जेवणाच्या ताटात हात धुणे योग्य की अयोग्य

0
1803
जेवणाच्या ताटात हात धुणे योग्य की अयोग्य
जेवणाच्या ताटात हात धुणे योग्य की अयोग्य

नमस्कार, एकदा मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते, तिथे त्यांच्या घरी तिच्या मुलाची बर्थडे पार्टी होती. आम्हाला सगळ्यांना तिने जेवायला वाढले, जेवणामध्ये पुरीभाजी, सांडगे, खीर, भजी, पापड, असा मेनू होता. जेवण एकदम छान होते. जेवण झाल्यावर तिच्याकडची ती पद्धत पाहिली, आणि मला एकदम किळसवाणे वाटले. कारण जेवण झाल्यावर त्या सगळ्यांनी ताटात हात धुतले. त्यावेळी मी तिला बोलू शकली नाही. पण नंतर दोन दिवसानंतर, मी तिला माझ्या घरी बोलावले, आणि तिला सांगितले, तुला एक सांगू, तूला राग तर नाही येणार ना, तर ती बोलली नाही ग, बोल त्यावेळी मी तिला सांगितले की, जेवणाच्या ताटात हात धुणे ची पद्धत अगदी अयोग्य आहे, ती म्हणाली का ? असे काय होते? आपण जे खातो तेथे हात धुतले तर काय बिघडते ?

आपल्या ताटात, दुसऱ्याच्या तर ताटात नाही ना, त्यावर मी तिला बोलली, अगं बाई जेवण हे परब्रम्ह असते, आणि त्याच्यात जर आपण हात धुतला, तर आपण त्या परब्रह्माचा अपमान करतो, असे म्हणतात. तिला माझे थोडे म्हणणे पटले, आणि ती बोलली हो ग ! खरंच मी चुकते ग!  मी पण माझ्या मुलांना तसेच सांगेल, की जेवणानंतर ताटात हात धुऊ नका. वाटल्यास तुम्ही जाऊन बेसिंग मध्ये हात धुवावेत. तर खरंच सांगते, मित्रांनो खरंच जेवणानंतर ताटात हात धुणे अगदी अयोग्य आहे. तसेच काहींची काय सवय असते, की जेवण झाल्यावर तर त्याच्या आजूबाजूचे खरकटे उचलून, त्याच ताटात टाकून,  हात धुतात. कृपया तसे करू नका. तर आज आपण जेवणाच्या  ताटात हात धुणे योग्य कि अयोग्य त्या बाबतीत थोडी माहिती जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात. 

जेवणानंतर ताटात हात धुणे अयोग्य, असे का म्हणतात ? 

तुम्हाला माहिती आहे का, शेतकरी राजा एक अन्नाचा दाणा बनवण्यासाठी, किती मेहनत घेत असतो. तसेच जेवण बनवण्यासाठी आपली आई, आजी, मावशी किती मेहनत घेतात, आणि जेवण झाल्यावर , ते प्रेमाचे सात्विक आहार जेव्हा  आपल्याला देतात, त्यावेळी ते किती प्रेमाने वाढतात. तसेच, तोच ताट किंवा फ्लेट किती प्रेमाने त्याच्या अंगात सगळे पदार्थ व्यवस्थित रित्या घेतो, आणि तो आपल्याला ते खाऊ घालतो, म्हणजे ही एक प्रोसिजर असते, की आपल्या शेतापासून, बनवण्यापासून, त्या ताटात घेण्यापासून, तर आपल्या पोटात जाणे पर्यंतची, आणि ज्यावेळी आपण ही प्रोसिजर पूर्ण करतो. त्यावेळी त्या आपण पालख्या घड्यावर पाणी असे सुद्धा म्हटले जाऊ शकते, कारण आपण त्या ताटात हात धुतो, म्हणजे एक प्रकारे आपण सरळ त्याचा अपमान करतो.  अन्न हे परब्रम्ह असते, आणि ह्याच परब्रह्माच्या ताटात जर तुम्ही हात धुतला, तर अगदी किळसवाणे होईल. तसेच जेवण नंतर तुम्ही तुमची चूळ भरायला हवी, आणि हात बेसिनमध्ये धुवायला हवा. 

वाचा  घराची अंतर्गत व बाह्य स्वच्छता कशी ठेवावी ?

जेवणानंतर ताटात हात धुणे योग्य का नसते ? 

अन्न हे परब्रह्म हे सगळ्यांनाच माहिती आहे. ज्या अन्नापासून आपल्याला ऊर्जा मिळते, जे आपल्याला सात्विक ठेवतो, आपल्या शरीरात जो आवश्यक ते विटामिन्स पुरवठा करतो, आपले शरीर निरोगी व सुदृढ बनवतो. अशा ताटाचा व अन्नाचा आपण आदर करायला हवा, शिवाय जेवणानंतर ताटात हात धुतले, की लक्ष्मी रुसते, शिवाय अन्नपुर्णाचाही अपमान होतो. जेवणाला ला यज्ञ असे म्हणतात. 

                 अन्न हे पूर्णब्रह्म ! 

                 उदर भरण नोहे! 

                 जाणिजे यज्ञकर्म! 

ही म्हण जेवणापूर्वी आपण म्हणतो, तसेच यज्ञाला जसे आपण पाणी व तुपाचा आहुती देतो, तसेच जेवण करण्यापूर्वी आपण ताटाला पाणी गोल फिरवतो, शिवाय जेवण करताना, आपण पहिला घास गोग्रास काढून ठेवतो, त्याच प्रमाणे आपण सर्व देवांची पूजा करतो. म्हणून तर म्हणतात ना, या देवांचा अपमान करू नका, जेवण झाल्यावर ताटात हात धुउ नका. 

जेवण करताना कोणते नियम पाळायला हवेत ! 

अनेकांची सवय असते, जेवण करताना व्यवस्थित बसत नाही, व्यवस्थित जेवत नाही, काही अन्न कुठे, खाली, तर काही अंगावर, तर काही ताटात तसेच राहू देऊन, ताटात हात धुतात. पण हे अगदी चुकीचे आहे.  तुम्ही जेवण करताना, काही नियम पाळायला हवेत. मग ते नेमके कोणते ? चला तर जाणून घेऊयात ! 

  • जेवण करताना जेवणापूर्वी, हात स्वच्छ धुवायला हवेत. जेणेकरून बाहेरील किटाणू तुमच्या पोटात जाणार नाही. 
  • जेवताना नेहमी खाली आसन ग्रहण करून, मांडी वाळून बसायला हवेत. खाली बसल्यामुळे तुमची पचनसंस्था सुरळीत होते. 
  • जेवताना तुमचे लक्ष नेहमी तुमच्या ताटात असले पाहिजे, इकडे तिकडे लक्ष देऊन जेवल्यामुळे, तुम्हाला पचायला जड जाते. 
  • जेवण करताना शांतचित्ताने जेवावे. बडबड करू नये, कारण जेवताना अन्नपदार्थाच्या  ठसका, लागून श्वास नलिकेमध्ये जाऊ शकतो. 
  • जेवताना टीव्ही, मोबाईल बघू नये, शांतचित्ताने एकाग्रतेने जेवावे, म्हणजे तुम्ही सुदृढ व निरोगी होणार. 
  • जेवताना ते अन्नपूर्णा मातेची म्हणजे, आईच कौतुक करा. कारण ती तेवढे जेवण बनवण्यासाठी, खूप मेहनत करते. तेवढं तिला ही बरे वाटते. 
  • जेवण झाल्यावर चूळ भरून घ्यावी. जेणेकरून दातात जे अन्नपदार्थ अडकलेले असतात, ते बाहेर निघतात. 
  • जेवणानंतर गुळाचा खडा खावे, जेणेकरून तुम्ही जे खाल्ले असते, ते तुम्हाला पचायला सोपे जातील. 
  • जेवणानंतर हात बेसिनमध्ये स्वच्छ धुवावेत. जेणेकरून तुमच्या नखांमध्ये, हातामध्ये अन्नपदार्थ अडकले असतील, ते बाहेर निघतात, व स्वच्छ कपड्याने हात पुरावेही. 
वाचा  घरात रूम फ्रेशनर मारण्याचे फायदे

हे काही अगदी साधे सोपे नियम आहेत, तरी आपण ते पाळायला कंटाळा करतो. कृपया असे करू नका. त्यांना चा अपमान करू नका, आणि हे साधे सोपे नियम पाळावेत. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला सांगितले आहेत, की जेवणानंतर ताटात हात धुणे, योग्य की अयोग्य आणि त्यामागील शास्त्र. तसेच आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर कृपया आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

 धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here