घरातील पाली घालवण्यासाठी उपाय

0
1309
घरातील पाली घालवण्यासाठी उपाय
घरातील पाली घालवण्यासाठी उपाय

नमस्कार मित्रानो, आज आपण बघणार आहोत घरातील पाली घालवण्यासाठी उपाय. आपण घर किती स्वच्छ ठेवतो हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कारण जर आपणच स्वच्छ ठेवले तर त्याच्यामुळे अनेक आजार आपल्याला किंवा आपल्या परिवारांना होऊ शकतात. म्हणून आपण आपले घर स्वच्छ व निरोगी राहण्यासाठी झटत असतो. पण त्यामध्ये बरेच वेळेस आपल्या घरामध्ये पाल शिरते आणि त्यानंतर प्रश्न असा पडतो की या पालीला घरातून कसे घालवावे. कारण ही पाल जर इकडेतिकडे फिरली तर त्या पाली मुळे घरातल्यांच्या आयुष्य धोक्यात येऊ शकते आणि जर का आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर आपल्याला अति काळजी घेणे गरजेचे आहेत.

कारण बऱ्याच वेळेस पालीच्या इन्फेक्शन किंवा विषामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. कारण पाल ही घरामध्ये कुठे फिरत असते जर ती पाल स्वयंपाक घरात गेली तर आपल्याला फूड पॉयझनिंग सारख्या समस्यांना देखील तोंड द्यावे लागू शकते आणि कोणालाच आवडणार नाही की आपले आरोग्य धोक्यात जावे. तेही एका पाली मुळे तर यामुळे आजचा आपला हा विषय आहे की जर आपल्या घरामध्ये पाल शिरली असेल तर ती कोणत्या प्रकारे घालवावी. तसेच यावर काही उपाय आहेत का हे देखील आपण बघणार आहोत. जेणेकरून आपले व आपल्या परिवाराच्या आरोग्य आपण सुरक्षित ठेवू शकू चला तर मग बघुया.

पाली घरांमध्ये का घुसतात ?

आपण पाली बद्दल थोडी माहिती घेतली तसेच पालीचा आणि आपल्या आरोग्याचा काय संबंध आहे हे देखील आपण जाणून घेतले. आता पण रोग्याची पाली नेमका घरामध्ये का बसतात चला तर मग बघुया. बरेच वेळेस पालींचा एक प्रजनन काळ असतो त्या काळामध्ये तुम्हाला सर्वाधिक पाली घरांमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये आढळून येतील आणि यामध्ये जर एखादी पाल घरामध्ये आली असेल तर आपोआपच दुसरी नर पाल आपल्या घरांमध्ये येते. यानंतर आपल्या घरामध्ये कोणत्यातरी कोपऱ्यामध्ये किंवा पडक्या जागेमध्ये पाल अंडी घालून पिलांना जन्म देते. 

वाचा  मुलांची उंची किती वयापर्यंत वाढते

पण या सर्वांमध्ये तुमचे परिवाराचा आरोग्य मात्र धोक्यामध्ये राहील कारण लहान मुलांना तर सवय असते खाली पडलेले किंवा जमिनीवर पडलेले उचलून खाण्याची. यामुळे सर्वाधिक पहिला परिणाम तुमच्या लहान मुलांवर होऊ शकतो त्यानंतर मोठ्यांच्या आरोग्यावर देखील याचा धोका उद्भवू शकतो. म्हणून पावसाळ्याच्या काळामध्ये घराची जरा जास्त काळजी घ्यावी तसेच कानाकोपरा मध्ये देखील महिन्यातून एकदातरी साफ-सफाई करावी.

घरातली पाल कशी घालवावी ?

तर आपण पण पाली बद्दल थोडीशी माहिती जाणून घेत आलेली आहे. आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्याकडे की जर घरामध्ये पाल शिरली असेल तर ती कोणत्या रीतीने आपण घालवू शकतो. तसेच यावर कोणते घरगुती उपाय आहेत का हेदेखील आपण जाणून घेणार आहोत.

रिकामा अंड भिंतीला लावू शकता :

तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल की जे सरपटणारे प्राणी असतात. शक्यतो ते आपली अंडी हे अशा जागी हालतात ज्या ठिकाणी त्यांच्या अंड्यांना कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवणार नाही. तसेच जर त्या ठिकाणी दुसऱ्या कोणत्या प्राणी अंडी दिले असतील तर दुसरे प्राणी त्या ठिकाणी अंडी घालत नाही. म्हणजेच एकाच जागेवर दोन प्राणी कधीही अंडी घालत नाही आणि घरामध्ये मुख्यता प्रजनन च्या काळामध्ये पाल येते. म्हणजे नक्कीच ती नवीन पिल्लांना जन्म द्यायला येते पण जर तुम्ही भिंतीला एक खिळा ठोकला आणि त्या खिळ्यावर रिकामा अंड्याचं कवच म्हणजेच डिम लावलं तर तुमच्या घरात पाल येणार नाही आणि जरी आली असेल तर ती लवकरात लवकर बाहेर निघून जाईल.

नेफ्थलीनच्या गोळ्या म्हणजेच डांबर गोळ्या चा वापर करा :

तुमच्या घरातील कानाकोपरा मध्ये डांबराच्या गोळ्या टाकाव्यात जेणेकरून त्या ठिकाणी पाली व इतर किडे, मुंग्यांचा शिरकाव होणार नाही. जेणेकरून तुम्ही तुम्हाला व तुमच्या परिवाराला मधील कोणत्याही माणसाला याचा त्रास होणार नाही.

तंबाखूचा वापर करावा :

ज्या तंबाखू चे माणूस सेवन करतात त्याचा तंबाखूचा वास देखील प्राणी घेत नाही आणि हेच तुम्हाला पालीपासून देखील वाचवू शकते. तुमच्या घरा मध्ये जर पाल्यांच्या प्रादुर्भाव वाढला असेल तर तुम्ही तंबाखूच्या छोट्या-छोट्या पुड्या करून एका कपड्यांमध्ये ठेवू शकता जेणेकरून तुमच्या घरातील पाली हे घराबाहेर निघून जातील.

वाचा  पायाचा अंगठा दुखणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय :-

कापूर ठेवावे :

घरांमध्ये कापून ठेवल्याने देखील पालीचा शिरकाव बऱ्यापैकी कमी होतो. तुम्ही जर तुमच्या घरामध्ये रोज एक कापूर जाळत असाल किंवा तुम्ही घरातील कानाकोपऱ्यात मध्ये जर कापून ठेवले असेल तर त्यामुळे पाल तिकडे अंडी देत नाही. तसेच जर आपल्या घरांमध्ये पालीचा शिरकाव झाला असेल तर ती लवकरात लवकर घराच्या बाहेर जाण्यास देखील मदत होईल. कापूर मुळे अनेक किडे देखील घरामध्ये येत नाही. आपल्या आयुर्वेदामध्ये कापूरला खूप मोलाचे स्थान आहे आणि त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे की जर तुम्ही कापूर आणि कडूलिंबाचे तेल एकत्र करून जर दिवा लावला तर तुमच्या घरांमध्ये तुम्हाला एकही मच्छर दिसणार नाही. तुम्हाला तर माहितीच आहे की आज काल मच्छर मुळे किती आजार पसरतात किती लोकांना किती वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. म्हणून कापूर हा जरी छोटासा वाटला तरी त्याच्यामध्ये महत्त्वाचे गुणधर्म आहेत.

कांदा कापून ठेवावा :

आपण घरामध्ये नेहमीच कांदा कापून ठेऊ शकत नाही. पण जर का तुमच्या समोर तुमच्या घरा मध्ये जर पाल आली असेल आणि जर ती जाण्याचे नाव घेत नसेल. तर तुम्ही कांदा कापून त्याचे तुकडे कानाकोपरा मध्ये ठेवावे. कांदा ठेवल्यानंतर कांद्याच्या वासामुळे व त्याच्या दरपणा मुळे पाली घराच्या बाहेर जातात. तसेच कांदा कापून ठेवल्या नंतर पालींचा शिरकाव घरामध्ये कमी झाला आहे असे बरेच वेळेस आढळून आले आहे.

बाजारात उपलब्ध असलेले कीटकनाशक स्प्रे घरात ठेवा :

बाजारामध्ये आजकाल अनेक प्रकारचे कीटकनाशक स्प्रे हे उपलब्ध आहेत. त्यातीलच एक स्प्रे तुम्ही घरामध्ये नेहमी ठेवावा कारण छोटे-मोठे किडे तुमच्या घरा मध्ये येऊ शकता आणि पावसाळ्यामध्ये तर कीड यांचा प्रादुर्भाव हा फारच वाढतो. म्हणून जर तुम्हाला तुमचे आणि तुमच्या परिवाराचे स्वास्थ लक्षात घेऊन एखादा कीटकनाशक स्प्रे तुमच्या घरामध्ये ठेवावा. तसेच यामध्ये तुम्ही मुख्यता हिट नावाचा स्प्रे घरी ठेवू शकता. कारण हा स्प्रे सर्व प्रकारच्या किड्यांना मारण्यासाठी सक्षम आहे पण हा स्प्रे वापरतांना स्वतःची काळजी घ्यावी व हा स्प्रे वापरून झाल्यावर आपले हात स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे व जेवणाआधी यास प्रेमींना हात लावू नये जेवण झाल्यावरच या स्प्रे चा वापर करावा.

वाचा  स्वप्नात शरीराला ताप येणे swapnat sharirala tap yene

तर मित्रांनो आज आपण बघितले की आपल्या घरातील पाली चा शिरकाव झाला असेल तर तो कोणत्या प्रकारे व का होतो. तसेच जर आपल्या घरामध्ये पाल आली असेल आणि जाण्याचे नावच घेत नसेल तर आपण त्या पालीला कोणत्या प्रकारे घराबाहेर काढू शकतो हेदेखील आपण जाणून घेतले. तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

                             

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here