नमस्कार, हल्ली वाढत्या प्रदूषणामुळे व बदलत्या थंड-गरम हवेमुळे नाकातून पाणी येणे, यासारख्या समस्या आपल्याला बघावयास मिळतात. तसेच तिखट, मसालेदार पदार्थांचा ठसका, येऊन नाकातून व डोळ्यातून पाणी येते. ज्यांना सायनसचा त्रास आहे, त्यांच्या नाकातून पाणी येणे, ही एकदम सामान्य बाब आहे, त्याला तुम्ही घाबरून जाऊ नका. नाकातून पाणी हे अनेक कारणांमुळे येते, जसे की तेलकट, तुपकट तिखट मसालेदार पदार्थ, खाल्ल्याने, तसेच सर्दी-पडसे झाल्यावर, नाकातून पाणी येते. बरेचदा पाणीपुरी खाताना ही नाकातून व डोळ्यातून पाणी येते, तरीपण आपण आवडीने खातो. तसेच कोणाला कसली एलर्जी असल्यामुळेही, नाकातून पाणी येण्याच्या समस्या होतात. कोणाला धुळीच्या वातावरणामध्ये जाऊन शिंका येतात. तर नाकातून पाणी येण्यापूर्वीची हि काही लक्षणे आहेत. तर ते आपण जाणून घेऊयात !
Table of Contents
नाकातून पाणी येणे यापूर्वीची काही लक्षणे
नाकातून पाणी येण्याची कारणे आम्ही सांगितली, आता त्याची काही लक्षणे आपण जाणून घेऊयात,
- तुम्हाला शिंका येतात.
- तुमचे नाक चुळचुळ करते.
- तुमचे नाक हे खाजवते.
- तुम्हाला सर्दी होते.
- जर तुमच्या डोळ्यात काही ईजा वगैरे झाली, तर तुमच्या नाकातून पाणी येते.
- तुमचा घसा कोरडा पडतो, आणि खवखवतो.
- तीव्र डोकेदुखी झाल्याने, की नाकातून पाणी येते.
नाकातून पाणी येत असेल त्या वेळी कोणते घरगुती उपचार करावेत
कोणत्या कारणामुळे नाक गळते, तसेच नाक गळण्या पूर्वी ची काही लक्षणे, आम्ही सांगितलेले आहेत. आता आपण कोणते घरगुती उपचार करावेत ते जाणून घेऊयात!
निलगिरीचे तेल वापरून पहा
ज्यावेळी तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन तसेच सर्दी-खोकला सारख्या समस्या होते, अशा वेळी जर तुम्ही निलगिरीच्या तेलाने वास घेतला, तर तुम्हाला नाकातून पाणी येणे, यासारख्या समस्यापासून तुम्ही आराम मिळवू शकतात. कारण निलगिरीच्या तेलात अंतीबॅक्टरियल, ऑंटीसेप्टीक गुणधर्म असतात. त्यामुळे तुम्हाला सर्दी-पडसे तसेच नाक गळणे व नाक कोरडे होणे, यासारख्या समस्यांवर आराम मिळतो.
तुळशीच्या पानांचा वापर करून बघा
हो, तुळशी आयुर्वेदिक वनस्पती आहे. जी आपल्या घरातच आहेत. ज्या वेळी तुम्हाला सर्दी-पडसे, तसेच नाक गळणे सारख्या समस्या होत असतील, अशावेळी जर तुळशीच्या पानांचा रस काढून, हातावर घेऊन वास घेतल्याने, ही तुमच्या नाकातील बॅक्टरियल गुणधर्म कमी होऊन, नाक गळण्याची समस्या कमी होते. असे केल्यास तुम्हाला फरक जाणवेल. तसेच तुम्ही तुळशीची पाने+ काळे मिरे यांचा काढा बनवून, घेऊ शकतात.
लसुन चा वापर करून बघा
आता तुम्ही म्हणाल, की लसूण स्वयंपाक घरातील पदार्थ आहे. तो नाक गळती च्या समस्या वर कसा आराम देईल. तर खरंच लसून मध्ये एंटीफंगल, अंतीबॅक्टरियल, गुणधर्म असतात. ज्यावेळी तुमच्या नाकात खाज येणे, चुळचुळ करणे, तसेच नाक कोरडी पडणे किंवा पाणी गळणे यासारख्या समस्या असतील, अशा वेळी जर तुम्ही लसणाच्या वडी हातावर ठेचून, त्या हातावर चोळून, त्याचा वास घेतल्यास, तुमच्या नाकात शिंका येऊन नाक मोकळे होते. तसेच आता मार्केटमध्ये, मेडिकल्स मध्ये लसणाचे तेल हे मिळते. तुम्ही लसणाच्या तेलाचा वास घेतल्याने, तुमची नाक ताबडतोब मोकळे होऊन, तुम्हाला शिंका येतात, व त्यावर तुम्हाला त्वरीत फरक जाणवतो.
ओवा वापरून बघा
हो, ज्यावेळी तुम्हाला सर्दी होते, डोकेदुखी होते, नाकातुन पाणी येते, अशावेळी जर तुम्ही ओवांचा वापर केल्याने, तुम्हाला फायदा होईल. त्यासाठी तुम्ही, ओवा भाजून एका कापडात गुंडाळून, त्याचा वास घेतल्याने, नाकातून पाणी येण्यासारख्या, समस्यांवर तुम्हाला आराम मिळेल, व तुमची डोकेदुखी असेल तेही थांबेल.
अद्रक चा वापर करून बघा
सर्दी, कफ प्रवृत्ती, डोके दुखणे, नाक गळणे, नाक कोरडे होणे, यासारख्या समस्यांवर पूर्वीच्या काळापासून अद्रक हा वापरला जातो. त्यासाठी तुम्ही अद्रकचा रस त्यात+ मध यांच्या वापर करू शकतात. तसेच तुम्ही अद्रक चा रस पाण्यात किसून, ते पाणी उकळून, त्याची वाफ घेतल्याने, तुमचे नाक गळतीची समस्या ही हळू कमी होण्यास मदत मिळते.
हळद वापरून बघा
हळदीचे गुणधर्म तर सगळ्यांनाच माहिती आहे. हळद ही आरोग्यासाठी फार लाभकारी आहे. हळद मध्ये अंटीबॅक्टरियल, अँटीसेफ्टीक गुणधर्म असतात. तुम्हाला बाहेरचे कोणतेही इन्फेक्शन झाले, तर त्यावेळी हळद ही फार गुणकारी आहेत , ज्यावेळी तुमचे नाक गळते, डोके दुखते, सर्दी होते, घसा दुखतो, अशावेळी जर, तुम्ही हळद दुधात टाकून पिल्याने, तुम्हाला फरक पडेल. तसेच तुम्ही हळद आणि जायफळ एकत्र करून कपाळावर व नाकाच्या आजूबाजूला लावल्यानेही, तुमच्या नाक गळतीच्या व डोकेदुखीची समस्या कमी होतात.
गरम पाण्याची वाफ घ्या
ज्यावेळी तुमचे नाक चुळचुळ करते, कोरडे पडते, तसेच नाकातून पाणी गळते, अशा वेळी तुम्ही गरम पाण्याची वाफ घ्यावी. तुम्हाला यासारख्या समस्यांवर त्वरित आराम मिळेल. गरम पाण्यामध्ये तुम्ही अद्रकाचा रस, किंवा लवंगाचे तेल किंवा लसणाचे तेल ही टाकून, तुम्ही वाफ घेऊ शकतात. आता हल्ली मार्केटमध्ये गरम पाण्यात घेण्यापूर्वीची औषधे मिळतात, तसेच तुम्ही निलगिरीचे तेलही टाकू शकतात. त्याने तुम्ही वाफ घेतल्याने, तुमच्या घशात, नाकात कोणतेही इन्फेक्शन असेल, ते निघण्यास मिळेल. तुम्ही गरम पाण्याची वाफ ही दहा ते पंधरा मिनिटे घ्यायला हवी, तरच तुम्हाला फरक पडेल. असे तुम्ही दिवसातून दोन वेळेस केल्यास, तुमच्या नाकातून गळणे सारख्या समस्या त्वरित कमी होतात. करून बघा, अगदी साधे सोपे उपाय आहेत.
नाकातून पाणी येत असेल, अशा वेळी कोणती काळजी घ्यावी?
- तुम्ही बाहेर जाताना नाकाला नेहमी रुमाल बांधावा.
- धुळीच्या व प्रदूषणयुक्त वातावरणात जाऊ नये.
- नाक पुसायला नेहमी सुती कपडा वापरावा.
- अतितिखट पदार्थ खाऊ नयेत
- नियमित गरम पाण्याची वाफ घ्यावी.
- बाहेरून आल्यावर नाक स्वच्छ पाण्याने धुवावे.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नाकाला स्प्रे मारावा.
- सारखे सारखे नाक पुसू नये, त्यामुळे नाकाला इजा होऊन, रक्त येण्याची समस्या होऊ शकते.
- बाहेर जाताना रुमालावर निलगिरीच्या तेलाचे काही थेंब टाकून, त्याने वास घ्यावे.
चला, तर मग आज आम्ही तुम्हाला नाकातून पाणी येण्याची कारणे? कोणकोणती व त्याची लक्षणे? हे सांगितलेले आहेत. तसेच त्यावर कोण-कोणते घरगुती उपाय करावेत, व कोणती काळजी घ्यावी, ते ही सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेले घरगुती उपाय करूनही, तुम्हाला फरक पडत नसेल, अशा वेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावे. तसेच आम्ही सांगितलेले, घरगुती उपायांमध्ये काही शंका-कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये, जरूर कळवावे.
धन्यवाद