नमस्कार मित्रांनो. सध्या अनेक जण हे शरीराच्या व्याधी जडल्यात, तर आयुर्वेदिक उपचारांकडे अधिक लक्ष घालत असतात. आयुर्वेदिक उपचार घेतल्यामुळे आजारही लवकर बरे होण्यास मदत होऊ शकते. आयुर्वेदिक पद्धतीने उपचार घेतल्यामुळे कमी कालावधीमध्ये अनेक प्रकारचे फायदे शरीराला होऊ शकतात. शिवाय, आजार मुळतः जाण्यास मदत होते. त्यामुळे, बरेच जण आयुर्वेदिक उपचार याकडे वळलेले दिसून येतात. एक प्रकारे आयुर्वेदिक शास्त्र याला पसंती दिली जाते.परंतु पंचकर्म म्हणजे काय हे बरेच लोकांना माहित नसते.
बरेच जण कुठलाही रोग झाला तर आयुर्वेदिक उपचार घेणे पसंत करत असतात. कारण, आयुर्वेदिक उपचार घेतल्यामुळे आजार हा मुळतः जाण्यास मदत होते. शिवाय,तो आजार पुन्हा पुन्हा होत नसतो. म्हणजे एखादा त्रास झाल्यास त्यावर आपण जर आयुर्वेदिक उपचार घेत असतो, तर त्रास पुन्हा पुन्हा होत नाही. म्हणून आजकाल अनेक लोकांचा कल हा आयुर्वेदिक उपचार याकडे जास्त प्रमाणात होत आहे. त्यातीलच, एक आयुर्वेदिक उपचार म्हणजेच पंचकर्म. अनेक जण पंचकर्म हा देखील आयुर्वेदिक उपचार करून घेण्याकडे जास्त लक्ष देत असतात. पंचकर्म म्हणजेच पाच प्रक्रिया करून घेणे.
अनेक वेळा पण बाहेरचे पदार्थ खात असतो, शरीराला योग्य ठरणारे पदार्थांचे देखील सेवन करत असतो तर अशा मुळे आपल्या शरीरामध्ये विषारी पदार्थ जमत असतात. तर आपल्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढून घेण्यासाठी आपण पंचकर्म ही प्रक्रिया करू शकतो. पंचकर्म ही प्रक्रिया केल्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघाल्यामुळे आपले शारीरिक स्वास्थ्य हे चांगले राहू शकते. तर मित्रांनो आज आपण पंचकर्म म्हणजे काय ? व पंचकर्म चिकित्सा करण्याचे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, पंचकर्म म्हणजे नेमके काय ? व पंचकर्म चिकित्सा केल्यामुळे कोणते फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात? या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.
Table of Contents
पंचकर्म म्हणजे काय ?
आज काल आपण घरातील पदार्थ खण्याऐवजी बाहेरचे पदार्थ खाणे जास्त पसंत करत असतो. सतत बाहेरचे पदार्थ खाणे फास्टफूड खाणे या सर्वांमुळे शरीरामध्ये विषारी पदार्थ जमत असतात. आणि ते शरीरात साचल्यामुळे अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यासाठी आपण पंचकर्म ही प्रक्रिया करू शकतो. तर नेमके पंचकर्म प्रक्रिया म्हणजे काय ? याविषयी आपल्याला माहीत असायला हवे. पंचकर्म म्हणजेच पाच प्रक्रिया करून घेणे.
तर त्या पंचकर्म प्रक्रिया म्हणजे वमन, विरेचन, बस्ती,रक्तमोक्षण व नस्य या आहेत. जर या पाच प्रक्रिया तुम्हाला करावयाच्या असतील तर सर्वप्रथम तुम्हाला स्नेहन व स्वेदन या क्रिया कराव्या लागतात. पंचकर्म केल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ हे कमी कालावधीत बाहेर टाकण्यास मदत होत असते. तसेच जास्तीत जास्त प्रमाणात दूषित दोष शरीरातून निघून जाण्यास मदत होते. पंचकर्म करण्यासाठी सर्वात प्रथम शरीराला तयार करायला लागते. आणि त्यासाठी स्वेदन व स्नेहन या क्रिया सर्वप्रथम करावे लागतात. कंड पंचकर्म करण्याआधी स्नेहन व स्वेदन या जर क्रिया केल्या नाहीत तर त्यामुळे शरीराला अपाय होऊ शकतात.
म्हणून स्नेहन व स्वेदन या क्रिया सर्वप्रथम करून घ्याव्या लागतात स्नेहन व स्वेदन या दोन प्रक्रिया केल्यामुळे शरीरातील दूषित दोष अथवा विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास लवकर मदत होते. म्हणजे कर्म यातील पूर्व कर्म हे आपण जाणून घेतलेले आहेत आता पंचकर्मातील पाच प्रक्रिया कोणत्या त्या बद्दल आपण आता जाणून घेऊयात.
वमन :
पंचकर्म या क्रियेला सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला वमन ही प्रक्रिया करावी लागते. वमन प्रक्रियाही कप निघून जाण्यासाठी करण्यात येते. वमन ही क्रिया करण्यासाठी दीड ते दोन तासाचा कालावधी लागत असतो. वमन या प्रक्रियांमध्ये व्यक्तीला औषधी काढे द्यावे लागतात. आणि हे काढे पिल्याने उलट्या होत असतात. उलट्या झाल्यामुळे शरीरातील आमाशय पित्त बाहेर निघत असतात. म्हणजेच, खेळातील कफ हा संपूर्णपणे बाहेर पडत असतो.
उलट्या झाल्यामुळे शरीरातील अग्नी हा मंद गतीने होत असतो. म्हणून अग्नि वाढण्यासाठी त्यावर एक प्रकारे विशिष्ट आहार डॉक्टरांना द्यावा लागत असतो. त्यामुळे अग्नी वाढण्यास मदत होते. जुनी सर्दी, ताप, खोकला, कॅन्सर साखरेचे जास्त प्रमाण, दमा, पीसीओडी, अपचन, अजीर्ण, मासिक काळात अधिक रक्तस्राव होणे, स्तन्य दोष किड्स इत्यादी सारख्या समस्या यामध्ये वमन खूप उपयोगी होत असते. त्याचप्रमाणे वमन ही क्रिया केल्यानंतर वजन हे दोन ते तीन किलोने कमी होत असते.
विरेचन :
पंचकर्मा प्रक्रिया यातील दुसरी प्रक्रिया म्हणजेच विरेचन होय. वमन झाल्यानंतर विरेचन ही प्रक्रिया करावी लागत असते यासाठी विरेचन चे औषध ही व्यक्तीला दिली जातात. त्यामुळे व्यक्तीला पंधरा ते वीस जुलाब होत असतात. आणि जुलाब झाल्यामुळे शरीरातील सर्व दूषित पदार्थ बाहेर येण्यास मदत होत असते. जास्तवेळ जुलाब झाल्यामुळे शरीरातील अग्नी हा मंद पावतो. त्यामुळे अग्नी हा पूर्ववत होण्यासाठी डॉक्टरांना विशेष आहार त्या व्यक्तीसाठी द्यावा लागत असतो. त्यामुळे, त्याच्या शरीरातील अग्नी हा पूर्ववत होण्यास मदत होते. विरेचन हे प्रक्रिया पित्तदोष यासाठी करण्यात येते. विरेचन ही प्रक्रिया केल्यामुळे ताप, पित्त, नाकातून व कानातून रक्त येणे, मुळव्याध, कॅन्सर, हृदयविकार, कावीळ, दमा, उलट्या, मासिक पाळीच्या समस्या इत्यादींसाठी प्रभावी ठरत असते.
रक्तमोक्षण :
ही पंचकर्मातील तिसरी प्रक्रिया होय. विरेचन झाल्यानंतर रक्तमोक्षण ही प्रक्रिया करावी लागते. रक्तमोक्षण म्हणजेच शरीरातील रक्त काही प्रमाणात बाहेर काढले जात असते. ज्यावेळी रक्तामध्ये बिघाड होत असते तर अशावेळी ते रक्त बाहेर काढण्यात येते. अगदी प्राचीन काळात देखील रक्तमोक्षण ही प्रक्रिया केली जात असे. आजच्या काळात रक्तमोक्षण करण्यासाठी काही आधुनिक यंत्रांचा वापर करून रक्तमोक्षण केले जाते. त्यासाठी हाताच्या कोपऱ्यात च्या भागातून रक्त काढले जात असते.
रक्तमोक्षण केल्यामुळे शरीराला अधिक प्रमाणात फायदा होत असतो. आंबट ढेकर, खाज येणे, घाम येणे, चक्कर येणे, डोक्यात चाळी होणे, लघवीतून रक्त बाहेर पडणे इत्यादी समस्यांमध्ये रक्तमोक्षण ही प्रक्रिया करू शकतात. स्वस्थ व्यक्ती स्वस्त राहण्यासाठी रक्तमोक्षण ही प्रक्रिया शरद ऋतूमध्ये करू शकतात.
नस्य :
पंचकर्म क्रिया मधील ही चौथी प्रक्रिया होय. नस्य म्हणजे नाकातून औषध दिले जात असते. आणि नाकातून औषध दिले गेल्यामुळे ते शिर प्रदेशात जात असते. व त्याद्वारे ते कार्य करत असते. नाकातून औषध दिल्या गेल्यामुळे त्याचा उपयोग हा संपूर्ण शरीराला होण्यास मदत होत असते. नस्य या प्रक्रियेचे देखील अनेक प्रकार असतात. जसे की, नावण्यस्य, धूम नस्य, प्रतिमर्शन असे बरेच प्रकार असतात. परंतु, पंचकर्म यामध्ये नस्य हा प्रकार वापरला जात असतो. यासाठी चूर्ण, दूध, औषधी इत्यादींचा नस्य या प्रकारात वापर होत असतो. नस्य या प्रक्रियेसाठी औषधींचा वापर हा कमी प्रमाणात केला तरी त्याचा फायदा संपूर्ण शरीराला होत असतो. दातांचे विकार, मान दुखणे, कान दुखणे, मुखरोग,चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, नाकाचे विकार, सर्दी, पॅरालीसीस, केस गळणे, शुक्र रोग इत्यादी समस्यांसाठी नस्य ही प्रक्रिया करू शकतात. नस्य ही क्रिया केल्यामुळे डोळ्यांतील दृष्टी वाढण्यास मदत होत असते.
बस्ती
पंचकर्म या प्रक्रियेतील पाचवी प्रक्रिया म्हणजेच बस्ती होय. बस्ती या प्रक्रियेला पंचकर्माचा महत्त्वाचा भाग देखील मानला जात असतो. अर्ध चिकित्सा हे नाव आयुर्वेदिक शास्त्रानुसार बस्ती याला दिली जात असते. बस्ती यामध्ये गुद मार्गातून औषधी सोडले जात असतात. बस्तीचे देखील अनेक प्रकार असतात. त्यानुसार शरीरात औषध दिले जात असतात. त्याचप्रमाणे शोधन, स्नेहन,स्वेदन,लेखन, बृहन वगैरे इत्यादी प्रकारचे बस्तीचे असतात. बस्ती याचे कार्य हे पक्वाशय यावर होत असते. त्यामुळे वातदोष सुधारण्यास मदत होते. शरीरातील तिन्ही दोषांमध्ये वात दोष हा सर्वात बलवान असतो. त्यामुळे बस्ती ही क्रिया करून वातदोष यावर विजय मिळवला त्या सर्वांवर विजय मिळवण्या समान असते. शरीरातील चे आजार हे खूपच जीवघेणे आहेत, जे आजार गंभीर आहेत, जुने आजार आणि अशा आजारात की ज्या आजारामुळे शिराला खूपच प्रकारे अपाय झालेले आहेत. तर अशा आजारांसाठी बस्ती ही प्रक्रिया केली जात असते. बस्ती ही प्रक्रिया केल्यामुळे शरीरातील सर्व प्रकारचे वातरोग संधिवात, स्थौल्य, मुत्र व मलाचा अवरोध, ताप, मुतखडा,पॅरालीसीस, मासिक पाळीच्या समस्या, हृदयरोग, अपचन इत्यादी प्रकारच्या समस्या साठी प्रभावी ठरत असते.
तर मित्रांनो, पंचकर्म म्हणजे काय याविषयी आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतली आहे. पंचकर्म हा आयुर्वेदातील महत्त्वाचा भाग मानला जात असतो. कित्येक बाहेरील देशातील फॉरेनर सुद्धा त्यांचा वेळ व पैसा खर्च करून पंचकर्म करण्यासाठी आपल्या भारतात येत असतात. अर्थातच पंचकर्म केल्यामुळे आपल्या शहराला अनेक प्रकारचे फायदे देखील होत असतात. त्या मित्रांना पंचकर्म चिकित्सा केल्यामुळे आपल्या शहराला कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात या बद्दल, आता आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.
पंचकर्म चिकित्सा करण्याचे फायदे:-
अनेक जणांचा कल हा आयुर्वेदिक उपचार याकडे जास्त असतो. आयुर्वेदिक उपचार घेतल्यामुळे शरीरातील आजार हा पूर्णपणे बरा होण्यास मदत होत असते. अगदी शरीरातील जुनी आजार देखील निघून जाण्यास मदत होत असते शिवाय ते आजार पुन्हा येत नसतात. त्याचप्रमाणे अनेक जण हे पंचकर्म चिकित्सा याकडे देखील वळलेले दिसून येतात. पंचकर्म चिकित्सा केल्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होत असतात. पंचकर्म ही प्रक्रिया पाच टप्प्यातून पार पाडली जात असते. हे आपण वरीलप्रमाणे जाणून घेतलेले आहेत. पंचकर्म चिकित्सा केल्यामुळे कोणते कोणत्या प्रकारचे फायदा आपल्या शहराला होऊ शकतात या त्याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.
- पंचकर्म चिकित्सा केल्यामुळे आपल्या शरीराचे अनेक रोग हे समूळ जाण्यास मदत होत असते. म्हणजेच शरीराची रोग हे मूळतः निघून जात असतात. आणि पुन्हा ते रोग होत नाहीत.
- आपल्या शरीराची त्वचा हे टवटवीत देखील दिसू लागण्यास मदत होत असते.
- पंचकर्म चिकित्सा केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील नाहीशा होतात शिवाय लवकर देखील पडत नाहीत.
- पंचकर्म प्रक्रिया केल्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य हे बाहेर टाकले जात असतात. शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडल्यामुळे आपल्या शरीराचे स्वास्थ्य हे चांगले राहू शकते.
- शरीराचे आजार हे कमी कालावधीत लवकर बरे होत असतात.
- पंचकर्म चिकित्सा केल्यामुळे त्वचा मऊ मुलायम व उजळण्यास मदत होत असते.
- पंचकर्म चिकित्सा केल्यामुळे शरीरात हलकेपणा येण्यास मदत होत असते तसेच शरीरातील उत्साह देखील वाढू लागतो.
- त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील नसा यादेखील मोकळे होत असतात. आपल्या शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
- आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही चांगल्या रीतीने वाढू लागते.
- पंचकर्म चिकित्सा केल्यामुळे आपल्या शरीरातील बदल होतातच शिवाय आपल्या मानसिक स्वास्थ्य यामध्ये देखील बदल होतात म्हणजेच सकारात्मक विचार हे आपल्या डोक्यात येतात. त्याचप्रमाणे आपण मानसिक ताण तणाव यापासून देखील दूर राहू शकतो.
- पंचकर्म चिकित्सा केल्यामुळे म्हातारपण देखील लवकर येत नाही. म्हणजेच, अधिक काळ चिरतरुण दिसण्यासाठी मदत होत असते.
तर मित्रांनो, पंचकर्म चिकित्सा केल्यामुळे एक ना अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होत असतात. पंचकर्म चिकित्सा म्हणजे नेमके काय? हे आपण वरीलप्रमाणे जाणून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे, पंचकर्म चिकित्सा केल्यामुळे कोणकोणत्या प्रकारचे फायदे आपल्याला होत असतात? याबद्दल देखील आपण जाणून घेतले आहेत. मित्रांनो तुम्हीदेखील एकदा तरी पंचकर्म चिकित्सा करून बघायला हवे यामुळे अनेक प्रकारचे फायदे तुम्हाला होऊ शकतात शिवाय तुम्ही अधिक काळ चिरतरुण दिसून लागाल. म्हणजेच तुम्हाला वार्धक्य लवकर येणार नाही. आणि अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहाल. नक्कीच तुम्हीदेखील आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा ही डॉक्टरांच्या मदतीने करून द्यायला हवी.
मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितले माहिती तुम्हाला कसे वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळू शकतात.
धन्यवाद !