नमस्कार, आजच्या धावपळीच्या जगात कोणाचे डोके दुखत नाही, असे कोणीच नाही. डोकेदुखी ही इतकी तीव्र आणि त्रासदायक असते, की आपल्याला त्याच्या वेदना असह्य होतात. डोके दुखी चे अनेक प्रकार आहेत, जसे की पुढील बाजूस दुखणे, मागील बाजूस, कपाळाच्या, कानाच्या बाजूस दुखणे, पण कोणत्याही डोके दुखी मध्ये त्रास हा वेदनात्मक असतो. ज्यावेळी आपले डोके दुखी अशावेळी, आपल्याला वाटते की, आपल्या आजूबाजूला कोणीच नको, आपल्याला आवाजही सहन होत नाही, अक्षरशः डोळ्यातून पाणी येते, आणि त्यामुळे आपली चिडचिड होते. तर मग डोक्याच्या मागील बाजूस दुखण्याची काय कारणे असतील बरं ? चला, तर मग जाणून घेऊयात !
Table of Contents
डोक्याच्या मागील बाजूस दुखणे याची काही कारणे- Reasons of Headache
डोके दुखले की असे वाटते की, आजूबाजूला आपल्या कोणीही नको पाहिजे. मग डोके का दुखते, आणि डोक्याच्या मागच्या बाजूस का दुखते, हे अनेक जणांना माहिती नसते. मग ते कोणत्या कारणांमुळे होते, ते जाणून घेऊयात !
- अतिशय आवाजामुळे,
- केमिकल्स युक्त वातावरणात, राहून त्या वासामुळे.
- सर्दी-पडसे यानंतर, डोकेदुखीची समस्या होतात.
- अपचन, पित्त, ऍसिडिटी, यांच्यामुळे मागील बाजूस डोके दुखते.
- मायग्रेनचा त्रास असल्याने, ही मागच्या बाजूस डोके दुखते.
- अतितीव्र सुगंधित वासाने, डोके दुखते.
- प्रवासात मळमळ झाल्याने, डोके दुखते.
- मेंदूच्या मागच्या बाजूस की ब्रेन ट्युमर झाल्याने डोके दुखते.
- ज्यांना संधिवाताचा त्रास आहे, त्यांचे मागच्या बाजूस डोके दुखते.
- शारीरिक व मानसिक ताण तणाव आल्यामुळे, ही मागच्या बाजूस डोके दुखते.
- कडक उपवास केल्याने, ही मागच्या बाजूस डोके दुखण्याची समस्या होऊ शकते.
- जास्ती प्रमाणात व्यायाम केल्याने, ही स्नायूंमध्ये ताण पोहोचून डोकेदुखीची समस्या होऊ शकते.
- नाकाशी व कानाशी संबंधित बिघडल्यामुळे,
मागील बाजूस डोके दुखी वर काही घरगुती उपाय
वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत, की डोके दुखी नेमकी कशी होते. आणि कोणत्या कारणांमुळे होते. तर आता जर तुमच्या मागच्या बाजूस डोके दुखत असेल, अशावेळी तुम्ही कोणते उपचार करायला हवे, ते जाणून घेऊयात.
सफरचंद खाऊन बघा
हो, तुम्ही म्हणाल मागील बाजूस डोकेदुखीवर सफरचंद कसा फायदेशीर ठरेल ? तर खरच ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास आहे, अशा लोकांनी जर सकाळी चार ते पाच च्या दरम्यान उपाशी पोटी, सफरचंद खाल्ले, तर त्यांना फायदा होईल. त्यासाठी तुम्ही सफरचंद मधोमध कापून, त्यावर काळे मीठ लावून, खाल्ल्यास त्यांना मायग्रेनचा त्रास हा कमी होतो. खरंच खूप प्रभावशाली उपाय आहे, हा पण सफरचंद हे तुम्हाला कंटिन्यू सात दिवस खावे लागेल, तरच तुम्हाला फरक पडेल.
निलगिरीच्या तेलाचा वापर करून बघा
निलगिरीचे तेल हे डोकेदुखी साठी फार प्रभावशाली आहे. निलगिरीच्या वासाने डोके दुखी तसेच मागील बाजूस डोकेदुखीच्या समस्यावर, आराम मिळतोच. तुम्ही निलगिरीच्या तेलाने कपाळावर, माने जवळ व मानेच्या मागील बाजूस, मसाज केल्याने तुमच्या नसांमधील रक्ताभिसरण सुरळीत होऊन, मागील बाजूस डोकेदुखीची समस्या कमी होतात.
तुळशी वापरून बघा
हो, तुळशीमध्ये ऑंटीसेप्टीक आणि एंटीट्रेससारखे गुणधर्म असतात. आयुर्वेदामध्ये तुळशी ही आवर्जून वापरली जाते. ज्यावेळी तुम्हाला मानसिक ताण आल्यामुळे, डोके दुखत असेल, त्यावेळी तुम्ही तुळशीची पाने +काळे मिरे यांचा काढा करून, पिऊ शकतात. त्यामुळे तुमचे मागील डोकेदुखी, वर त्वरित आराम मिळेल.
नारळाच्या तेलाचा वापर करा
ज्यावेळी तुमच्या डोक्यात तीव्र वेदना होतात, मागच्या बाजूस असह्य वेदना होतात, अशावेळी तुम्ही नारळाच्या तेलाने डोक्याची मालिश करावी. त्यासाठी तुम्ही नारळाचे तेल एका वाटीत घेऊन थोडेसे कोमट करून, अगदी डोक्यावर मुळापासून लावावे, म्हणजे डोक्याला एक उब मिळते, आणि डोके दुखी ही थांबते. व डोक्याला तेल लावल्यामुळे ही डोक्याचा माथा शांत राहतो.
लसणाचा वापर करून बघा
लसुन चा वापर हा डोके दुखीसाठी अगदी पूर्वीपासून केला जातो. ज्यावेळी तुमच्या मागच्या बाजूस डोके दुखते, अश्यावेळी जर तुम्ही लसणाचा तेलाचा वास घेतला, तर तुमच्या डोक्यात थोडीशी झणका निघून डोकेदुखी, वर त्वरित आराम मिळतो. तसेच तुम्ही लसणाचे तेल हे डोक्याच्या मागच्या बाजूस दुखते, त्या जागेवर अलवारपणे लावल्यास, डोकेदुखीही थांबते.
ताकाचा वापर करून बघा
म्हणतात ना, शरीराची रचना ही आपल्या आहारावर असते. ज्या वेळी तुमची पचन संस्था ही बिघडते, अवेळी खानपान होते, तेलकट पदार्थ खाल्ले जातात, अश्यावेळी तुम्हाला ऍसिडिटी, आम्लपित्त यासारख्या समस्या होतात. आणि त्यामुळे तुमच्या मागील बाजूस डोके दुखते. अशावेळी जर तुम्ही ताक + काळी मिरी पूड + मीठ एकत्र करून पिल्यास तुमची ऍसिडिटी ही मोकळी होते. आणि तुमची मागच्या बाजूस ची डोकेदुखीची समस्या, कमी होते.
लिंबू सोड्याचा वापर करून बघा
जर तुम्हाला गॅस, एसिडिटी, अपचन सारख्या समस्या झाल्या, की तीव्र डोकेदुखीचा त्रास होतो. अशा वेळी जर तुम्ही लिंबु चा वापर केला, तर तुम्हाला त्याने फायदा होईल. त्यासाठी तुम्ही लिंबू +काळे मीठ + खाता सोडा हे मिक्स करून पिल्यास तुमची ऍसिडिटी मोकळी होऊन, तुमच्या डोकेदुखीची समस्या यामुळे कमी होतात.
अद्रक चा वापर करा
हो, अद्रक हे डोकेदुखी साठी फायदेशीर असते. ज्यावेळी तुमच्या मागील बाजूस डोके दुखते, अशावेळी तुम्ही कडक आल्याचा चहा पिल्याने, मागील बाजूस डोकेदुखी ही त्वरित थांबते. तसेच तुम्ही आले हे गरम पाण्यात उकळून, त्याची वाफ घेतल्याने, ही तुमच्या मागील डोकेदुखी वर आराम मिळेल.
लवंग तेल चा वापर करा
हो, आता मार्केटमध्ये, मेडिकल स्टोअर्स, मध्ये लवंग तेल हे मिळते. ज्या वेळी तुमच्या मागील बाजूस डोके दुखते, अशावेळी जर तुम्ही लवंगाचे तेलाने मागील बाजूस व मानेवर मसाज केल्याने, तुमच्या डोक्याच्या नसांमधील ताण कमी होऊन, मागील डोकेदुखी ही कमी होते. तसेच तुम्ही लवंगाची पावडर आणि त्यात कच्चे दूध मिसळून, तो लेप कपाळावर व डोक्याच्या मागील बाजूस, लावल्यास तुम्हाला त्वरित आराम मिळू शकतो.
चला, तर मग आज आम्ही तुम्हाला डोक्याच्या मागील बाजूस का दुखते? त्याची काही कारणे तसेच, त्यावर तुम्ही कोणते घरगुती उपाय करू शकतात, हे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेले, घरगुती उपाय करूनही, तुमची डोकेदुखी ही कमी होत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे.
धन्यवाद