट आणि बाथरूम च्या काचा महिन्या दोन महिन्यातून स्वच्छ धुऊन घ्यावेत. तसेच जाळे असेल, तर ते काढून घ्यावे. 

घराच्या बाहेरील स्वच्छता कशी ठेवावी ? 

मित्रांनो घराची बाहेरची स्वच्छता म्हणजे, तुमच्या बाहेरच्या खिडक्या गॅलरी, तसेच बाहेरच्या पॅसेज तसेच बाहेरचे अंगण होय. 

  •  तुमच्या घराची गॅलरी, तसेच पुढचा पोर्च असेल, तर तो नियमित स्वच्छ धुवावा, पुसावा, तसेच बाहेरील खिडक्यांना जाळ असेल, तर ते झटकावे. 
  • बाहेरच्या बागेत तुळशी, मनी प्लांट, मोगरा फुलांची झाडे, घराला शोभेल अशी झाडे लावावेत. 
  • बाहेरील झुडपे कुंड्यांमधील झाडे यांना नियमित पाणी घालावे. 
  • तसेच त्यांना महिन्या दोन महिन्यातून खत द्यावे. त्यामुळे झाडांचे वाढण्यास मदत मिळते. 
  • झाडांना नियमित खत दिल्यामुळे, त्यावर अळी तसेच किडे पडत नाही. त्यावर किटकनाशकांची फवारणी करावी. 
  • बाहेर अंगण असेल, तर ते स्वच्छ झाडावे. त्यावर पाणी चा सबका द्यावा. त्यामुळे बाहेरची धूळ घरात येत नाही. 
  • घराच्या आजूबाजूच्या परिसरात केर कचरा असेल, तर जमा करून कचराकुंडीत टाकावा. कारण तो कचरा असल्यामुळे घरात मच्छरांचा प्रादुर्भाव होतो आणि बाहेर मच्छर असल्यामुळे, घरात मलेरियाची लक्षणे असू शकतात. 

चला, तर मग मित्रांनो अशा रितीने आज आम्ही तुम्हाला घराची स्वच्छता कशी ठेवावी, तसेच बाहेर अंगण असेल, तसेच बाहेरचे स्वच्छता कशी ठेवावी, हे सांगितलेले आहेत. तसेच, आम्ही सांगितलेल्या घरातील स्वच्छतेविषयी तुम्हाला वेळ मिळत नसेल, तर तुम्ही नोकरदार वर्गांना लावून त्याची स्वच्छता करून घ्यावी. जरुरी नाही की ही स्वच्छता तुम्ही करावी, करताना तुम्ही त्यांचे बाजूला उभे राहून करून घ्या.

पण तुमच्या करणे शक्य नसेल, तर तुम्ही घरातील नोकरदार वर्गाकडून करून घेतल्यास, तुमच्या घरात स्वच्छता ही राहते आणि आरोग्य ही राहते. आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला शंका असतील, तर तुम्ही आम्हाला सांगावेत, तसेच आम्ही सांगितलेली माहिती ही तुम्हाला आवडली असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

धन्यवाद !

 

                     

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here