आमचूर पावडर म्हणजे काय आमचूर पावडरचे फायदे आणि वापर

0
1409
आमचूर पावडर म्हणजे काय आमचूर पावडरचे फायदे आणि वापर
आमचूर पावडर म्हणजे काय आमचूर पावडरचे फायदे आणि वापर

नमस्कार, मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आमचूर पावडर म्हणजे व त्याचे होणारे फायदे याबद्दलची माहिती. आमचूर पावडर ही स्वयंपाक घरातली वापरली जाणारे आहेत. ज्याला आंबटचिंबट, चटपटे, गोड पदार्थ आवडतात, अशा लोकांसाठी तर फार फायद्याचे आहे. कारण ही चटपटीत, आंबटचिंबट, गोड असते. हि कैरी पासून बनवली जाते. हि बनवण्यासाठी कैरी सुकवून, तिचा वापर आपल्या आहारामध्ये केला जातो. जर तुम्हाला एखाद्या पदार्थाला विशिष्ट चव द्यायची आहे. अशा वेळी तुम्ही आमचूर पावडर चा वापर करू शकतात. तसेच तुम्ही सलाड, फ्रूट त्यावर आमचूर पावडर टाकू शकतात.

तसेच हि पावडर भाज्यांमध्ये, मसाल्यामध्ये वापरली जाते. तसेच याचा वापर हा ज्युस मध्येही केला जातोय. आमचूर पावडर वापरल्याने तुम्हाला खूप सारे फायदे होतात. हो, खरंच ऐकून नवल वाटलं ना! पण आमचूर पावडर जर तुम्ही खाल्ली, तर तुमच्या शरीरासाठी ही ती फायदेशीर असते. कारण त्यामध्ये जे घटक असतात, ते आपल्या शरीराला फायदेशीर ठरतात. आज आपण त्या बाबतीत जाणून घेणार आहोत, की हि फक्त चव देणारी नसून, तर आपल्या शरीराला फायदेशीर ही असते. चला तर मग जाणून घेऊयात, आमचूर पावडर म्हणजे काय व की हि पावडर खाल्ल्याने तुमच्या शरीराला होणारे फायदे नेमके कोण कोणते? 

आमचुर पावडर खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे ? 

मित्रांनो, आम चूर पावडर खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदे होतात. तर ते नेमके कोणकोणते ? चला तर मग जाणून घेऊयात. 

आमचूर पावडर मधील घटक द्रव्य :

मित्रांनो, हि पावडर ही कैरी सुकवून बनवली जाते. त्यामुळे तिच्यामधील घटक द्रव्य, आपल्याला फायदेशीर राहतात. तर आमचूर पावडर मध्ये, विटामिन सी, विटामिन ए, कॉपर, लोह, झिंक, प्रोटीन, फायबर, साखर, मॅग्नेशियम, बीटा कॅरोटीन, ऑंटीएक्सीडेंट, यासारखे गुणधर्म असतात. त्यामुळे त्याचे आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे होतात. 

वाचा  पायाची नस दुखणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय

डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते :

जर तुम्हाला डोळ्यांच्या बाबतीत तक्रारी असतील, तसेच तुम्हाला मोतीबिंदूचा त्रास असेल, तर अशा वेळी तुम्ही आमचूर पावडर तुमच्या आहारात घ्यावी.  कारण आमचूर पावडर मध्ये बीटा कॅरोटीन चे गुणधर्म असतात. हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात नेहमी आमचूर पावडर वापरायला घ्यावी. 

पचन क्रियासाठी फायदेशीर ठरते :

बऱ्याच वेळेला, अपचन समस्या खूप जणांना होतात. अजीर्ण होणे, पोटात गॅसेस होणे, यासारख्या समस्या जर तुम्हाला असतील, तर अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारात आमचूर पावडर चा वापर करावा. कारण त्यामध्ये फायबरचे प्रमाण असते, जे तुमच्या पचनक्रियेत अडथळा दूर करण्यास फायदेशीर ठरते. त्यासाठी तुम्हाला सकाळी कोमट पाण्यात एक चमचा आमचूर पावडर टाकून, त्याचे मिश्रण एकजीव करुन सकाळी प्यावेत. त्यामुळे तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. 

बद्धकोष्ठतेचा त्रास यावर फायदेशीर ठरते :

खूप जणांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, तसेच पोट साफ न होणे, शौचास करतांना त्रास होणे, अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारामध्ये, आमचूर पावडर चा उपयोग केला, तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. त्यासाठी तुम्ही नियमित सकाळी कोमट पाण्यात अर्धा चमचा आमचूर पावडर टाकून, ते पाणी प्यावेत. त्यामुळे तुमचे पोट साफ होण्यास मदत मिळते व बद्धकोष्ठतेचा त्रासावर आराम मिळतो. 

वजन कमी होण्यास फायदेशीर ठरते :

बदलत्या जीवनशैलीमध्ये, अवेळी खाणे, जागरण, झोप पुरेशी न होणे, सतत बैठे काम, बाहेरचे जंकफूड खाणे, मैद्याचे पदार्थ खाणे, या साऱ्यांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे वजन वाढण्यास ते जबाबदार असतात. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये आमचूर पावडर चा वापर केला, तर त्यामुळे तुम्हाला फायदा होईल. कारण आमचूर पावडर मध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असल्यामुळे, तसेच विटामिन सी चे प्रमाण असल्यामुळे, आपल्या वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर ठरते. त्यासाठी नियमित तुम्ही तुमच्या आहारामध्ये आमचूर पावडरचा वापर करावा. तसेच तुम्ही सलाड, ज्यूस तसेच पाण्यात ही आमचूर पावडर टाकून घेऊ शकतात. 

वाचा  जांभूळ खाण्याचे फायदे व तोटे

कॅन्सरचा धोका टळतो :

जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये आमचूर पावडर चा वापर केला, तर तुम्हाला कॅन्सरचा धोका टळतो. कारण आमचूर पावडर ही कैरी सुकवून केली जाते. तर कैरीची साली मध्ये मॅगीफेरीन नावाचे गुणधर्म असतात. ते आपल्या कॅन्सर वर रोख आणण्यासाठी मदत करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात नियमित आमचूर पावडर चा वापर केला, तर तुम्हाला कॅन्सरचा धोका टळू शकतो. 

ॲनिमियाचा त्रास होत नाही :

ज्या महिलांना ॲनिमियाचा त्रास आहे, त्यांनी त्यांच्या आहारात आमचूर पावडर चा वापर करावा. ॲनिमियाचा त्रास हा शरीरातील रक्ताची कमतरता मुळे होतो, तसेच मासिक पाळी दरम्यान अंगावरून अधिक रक्तस्राव झाल्यामुळे, शारीरिक अथवा मानसिक थकवा येतो, त्यामुळे ॲनिमिया होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात असतात. अशा वेळी त्यांनी त्यांच्या आहारामध्ये आमचूर पावडर चा वापर करावा. कारण आमचूर पावडर मध्ये लोह, झिंक चे गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण क्रियाही सुरळीत राहण्यास मदत होते व रक्ताची कमतरता दूर होते. 

आमचूर पावडर कशी तयार होते ?

आमचूर पावडर बनवणे अगदी सोपे आहे, त्यासाठी तुम्हाला कैरी आणायची आहे. ती स्वच्छ धुवून, घ्यायची आहे. तिला पातळ कापून घेऊन, उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे. अगदी कडकडीत झाल्यावर तिला मग नंतर तुम्हाला मिक्सर ग्राइंडर मध्ये बारीक दळून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एका डब्यामध्ये ती पावडर ठेवायची आहे. झाली तुमची आमचूर पावडर तयार! अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पावडर बनते. आमचूर पावडर तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये तसेच सलाड, ज्यूस मध्ये वापरू शकतात. तिची आंबटचिंबट, रुचकर चव, अगदी छान लागते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही सांगितले आमचूर पावडर म्हणजे काय? व तुम्हाला तुमच्या आहारामध्ये आमचूर पावडर कशी बनवावी, तिचा वापर कसा करावा,  ते सांगितलेले आहेतच. ती बनवण्याची पद्धतही अगदी सोपी आहे. तसेच तुम्हाला आमचूर पावडर पासून ऍलर्जी असेल, तर तुम्ही डॉक्टरांना विचारूनच तिचा वापर तुमच्या आहारात करावा. तसेच आम्ही सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तसेच तिच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

वाचा  जुळी मुलं का आणि कशी जन्माला येतात

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here