बाळाचे दात स्वच्छ कसे करावेत?

0
759

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत बाळाचे दात स्वच्छ कसे करावेत?  लहान बाळाची काळजी ही व्यवस्थित प्रकारे प्रत्येक आईला ही घ्यावीच लागत असते. त्यामुळे आईने जर एक दोन काम कमी केलीत तरी चालतील परंतु बाळाकडे पुरेपूर लक्ष आवर्जून द्यायला हवे. बाळ जसजसे  मोठे होत असते, तस तसे आईचे बाळाबद्दल चे काम देखील वाढत असते. बाळाच्या हालचाली यादेखील वाढत असतात त्यामुळे आईला यावर बारकाईने लक्ष द्यावे लागत असते. लहान बाळाला चार महिन्यानंतर दात येण्यास सुरुवात होत असते. तर काही लहान बाळांना सहा महिन्यानंतर, काहींना सात महिन्यांनंतर, तर काहींना वर्षाचा झाल्यानंतर देखील दात येत असतात. म्हणजेच चार महिने झाल्यानंतर बाळाची दात येण्याची क्रिया ही चालू असते. आणि बाळाचे दात येतात तेव्हा त्या दातांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. बाळाला दात आल्यावर ती दिसायला तर एकदम सुंदर दिसू लागतात. परंतु त्यांच्या दातांची काळजी देखील तितक्याच प्रकारे घेणे आवश्यक ठरत असते. बाळाचा जन्म झाल्यावर ते फक्त दुधावरच अवलंबून असते. आणि बाळ हे जसजसे मोठे होत जाते तसतसे त्यांची भूक देखील वाढत जाते. म्हणून फक्त त्यांना दुधावरच अवलंबून राहता येत नाही तर त्यांना वरील अन्न देखील खाता आले पाहिजे. आणि बाळांना दात आल्यावर त्यांना अन्न चावण्यासाठी दातांचा उपयोग करता येतो. ज्याप्रमाणे मोठ्या माणसांना काय काय खाल्ल्यावर दात साफ करण्याची गरज असते. जेणेकरून त्यांचे दात खराब होणार नाहीत. त्याचप्रमाणे लहान बाळा तर खूपच लहान असतात परंतु त्यांना त्यांची स्वतःची काळजी पाहिजे तितकी घेता येत नाही. अर्थातच त्यांना त्यांचे दातांची निगा तर काही राहता येणार नाही. त्यांना स्वतः पण त्यांचे दात स्वच्छ तर करता येणार नाहीत. यासाठी आईने स्वतः बाळाच्या दातांची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून बाळाचे दात स्वच्छ राहतील आणि खराब होणार नाहीत. तर मित्रांनो आज आपण बाळाचे दात स्वच्छ कसे करावेत? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग बाळाचे दात स्वच्छ कसे करावेत? याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

सर्वप्रथम आपल्याला बाळाला दात कधी येतात याबद्दल माहिती असायला हवी!

मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला बाळाला दात कधी येतात याबद्दल माहिती जाणून घ्यायला हवी. बाळ जेव्हा चिडचिड करू लागते किंवा सतत रडत असते, तसेच बाळाला झोप देखील व्यवस्थित लागत नाही तेव्हा बाळाला दात येण्याची शक्यता असू शकते. कारण बाळाला दात येण्याआधी सर्वप्रथम बाळाच्या हिरड्या फुगत असतात. आणि बर्‍याच वेळा हिरड्या सूजत देखील असतात. आणि हिरड्या दुखल्यामुळे बाळ सतत रडत असते चिडचिड करताना दिसून येत असते. तसेच बाळ खेळताना देखील सतत काहीतरी खेळणे घेऊन चावण्याचा प्रयत्न करत असते. आणि बाळाचे लाळ गळण्याचे प्रमाण खूप वाढलेले असते. असे हे सर्व बाळ चार महिने झाल्यानंतर सुरू होत असते. म्हणजेच बाळाला दात येण्याची क्रिया ही चौथ्या मिळण्यापासून सुरू होत असते तर काहींना सहाव्या महिन्यापासून दात येण्याची क्रिया सुरू होत असते. तर काही बाळा नवर अनुवंशिकतेचा परिणाम देखील दिसून येत असतो. म्हणजेच काही बाळांना वर्षाचे झाल्यानंतर दात येऊ शकतात. प्रत्येक बाळा हे वेगळे प्रकारचे असते त्यामुळे त्यांचे दात येण्याची क्रिया ही देखील वेगवेगळ्या प्रकारची असू शकते.

वाचा  कांद्याच्या रस चे फायदे

बाळाला दात आल्यावर बाळाच्या दातांची कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी?

लहान बाळ हे जेव्हा सतत रडत असते तसेच खेळणी खेळताना काही ना काही खेळणी तोंडात घालून ते चावण्याचा प्रयत्न करत असते, तसेच आईचे दूध देखील व्यवस्थित प्रकारे पित नसते तेव्हा समजून घ्यावे की बाळाला दात येण्याची क्रिया सुरू झालेली आहे. आणि जेव्हा बाळाचे दात येतात तेव्हा मात्र बाळाच्या दातांची योग्य त्या प्रकारे निगा राखली पाहिजे. बाळाला दात आल्यावर बाळाच्या दातांची कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

स्वच्छ कपड्याच्या साह्याने बाळाचे दात नेहमी स्वच्छ करायला हवेत

जेव्हा लहान बाळाचे दात येतात तेव्हा लहान बाळाच्या दातांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी तुम्ही बाळा ला जेवण खाऊ घातल्यानंतर एक स्वच्छ कपडा तुमच्या बोटाला गुंडाळून त्याच्या सहाय्याने बाळाच्या दातांवर अलगदपणे फिरवावा. तो कपडा तुम्ही ओला करून देखील दात हळुवारपणे स्वच्छ करू शकतात. तसेच बोटाला गुंडाळलेला कपडा हा दातांच्या वरच्या साईडने अलगदपणे फिरवावा आणि नंतर दातांच्या मागच्या साईडचे हळुवारपणे फिरवावा. यामुळे बाळाचे दात स्वच्छ राहण्यास मदत होईल. जेणेकरून बाळाचे दात हे खराब होण्या पासून बचाव होईल.

ब्रशच्या साह्याने दात स्वच्छ करावेत

बाळ जर हा थोडा मोठा असेल तर तुम्ही बाळाचे दात हे ब्रशच्या सहाय्याने स्वच्छ करायला हवेत. बाळाला जेवण खाऊ घातल्यावर त्याच्या दातांमध्ये अन्नकण अडकण्याची शक्यता असते. आणि जर दातांमध्ये अन्नकण तसेच अडकून राहिले तर त्यामुळे दात खराब होण्याची शक्यता असते. म्हणून बाळाच्या दातांमध्ये ते अन्नकण तसेच अडकून राहू नयेत यासाठी तुम्ही बाळाला हळूवारपणे ब्रश करून द्यायला हवा. बाळ ब्रश करताना तो एकदम हळुवारपणे खालून वर वरून खाली अशा पद्धतीने व्यवस्थितपणे फिरवायला हवा. जेणेकरून बाळाचे दात हे व्यवस्थित स्वच्छ राहण्यास मदत होईल.

वाचा  योगा करण्याचे फायदे

बाळ छोटे असल्यास बोटाच्या साहाय्याने ब्रश करावा

बाळ हे अगदी छोटी असल्यामुळे त्यांना ब्रश केल्याने तो लागण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचे बाळ छोटे असेल आणि तुम्हाला त्याचे दात साफ करायचे असतील तर तुम्ही तुमच्या हाताच्या बोटाच्या साह्याने बाळाला ब्रश करू शकतात. बाळाला तुम्ही बोटाच्या साहाय्याने ब्रश करण्याआधी तुमचा हात स्वच्छ धुऊन टाकावा. कारण जर तुमचा हाथ हा अस्वच्छ असेल आणि अशा पद्धतीने तुम्ही जर ब्रश केला तर बाळाला इन्फेक्‍शन होऊ शकते. म्हणून सर्वप्रथम तुम्ही हँडवॉश करून घ्यावा. आणि त्यानंतरच तुम्ही बोटाच्या साह्याने बाळाला हळुवारपणे ब्रश करावा. यामुळे बाळाचे दात देखील स्वच्छ राहण्यास मदत होईल. जेणेकरून बाळाचे दात खराब होणार नाहीत. म्हणून तुम्ही तुमचे बाळ छोटे असेल तर ब्रश याच्या साह्याने दात न घासता बोटाच्या साहाय्याने दात स्वच्छ करावेत.

बाळ थोडे मोठे असल्यास बाळाला पाण्याच्या गुळण्या करण्यास सांगाव्यात

जर तुमचे बाळ हे थोडे मोठे असेल तर तुम्ही बाळाचे दात स्वच्छ ठेवण्यासाठी जेवण झाल्यावर गुळण्या करायला शिकवायला हव्यात. आणि जर बाळाला व्यवस्थित प्रकारे गुळण्या करता येत नसतील तर तुम्ही स्वतः थोडे तोंडात पाणी घालुन बोटाच्या साहाय्याने स्वच्छ करून द्यायला हवेत. जेणेकरून बाळाच्या दातांमध्ये अन्नकण अडकलेले असतील तसे बाहेर निघून जाण्यास मदत होईल. आणि बाळाचे दात देखील खराब होणार नाहीत ते स्वच्छ राहतील.

     त्याचप्रमाणे, बाळाला जेव्हा दात येत असतील तेव्हा तुम्ही डॉक्टरांना दाखवायला घेऊन जावे नाहीतर डेंटल स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे देखील दाखवायला नेऊ शकतात. डॉक्टर कडे नेल्यामुळे डॉक्टर तुम्हाला दात कसे स्वच्छ ठेवावेत याबद्दलची अजून जास्तीची माहिती देऊ शकतील. तसेच बाळाचे दात याबद्दल कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी याबद्दल देखील तुम्हाला डॉक्टर चांगल्या प्रकारे सल्ला देतील. त्यामुळे बाळाचे दात आल्यावर तुम्ही बाळाकडे अजिबात दुर्लक्ष करायला नको कारण की बाळाच्या दातांची जितकी चांगली काळजी घेतली जाईल तितके बाळाचे दात हे खराब होण्यापासून वाचतील कारण सुरुवातीचे बाळाचे दात हे दुधाचे असतात आणि जर बाळाच्या दुधाच्या दातांची व्यवस्थित प्रकारे काळजी घेतली तर ते दात पडून येणारे दात हे देखील चांगल्या प्रकारे येऊ शकतील. नाहीतर बाळाच्या दातांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर येणारे दात हे सरळ न येता वाकड्यातिकड्या प्रकारचे येऊ शकतात. म्हणून बाळाच्या दातांची काळजी ही योग्य वेळी घ्यायला हवी जेणेकरून दात देखील त्याला व्यवस्थित प्रकारे येऊ शकतील.

वाचा  लहान बाळाचे कान फुटणे

     मित्रांनो वरील प्रकारे आपण बाळाला दात आल्यास कशा प्रकारे योग्य काळजी घ्यायला हवी याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. बाळाच्या दातांच्या आरोग्य विषयी अजून जास्तीची माहिती तुम्हाला जाणून घ्यावयाची असेल तर तुम्ही बाळाला डॉक्टरांकडे घेऊन अजून जास्तीची माहिती जाणू शकतात.

      तर मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून कळू शकतात.

  धन्यवाद.

आईचे दूध वाढवण्यासाठी उपाय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here