नमस्कार, मित्रांनो अनेक पालकांच्या या समस्या असतात की, त्यांचे मुले सारखे चिडचिड करतात. राग राग करतात. रागामध्ये झोपून जातात, जेवण करत नाही, किंवा हा पदार्थ मला आवडत नाही, तो पदार्थ मला आवडत नाही, मला बाहेर जायचंय, मला खेळायला जायचे, मला हे घेऊन द्या किंवा ते घेऊन द्या, अशी जिद्द ते सारखे करत असतात. लहान मुले जिद्दी असतात, आणि चिडचिडही करतात, आणि त्यांना जे काम करून घ्यायचे, ते हट्ट करून घेतातच. अशावेळी आपणही फार चिडतो, मग आपण त्यांना राग राग करतो, त्यांना मारतो, पण हे योग्य नाहीत. याउलट मुले अजून चिडके होतात, अशावेळी आपण मुलांची काळजी घ्यायला हवी, मुलांचे चिडचिड केल्यामुळे त्यांना जेवणही त्यांच्या अंगी लागत नाही, त्यामुळे ते अगदी कडके, बारीक होऊन जातात. त्यांना त्या चिडकेपणातुन कसे बाहेर काढावे, ते माहिती करून घ्यावेत. चला तर मग जाणून घेऊयात, की चिडखोर मुलांना कसे हाताळावे?
Table of Contents
लहान मुलं चिडखोर का बनतात ?
जिद्द, ही लहान मुलांची आयडिया आहेत. ज्या मुलांना माहिती असते, की आपण जिद्द केली, आणि ती जर नाही मिळाली ना, पण त्यावर रडले, चिडले, तर आपल्याला त्या गोष्टी लवकर भेटतात. आणि समजा त्या गोष्टी नाही भेटल्यास, तर लहान मुले चिडखोर बनतात. तसेच त्यांना त्यांच्या मनासारखे काही झाले नाही, तर त्यांची चिडचिड, राग-राग करतात. व ते चिडखोर बनतात.आणि चिडखोर मुलांना सांभाळणे म्हणजे कठीणच !
तसेच हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये, व वाढत्या महागाई मध्ये, आई वडिलांना दोघांना नोकरी करावी लागते, त्यावेळी मुलांकडे त्यांचे दुर्लक्ष होते, अशा वेळी त्यांना आई-वडिलांचे प्रेम हे कमी प्रमाणात मिळते, त्यामुळे मुले चिडचिड होतात, व त्यांचा स्वभावच मुळातच चिडखोर होऊन जातो, तसेच तुमचे घरातील वातावरण हे निगेटिव्ह असेल, आईवडिलांची सारखे भांडणे होत असतील, किंवा घरात पैशाची चणचण वरून काहीही राग- राग होत असेल, त्याचा परिणाम मुलांवर होतो मुले चिडचिड करायला लागतात.
चिडचिड पण आता मुलांना बाहेर कसे काढायचे ?
वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला मुले कशामुळे चिडचिड करतात, ते सांगितलेले आहेत. आता आपण बघणार की मुलांना त्यातून कसे बाहेर काढावेत.
“लहान मुले म्हणजे देवाघरची फुले” ही म्हण सगळ्यांनाच माहिती आहे. अशा वेळी जर त्या फुलांना काही त्रास झाला, तर ते कोमेजून जातात. तसेच प्रमाणे मुलांचेही असते, त्यावेळी त्यांच्या मनावर काही परिणाम झाला, किंवा काही वातावरणामुळे त्यांच्या चिडचिडपणा येणे, तसेच एखाद्या गोष्टींची जर ते कधी पासून वाट बघत आहेत, आणि ती वस्तू नाही मिळाली, तर मुले चिडचिड करतात. तसेच अजून काही माहिती आपण जाणून घेऊयात !
- तुम्ही मुलांच्या हौशी पुरवत असतात, आणि एखाद्या वेळेस नाही पुरवली, तर त्यांचा स्वभाव मुळातच चिडचिड होऊन जातो, अशा वेळीतुम्ही मुलांना शांत चित्ताने समजावून घ्यावेत. त्यांना राग येतो, त्यावेळी त्यांच्याशी जास्त बोलू नये, थोड्या वेळाने राग निघाल्यावर, मुले आपोआप त्यांच्या लाईन वर येतात.
- तसेच त्यांना जी भाजी आवडत नाही, तेव्हा तिचे वेगळी पध्दत करून, तुम्ही मुलांना द्यावेत. मुलांशी बोलताना प्रेमाने बोलावे. आपणही स्वतः राग- राग करू नये, या वेळी मुले चिडतात, आणि आपण राग केला, तर त्यांचा चिडखोरपणा अजून वाढतो.
- तसेच मुलांना तुम्ही शांत निसर्गरम्य ठिकाणी फिरायला घेऊन जावे, जर तुम्ही नोकरदार असणार, तर हप्त्यातून दोन दिवस मुलांसाठी ठेवावेत.
- मुलांसोबत त्यांचे आवडते खेळ खेळावेत. बॅटमिंटन, क्रिकेट, लुडो, कॅरम, यासारखे मुलांसोबत खेळल्यास त्यांचा राग शांत होतो.
- तसेच अधून-मधून तुम्ही मुलांना गावी न्यावे. गावाचे वातावरण हे नैसर्गिक वातावरण असते. त्यामध्ये मिसळल्यावर मुलांना गावाच्या मुलांची ही जाणीव होते. त्या दोघांमधला फरक त्यांना समजतो, की आपल्याला एवढ्या सोयीसुविधा आहेत. आणि गावच्या मुलांना तरी तेवढ्या सुविधा नाही, यातील फरक त्यांना लगेच समजतो.
- तुम्ही अधून मधून मुलांना अनाथ आश्रम मधील मुलांना भेटायला न्यावेत.
- मुलांना राग कोणत्या कारणामुळे येतो, ही गोष्ट समजून घ्यावी.
- मुलांना उगाच आपल्या वयाचे टोमणे मारु नये, त्यामुळे अजून जिद्दी होतात.
- कधीकधी मुलांच्या चिडखोरपणा वर दुर्लक्ष करत राहावे, त्यामुळे त्यांना माहिती पडते, की ते आपल्या कडे लक्ष देत नाहीये, ते आपोआप शांत होऊन जातात.
- तसेच जे काही मुलं काही गोष्टीची जिद्द करतात, त्यावेळी त्यांचे मन तुम्ही वळवावे. दुसऱ्या गोष्टी त्यांना लक्ष द्यायला सांगावे.
- तसेच तुम्ही मुलांना वीर मुलांच्या गोष्टी, सांगाव्यात. देवाचे गाणे ऐकायला लावावेत. तसेच रोजच्या रोज त्यांना देवाला नमस्कार करायला लावायच्या, सवयी तुम्ही मुलांना लावाव्यात.
- मुलांना पैशांची किंमत कळवून द्यावीत. हल्लीच्या मुलांना पैसा हा माहित नसतो. त्यांना फक्त वस्तू आवडतात, पण त्या पैसा साठी आपण किती मेहनत करतो, हे ते मुलांना पटवून द्यावेत. त्यामुळे पुढच्या वेळेस मुलं काही गोष्टींसाठी जिद्द करणे हे टाळतात.
चिडखोर मुलांना मारावे कि नाही ?
हल्ली मुलं चिडचिड करतात. त्यावेळी आई-वडीलही जास्त चिडून जातात. मग ते एक मोठे वादाच्या स्वरूपात रूपांतर होते. अशा वेळी तुम्ही शांत चित्ताने विचार करावा, राग राग करून कोणालाही फायदा होत नाही, उलट त्याचा नकारात्मक प्रभाव जास्त असतो. त्यामुळे घरातील वातावरणही चिडचिडे होऊन जाते.
आई वडीललांचे भांडण होतात, व मुल सारखी चिडचिड करतात, आणि रागामध्ये कोणीच जेवणही करत नाही. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही होतो, व मुलांवरही होतो. असे वेळी आपण रागाच्या भरात मुलांना मारून बसतो, पण ते मारल्यामुळे मुलांना अजून काही समस्या होतात. रागाच्या भरात मुलांना जास्त लागून जाते. कृपया असे करू नका. मुलांची तुम्ही त्यांना शांतचित्ताने प्रेमाने समजावा, किंवा त्यांना राग आला असेल, तर थोडावेळ त्यांना त्यांच्याच रागात राहू द्या, थोडं शांत झाले, की ते आपोआप तुमच्याकडे येतील.
चिडचिडे हट्टी मुलांसाठी काही टिप्स
- मुले सारखे चिडचिड करतात, अशा वेळी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.
- त्यांना त्यांच्यातील व गरीब मुलांना मधील फरक समजून द्यावे.
- तसेच झाली मुले चिडचिड करून जेवणाला नाही म्हणतात, किंवा जेवणाचे ताट लोटतात, अशावेळी त्यांना त्या जेवणाचे महत्त्व समजून द्यावेत.
- तसेच मुले चिडचिड करतात, अशा वेळी तुम्ही वास्तुशास्त्रानुसार, त्यांच्या रूममध्ये मोरपीस लावावेत. मुलांच्या रूम मध्ये मोरपीस असल्यामुळे, मुलांचा चिडचिडेपणा कमी होतो.
- मुलांना नेहमी मोठ्यांची रिस्पेक्ट करायला सांगा. मोठ्यांचा नमस्कार करायला सांगा. मोठ्यांशी बोलताना आदराने बोलायला शिकवा. असे वळण जर तुम्ही लहानपणापासून मुलांना लावले, तर मुले समजदार होतात.
- आई वडील बोलताना मुलांनी मध्ये बोलू नये, अशी शिकवण त्यांना द्यावेत.
- तसेच तुम्ही मुलांना काम करायला लावावेत, त्यामुळे त्यांना कामांचे महत्त्व समजते.
- मुलांना आजी बाबांसोबत वेळ घालवायला द्यावेत. मुलांना गोष्टी चे पुस्तक, कोमॅक्स, सारख्या पुस्तकात मुलांना वाचायला द्यावेत.
- तसेच मुलांना रोजच्या रोज योगा करायची सवय लावा.
- मुलांना इतरांना मदत करायची सवय लावावेत.
चला, तर मग आज आम्ही तुम्हाला सांगितले आहेत, की मुले चिडचिड करत असतील, तर त्यांना कोणत्या पद्धतीने हाताळावे, तसेच ती चिडचिड करत असतील, अशा वेळी तुम्ही त्यांना कशा प्रकारे समजवावे, तसेच त्यांना मारू नये, उलट त्यांना मोकळेपणाने समजावे. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात.
धन्यवाद !