केस गळतीवर आयुर्वेदिक तेल

0
1704
केस गळतीवर आयुर्वेदिक तेल
केस गळतीवर आयुर्वेदिक तेल

          

   मित्रांनो, आपणा सर्वांनाच असे वाटत असते की आपले केस हे लांब सडक असावेत. आपले केस स्वच्छ सुंदर आणि निरोगी व्हावे. तसेच आपले हे केस मऊ मुलायम व्हावेत. आपल्या केसांची गळती होऊ नये. अकाली आपले केस पांढरे होऊ नयेत. इतरांप्रमाणे आपले केस सुंदर दिसावेत. पण हल्लीच्या धावपळीच्या जगात मात्र आपणास योग्य ती केसांची काळजी घेता येत नाही. आणि याचाच परिणाम म्हणून आपले केस गळू लागतात केसांकडे दुर्लक्ष होते अकाली केस पांढरे होणे याचे प्रमाण वाढते. केस गळतीवर काहीच प्रभावी ठरत नाही.तसेच, कामाचा अति लोड असल्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो परिणामी आपले केस गळतीवर लक्ष दिले जात नाही.

आपण पाहिजे तेवढे आपल्या केसांची काळजी घेत नाही. इतरांच्या केसां प्रमाणे आपल्यालाही वाटते  की आपले केस सुंदर दिसावेत लांबसडक व्हावेत म्हणून तुम्ही वेगवेगळे प्रयोग तुमच्या केसांवर करतात. पार्लरमध्ये जाऊन केसांवर केमिकलचा मारा करतात. याने केसांची समस्या अजून जास्त उद्भवू शकते. तुम्हालाही तुमचे केस गळू नये असे वाटते का? तुमचेही केस इतरांप्रमाणे घनदाट, मऊ, मुलायम व्हावेत असे वाटते का ? केस गळू नये,अकाली ते पांढरे होऊ नयेत आणि केस निरोगी व सुंदर व्हावेत यासाठी आम्ही तुमच्या साठी काही आयुर्वेदिक तेल घेऊन आलेले आहेत. हे आयुर्वेदिक तेल तुम्ही घरी करून बघा. तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. चला तर मग आपण जाणून घेऊया हे आयुर्वेदिक तेल आहे तरी नेमके कोणते.

कोरफडीचे तेल :

    मित्रांनो, कोरफड हे तर सर्वांनाच माहिती आहे. सर्वांच्याच दारोदारी कोरफड असते. कोरफड हे एक आयुर्वेदिक वनस्पती आहे.कोरफडीचे फायदे आणि गुणधर्म बहुगुणी आहेत. कुणाला चेहऱ्यावर समस्या असतील तर अगदी सहजपणे ते कोरफडीचा उपयोग करतात. केसांच्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणून वापरली जाणारी ही कोरफड. तर मित्रांनो आपण या कोरफडीचा उपयोग हा आपल्या केस गळतीवर योग्य प्रमाणे करू शकतो. या कोरफडीपासून आपण एक आयुर्वेदिक तेल तयार करू शकतो. आणि ते कसे करावे हे आपण जाणून घेऊयात.

वाचा  लहान मुलांना एबीसीडी शिकवण्याची पद्धत

कोरफडीचे तेल कसे करावे ?

     कोरफडीचे तेल करण्यासाठी तुम्ही कोरफड ही स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. यानंतर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने कोरफडीचा रस हा एका वाटीत काढून घ्या. यानंतर एका कढईत खोबऱ्याचे तेल थोड्या प्रमाणात घ्या.तुमचे केस जर लांब असतील तर जास्त प्रमाणात घ्या. आता हे तेल मध्यम आचेवर गरम करा.तेल गरम झाल्यानंतर त्यात कोरफडीचा रस टाकून घ्या. आणि हे तेल पंधरा मिनिटापर्यंत गरम करा. आता हे तेल थंड झाल्यावर यात विटामिन ई च्या दोन कॅप्सूल टाका. आणि हे तेल व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या.  विटामिन ई कैप्सूल यामुळे तुमचे केस मुलायम होण्यासाठी मदत होते. आणि केस गळतीवर देखील प्रभावी ठरू शकते.अशा प्रकारे तुम्ही कोरफडीचा तेल तयार करू शकतात. हे तयार झालेले तेल तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा. आणि सकाळी केस स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे. त्याने तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.

वडाच्या पारंब्या चे तेल :

     मित्रांनो,वडाचे झाड हे तर सगळ्यांनीच बघितले आहे. कित्येक जणांनी तर वडाच्या पारंब्या चे झोके खेळले असतील. पण वडाच्या पारंब्या पासून बनवलेले तेल आपल्या केसांसाठी किती बहुगुणी आणि आयुर्वेदिक आहे हे फारच कमी जणांना माहीत असेल. बर्‍याच जणांना हा प्रश्न पडला असेल की वडाच्या पारंब्या पासून तेल कसे काय बनू शकते का? पण मित्रांनो फार टेन्शन घ्यायची गरज नाही. अगदी सहजरीत्या आपण वडाच्या पारंब्या पासून तेल बनवू शकतो. हे तेल कसे बनवावे चला तर आपण जाणून घेऊया.

वडाच्या पारंब्या पासून तेल कसे बनवावे ?

  वडाच्या पारंब्या पासून तेल बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही खोबऱ्याचे तेल 50 ग्रॅम घ्या. हे तेल एका कढईमध्ये गरम करा. त्यानंतर त्यात साधारण 7 ग्रॅम इतक्या वडाच्या पारंब्या टाका. आता यात पाच ग्रॅम इतकी दालचिनी टाका. आणि या तेलाचा रंग पिवळसर होईल पर्यंत ते चांगल्याप्रकारे गरम करून घ्या. अशाप्रकारे आपण वडाच्या पारंब्या पासून आयुर्वेदिक तेल तयार करू शकतो.

वाचा  मुलांची उंची किती वयापर्यंत वाढते

      मित्रांनो तुम्ही वापर कसा कराल तर, तुम्ही पहिले तुमचे केस स्वच्छ धुऊन टाकावेत. आणि यानंतर तुम्ही हे तयार केलेले तेल तुमच्या केसांना लावा आणि पाच मिनिटे मालिश करा. तेल लावल्यानंतर ते दोन तास तसेच ठेवावे आणि नंतर केस स्वच्छ धुऊन टाकावे . रात्री झोपण्यापूर्वी देखील तुम्ही हे तेल लावू शकतात.आणि सकाळी उठल्यावर  केस स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे. याने तुमच्या केसांना केस गळतीवर नक्कीच फायदा होईल. तुमचे केस मऊ मुलायम आणि केसांची गळती थांबून लांब होण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

जास्वंदीच्या फुला पासून बनवलेले तेल :

  जास्वंदीचे झाड हे सगळ्यांच्या घरोघरी असते. जास्वंदीची फुले ही आपण गणपती बाप्पाच्या चरणी वाहत असतो.जास्वंदाची फुले हे विविध रंगांची असतात.लाल,पिवळे, गुलाबी, पांढरे अशा वेगवेगळ्या प्रकारची जास्वंद आढळून येते. जास्वंदी चा उपयोग हा फक्त देवासाठी होतोच असे नाही तर जास्वंदीच्या फुलांचा पानांचा वापर आपल्यासाठी फायदेशीर ठरत असतो.जास्वंदीच्या झाडांची फुले आपल्या केसांसाठी बहुगुणी ठरते. जास्वंदीचे फुले, पाने यांचा वापर करून आपण आयुर्वेदिक तेल तयार करू शकतो. तसेच जास्वंदीच्या फुला व पानांपासून आपण हेअर मास्क देखील तयार करू शकतो. जास्वंदीचे तेल तयार करून ते वापरल्याने तुमचे केसांची गळती कमी होऊ शकते. आणि केसही मऊ मुलायम आणि लांब सडक होऊ शकतात. चला तर मग जास्वंदीचे तेल कसे बनवावे हे आपण बघुयात.

जास्वंदीच्या फुलाचे तेल कसे बनवावे ?

जास्वंदीच्या फुलांचे तेल तयार होण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही एका कढाईत खोबरेल तेल घ्या. त्यानंतर हे तेल गरम करून घ्या. आता या तेलात साधारण 7 ते 8 जास्वंदीचे फुले आणि पाच-सहा जास्वंदीचे पाने स्वच्छ पाण्याने धुऊन तेलात टाका. आता हे तेल पंधरा मिनिटे चांगले उकळून घ्या. अशाप्रकारे तुम्ही जास्वंदीच्या फुलांपासून आयुर्वेदिक तेल तयार करू शकतात. मित्रांनो, जास्वंदीच्या फुलापासून तयार केले तेल याने तुमच्या केसांना हा नक्कीच फायदा होऊ शकतो. हे तेल तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केसांना व्यवस्थितपणे लावून घ्या. आणि पाच मिनिटे मालिश करा. आणि दुसऱ्या दिवशी केस स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. याने तुमचे केस हे मुलायम तर होतीलच आणि केसांची गळती जास्तीत जास्त प्रमाणात कमी होऊ शकते.

वाचा  लिपस्टिक लावण्याचे फायदे आणि नुकसान

     तर मित्रांनो,तुम्ही वरील प्रमाणे आयुर्वेदिक तेल तयार करू शकतात. आणि ते तुमच्या केसांवर योग्य त्या प्रमाणे वापरू शकतात. याने तुमच्या केसांसाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. यानेही जर तुम्हाला फायदा होत नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. व योग्य तो उपचार घेऊ शकतात.आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून  कळवू शकतात.

  धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here