नमस्कार, आज आपण बघणार आहोत डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे या वर काही घरगुती उपाय एकदा तयारी करण्यासाठी मी आरशात उभी राहिली त्यावेळी चेहऱ्यावर असे काही दिसले, की थोडी अचंबित झाली, मग मी ते पावडर लावून झाकायचा प्रयत्न केला. पण तरीही ते थोड्यावेळाने दिसायला लागले, ते म्हणजे माझ्या डोळ्याखालील काळी वर्तुळे. मला उगाचच प्रश्न पडला, की माझ्या डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसायला लागले असतील, असे मनात निरनिराळे प्रश्न यायला लागले. त्यावेळी आई पण मला म्हणाली, अगं तू खरंच तुझ्या आहाराकडे लक्ष देत नाही, धावपळ करते, खरंच आता हल्ली वाढत्या प्रदूषणामुळे, तसेच धावपळीच्या युगात, आपले अवेळी खानपान याच्या प्रभावामुळे, अनेक लोकांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसायला लागलेली आहेत. काळी वर्तुळे आपल्या डोळ्यांच्या खाली असले, की आपण आपली स्वतःची काळजी घ्यायला हवी, कारण डोळ्याखाली वर्तुळे ही अशक्तपणा, शरीरात रक्ताची कमतरता, तसेच वाढत्या प्रदूषणामुळे, यासारख्या समस्यांमध्ये बघायला मिळतेय. बाहेरचे जंकफूड, तेलकट-तुपकट, कोणत्याही पदार्थांचा मारा आपण आपल्या शरीरावर करत असतो. आपण हिरव्या पालेभाज्या तर खाणे दूरच राहतो, खरंच आज आपण बघणार आहोत, की डोळ्याखाली काळी वर्तुळे कशामुळे येतात? त्याची कारणे कोणती? आणि त्यावर कोणते घरगुती उपाय करायला हवेत? चला, तर मग जाणून घेऊया की, डोळ्याखाली काळी वर्तुळे नेमकी कोणत्या कारणामुळे येतात?
Table of Contents
डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्याची कारणे?
डोळ्याखाली काळी वर्तुळे अनेक कारणांमुळे येतात. ती नेमकी कोणती, चला तर मग जाणून घेऊयात!
- वाढत्या प्रदूषणामुळे,
- शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे,
- हिरव्या पालेभाज्यांच्या अभावामुळे,
- शरीरात रक्ताची कमतरता झाल्यामुळे,
- अतिशय जागरण केल्यामुळे,
- सारखे- सारखे टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, यांच्यावर काम केल्यामुळे,
- तेलकट-तुपकट पदार्थांचा जास्त वापर झाल्यामुळे,
- अनुवंशिक गुण असल्यामुळे,
- दीर्घकाळापासून आजारी असल्यामुळे,
- धूम्रपान , अमली पदार्थ सेवन जास्त प्रमाणात केल्यामुळे,
- तसेच वाढत्या वयामुळे ही होतात,
डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात, ते कसे समजते?
वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की डोळ्याखाली काळी वर्तुळे नेमक्या कोणत्या कारणांमुळे येतात. ज्यावेळी तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात, त्यावेळी डोळ्याजवळ आजूबाजूचा भाग काळसर दिसतो. आणि संपूर्ण चेहरा गोरा आणि डोळ्याजवळ गोल सर्कुलेशन पद्धतीने, डोळ्याच्या आजूबाजूचा भाग काळा दिसतो, आणि डोळे खोलवर गेलेल्या सारखे दिसतात.
डोळ्याखाली काळी वर्तुळे आल्यास, कोणते घरगुती उपचार करायला हवेत?
वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुमच्या डोळ्याखाली वर्तुळे कोणत्या कारणांमुळे येतात, ते सांगितलेले आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत, की डोळ्याखाली काळी वर्तुळे आले, तर त्यावर कोणते घरगुती उपचार करायला हवेत. चला तर मग जाणून घेऊयात!
बटाट्याचा वापर करून बघा
हो, बटाट्याचा वापर हा पूर्वीच्या काळापासून केला जात आहे, जर तुमच्या चेहऱ्यावर काळे चट्टे, डाग, पुरळ असतील, तसेच डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील, अशा वेळी जर तुम्ही बटाट्याचा वापर केला, तर त्याने तुम्हाला फरक मिळेल. त्यासाठी तुम्ही बटाट्याचा कीस करून, डोळ्याच्या आजूबाजूला लावावा, आणि दहा ते पंधरा मिनिटांनी धुवून टाकावे, असे तुम्ही एक आठवडा केले, तर तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होताना दिसेल.
काकडीचा वापर करा
तुम्हाला कुठेही पार्लर मधे काकडी चा वापर हा डोळ्यांखाली करायला सांगतात, हो काकडीचा वापर केल्याने खरंच डोळ्याखालील, काळी वर्तुळे कमी होण्यास मदत मिळते. त्यासाठी तुम्ही काकडीचे चकत्या कापून, जेव्हाही फ्री असाल, अशावेळी त्या ठेवल्यानंतर तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे जाण्यासाठी मदत मिळते. शिवाय डोळ्यातील आग होणे, उष्णता असणे, डोळ्यांची लाली, यासारख्या समस्याही कमी होतात.
कोरफडीचा वापर करून बघा
कोरफड आंटीबॅक्टरियल आहे, तुमच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर कोणतीही इन्फेक्शन, व काही समस्या झाली असल्यास, त्यावर कोरफड फार गुणकारी असते. जर तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील, अशा वेळी जर तुम्ही डोळ्यांच्या काळी वर्तुळ यांना कोरफड लावले, तर तुमच्या डोळ्यातील उष्णता बाहेर निघेल, शिवाय काळे सर्कल कमी होण्यास मदत मिळेल, त्यासाठी तुम्हाला कोरफड घ्यायची आहे, तिचा गर काढून त्यात चिमूटभर हळद टाकून, तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागाला लावायचे आहे. असे तुम्ही दिवसातून दोन वेळेस केले असता, पंधरा ते वीस दिवसात तुम्हाला डोळ्याखालील काळी वर्तुळ, यांवर आराम मिळेल. करून बघा, प्रभावशाली उपाय आहे.
लिंबाचा रस वापरून बघा
डोळ्याखालील काळी वर्तुळे जाण्यासाठी, लिंबाचा रस फार फायदेशीर ठरेल. कारण लिंबू मध्ये विटामिन सी असते. अशा वेळी जर तुम्ही डोळ्याखालील काळी वर्तुळ यांवर यांचा वापर केला, तर तुम्हाला लवकर फरक पडेल. त्यासाठी तुम्हाला लिंबू कापून+ त्यात मधाचे दोन ते तीन थेंब टाकून, त्याने डोळ्यांच्या आजूबाजूला मसाज केली, तर तुम्हाला दोन ते तीन आठवड्यात फरक जाणवेल, करून बघा.
खोबरेल तेल बदाम तेल वापरून बघा
हो, डोळ्यांखाली काळी वर्तुळे घालवण्यासाठी तुम्ही शुद्ध खोबरेल तेल व बदाम तेल एकत्र करून, डोळ्याखालील काळी वर्तुळ यांवर दहा ते पंधरा मिनिटे मसाज केलात, तर तुम्हाला ताबडतोब फरक जाणवेल, शिवाय तुमचे डोळ्यांची आग होणे, कमी होईल.
पुरेसे पाणी प्या
आपल्या शरीराला पुरेसे पाण्याची गरज आहे, आणि एवढे साधे सोपे काम करायला आपण किती कंटाळा करतो, जर तुम्हाला शरीरात पाणी कमी पडले, तर तुम्हाला डीहायड्रेशन सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते, आणि डीहायड्रेशन मुळे थकवा येणे, डोळ्याखाली काळी वर्तुळे होणे, झोप न येणे, यासारख्या समस्या बघावयास मिळतात.
आपले शरीर हे पाण्याने 60 ते 65 टक्के भरलेले आहे. अशा वेळी तुमच्या शरीराला पाण्याची गरज असते. तुम्ही दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्यायला हवे, जर तुमच्या शरीराला पुरेसे पाणी मिळाले, तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर व्हाल. शिवाय तुम्ही तंदुरुस्त राहनार, तसेच केसांचे सौंदर्य च्या सगळ्या तक्रारी तुमच्या दूर होतील, करून बघा.
हिरव्या पालेभाज्या फळे खात जा
तुम्ही तुमच्या शरीरात विटामिन युक्त हिरव्या पालेभाज्या व फळे खायला हवेत. हिरव्या पालेभाज्या व फळे खाल्ल्याने, तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता दूर होते, शिवाय ब्लड सर्कुलेशन सुरळीत राहते. तसेच शारीरिक तक्रारी दूर राहतात. हिरव्या पालेभाज्या फळे खाल्ल्याने, तुमच्या डोळ्याखालील वर्तुळे ही कमी होतात. शिवाय तुमच्या शरीराला विटामिन ए,बी,सी,डी यासारखे विटामिन्स मिळतात. कार्बोदके, प्रथिने, मिनरल्स, यासारखे घटक द्रव्य तुमच्या शरीराला मिळतात, व तुमच्या शरीराची मेटाबोलिजम सिस्टीम सुधारतो.
योगासने करत जा
दिवसभरातील थकवा जाण्यासाठी तुम्ही योगासने करायला हवे. योगासनाने तुमचे शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळते. रोजच्यारोज तुम्ही जास्त नाही, पण अर्धा तास तरी तुमच्यासाठी द्यायला हवा. योगासने केल्याने तुमचे शरीर निरोगी राहते. शिवाय तुमचे वय ही दिसत नाही. तुम्ही रोज सूर्यनमस्कार करायला हवा.
चला, तर मग आज आम्ही तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे, कोणत्या कारणामुळे येतात. तसेच त्यावर काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत. आम्ही सांगितलेले उपाय करूनही, डोळ्याखालील काळी वर्तुळे कामी होत नसतील, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तसेच आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवावे.
धन्यवाद