नमस्कार मित्रांनो, कपाळावर गंध का व कुठे लावायचे? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो. मित्रांनो दिवसाची सुरुवात आपण देवाच्या आराधनेने करत असतो. सकाळी उठल्यानंतर आपण ईश्वराचे नाम मुखी घेतो. स्नान झाल्यानंतर आपण टिळा लावणे हे खूप महत्वाचे असते. आपला देह म्हणजे ईश्वराचे मंदिर. मंदिरात ईश्वरी भाव असतो. तसाच देहात देखील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरी भावाकडे खेचणारे असतात. ईश्वराच्या पूजेने आपला देह शांत होत असतो. गंध लावणे म्हणजे केवळ कपाळाची शोभा नव्हे तर गंध लावणे म्हणजे बुद्धीचे पूजन. कुठलाही सण समारंभ असो किंवा कुठलेही शुभ कार्य असेल तेव्हा टिळा लावण्याचे फार महत्व असते. टिळा लावल्याने व्यक्तिमत्त्व खुलून दिसते. कपाळी टिळा लावल्याने व्यक्तीच्या आत्मविश्वासात भर पडते. टिळा लावणे हे फार प्राचीन काळापासून चालत आलेले आहे.कुठलाही राजा असो किंवा सैनिक असो लढाई करण्यापूर्वी त्यांच्या कपाळावर म्हणजेच मस्तकावर टिळा लावला जात असे. आज देखील कुठल्याही काम करण्याआधी किंवा परीक्षेला जाण्यापूर्वी आपण कपाळी टिळा लावून जात असतो.
ज्योतिष शास्त्रानुसार टिळा लावल्यामुळे ग्रहांची शांतता होते. असे मानले जाते की चंदनाचा टिळा लावल्याने व्यक्तीचे घर हे अन्नधान्य याने परिपूर्ण असते. व त्याच्या सौभाग्ययात देखील वाढ होत असते.
कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यासाठी टिळा लावला जातो.तर मित्रांनो कपाळावर गंध का लावायचा?त्याचे महत्त्व काय? तो कसा लावावा? तसेच गंध कोणत्या प्रकारचा आपण लावू शकतो? गंध कपाळावर लावल्याने कोणते कोणते फायदे होता? हे आपणाला जाणून घ्यायला हवे.
Table of Contents
कपाळावर गंध लावण्याचे महत्व
मित्रांनो, बुद्धीच्या आश्रयस्थान असलेल्या मस्तकाची पूजा आहे गंधाद्वारे करावी. स्नान झाल्यानंतर देवपुजे आधी तुम्ही तुमच्या कपाळावर गंध लावावा. गंध लावल्याने बुद्धीचे पूजन होते. मित्रांनो,ईश्वर हे साध्य तर बुद्धी हे साधन असल्याने बुद्धीचे पूजा करणे आवश्यक आहे. तसेच गंध हे मांगल्याचे प्रतीक आहे. मित्रांनो असे म्हटले जाते की जो नित्य गंध लावत असतो ती व्यक्ती ही मृत पावल्यानंतर वैकुंठात जाते असे धर्म शास्त्र सांगते. मित्रांनो कपाळावर गंध लावणे तुम्हाला खूप सारे काही फायदा होऊ शकतात. कपाळावर गंध लावल्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो.कपाळावर गंध लावण्याचे अध्यात्मिक महत्व आहे. आज्ञाचक्र वर टिळा लावल्याने आज्ञा चक्रा ला नियमित रूपाने उत्तेजना मिळत राहते. यामुळे व्यक्ती ऊर्जावान, तणाव मुक्त,दूरदर्शी व विवेकशील राहते अशी व्यक्ती इतरांपेक्षा जास्त समजदार असते.
टिळा लावणे हे वैज्ञानिक दृष्टीने देखील फार महत्त्वाचे असते. मेंदूत सेराटोनिन आणि बीटा इंडॉर्फिन चा स्राव संतुलित पद्धतीने होत राहतो ज्यामुळे निराशा दूर होउन मनात उत्साहा निर्माण होण्यास मदत होते. आणि हा उत्साह संचारल्या मुळे त्या व्यक्तीच्या डोकेदुखीचा त्रास देखील कमी होतो.
मित्रांनो,आपल्या शरीरात सात सूक्ष्म ऊर्जा केंद्र असतात.जी अपार शक्ती चा भंडार आहे. त्यांना चक्र असे देखील म्हटले जाते. कपाळाच्या मध्यभागी जिथे तुम्ही टिळा लावतात तिथे आज्ञाचक्र असते. या स्थानी शरीराच्या प्रमुख तीन नाड्या येऊन मिळतात.
त्या तीन नाड्या म्हणजेच इडा,पिंगला,सुषुम्ना. या तीन नाड्या ज्या ठिकाणी मिळतात त्याला त्रिवेणी असे देखील म्हटले जाते. हे गुरु स्थान आहे. इथूनच पूर्ण शरीर संचालन होत असते. तसेच हे आपल्या चेतनाचे मुख्य स्थान देखील आहे. आणि याला मनाचे घर पण म्हणतात. यामुळे कपाळाचे हे स्थान सर्वात पूजनीय मानले जाते. कपाळावर टिळा लावल्यामुळे स्वभावात चांगले बदल घडून येण्यास मदत होते.
कपाळाला गंध लावल्यामुळे आपले ध्यान एकाग्र होण्यास मदत होते. आपल्याला आपले मन एकाग्र करता येते. कपाळी गंध लावल्यामुळे मनुष्य हा पाप कर्माकडे वळत नाही. ज्या लोकांना कामाचा भरपूर व्याप असतो,श्वास घ्यायला देखील फुरसत मिळत नसते त्यांनी किमान स्नान झाल्यानंतर तरी कपाळाला टिळा लावला पाहिजे. त्यानिमित्ताने भगवंताची पूजा होते.
कपाळावर गंध कसा लावावा?
मित्रांनो,कपाळावर गंध लावण्याचे महत्व किती आहे हे आपण जाणून घेतले आहे. कपाळाला गंध लावल्यामुळे मन शुद्ध होते. मनाची एकाग्रता वाढण्यास देखील मदत होत असते. कपाळावर गंध लावल्यामुळे मन स्थिर होते. त्यामुळे पूजा करताना आपण त्यातच रममाण होतो.कपाळावर गंध लावण्याचे ज्याप्रमाणे महत्त्व आहे तसेच कपाळावर गंध कसा लावावा हे देखील जाणून घेणे फार महत्त्वाचे असते.
तर मित्रांनो, कपाळावर टिळा लावताना तो कुठल्या बोटाने लावावा आणि त्याचे कोणते कोणते फायदे आहेत हे देखील जाणून घेणे फार महत्त्वाचे असते.कपाळावर गंध लावताना हा मधल्या बोटांच्या सहाय्याने तुम्ही लावू शकतात. मधल्या बोटांचा संबंध हा हृदयात असतो. या बोटातून प्रवाहित होणारी स्पंदने ही हृदयापर्यंत जाऊन भिडतात.
तसेच मित्रांनो जप करताना देखील मधल्या बोटाचा वापर करत असतात. त्यामुळे दिवसभर मन ही शांत राहते आणि मन देखील भक्तिभावाने पूर्ण होते. गंध लावल्यामुळे मनुष्य हा पाप कर्माकडे न वळता चांगल्या कर्माकडे वळतोआणि समाजात देखील त्या व्यक्तीकडे चांगल्या नजरेने देखील बघितले जाते.
देवपूजा करत असताना शक्यतो देवाला तिसऱ्या बोटाने गंध लावावा. पितृ कार्य करताना म्हणजे पितरांची पूजा करताना गंध हा अंगठाशेजारच्या बोटाने म्हणजेच तर्जनीने लावला पाहिजे. एखाद्या महान व्यक्तीना किंवा ऋषीमुनींना गंध लावताना हा शक्यतो अंगुली म्हणजेच शेवटच्या बोटाने गंध लावला पाहिजे. मोक्ष प्राप्ती करायची असेल तर टिळा हा अंगठा ने लावला पाहिजे. शत्रूंचा नाश करायचा असेल तर टिळा हा तर्जनीने लावावा. धनप्राप्ती व्हावी यासाठी मध्यमानी ने टिळा लावावा. तसेच शांती प्राप्तीसाठी शक्यतो अनामिकाने टिळा लावला पाहिजे. साधारण टिळा हा अनामिकेने लावला जात असतो.हे गंध लावण्याचे शास्त्रशुद्ध पद्धत आहे.
कपाळावर लावायचे गंधाचे प्रकार
-
हळद
-
कुंकू
-
अष्टगंध
-
चंदन
-
केशर
-
भस्म
-
गुलाल
-
बुक्का
मित्रांनो, वरील प्रमाणे गंधाचे प्रकार आहेत. कुठलेही शुभकार्य असते तर त्या वेळेस गंध कपाळी लावणे फार महत्त्वाचे असते. बायका कपाळी हळदी कुंकू लावत असतात. गंधा शिवाय कुठलीही पूजा ही अपूर्ण मानले जात असते . टिळा याला विजय तिलक असे देखील म्हटले जाते. वरील प्रमाणे हळद कुंकू,अष्टगंध, चंदन, गुलाल, बुक्का इत्यादी टिळा चे प्रकार आहे. प्रत्येक गंधाचे हे वेगळे महत्त्व आहे.
हळदीचा टिळा लावल्याने त्वचा शुद्ध होते. हळदीच अंतीबॅक्टरियल तत्वे असतात. जे आपल्याला रोगमुक्त करतात. बायका लाल रंगाचा गंध कपाळी लावत असतात . लाल रंग ऊर्जा व शक्तीचे प्रतीक मानले जाते . त्याला देने स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते टिळा लावणे म्हणजे देवीची आराधना करणे होय. कपाळी टिळा लावल्याने मनुष्याला शांतीची अनुभूती येत असते. टिळा लावल्यामुळे तरी मानसिक रोगांपासून संरक्षण होत असते.
कोणत्या प्रकारचा गंध कपाळावर लावावा?
मित्रांनो, कपाळावर गंध का लावला पाहिजे,तसेच कसा लावला पाहिजे,कुठल्या बोटाने लावला पाहिजे हे आपण जाणून घेतले आहे. मित्रांनो गंधाचे खूप प्रकार आहेत. तसेच गंध कोणत्या प्रकारचा लावला पाहिजे हे देखील जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.
धार्मिक मान्यतेनुसार चंदनाचा टिळा लावल्याने मनुष्याच्या पापांचा नाश होतो. लोकांना संकटापासून मुक्तता मिळते.
मित्रांनो, कपाळाच्या दोन भुवया मध्ये अग्न चक्राचे स्थान असते. या स्थानाला तिसरा डोळा असे देखील म्हणतात. हे ऊर्जा स्थान असल्याने अध्यात्मात या स्थानाला विशेष महत्व आहे. म्हणूनच कपाळावर चंदनाचा टिळा लावणे आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असते.चंदनाच्या टिळाला फार महत्त्व आहे. नाकातून वाहणाऱ्या दोन नाडी यांपैकी एक धन नाडी व एक ऋण नाडी असते.धन नाडी यातून निर्माण होणारी उष्णता रोखण्यासाठी चंदन टिळा लावण्याचे महत्व फार आहे . कपाळावर टिळा लावताना तुम्ही औषधी चंदनाचा उपयोग करू शकतात. चंदनाचा टिळा लावल्याने एकाग्रता सुधारण्यास मदत होते. थंड प्रवृत्तीचे चंदन शरीरास आणि कालांतराने मनास शांतता मिळण्यास मदत करते. चंदनाचा टिळा लावल्याने मन एकाग्र होण्यास मदत होते.
जाणून घ्या :थंडीत ड्राय स्काल्पमुळे केस गळतात?
टिळा सह तांदूळ लावल्यास आई लक्ष्मी आकर्षित होते. टिळा हा अनेक गोष्टींचा लावला जातो जसे की हळद-कुंकू , भस्म, केशर, चंदन. चंदनाचा टिळा लावल्याने तुम्हाला खूप सारे काही फायदे होऊ शकतात. तर मित्रानो, नक्कीच तुम्ही चंदनाचा टिळा लावून बघा नक्कीच फायदा होऊ शकतो.
मित्रांनो गंध कपाळावर कसा लावावा, कुठे लावावा हे तुम्ही जाणून घेतलेले आहे. वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात. अधिक माहिती साठी तुम्ही येथे देखील वाचू शकता.
धन्यवाद.