मोहरी तेल लावण्याचे फायदे जाणून घेऊया काय आहेत?

0
1661
मोहरी तेल लावण्याचे फायदे
मोहरी तेल लावण्याचे फायदे

 

नमस्कार मित्रांनो या निसर्गात अनेक अशा वनस्पती आहे की जसा आपल्याला पुरेपूर फायदा होत असतो.अनेक प्रकारचे आयुर्वेदिक वनस्पती निसर्गामध्ये आढळून येतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी पासून आपल्याला मोठमोठे फायदे होत असतात. त्यातीलच एक म्हणजे मोहरी. मित्रांनो, मोहरी ही आकाराने किती छोटीशी असते. परंतु मोहरीचे एक ना अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होत असतात. स्वयंपाक घरात हमखास मोहरीचा उपयोग होत असतो. आणि भाज्यांमध्ये मोहरीचा तडका दिला जातो. ज्यामुळे जेवण रुचकर बनण्यास मदत होत असते. तर मित्रांनो या मोहरी पासून तेल देखील आपल्याला मिळत असते. आणि मोहरीच्या तेलाचा उपयोग आपला खूपच फायदेशीर ठरत असतो. अगदी जुन्या काळापासून मोहरीच्या तेलाचा उपयोग करण्यात आलेला आहे. आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने तर मोहरीचे तेल फारच उपयुक्त ठरते.

      अनेकजण मोहरीच्या तेलाचा स्वयंपाक बनवण्यासाठी देखील उपयोग करत असतात. आपल्या शरीराच्या दृष्टीने मोहरीचे तेल हे फारच उपयुक्त ठरत असते. त्याचप्रमाणे आपल्याला शरीराच्या संदर्भात अनेक समस्या येत असतात. आणि त्यासाठी देखील आपण मोहरीच्या तेलाचा उपयोग करू शकतो. बऱ्याच लोकांना केसां विषयी देखील समस्या येत असतात. आणि त्यासाठी देखील मोहरीचे तेल उपयोगी ठरत असते. तर मित्रांनो आज आपण मोहरी तेल लावण्याचे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मोहरीचे तेल लावण्याची आपल्याला कुठल्या प्रकारचे फायदे होऊ शकतात तसेच या तेलाचा आपण कशा प्रकारे वापर करायला हवा या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

मोहरीचे तेल नेमके काय असते?

बऱ्याच लोकांना मोहरीचे तेल नेमके काय असते या विषयाबद्दल माहीत नसते. आणि मोहरीचे तेल नेमके कसे बनते याविषयी देखील माहित नसते. तर मित्रांनो मोहरीचे एक छोटीशी झाड असते. मोहरी आपण स्वयंपाकघरात तर वापरत असतो. पोह्यांना तर हमखास मोहरीची फोडणी दिलेली असते. अर्थातच मोहरीमुळे जेवणाला चव देखील येत असते. अगदी जुन्या काळापासून मोहरी च्या तेलाचा  उपयोग लोक करत आलेले आहेत. कारण यापासून एक ना अनेक प्रकारच्या फायदा आपला होत असतात. तर मोहोरीच्या दाण्याच्या पासून तेल तयार करण्यात येते. अगदी आपण घरगुती पद्धतीने देखील मोहरीचे तेल तयार करू शकतो. परंतु त्यासाठी योग्य कृती आपल्याला माहिती असणे आवश्यक ठरत असते. मोहरीच्या तेलाचे एक ना अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात.

वाचा    केस वाढवण्यासाठी कोणते तेल वापरावे

मोहरीचे तेल लावण्याचे फायदे कोण-कोणते आहेत?

   मोहरीचे तेल हे स्वयंपाकाच्या दृष्टीने उपयोगी मानले जाते. मोहरी तेल जेवणात वापरल्याने आयुर्वेदिक फायदे आपल्या शरीराला होत असतात. तसेच मित्रांनो मोहरीचे तेल लावण्याचे अनेक प्रकारचे फायदे देखील आपल्याला होत असतात. तर मोहरीचे तेल लावण्याचे कुठल्या प्रकारचे फायदे आपण होऊ शकतात याबद्दल आता आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

मोहरीचे तेल त्वचेला लावण्याचे फायदे:

अनेक लोकांना त्वचेच्या संदर्भात समस्या निर्माण होत असतात. जसे की त्वचा फाटणे त्वचा कोरडी पडणे त्वचा निस्तेज दिसू लागणे अशा एक ना अनेक समस्या निर्माण होत असतात. हिवाळ्याच्या वेळी त्वचा कोरडी पडण्याची समस्या सगळ्यांनाच येत असते. तर त्वचेच्या समस्या साठी आपण मोहरीचे तेल याचा उपयोग करू शकतो. मोहरीचे तेल हे चिकट स्वरूपाचे असते. एक प्रकारे ते घट्ट असते. मोहरीच्या तेलामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात. जे आपल्या साठी फार उपयुक्त ठरत असतात. तसेच यामध्ये विटामिन ई याचे प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असते. विटामिन ई हे आपल्या त्वचेसाठी फारच उपयुक्त ठरत असते. जल तुम्हाला त्वचे संदर्भात समस्या येत असतील तर तुम्ही मोहरीच्या तेलाने तुमच्या त्वचेला मसाज करायला हवा. जर तुमच्या चेहऱ्याची त्वचा हि निस्तेज व कोरडी पडत असेल तर त्यासाठी तुम्ही मोहरीचे तेल थोड्या प्रमाणात घेऊन त्यामध्ये थोडेसे नारळाचे दोन चार थेंब तेल मिक्स करावे आणि त्या तेलाने तुमच्या चेहर्‍याला मसाज करावा. यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा मुलायम व चमकदार दिसू लागण्यास मदत होईल. शिवाय या तेलाने मसाज केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित प्रकारे होऊ लागते ज्यामुळे त्वचेची पोत सुधारते. व तुमची त्वचा हे नितळ देखील दिसू लागते. अशा प्रकारचे फायदे तुम्हाला मोहरीच्या तेलाचे होऊ शकतात.

मोहरीचे तेल केसांना लावण्याचे फायदे:

असे कोणीही नाही की ज्यांना केसांच्या विषयी समस्या निर्माण होत नसेल. केसां बद्दल बोलायचे म्हटले, तर अनेकांना केस गळती, केसात कोंडा होणे केस निस्तेज दिसू लागणे वगैरे अशा एक ना अनेक समस्या निर्माण होत असतात. तर या समस्यांसाठी तुम्ही मोहरीच्या तेलाचा उपयोग करू शकतात. मोहरीच्या तेलामध्ये विटामिन ई मुबलक प्रमाणात असते जे केसांची पोत सुधारते. यासाठी तुम्ही मोहरीचे तेल कोमट करून घ्यावे. त्यामध्ये तुम्ही थोडे नारळाचे तेल मिक्स करावे. आणि दोन विटामिन ई च्या कॅप्सूल टाकाव्यात. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही या तेलाने तुमच्या केसांची व केसांच्या मुळांची मालिश करावी. मालिश केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यास मदत होते. आणि सकाळी उठल्यावर हर्बल शाम्पू च्या मदतीने तुमचे केस स्वच्छ करून घ्यावेत. मित्रांनो हा उपाय तुम्ही आठवड्यातून चार पाच वेळा करू शकतात. हा उपाय तुम्ही नियमित केल्यामुळे तुमच्या केसांच्या ज्या काही समस्या असतील त्या जाण्यास मदत होईल. तुमच्या केसांची गळती बंद होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे तुमचे केस हे मुलायम व चमकदार दिसू लागतील. तसेच हा उपाय तुम्ही नियमित केल्यामुळे तुमच्या केस लांब सडक व काळेभोर देखील होऊ लागतील. मोहरीचे तेल तुम्ही केसांना लावल्यामुळे वरील प्रमाणे तुमच्या केसांना फायदे येऊ शकतील.

वाचा  स्वप्नात आई एकविरा दिसणे शुभ की अशुभ ?

लहान मुलांना मोहरीचे तेल लावण्याचे फायदे:

अनेक जण लहान मुलांना कोणत्या तेलाने मालिश करावी याविषयी विचारत करत असतात. कोणते तेल लावल्याने आपल्या बाळाला फायदा होईल याबद्दल चिंतेत असतात. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या बाळाची मालिश करण्यासाठी मोहरीचे तेलाचा उपयोग करू शकतात. मोहरीच्या तेलाने बाळाला मालिश केल्यामुळे त्यांचे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित प्रकारे होण्यास मदत होत असते. शिवाय लहान मुलांची मोहरीच्या तेलाने मालिश केल्यामुळे हाडे देखील बळकट होण्यास मदत होत असते. तसेच मोहरीच्या तेलाने मालिश केल्यामुळे त्यांना शांत देखील वाटू लागते आणि झोप देखील चांगल्या प्रकारे लागत असते. लहान मुलांना मोहरीचे तेल लावण्याचे एक ना अनेक फायदे लहान मुलांना होऊ शकतात.

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी मोहरीचे तेल लावण्याचे फायदे:

बऱ्याच लोकांना त्यांच्या कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची समस्या निर्माण होत असते. म्हणजेच ज्याला आपण असे म्हणू शकतो की, अकाली सुरकुत्या पडणे. कामांची धावपळ, मानसिक ताणतणाव, सतत चिंतेत राहणे अशा एक ना अनेक कारणांमुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडत असतात. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या घालवायचे असतील तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला मोहरीच्या तेलाने मालिश करायला हवी. जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्याला मोहरीच्या तेलाने मालिश करून झोपले, तर यामुळे अधिक फायदा होऊ शकतो. मोहरीच्या तेलाने मालिश केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढण्यास मदत होते त्यामुळे त्वचेची पोत सुधारून त्वचेवरील सुरकुत्या जाण्यासाठी मदत होते व भविष्यात होणाऱ्या सुरकुत्या देखील लवकर पडत नाहीत. तर नक्कीच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या जर घालवायचे असतील तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मोहरीच्या तेलाने मालिश करायला हवी. तर हे आहेत मोहरी तेल लावण्याचे काही उपयुक्त फायदे.

मोहरीचे तेल ओठांना लावण्याचे फायदे:

    बऱ्याच लोकांना ओठ फाटण्याची समस्या निर्माण होत असते. हिवाळा आला तर ही समस्या अनेकांना भेडसावत असते. ओठांना चिरा पडणे ओठ फाटणे अशा एक ना अनेक समस्या या ओठा संदर्भात येत असतात. जर तुम्हाला या समस्यांपासून दूर रहावयाचे असेल तर तुम्ही तुमच्या ओठांना मोहरीच्या तेलाने मसाज द्यायला हवी. तसेच रात्री झोपण्यापूर्वी ओठांना मोहरीचे तेल लावून झोपायला हवे. असे केल्यामुळे तुमचे ओठ फाटणे, ओठांना चिरा पडणे या अनेक समस्येपासून तुम्ही दूर राहू शकतात. मोहरीचे तेल लावल्याने एक प्रकारे बोटांना मॉइस्चराइजरच मिळत असते. म्हणजे ओठांना ओलावा टिकून राहतो. ज्यामुळे ओठ चमकदार दिसू लागतात ओठानवरील काळी त्वचा देखील निघून जाण्यास मदत होत असते. त्यालाच आपण मृतपेशी निघून जाणे असे देखील म्हणू शकतो. जर तुम्हाला तुमचे ओठ चांगले असावेत असे वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या ओठांना मोहरीचे तेल नियमीत लावायला हवे.

वाचा  पायाला कुरूप झाल्यावर उपाय

      तर मित्रांनो, मोहरीचे तेल नेमके काय आहे? तसेच मोहरीचे तेल ओठांना लावण्याने कुठल्या प्रकारचे फायदे होऊ शकतात? त्याचप्रमाणे मोहरीचे तेल हे केसांसाठी व आपल्या त्वचेसाठी किती प्रकारे फायदेशीर ठरू शकते? याविषयी आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतली आहे. मोहरीचे तेल लावल्याने एक ना अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात.तर हे आहेत मोहरी तेल लावण्याचे काही उपयुक्त फायदे.

तसेच मोहरीचे तेल लावल्याने आपली हाडे देखील बळकट राहू शकतात. मोहरीचे तेल लावल्याने शरीराचे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित चालू राहते. त्याचप्रमाणे मोहरीचे तेल नियमित त्वचेला लावल्यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहण्यास मदत होत असते. मोहरी तेलाचे फायदे सांगावे तितके कमीच आहेत. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही देखील मोहरीचे तेल लावायला हवे, ज्यामुळे तुम्हाला आणि प्रकारचे फायदे होऊ शकतील.

      मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

       धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here