लहान बाळाला घाम येणे.
नमस्कार मित्रांनो. बाळाचा जन्म झाल्यापासून त्याच्या प्रत्येक गोष्टी या लक्षात घेतल्या पाहिजेत. लहान बाळाच्या प्रत्येक सवयीवर, बाळाच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असते. आजकाल तर अगदी लहान बाळापासून मोठ्यांपर्यंत घाम येण्याची समस्या प्रत्येकाला येत असते. घाम येणे हे एक सामान्य बाब आहे. वातावरण बदलामुळे देखील अनेकांना घाम येत असतो. लहान बाळांचा विचार केला तर घाम येणे ही प्रत्येक लहान बाळाच्या बाबतीत सामान्य गोष्ट मानली जाते. काही लहान बाळांना घाम जास्त येतो तर काही लहान बाळांना कमी प्रमाणात घाम येत असतो. घाम येणे ही जरी सामान्य बाब म्हटली तर मात्र ती थंडीच्या दिवसात येणे ही असामान्य बाब मानली जाते. वातावरण बदलामुळे किंवा उष्ण वातावरणामुळे प्रत्येकालाच तसेच, प्रत्येक लहान बाळांना देखील घाम येत असतो. काही मोजक्या बाळांना थंडीच्या दिवसांत देखील घाम येत असतो. थंडीच्या दिवसांत जर बाळाला घाम येत असेल तर मात्र ती असामान्य बाब मानली जाते आणि यामूळे बाळावर आवर्जून लक्ष घातले पाहिजे. बऱ्याच वेळा काही लहान बाळांच्या आई या त्यांना जास्तीचे कपडे घालून झोपताना अजून त्याला एखाद्या रुमालाने गुंडाळत असतात या कारणामुळे देखील ते बाळ घामेघूम होत असते. परंतु लहान बाळांना गुंडाळून झोपताना वातावरणाचा अंदाज घ्यायला हवा. जर वातावरण हे उष्ण प्रकारचे असेल अशा वेळी बाळाला जास्त गुंडाळून झोपवणे चुकीचे ठरते. कारण यामुळे बाळ खूप घामेघूम होण्याची शक्यता असते. तर मित्रांनो लहान बाळांना घाम हा का येत असतो? लहान बाळांना अवेळी घाम येण्याची कारण नेमकी कोणती असू शकते? याबद्दल आपल्याला जाणून घ्यायला हवे. तर मित्रांनो, आज आपण लहान बाळाला घाम येणे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, लहान बाळांना घाम येणे या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.
लहान बाळांना घाम येण्याची नेमकी कोणती कारणे असू शकतात?
मित्रांनो, बऱ्याच लहान बाळांना घाम येत असतो. घाम येण्याची अनेक कारणे असू शकतात. लहान मुलांना घाम येणे ही एक सामान्य बाब मानली जाते. घाम येणे हे क्रिया अनेक कारणांमुळे घडत असते. तर लहान मुलांना घाम येणे यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात, याबद्दल आपण आता जाणून घेऊयात.
- खरं तर लहान बाळांना वातावरण बदलामुळे देखील घाम येण्याची शक्यता असते. जर वातावरण हे उष्ण प्रकारचे असेल किंवा उन्हाळा असेल तेव्हा लहान बाळांना अधिक प्रकारे घाम येण्याची शक्यता असते.
- आईने जर वातावरणाचा अंदाज न घेता लहान बाळाला जाड कपडे घालून अजून त्यावर रुमालाने गुंडाळून झोपवले असता, लहान बाळाला अतिप्रमाणात घाम येण्याची शक्यता असते.
- बऱ्याच वेळा वातावरणामुळे लहान बाळाला सर्दी होण्याची शक्यता असते. तर सर्दी झाल्यावर अनेक लहान बाळांना घाम येण्याची देखील शक्यता असते.
- अनेक लहान बाळ हे एकाच बाजूने सतत झोपत असतात. आणि एकाच कुशीवर सतत झोपल्यामुळे त्या साईडने लहान बाळाला घाम येण्याची अधिक शक्यता असते.
- थंड वातावरणामुळे बऱ्याच वेळा बाळाची आई ही जास्तीचे कपडे घालून ठेवते आणि या कारणामुळे देखील लहान बाळाला घाम येण्याची शक्यता असते.
- तसेच आईने बाळाला काही गरम पदार्थ खाऊ घातल्यामुळे देखील लहान बाळाला घाम येण्याची शक्यता असते.
- जर एखादा बाळ हे आजारी असेल तर त्या आजारपणामुळे देखील त्याला सतत घाम येण्याची शक्यता असते.
- लहान बाळाला सतत पायमोजे हात मोजे घालून ठेवले आहे तसेच त्यांना जास्तीचे कपडे घालून ठेवल्यामुळे देखील अधिक प्रमाणात घाम येत असतो.
- बऱ्याच वेळा लहान बाळातील हार्मोन च्या बदलामुळे देखील घाम येण्याची शक्यता असते.
- बाळाच्या शरीरातील तापमान वाढ झाल्यामुळे देखील बाळाला घाम येण्याची शक्यता असते.
लहान बाळाला घाम येणे हे नेमकी कोणत्या कारणामुळे येऊ शकते हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहेत. जर तुमच्या लहान बाळाला थंड वातावरणामध्ये देखील घाम येत असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. कारण थंडीच्या दिवसांमध्ये घाम येणे ही एक असामान्य बाब मानली जाते त्यामुळे बाळाकडे वेळीच लक्ष द्यायला हवे. बऱ्याच वेळा थंडीच्या दिवसांमध्ये घाम येणे या समस्यांमुळे अनेक पालक घाबरून जात असतात. परंतु, थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या बाळांचा बचाव व्हावा यासाठी तुम्ही जर त्याला जास्तीचे कपडे घातले आणि पायमोजे, हात मोजे, गरम टोपी हे सर्व घालून त्याला झोपले असेल आणि थोड्या वेळाने त्याच्या शरीरातील तापमानात वाढ होऊन बाळाला घाम येण्याची शक्यता असते. म्हणजेच सर्दीच्या दिवसात जर तुमच्या बाळाला या कारणामुळे घाम येत असेल तर जास्त घाबरण्याचे कारण नसते. आणि इतर वेळी जर म्हटले म्हणजे इतर वरील सर्व कारणांमुळे जर बाळाला घाम येत असेल तर आपण बाळाची योग्य त्या प्रकारे काळजी घ्यायला हवी. बाळाकडे लक्ष द्यायला हवे. जेणेकरून, त्याला घाम येणार नाही. लहान बाळाला अधिक प्रमाणात घाम येत असेल तर आपण कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.
लहान बाळाला घाम आल्यास कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी?
लहान बाळांना घाम येणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. बऱ्याच वेळा लहान बाळांना घाम येत असतो तर काहींना अगदी कमी प्रमाणात घाम येताना दिसून येतो. आपल्या पायाला घाम येत आहे म्हणून जास्त घाबरून जाऊ नका. घाम येणे ही तर एक सर्वांनाच होणारी समस्या असते. तसेच, घाम येणे हे आपल्या शरीरासाठी चांगले देखील ठरत असते. कारण आपल्या शरीरातील तापमान वाढल्यामुळे आपल्या शरीराला घाम घेण्याची क्रिया घडत असते. म्हणून घाम येणे ही एक सामान्य बाब आहे. लहान बाळांना घाम आल्यास त्यांची कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.
- आईने बाळाला कपडे घालताना वातावरणाचा अंदाज घेऊनच वातावरणानुसार बाळाला कपडे घालायला हवे जेणेकरून त्याला जास्तीचा घाम येणार नाही. उदाहरणार्थ, जर उन्हाळा असेल तर लहान बाळांना जाड कपडे न घालता बारीक कपडे अथवा सुती कपडे घालायला हवे ज्या कपड्यातून हवा देखील आत मध्ये शिरेल असे. जेणेकरून, लहान बाळांना घाम खूप कमी प्रमाणात घाम येईल.
- तसेच आईने लहान बाळाला उन्हाळ्याच्या दिवसात झोपवताना शक्यतो रुमालाने गुंडाळून झोपू नये. कारण रुमालाने गुंडाळून झोपल्याने त्याला जास्त घाम येण्याची शक्यता असते. कमीत कमी उन्हाळ्यात रुमालाने न गुंडाळता बाळाला मोकळे झोपू द्यायला हवे.
- बऱ्याच वेळा लहान बाळं ही सतत एकाच कुशीवर झोपत असतात. मोठी माणसे ही एकाच कुशीवर झोपलेली असले तरी मात्र झोपेतून ते सारखी सारखी बाजू बदलवत असतात. त्यामुळे त्यांना फारसे गरम होत नाही आणि घाम येत नाही. परंतु लहान बाळाला असे करता येत नाही. म्हणून जेव्हा लहान बाळ आहे एकाच कुशीवर तासनतास झोपले असेल तर त्याची कुशी तुम्ही मध्ये मध्ये बदलवत राहायला हवी जेणेकरून त्यांना घाम येणार नाही. कारण लहान बाळ आहे तासन्तास एकच कुशीवर झोपल्यामुळे त्या साईडचे कान,गाल, डोके यांना घाम येत असतो तसेच, त्यामुळे केस देखील त्या बाजूने ओले होतात.
- लहान बाळाला उन्हाळ्याच्या दिवसात पायमोजे, हातमोजे, घालू नये जेणेकरून त्यांना घाम येणार नाही.
- जर आईकडून लहान बाळाला एखादे गरम पदार्थ खाऊ घातले गेले असेल तर त्या कारणामुळे देखील लहान बाळाला घाम येण्याची शक्यता असते. लहान बाळांना गरम पदार्थांचे सेवन करू देऊ नये.
- बऱ्याच वेळा लहान बाळ हे आजारी पडल्यामुळे देखील त्याला घाम येण्याची शक्यता असते. जेवण लहान बाळ आहे आजारी असेल तेव्हा त्याला वेळोवेळी ड्रॉप दिले पाहिजेत जेणेकरून ते लवकर बरे होईल.
- लहान बाळांना घाम आल्यामुळे त्यांच्या शरीरातील पाणी हे कमी होऊ शकते यासाठी तुम्ही जर बाळ हे थोडी मोठी असल्यास ज्याला जर तुम्ही वरचे पाणी चालू केले असेल तेव्हा त्याला पाणी हे वेळोवेळी द्यायला हवे. आणि जर बाहेर लहान असेल तर तुम्ही स्वतः जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे जेणेकरून बाळाला दुधातून पाण्याची कमतरता भासणार नाही.
- थंडीच्या दिवसात जर तुम्ही तुमच्या बाळाला थंडीपासून बचाव व्हावा यासाठी पाय मोजे, हातमोजे आणि जास्तीचे कपडे घालत असाल तर एखाद्या विशिष्ट वेळी म्हणजेच बाळाला जर बाळाचे हात मोजे हे ओले झालेले असतील किंवा पायमोजे ओले झालेले असेल असे जाणवून आल्यास त्यावेळी तुम्ही त्याचे पाय मोजे व हात मोजे काढून घ्यायला हवे.
- बऱ्याच वेळा लहान बाळाला जर सर्दी झाली असेल तर त्यांना घाम येण्याची शक्यता असते. अशावेळी जर लहान बाळाला घाम आला तर तुम्ही जास्त घाबरून जाऊ नका. तर सर्दी मुळे घाम येणे हे सहाजिकच आहे. जसजशी सर्दी निघून जाईल तेव्हा तसा त्याचा घाम येणे कमी होत जाईल.
तुमच्या बाळाला जर घाम येत असेल तर वरील प्रकारे तुम्ही तुमच्या बाळाची काळजी घेऊ शकतात. घाम हा तर सर्वांनाच येत असतो. अनेक वेळा शरीरातील तापमान वाढीमुळे देखील घाम येण्याची शक्यता असते. लहान बाळाला घाम येणे याबद्दल तुम्हाला अजून जास्तीची माहिती हवी असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून याविषयी जाणून घेऊ शकतात.
मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.
धन्यवाद.