बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी?

0
1753
बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी
बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी

बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी ?

नमस्कार मित्रांनो. काही दिवसांपूर्वीच आमच्या बाजूच्या मावशींच्या मुलीची सुखरूप डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी ही नॉर्मल झाली. त्यामुळे बाळ आणि बाळाची आई दोघेही सुखरूप आणि मजेत होते. कुणीतरी पाव्हना घरी आलाय म्हणजे बाळ घरी आले हे ऐकताच बाळाला बघण्यासाठी अनेक पाहुणे येत असतात. तर आमच्या बाजूच्या मावशीच्या घरी देखील बाळाला बघण्यासाठी खुप गर्दी झाली. एकतर प्रसूती काळामध्ये खूप वेदना होत असतात, हे आपल्याला चांगलेच माहित आहे. त्यामुळे आईला व बाळाला दोघांनाही विश्रांतीची खूप गरज असते. रोज त्या मावशींकडे बाळाला बघण्यासाठी सतत कोणीना कोणी येत होते. त्यामुळे आईची व बाळाची योग्य त्या पद्धतीने काळजी घेतली जात नव्हती आणि त्यांना पुरेशी विश्रांती देखील मिळत नव्हती. आणि अशा काळात बाळंतिणीची काळजी घेणे फार महत्वाचे असते.

तसेच सर्व जण त्या बाळाचे फोटो काढत होते. बाळ झोपलेले असले तरी बाळाला सारखे सारखे जागवत होते. त्यामुळे ते बाळ आणि बाळाची आई यांचा स्वभाव थोडा चिडचिड होत होता. आणि हे मला देखील सहन होत नव्हते. शेवटी एका दिवशी मी त्या मावशीकडे जाऊन त्यांना व्यवस्थित समजावून सांगितले की मावशी, आई आणि बाळ या दोघांनाही आता सध्या विश्रांतीची खूप गरज आहे. त्यामुळे त्यांना दोघांनाही पुरेपूर विश्रांती घेऊ द्या. कारण, डिलेव्हरी झाल्यानंतर आई व बाळा दोघांनाही खूप आरामाची गरज असते. कमीत कमी दीड दोन महिने तरी त्यांना भरपूर आराम द्यावा लागतो. त्या मावशीला देखील माझे सांगणे पटले आणि त्यांनी येणाऱ्या पाहुण्यांना उशीराने बघायला येण्यास सांगितले, ज्यामुळे आई व बाळ दोघांनाही आराम मिळू शकेल.

खरंच मित्रांनो, डिलिव्हरी काळामध्ये खुप असाह्य वेदना बाळाच्या आईला सहन करावे लागतात. त्यामुळे सुंदर अशा बाळाचा जन्म होत असतो. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतिणीची काळजी घेणे खूप आवश्यक ठरत असते. डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ व आई दोघांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर आईचा चेहरा देखील सुखावतो आणि तसेच बाळंतीनी शरीराने देखिल दुबळी होत जाते आणि आवश्यक तेवढे पुरेसे दूध बाळाला मिळत नाही त्यामुळे आई आणि बाळ या दोघांची तब्येत खराब होऊ शकते. त्यामुळे डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतिणीची काळजी जेवढी जास्तीत जास्त घेतली तेवढे चांगले आई आणि बाळ दोघं चांगले राहू शकतील. तर मित्रांनो, आज आपण बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी ? तसेच बाळंतीणीचा आहार कसा असावा ? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतिणीची काळजी कशापद्धतीने घ्यावी ? 

      मित्रांनो, ज्याप्रमाणे गरोदरपणामध्ये बाळ व्यवस्थित असावा त्यासाठी योग्य वर डॉक्टरांचा सल्ला घेऊन काय खावे काय खाऊ नये तसेच दर महिन्याला तपासणीसाठी जावे लागत असते, म्हणजेच गरोदरपणामध्ये ज्याप्रमाणे योग्य काळजी घेतलेली असते. त्याचप्रमाणे डिलिव्हरी झाल्यानंतर देखील अत्यंत काळजी घेणे आवश्यक असते. कारण डिलिव्हरी चा काळा हा अत्यंत नाजूक असा असतो. म्हणजेच आई आणि बाळ दोघांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा काळ असतो. डिलिव्हरी मध्ये आईला बाळाला जन्म देण्यासाठी खूप अशा असहाय्य वेदना सहन करावे लागत असतात.

वाचा  योगा करण्याचे फायदे

तसेच बाळाला जन्म देत असताना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव देखील होत असतो आणि आईच्या शरीराची झीज देखील झालेली असते. डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाच्या आईला खूप अशक्तपणा आलेला असतो. त्यामुळे डिलिव्हरीनंतर आई आणि बाळ या दोघांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. तर डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतिणीची काळजी कशा पद्धतीने घ्यायला हवी हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • डिलिव्हरी झाल्यानंतर आई आणि बाळ या दोघांनाही विश्रांतीची खूप गरज असते. त्यामुळे त्यांना पुरेपूर विश्रांती द्यावी. डिलिव्हरी नॉर्मल झालेले असो अथवा सिजेरियन पद्धतीने झालेले असो सुरुवातीचा काळ हा खूप महत्त्वाचा असतो कारण की डिलिव्हरी दरम्यान बाळंतिणीला खूप असह्य अशा वेदना सहन करावा लागलेला असतात. त्यामुळे शरीराला एक प्रकारे थकवा आलेला असतो.
  • बाळंतिणीला वॉशरूम ला जायचे असेल तरी बाळंतिणीच्या आईने अथवा सासूने अर्थात जी व्यक्ती बाळंतिणीच्या सोबत असेल त्या व्यक्तीने बाळंतिणीला सोबत जाण्यासाठी आधार द्यावा कारण की, डिलिव्हरी दरम्यान खूप रक्तस्राव झालेला असतो त्यामुळे बाळंतिणीला अशक्तपणा आलेला असतो, त्यामुळे चक्कर येण्याची भीती देखील असते.
  • डिलिव्हरी नंतर अजूनही खूप वेदना होत असतील तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांना दाखवावे त्यामुळे डॉक्टर योग्य त्या पद्धतीने उपचार देऊ शकतील.
  • तसेच टाक्यांची काळजी देखील व्यवस्थित प्रकारे घ्यावीत डॉक्टरांनी टाक्यांना लावण्यासाठी दिलेला मलम वेळोवेळी लावावा. तसेच टाके देखील स्वच्छ ठेवावेत त्या मोबाईल टाके लवकर सावरायला मदत होते. त्याचप्रमाणे दिलेल्या गोळ्या, औषधे वेळेवर घ्याव्यात. याने देखील टाक्या सावरायला मदत होईल.
  • डिलिव्हरी झाल्यानंतर आईने बाळाला लगेच स्तनपान द्यावे. सुरवातीचे स्तनपान देणे बाळाच्या आरोग्यासाठी खूप उपयोगी ठरते. तसेच बाळाला बाहेरील दूध बसण्यापेक्षा आईने स्तनपान करू द्यावे आईचे दूध बाळासाठी खूप आवश्‍यक असते आणि याने बाळाची प्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होत असते.
  • डिलिव्हरी झाल्यानंतर आई आणि बाळ दोघांनाही बघण्यासाठी पाहुणे गर्दी करत असतात.डिलिव्हरी झाल्यानंतर चा सुरुवातीचा काळ आई आणि बाळासाठी अत्यंत आवश्यक असतो कारण की या दरम्यान त्यांना खूप विश्रांतीची गरज असते. आई आणि बाळ या दोघांनाही बघण्यासाठी सतत कोणते
  • ना कोणते पाहुणे येत असतात, त्यामुळे त्यांना पुरेपूर विश्रांती मिळत नाही परिणामी बाळा आणि आई दोघेही चिडचिडी होतात त्यामुळे पाहुण्यांना उशीराने येण्यास सांगावे कारण आईला आणि बाळाला दोघांनाही याकाळात शांततेची आणि विश्रांतीची गरज असते. 
  • दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा आठ किंवा पंधरा दिवसांनी बाळंतिणीला फेड तपासणीसाठी घेऊन जावे.
  • डिलिव्हरी झाल्यानंतर आईला व बाळाला दोघांनाही अंघोळीच्या आधी तेलाने मसाज द्यावी. यामुळे बाळंतिणीचे शरीर हे पूर्ववत व्हायला मदत होत असते. त्याचप्रमाणे बाळंतिणीला डाळीचे पीठ+ दुधाची साय + चिमूटभर हळद, असे मिश्रण लावून आंघोळ करण्यास सांगावी. त्याचप्रमाणे बाळालाही अंघोळीच्या वेळी याच मिश्रणाने मसाज करून कोमट पाण्याने आंघोळ घालावी.
  • डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतिणीला डोक्याला रुमाल बांधण्यास सांगावे कारण बाहेरील हवेमुळे बांधणीचे डोके दुखण्याचे समस्या वाढत असते.
  • तसेच डिलिव्हरी झाल्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर बांधणीला शेक शेगडी आवश्यक द्यावी त्यामुळे कंबरदुखीचा त्रास कमी होतो.
वाचा  कानातील मळ काढण्यासाठी उपाय

वरील प्रमाणे डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतिणीची व बाळाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरते तसेच दोघांनाही शांततेची व विश्रांतीची गरज असते तर ती पुरेपूर द्यावी. त्याचप्रमाणे डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतिणीला आराम मध्ये काय खायला द्यावे आणि काय खायला देऊ नये याविषयी आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतिणीच्या आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा ?

         मित्रांनो डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला दोघांनाही आवश्यक ती विश्रांती आवश्यक द्यावी कारण डिलिव्हरी नंतर आईला खूप थकवा आलेला असतो तसेच शरीराची देखील झीज झालेली असते. त्याचप्रमाणे डिलिव्हरी काळामध्ये खूप रक्तस्राव देखील झालेला असतो. कर बाळंतिणीच्या शरीराची झीज भरून निघावी रक्ताची कमतरता भरून निघावी यासाठी बांधलेला योग्य प्रकारे आहार देणे खूप आवश्यक असते. तर बांधणीच्या आहारामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश असावा हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

  1. डिलिव्हरी झाल्यानंतर सुरुवातीला बाळंतिणीला बाळंत काढा आवश्यक द्यावा. यामध्ये कडूनिंब आणि गुळाचा देखील समावेश जरूर करावा. कारण डिलिव्हरी दरम्यान पोटामध्ये जी घाण साचलेली असते तर ती या बाळंत काढयाने निघून जाण्यास देखील मदत होत असते.
  2. डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतिणीच्या आहारामध्ये गावरानी गाईचे तूप याचा समावेश जरूर करावा. कारण डिलिव्हरी नंतर प्रचंड प्रमाणात वात वाढलेला असतो. त्यामुळे तूप खाऊ घालने खूप आवश्यक असते यामुळे वात कमी होऊ शकतो. बऱ्याच बायका या तूप खाल्ल्याने वजन वाढते या भीतीने तू खाण्यास नाकारतात. परंतु असे केल्याने वात वाढण्याची जास्त शक्यता असते.
  3. तूप देताना ते गव्हाच्या घाटावर टाकून द्यावे त्यामुळे खायला देखील छान लागते. तसेच बाळंतिणीला डाळीचे वरण व भात खायला देताना त्यावर देखील तूप आवर्जून घालावे.
  4. बाळंतिणीच्या शरीराची झीज भरून निघावी यासाठी आहारामध्ये योग्य त्या घटकांचा समावेश करणे खूप आवश्‍यक असते तसेच बाळंतीणीला हिरवे पालेभाज्या जास्तीत जास्त प्रमाणात खाऊ घालावे.
  5. बाळंतिणीला पालक आणि मेथी हिरवी पालेभाजी जास्तीत जास्त प्रमाणात खाऊ घालावी कारण यामध्ये लोहाचे प्रमाण पुरेपूर असते आणि डिलिव्हरी दरम्यान खूप रक्तस्राव झाला असतो. त्यामुळे या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होत असते. पालकाची भाजी व मेथीची भाजी ही सुखी न करता पातळ करावी यामुळे बाळंतिणीचे दूध वाढण्यास देखील मदत होत असते म्हणजेच बारा देखील पुरेसे दूध मिळत असते.
  6. डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतिणीला दोन टाइम दूध प्यायला द्यावे. कारण दुधाने दूध वाढत असते. म्हणजेच बाळाला आवश्यक पुरेसे दूध मिळत असते. दुध प्यायला देताना ते नुसतेच देऊ नका तर त्यामध्ये तुम्ही दोन चमचे शतावरी कल्प मिक्स करून घ्यावे त्यामुळे बाळाला पुरेसे दूध मिळण्यास मदत होत असते. आणि दोघांनाही पुरेपूर कॅल्शियम मिळत असते.
  7. बाळंतिणीला योग्य त्या फळांचा, तसेच विटामिन सी युक्त फळांचे सेवन करण्यास घ्यावे. यामुळे आईची व बाळाची लोकांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत असते.
  8. बाळंतिणीला मोड आलेली कडधान्ये खायला द्यावी. नाश्त्याला मुगाची उसळ करून खायला द्यावी.यामुळे योग्य त्या प्रोटीनची कमतरता भरून निघते.
  9. बाळाच्या आईला मुगडाळ युक्त पदार्थांचे सेवन करण्यास द्यावे. कारण मूगडाळ ही खूप पौष्टिक असते. मूग डाळीचा पराठा किंवा मूग डाळीची खिचडी बनवून त्यावर गावरानी तुपाची धार सोडून खायला द्यावी. त्यामुळे खायला देखील छान आणि पचण्यास देखील सोपे जाते यामुळे बाळंतिणीचे पोट साफ होण्यास देखिल मदत होऊ शकते.
  10. टोमॅटोचा तसेच हिरव्या पालेभाज्यांचे सूप आवर्जून प्यायला द्यावे.
  11. बाळंतिणीला भेंडी, गीलके, टोमॅटोची चटणी यांसारख्या फळभाज्यांची भाजी आवर्जून खायला द्यावी.
  12. डिलिव्हरी नंतर बांधणीसाठी डिंक युक्त लाडू बांधून खायला द्यावेत. त्यामध्ये बदाम काजू खारीक खोबरे डिंक यांचा आवश्यकतेनुसार समावेश असावा यामुळे बाळंतिणीचे शरीराची झीज भरून निघण्यास मदत होईल त्याचप्रमाणे भविष्यामध्ये होणारी कंबरदुखीचा त्रास उद्भवणार नाही.
  13. बाळ झाल्यानंतर बाळंतिणीला डोके दुखण्याची समस्या ही वाढत असते.त्यामुळे बाळंतिणीला खसखस आणि खोबरे युक्त बट्ट खायला आवर्जून द्यावे. यामुळे डोकेदुखीची समस्या होत नाही, त्याचप्रमाणे, आई आणि बाळ दोघेही शांत राहतात.
वाचा  ऑईली स्कीनची काळजी व त्यासाठी फेस वॉश

डिलिव्हरी झाल्यानंतर बाळांतीनीच्या आहारामध्ये मध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश करू नये ?

बाळंतिणीच्या आहारामध्ये पोस्टीक घटकांचा समावेश करावा तसेच डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतिणीला काय खायला देऊ नये याविषयी देखील माहिती जाणून घेणे आवश्यक ठरते. या विषय आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

  • डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतिणीला जास्त तिखट मसालेदार युक्त पदार्थांचे सेवन करू नये यामुळे आई व बाळ दोघांनाही त्रास होण्याची शक्यता असते.
  • तसेच बाळंतिणीला बाहेरचे अन्न पदार्थ खाऊ देऊ नये. कारण यामुळे आई आणि बाळ दोघांना त्रास होऊ शकतो.
  • बाळंतिणीला मैदा युक्त पदार्थांचे सेवन अजिबात करू देऊ नये याने तिचे वजन जास्त वाढण्याची देखील शक्यता असते.
  • तसेच बाळंतिणीला थंडगार पाणी पिऊ देऊ नये त्याऐवजी कोमट पाणी पिण्यास द्यावे. यामुळे पोट देखिल साफ होण्यास मदत होते.

वरील प्रमाणे, डिलिव्हरी झाल्यानंतर काय काळजी घ्यावी तसेच डिलिव्हरी नंतर बांधलेला काय खायला द्यावे आणि कोणत्या पदार्थांचा समावेश आहारामध्ये करू नये याविषयी माहिती आपण जाणून घेतलेली आहे.

            वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

        धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here