केस दाट होण्यासाठी काय खावे

0
2913
केस दाट होण्यासाठी काय खावे
केस दाट होण्यासाठी काय खावे

 

   मित्रांनो, सर्वांनाच वाटत असते की आपले केस स्वच्छ,सुंदर,निरोगी राहावे आपले केस लांब आणि घनदाट व्हावेत. तसेच आपले केस गळू नयेत, केस दाट व्हावे, म्हणून आपण आपल्या केसांवर विविध प्रकारचे प्रयोग करत असतो. आणि बरेच घरगुती उपाय करत असतो. दाट केस हे सौंदर्याचे लक्षण आहे. पण वाढत्या वयानुसार आणि इतर गोष्टींचा काही परिणाम म्हणून ही अचानक केस गळू लागतात आणि विरळ होऊ लागतात. अशा वेळी बाहेरून आणखी काही केमिकल्स मारा केल्यामुळे केस रुक्ष होतात आणि तुटतात. म्हणून केसांसाठी अमुक एक शाम्पू तमुक तेल किंवा कुठलाही प्रयोग केला जातो. पण हे असे प्रकार न करता तुम्ही तुमच्या आहारात योग्य घटकांचा समावेश केल्यास तुमच्या केसांच्या आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येईल. 

खरं तर दाट केसांचेच रहस्य हे तुमच्या आहारावर अवलंबून असते. आपले देखील दाट केस व्हावे म्हणून आपण आपल्या आहारात योग्य पोषक घटकांचा समावेश केला पाहिजे. यासाठी आपण पालेभाज्यांचा योग्य त्या फळांचा आपल्या आहारात समावेश  केला पाहिजे. केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषक घटक जर शरीरात तयार होत नसतील तर याचा परिणाम हा तुमच्या केसांवर दिसून येतो. आणि केसांची गळती रोखणे मुश्किल होऊ शकते.तुमचे केस दाट व्हावेत म्हणून तुम्ही सप्लिमेंट घेतात का ? परंतु सप्लीमेंट न घेता तुम्ही तुमच्या आहारात पोषक घटकांचा समावेश केल्यास तुमच्या केसांना योग्य तो परिणाम दिसण्यास मदत होऊ शकते. 

केसांची वाढ :

मित्रांनो, केसांची वाढ योग्य रीतीने चांगली व्हावी म्हणून आठवड्याला किंवा आठवड्यातून तीनदा तरी तुम्ही केसा स्वच्छ ठेवली पाहिजेत. हल्ली प्रदूषणातही खूप वाढ झालेली आहे. या प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावरही परिणाम होत असतो. आणि याचाच परिणाम हा केसांवरील दिसून येत असतो. म्हणून बाहेर जाताना केसांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, नियमित व्यायाम केल्याने देखील केसांची आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकते. यासाठी तुम्ही नियमितपणे व्यायाम केला पाहिजे.

व्यायाम केल्याने योग्य प्रकारची ऊर्जा आपल्या शरीरास मिळत असते. आणि यामुळे आपले आरोग्यही चांगले राहू शकते. आपले आरोग्य उत्तम राहिले तर त्याचा परिणाम हा केसांवर दिसून येतो. त्यासाठी तुम्ही रोज व्यायाम केला पाहिजे, योग्य तो हिरव्या पालेभाज्यांचा फळांचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. कडधान्य खाल्ली पाहिजेत. उत्तम प्रकारे व्यायाम केला पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या केसांची योग्य ती निगा राखली पाहिजे. याने तुमचे केस घनदाट होण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते.

वाचा  नॉनस्टिक भांड्यात जेवण बनवताना काय काळजी घ्यावी? Non sticky bhandyat jevan kase banval

अंडी खाऊन बघा :

       अंडी हे सगळ्यांनाच आवडतात.अंड्यामध्ये प्रथिने आणि बायोटिन चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. अंड्यातील या दोन्ही घटकांमुळे केसांचे मुळापासुन पोषण होते. केसांच्या वाढीसाठी आहारात प्रथिने युक्त पदार्थांचा समावेश असणे खूप आवश्यक असते. म्हणून अंड्यांचे सेवन करणे गरजेचे ठरू शकते. केसांवरील फॉलिकल्स चा थर प्रामुख्याने प्रोटिन्स पासूनच बनलेला असतो. अंड्यामध्ये झिंक, सेलेनियम आणि इतर पोषक घटक देखील मुबलक प्रमाणात असते. म्हणून केसांच्या वाढीसाठी अंडे खाणे फायद्याचे ठरते. म्हणून तुम्ही तुमच्या आहारात अंड्यांचे सेवन करणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते.

सुकामेवा :

       मित्रांनो,सुकामेवा हे तर सगळ्यांच्याच आवडीचे. सुकामेवा चवीला तर चांगला लागतोच पण त्याचे आरोग्याला होणारे फायदे हि खूपच आहेत. सुकामेवा मुळे केसांची वाढ नीट होते आणि केसही दाट होतात. फक्त एक पाउंड बदाम जरी रोज खाल्ले ना तरी  शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकाची भरपाई होते. शिवाय झिंक व ब जीवनसत्व यांची पूर्तता देखील होते. म्हणून तुमच्या नेहमीच्या आहारात सुक्यामेव्याच्या समावेश असणे फायद्याचे ठरते. अक्रोड हे तर केस वाढीसाठी उत्तम स्रोत आहे. अक्रोड चे नियमित सेवन केल्याने तुमच्या केसांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. म्हणून तुम्ही नियमित पणे सुक्या मेव्याचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते.

कडधान्य खाऊन बघा :

      मित्रांनो, कडधान्य यांचे सेवन तुम्ही रोजच्या आहारात नियमितपणे करू कडधान्य रोज खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरास आवश्यक ती ऊर्जा मिळू शकते. कडधान्य यातून आपल्याला बऱ्याच प्रमाणात प्रथिने मिळतात. म्हणून कडधान्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. कडधान्य मुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. तसेच लोह, बायोटीन आणि फॉलिक सारखी पोषक घटक ही कडधान्य खाल्ल्यामुळे मिळू शकतात. केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात कडधान्यांचा समावेश नक्कीच करून बघा.

पालक :

    मित्रांनो,आरोग्याला अत्यंत पोषक असणारी हिरवी पालेभाजी म्हणजे पालक पालक ची तुम्ही तुमच्या आहारात नियमितपणे समावेश केला पाहिजे. पालक मध्ये लोह, अ आणि क जीवनसत्व यांचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. अ जीवनसत्वामुळे डोक्यातील त्वचेत आर्द्रता टिकून राहते. तसेच पालक मध्ये मुबलक प्रमाणात लोह असल्याने शरीराला आवश्यक असणारे लोहाची मात्रा देखील यातून मिळते. पालक खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण हे तर वाढतेच वाढते आणि याचा परिणाम म्हणून तुमच्या केसांची वाढ ही चांगली होण्यास मदत होऊ शकते. म्हणून नियमितपणे पालक खाल्ल्यास आपल्या आरोग्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.

वाचा  फास्टफुड खाण्याचे नुकसान

बोर आणि स्ट्रॉबेरी :

    बोर आणि स्ट्रॉबेरी हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत मध्ये सगळ्यांनाच आवडत असते.बोर किंवा स्ट्रॉबेरी यासारख्या फळांमध्ये क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. यामुळे केसांच्या फॉलिकल चे संरक्षण होते. आणि केसही तुटत नाहीत. मित्रांनो शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास ॲनिमिया होऊ शकतो. म्हणून बोर आणि स्ट्रॉबेरी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील क जीवनसत्त्व वाढण्यास मदत होते. क जीवनसत्व म्हणजेच विटामिन सी आहारातील लोह शरीरात शोषून घेण्यास मदत होते. मित्रांनो,संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की लोहाच्या कमतरतेमुळे केस गळू लागतात. म्हणून शरीरात पुरेशा प्रमाणात लोह राहिल्यास केस गळतीची समस्या कमी होण्यास मदत होते. म्हणून तुम्ही आवर्जून पणे बोर आणि स्ट्रॉबेरी यांचा समावेश तुमच्या आहारात नक्कीच करू शकतात याने तुम्हाला बऱ्याच प्रकारे फायदा होऊ शकतो.

अवोकॅडो :

   मित्रांनो, अवोकॅडो या फळाचा समावेश तुम्ही तुमच्या नियमित आहारात करून बघा. याने तुमच्या केसांचे आरोग्य हे चांगले राहण्यास नक्कीच मदत होऊ शकते. एका मध्यम आकाराच्या अवोकॅडो पासून तुम्हाला 21 टक्के इतक्या प्रमाणात ई जीवनसत्त्व मिळू शकते. ई जीवनसत्व हे केसांच्या वाढीसाठी खूपच मदत करते. म्हणून अवोकॅडो या फळाचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात करू शकतात याने तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.

मासे :

  मित्रांनो,मासे यांचा समावेश तुमच्या आहारात केल्यामुळे तुमच्या आरोग्य हे चांगले राहण्यास नक्कीच मदत होऊ शकते.मासे खाल्ल्यामुळे केसांची वाढ चांगल्या प्रमाणात होते. मासे हे omega-3 चे उत्तम स्रोत असतात. जे केसांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते. Omega-3 आणि ओमेगा 6 सारख्या फॅटी एसिडमुळे केसांची गळती थांबून केस दाट होऊ शकतात. मासे खाल्ल्यामुळे तुमचे केस हे घनदाट होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात माशांचे नियमितपणे सेवन करू शकतात. त्यामुळे तुमचे केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकते.

रताळे :

   मित्रांनो, तुम्ही तुमच्या आहारात रताळे यांचे सेवन करू शकतात. रताळे यामध्ये बीटा कॅरोटीन चे प्रमाण जास्त प्रमाणात असते. शरीरात या घटकाचे रूपांतर हे अ जीवनसत्व यात होत असते. यातून मिळणारे जीवनसत्त्वाचे प्रमाण यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. ज्यामुळे डोक्याची त्वचा निरोगी राहते व डोक्यात कोंडा होत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या आहारात रताळ्याचा समावेश केल्याने नक्कीच फायदा होऊ शकतो.

वाचा  चिकन सूप पिल्यामुळे होणारे शरीराला फायदे :-

बिया :

   मित्रांनो बिया खाल्ल्यामुळे देखील तुम्हाला तुमच्या आरोग्यास फायदा होऊ शकतो. सूर्यफुलाच्या बिया या चवीला तर खूप छान बिया यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात जीवनसत्व मिळू शकते.बिया या मध्ये भरपूर प्रमाणात पोषणद्रव्ये असते. फ्लॅक्स सीडस हे ओमेगा 3 ची कमी भरून काढतात. या सगळ्या आवश्यक घटकांची कमी भरून काढण्यासाठी आहारात बियांचा समावेश केला पाहिजे.

गोड मिरची व लिंबूवर्गीय फळे यांचा समावेश :

   मित्रांनो तुम्ही तुमच्या आहारात लिंबूवर्गीय फळांचा समावेश नक्कीच करून देऊ शकतात. लिंबूचे नियमितपणे सेवन केल्यास तुमचा चेहरा हातात ताजातवाना दिसू शकतो. आणि तुमच्या केसांचे आरोग्य देखील सुधारू शकते. लिंबूचे नियमितपणे सेवन केल्यामुळे यातून तुम्हाला भरपूर प्रमाणात विटामिन मिळू शकते. तसेच गोड मिरची मध्ये भरपूर प्रमाणात क जीवनसत्त्व असते. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. एका पिवळ्या मिरचीत एका संत्र्याच्या पाच पट इतके क जीवनसत्व आढळते.

क जीवनसत्वामुळे कोलाजिन ची निर्मिती होते. त्यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते. तसेच गोड मिरची मध्ये क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते. म्हणून तुम्ही तुमच्या नियमित आहारात गोड मिरची तसेच लिंबूवर्गीय फळे यांचा समावेश आवर्जून करून बघा याने तुम्हाला तुमचे केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकते. जागतिक पोषणतज्ञांनी शिफारस केल्यानुसार सकाळी फक्त एक ग्लास लिंबूपाणी तुमची दिवसभराची सी व्हिटॅमिन ची गरज पूर्ण करेल व दिवसभर तुम्हाला तजेलदार वाटेल सुद्धा !!!

         केस दाट होण्यासाठी पालक, अंडी, स्ट्रॉबेरी, मासे रताळे,सुकामेवा, गोड मिरची, कडधान्य आणि सोयाबीन या पोषक घटकांचा समावेश केला पाहिजे.

    

   धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here