गावरान तूप खाण्याचे फायदे

0
1077

नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत गावरान तूप खाण्याचे फायदे आपण आरोग्याच्या दृष्टीने आपल्या आहारामध्ये अनेक वस्तूंचा, पदार्थांचा समावेश करत असतो. जेणेकरून आपले शारीरिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होऊ शकेल. शिवाय आपण आपल्या आहारामध्ये सर्व प्रकारचे विटामिन्स मिळणाऱ्या वस्तूंचा पदार्थांचा देखील समावेश करायला हवा. जर आपण आपला आहार हा व्यवस्थित घेत असाल तर आपण आपले स्वास्थ्य चांगले ठेवू शकतो. मित्रांनो, तसेच आहारामध्ये तुपाचा समावेश देखील आवर्जून करायला हवा. अनेक जण तूप याचे नाव काढले तरी जेवणामध्ये तूप घेणे टाळत असतात. तर काही जणांना तुपाचे नाव काढता बरोबर तोंडाला पाणी सुटत असेल. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीनुसार खाण्याची आवड बदलत असते. परंतु, मित्रांनो तूप खाल्ल्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे होऊ शकतात. तुपाचे देखील अनेक प्रकार असतात. गाईचे वेगळे, म्हशीचे वेगळे अशा प्रकारचे तूप असते. गावरान तुप खाण्याचे फायदे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप सारे होऊ शकतात.

         मित्रांनो आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील तूप खाणे किती लाभदायक ठरते याविषयी सांगितलेले आहे. अगदी पूर्वीच्या काळापासून तुपाचा अनेकजण उपयोग करत आलेले आहे. आपण घरात खीर जरी बनवली तरी खीर वर टाकण्यासाठी तूप पहिले मागत असतो. कारण, त्यावर तूप टाकल्यामुळे खीरला एक वेगळ्याच प्रकारची चव येते. तसेच डाळभात बनवले असेल तर गरम गरम डाळ-भातावर तूप आपण आवर्जून घालत असतो. त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारची चव लागत असते ते खायला देखील छान लागते. आणि तूप टाकून खाल्ल्यामुळे ते अजूनच पौष्टिक बनत असते. तसेच आपल्या घरात कुठलाही प्रोग्राम ठेवला असेल तर त्यासाठी तुप सर्वप्रथम लागत असते. सत्यनारायणाचा कार्यक्रम असेल तर त्यासाठी देखील सत्यनारायणाचा प्रसाद बनवताना तूप लागत असते. तर मित्रांनो असे अनेक पदार्थ आहेत की त्यामध्ये तूप टाकल्याशिवाय त्याला चवच लागत नाही. चहा मध्ये देखील एक चमचा गावरान तूप टाकून पिल्याने त्याचे देखील भरपूर प्रमाणात फायदे आपल्याला होऊ शकतात. डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतीन बाईला देखील तूप खायला आवर्जून दिले जाते. त्यामुळे तिला देखील अनेक प्रकारचे फायदे होत असतात. अनेक जण गावरान तूप हे घरीच देखील बनवत असतात. कारण घरगुती पद्धतीने बनवलेले गावरान तूप हे दीर्घ काळ टिकण्यास मदत होते. गावरान तूप खाण्याची मजाच काहीतरी वेगळी असते. चवीला तर छान लागते शिवाय त्याच्या मुळे शरीराला होणारे फायदे देखील होत असतात. तर मित्रांनो आज आपण गावरान तूप खाण्याचे फायदे या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. चला, तर मग गावरान तूप खाण्याचे फायदे या विषयाबद्दल खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  चेहऱ्याला दही लावण्याचे फायदे

गावरान तूप खाण्याचे शरीराला होणारे फायदे:-

    बऱ्याच जणांना गावरान तूप खायला आवडत असते. गावरान तूप खाण्याचे देखील फायदे भरपूर प्रमाणात असतात. तर मित्रांनो, गावरान तू खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कुठल्या प्रकारचे फायदे होऊ शकतात आणि ते खाणे किती फायदेशीर ठरू शकते या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

  • गरम गरम डाळभात त्यामध्ये गावरान तूप टाकून खाल्ल्यामुळे आपल्याला अपचनाचा त्रास होत नाही. शिवाय त्या जेवणातील पोष्टिकता देखील वाढते. आणि जेवण हे रुचकर देखील लागू लागते.
  • डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतिणीला आवर्जून खायला देत असतात. कारण डिलिव्हरी नंतर बाळंतिणीचे पोटाला वात येत असते. आणि जर बाळंतीन बाईने तूप रोज खाल्ले तर वाढलेला वात देखील कमी होण्यास मदत होत असते. शिवाय आईची व बाळाची त्वचा देखील मऊ मुलायम राहण्यास मदत होते.
  • हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपली त्वचा कोरडी पडत असते. अशावेळी जर तुम्ही गावरान तुप घेऊन तुमच्या त्वचेला मसाज केली तर तुमच्या त्वचेचा कोरडेपणा जाऊन तुमची त्वचा ही मऊ व मुलायम होण्यास मदत होईल. आणि त्वचा चमकदार देखील बनू लागेल.
  • तसेच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपण तुपाचे अधिक सेवन करायला हवे. तर तुम्ही चहा मध्ये अथवा दुधामध्ये एक चमचाभर तूप टाकून त्याचे सेवन करायला हवे. त्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता ही व्यवस्थित प्रकारे राहू शकते.
  • बऱ्याच लोकांना सांधेदुखीचा त्रास होत असतो. सांधेदुखी अनेक कारणांमुळे होत असते. काहीजणांना सांधेदुखीचा त्रास हा लवकर होतो तर काहींना वय झाल्यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो. आपल्या हाडांमधील फायबरचे प्रमाण कमी झाल्यामुळे हा त्रास होत असतो तसेच आपल्याला सांधेदुखीचा त्रास होऊ नये यासाठी आपण तुपाचे पहिल्यापासून सेवन करत आले पाहिजे. जर तुम्ही तुमचे नियमित सेवन करत असाल तर तुम्हाला भविष्यात सांधेदुखीचा त्रास होणार नाही. नियमितपणे सेवन केल्यामुळे आपल्या हाडांना एक प्रकारे बळकटी मिळत असते. तसेच हाडांचे ऑइल कमी देखील होत नाही. हाडांचे ऑइल कमी झाल्यामुळे देखील सांधेदुखीचा त्रास होत असतो.
  • तुपाचे आपण नियमित सेवन केल्यामुळे आपल्याला काम करण्यास स्फूर्ती देखील मिळत असते. जर आपल्या शरीरांमध्ये ऊर्जेचे प्रमाण हे व्यवस्थित प्रकारे असेल, तर कुठले काम आपण सहज रित्या करू शकतो यामुळे थकवा देखील जाणवत नाही. आणि ऊर्जेचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी आपण तुपाचे सेवन करणे आवश्यक ठरते.
  • नियमितपणे तुम्ही जर तुपाचे सेवन केल्यास तुम्हाला अनेक प्रकारचे पोषक घटक यातून मिळतील. अनेक जणांना मल पद्धतीचा त्रास होत असतो. म्हणजेच जुलाबाचा त्रास होत असतो. तर यासाठीदेखील तूप खाणे गुणकारी ठरू शकते.
  • पोट साफ न होण्याचा त्रास होत असेल तर एक ग्लास गरम दूध त्यामध्ये एक चमचा तूप टाकून त्याचे सेवन करायला हवे. यामुळे लवकर पोट साफ होण्यास मदत होत असते.
  • अनेक लोकांना ऑफिस मध्ये बैठे काम करावे लागत असते. त्यामुळे जेवण झाले की तसेच काम करावे लागत असते. आणि यामुळे त्यांना अपचनाची समस्या निर्माण होत असते. अपचनाची समस्या निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी नियमित गावरान तुपाचे सेवन करायला हवे जेणेकरून पचन क्रिया सुलभ होण्यास मदत होऊ शकेल.
  • अनेक लोकांना ॲसिडिटी होत असते. ॲसिडिटी या समस्येचे संदर्भात देखील गावरान तुपाचे सेवन केल्याने ॲसिडिटीची समस्या येत नाही.
  • अनेक जण हे शरीराने दुर्बल असतात. जर तुम्ही नियमित पणे गावरान तूपचे सेवन करत असाल तर शरीराची दुर्बलता दूर राहू शकते. म्हणजेच नियमितपणे तुपाचे सेवन केल्यामुळे वजन देखील व्यवस्थित वाढू लागते.
  • नियमीत गावरान तुपाचे सेवन केल्यामुळे कॅन्सर सारखे रोग देखील होत नाहीत. कॅन्सर होण्यासाठी ज्या पेशी कारणीभूत ठरत असतात ते नेहमी गावरान तुपाचे सेवन केल्यामुळे नष्ट होत असतात. म्हणून तुम्ही नियमित गावरान तुपाचे सेवन करायला हवे.
  • बरीच लहान मुलं व अनेक लोक हे सारखे सारखे आजारी पडत असतात. आणि आजारी पडण्या मागील एक कारण म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती कमी असणे. तर अशा मुलांनी व लोकांनी नियमित गावरान तुपाचे सेवन करायला हवे. गावरान तुपाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत असते. आणि शरीराला योग्य प्रकारची ऊर्जा मिळते आणि शरीरातील ताकद वाढण्यास देखील मदत होत असते.
  • गावराणी तुप नियमीत खाल्ल्यामुळे केसान संदर्भातील समस्या देखील नाहीश्या होतील. तसेच गावरान तुप हे केसांना लावल्याने देखील फायदे होत असतात. केस मऊ व मुलायम होण्यास मदत होत असते.
  • नाकाच्या हाडा संदर्भात देखील आणि ज्यांना त्रास होत असतो. अश्यांनी गावरान तूप थोडं कोमट करून त्याचे एक-दोन थेंब नाकात टाकल्या मुळे आराम मिळू शकतो.
  • बऱ्याच लोकांना कसले ना कसली तरी ॲलर्जी होत असते. यासाठी देखील तुम्ही नाकामध्ये गावरान तुपाचे दोन-तीन थेंब टाकल्यामुळे आराम मिळू शकतो. शिवाय जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर डोकेदुःखी देखील यामुळे थांबू शकते. तसेच नाकात दोन-तीन थेंब तूप टाकल्यामुळे अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहू शकतात.
  • नियमित गावरान तूप खाल्ल्यामुळे तुमची चेहऱ्यावरील त्वचाही चमकदार बनू लागते. शिवाय त्वचा ही मऊ आणि मुलायम होण्यास देखील मदत होत असते.
वाचा  ताप येणे या समस्या वर काय खावे आणि काय खाऊ नये

तर मित्रांनो, गावरान तूप नियमित खाल्ल्यामुळे किती प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात याविषयी आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहेत. जर तुम्ही गावरान खात नसाल तर नक्कीच आतापासून गावरान खायला सुरुवात करायला हवी. गावरान तूप नियमित खाल्यामुळे  भविष्यात होणारे सांधेदुखीचा त्रास देखील नाही होणार. शिवाय तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकतात. आणि बाळंतीन बाई ला गावरान तूप खाल्याचे तर भरपूर प्रमाणात फायदे होत असतात.

      मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 धन्यवाद.

बेंबित तूप टाकण्याचे फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here