नमस्कार मित्रांनो, आजकाल बर्याच लोकांना अपचनाचे त्रास व्हायला लागले आहेत. आणि अपचनामुळे विविध प्रकारचे आजार देखील जडू शकतात. पोट दुखणे, खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटणे किंवा छाती मध्ये जळजळ होणे तसेच भूक न लागणे, काही खाल्ले की लगेच मळमळ होणे, पोटामध्ये गॅस तयार होणे, तोंडाला वास येणे व जिभेवर थर साचणे हे सर्व अपचनाचे लक्षणे आहेत. यावर जेवणानंतर कोणते आसन करावे हे जाणून घेऊया.
पचनाची सुरुवात ही आपल्या तोंडामधून होत असते. जेवण करताना ते अगदी घाईघाईत खाणे, अन्न नीट न खाणे या सर्वांमुळे अपचनाच्या समस्या उद्भवतात. त्याचबरोबर काही जणांच्या खाल्लेल्या अन्नामध्ये पाचक रस जो आहे तो व्यवस्थित मिक्स न झाल्यामुळे, जठरामध्ये जे अन्न आहे ते नीट न घुसळल्यामुळे अन्नपचनाच्या समस्या वाढत असतात. त्यामुळे अन्न पचनामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं ते जास्त प्रमाणामध्ये शरीरात निर्माण होत असते. यामुळे शरीराचे आतडे आहेत ते सडू लागतात.
या सगळ्यांमुळे विषारी पदार्थ तयार होतात व हे सर्व शरीरामध्ये मिसळून अनेक आजार होऊ शकतात. यामुळे शरीरात कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. तसेच नसा ब्लॉक होण्याची शक्यता असते, असे एक ना अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. या सर्व समस्या अपचनामुळे निर्माण होत असतात. काही काही जणअन्न न चावता खातात, त्यामुळे शरीरातील अमाशयावर ताण पडतो. या सर्व समस्या अपचनामुळे होतात.
पण मित्रांनो, जास्त घाबरण्याचे कारण नाही. अन्नपचन यावर तुम्ही कुठल्याही प्रकारचा औषध घ्यायचं नाहीये. फक्त अन्नपचन होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. अन्नाचे पचन व्हावे यासाठी जेवणानंतर काही आसने केले पाहिजे. तर आज आपण जेवणानंतर कोणते आसन करावे ? व ते का करावे ? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Table of Contents
किती वेळाने जेवणानंतर आसन/व्यायाम करावा
मित्रांनो, नाष्टा, जेवण तसेच काही खाल्ल्यानंतर लगेचच योगासनांचा सराव न करण्याचा सल्ला हा योग प्रशिक्षकांकडून दिला जात असतो. जेवणानंतर दोन ते तीन तासानंतर योगासनांचा अभ्यास करावा असे सांगितले जाते.
योगासने केल्यानंतर किमान अर्धा तासानंतर जेवण करावे, पण वज्रासन हे एक असे आसन आहे ज्याचा सराव तुम्ही जेवणानंतर लगेच करू शकतात. ज्यामुळे अन्नाचे पचन सहजरीत्या होण्यास मदत मिळते. मित्रांनो, जेवण झाल्यानंतर लगेचच जड व्यायाम करून नका. फक्त वज्रासन हेच एकमेव आसन आहे जे तुम्ही जेवणानंतर करू शकतात. त्याने कुठलाही प्रकारचा त्रास होत नाही.
जेवणानंतर कोणते आसन/व्यायाम का करावा
मित्रांनो, बऱ्याच जणांना अन्नपचन याचा त्रास होत असतो. तसेच बरेच जण हे जेवणानंतर लगेच झोपी जातात किंवा कुठल्याही प्रकारची हालचाल करत नाही. परंतु, असे करणे चुकीचे ठरते. अन्नपचनाची क्रिया ही सुलभ व्हावी म्हणून जेवणानंतर तुम्ही दोन ते तीन तासानंतर नक्की व्यायाम करावा कारण यामुळे तुमच्या अन्नपचनाची क्रिया ही सुलभ होते.
जेवणानंतर आसन/व्यायाम केल्यामुळे त्याचा परिणाम हा तुमच्या स्नायूंवर पडतो, पोटांच्या स्नायूंवर तान पडतो त्यामुळे अवयवांना चांगला तान मिळतो व त्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळत असते. तसेच शरीरामध्ये जी अतिरिक्त चरबी वाढत असते ती चरबी देखील यामुळे कमी होत असते.
म्हणून जेवणानंतर नियमित व्यायाम तुम्ही केले पाहिजे. जेवणानंतर व्यायाम केल्याने तुमच्या रक्ताभिसरणाची प्रक्रिया ही व्यवस्थित होत असते. तसेच अन्नपचनाची क्रिया ही सुलभ होते. शिवाय अन्न अपचनाची समस्या निर्माण होऊन जे त्रास होत असतात ते त्रास तुम्हाला जेवणानंतर व्यायाम केल्याने उद्भवणार नाही.
जेवणानंतर कोणते आसन करावा
मित्रांनो, पचनाची समस्या दूर व्हावी, यासाठी तुम्ही नियमित जेवणानंतर व्यायाम करणे गरजेचे ठरते. जेवणानंतर तुम्ही वज्रासन हे आसन लगेच करू शकतात. हे आसन विशेषता ओटीपोट आणि पाठीसाठी अतिशय लाभदायक आहे. तर वज्रासन याचा कसा सराव करायचा ? वज्रासन करण्याची नेमकी पद्धत कोणती ? याविषयी आपण आता जाणून घेऊया.
वज्रासन करण्याची पद्धत
- वज्रासन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही एक चटई घ्या. त्याच्यावर तुम्ही आरामदायी स्थितीत बसा. यानंतर दोन्ही पाय एकमेकांजवळ ठेवून पाय पसरून बसा हात नितंबाच्या बाजूला ठेवावे.
- आता डाव्या हाताच्या बाजूवर शरीराचा भार घ्यावा. या नंतर उजव्या हातानं उजवा पाय गुडघ्यात दुमडून घ्यावा आणि तळवा मागील बाजूस न्यावा. अशाच प्रकारे डावा पाय देखील मागील बाजूस न्यावा.
- आता दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांजवळ आणा पण दोन्ही टाचा एकमेकांपासून दूर ठेवा.
- मागील बाजूस तुमचे पाय एखाद्या आसणाप्रमाणे दिसतील. आता आपल्या उलट्या पावलांवर बसा बसल्यानंतर किंचितसे पुढे झुकावे.
- पाठीचा कणा ताठ ठेवा. आपल्या हातांचे तळवे गुडघ्यावर ठेवा. डोळे बंद करा आणि ध्यान करा ही झाली वज्रासन याची अंतिम स्थिती.
मित्रांनो, तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार अंतिम स्थितीत बसायचे आहे. तुम्ही जबरदस्तीने आसनाचा सराव करू नका. जबरदस्ती आसन केल्यास तुम्हाला कुठलाही फायदा होणार नाही, हे लक्षात ठेवा. उलट एखाद्या चुकीमुळे दुखापत होण्याची देखील शक्यता असते.
तुम्ही आसनाची अंतिम स्थिती घेतली होती त्याचा उलट स्टेप करून यातून बाहेर यायचं. वज्रासन हे तुम्हाला जर माहित असेल व्यवस्थित तरच हे आसन तुम्ही करून बघा अन्यथा करू नका.
वज्रासन करतेवेळी लक्षात घ्यावयाच्या बाबी
मित्रांनो, वज्रासन करतेवेळी काही बाबींकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. वज्रासन करताना कोणत्या बाबी नेमके लक्षात घ्याव्यात, हे तुम्ही खालील प्रमाणे जाणू शकतात.
- पाय, गुडघे, घोटे, कंबर, किंवा पाठ जर दुखत असेल तर हे आसन कृपया करू नये. तसेच घोटे आणि गुडघे कडक असेल तर हे आसन करणं शक्यतो टाळावे. हे आसन करताना पाय गुडघे दुखत असतील तर घोट्या खाली एक टॉवेल गुंडाळून ठेवावा. त्यामुळे पाय दुखण्याचा त्रास होणार नाही.
- तसेच गुडघ्यावर हात ठेवणे शक्य होत नसल्यास तुम्ही जमिनीवर हात ठेवू शकता. आसन करताना पाठीला बाक येऊ द्यायचा नाही. तसेच, श्वासोच्छवास देखील रोखून धरू नका. नैसर्गिक स्वरूपात श्वास घेण्याची प्रक्रियाही चालू ठेवावी.
वज्रासन करण्याचे फायदे
मित्रांनो, जेवण झाल्यानंतर वज्रासन करणे योग्य ठरते. तसेच, वज्रासन केल्यामुळे कुठले कुठले फायदे होतात, हे खालील प्रमाणे आपण जाणून घेऊया.
- वज्रासन या आसनामुळे ओटीपोटातील रक्ताभिसरण क्रिया सुधारते. पाठीच्या कण्याचे आरोग्य सुधारते पाठीचा कणा नैसर्गिक परिस्थितीत राहण्यास आपोआप सवय होते, पण त्यासाठी हे आसन नियमित करावे लागते.
- वज्रासन हे असे नियमित केल्यामुळे अन्न पचन क्रिया सुधारते, सुलभ होते. तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होत असते.
- वज्रासन हे आसन केल्यामुळे घोटे आणि गुडघ्यांचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारते. तसेच, स्नायूंची लवचिकता वाढते. मुख्य म्हणजे या वज्रासना मुळे पचनासंबंधित समस्या दूर होण्यास देखील मदत होत असते.
- या आसनामध्ये मानेपासून ते पाठीच्या कण्यातील शेवटच्या मणक्यांचा चांगला व्यायाम होतो आणि हे आसन करण्यासाठी जास्त जागा देखील लागत नाही.
शतपावली करणे
जेवण झाल्यानंतर “शतपावली” करणे हा देखील एक योग्य व्यायाम आहे. शतपावली करणे म्हणजे चालणे. जेवण झाल्यानंतर एकाच ठिकाणी बसू नये. कारण एकाच ठिकाणी बसल्यामुळे शरीराला स्थूलत्व प्राप्त होते. शरीरातील लठ्ठपणा वाढतो. तसेच, जे लोक जेवण झाल्यानंतर लगेच झोपतात, त्या लोकांच्या शरीरात अनेक प्रकारच्या व्याधी जडत असतात.
म्हणून मित्रांनो, जेवणानंतर तुम्ही तसेच बसून राहू नका, तर जेवणानंतर शतपावली करणे हे देखील योग्य ठरते. आयुर्वेदानुसार जेवण झाल्यानंतर मंद गतीने पावले टाकत चालणे म्हणजेच शतपावली करणे. असं केल्याने आपल्या पोटातील अन्न हे पचनशील होते तसेच अन्नाचे पचन हे वेगाने होते. यामुळे त्याचे फायदे आपल्या शरीरास होतात.
परंतु मित्रांनो, शतपावली करणे म्हणजेच जोरात चालणे हे चुकीचे आहे शतपावली म्हणजेच मंदगतीने पावले टाकने.
जेवण केल्यानंतर आसन/व्यायाम करण्याचे फयदे.
मित्रांनो, जेवण केल्यानंतर जर तुम्ही नियमितपणे व्यायाम करत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होणार आहे. तर जेवण केल्यानंतर व्यायाम केल्यामुळे कुठले फायदे होऊ शकतात, याविषयी आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.
- जेवण केल्यानंतर व्यायाम केल्यामुळे शरीरातील अन्नपचनाची क्रिया सुधारते.
- जेवणानंतर नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
- जेवणानंतर व्यायाम केल्यामुळे शरीराचे आरोग्य निरोगी राहते.
- जेवणानंतर व्यायाम केल्यामुळे शरीरातील पाचक रस हे व्यवस्थितरीत्या जठारामध्ये जात असते.
- जेवणानंतर नियमित व्यायाम केल्यामुळे शरीर हे कुठल्याही रोगाला बळी पडू शकत नाही.
- तसेच जेवणानंतर डाव्या कुशीवर दहा मिनिटे झोपल्यामुळे अन्न पचनाची क्रिया ही व्यवस्थित रित्या होत असते.
- जेवणानंतर व्यायाम केल्यामुळे पोट दुखण्याच्या तसेच छाती मधील जळजळ अशा समस्या दूर होतात.
मित्रांनो, जेवण झाल्यानंतर तुम्ही किती वेळा नंतर व्यायाम करू शकतात, तसेच जेवणानंतर व्यायाम का केला पाहिजे, व्यायाम करण्याची कुठले कुठले फायदे होऊ शकतात आणि व्यायाम करताना कुठली काळजी घेतली पाहिजे ? अशाप्रकारे तुम्ही वरील माहिती जाणून घेतलेली आहे. याविषयी अजून तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.
धन्यवाद.