सूर्यप्रकाशामुळे कोणते जीवनसत्व मिळते ?

0
763
सूर्यप्रकाशामुळे कोणते जीवनसत्व मिळते
सूर्यप्रकाशामुळे कोणते जीवनसत्व मिळते

नमस्कार, मित्रांनो आज आपण सूर्यप्रकाशामुळे कोणते जीवनसत्व मिळते याबद्दलची माहिती जाणून घेऊया. आपल्या शरीरावर उपचार करणारे गोष्टी आपल्या आजूबाजूलाच असतात. निसर्गामध्ये आपल्या शरीरावर फायदे करणारे गुणधर्मही असतात, तसेच नुकसान करणारेही गुणधर्म असतात. आपल्या आजूबाजूची रचना ही आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर असते. तसेच आपल्या शरीराला लागणारे आवश्यक घटक द्रव्य हे, ऊन, पाऊस, वारा, अन्नपदार्थ, पाणी, आणि वस्त्र व निवारा या सगळ्या गोष्टी गरजेचे असतात. त्यामध्ये एखादी गोष्ट जरी कमी झाली, तरी आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. तसेच आपण सूर्यप्रकाश याविषयी जाणून घेणार आहोत.

सूर्यप्रकाश हा आपल्या शरीरासाठी फार गुणकारी असतो. तसेच तुम्ही बघितलं असेलच, लहान बाळाचा जन्म झाल्याबरोबर, डॉक्टर त्याला रोज सकाळी कोवळ्या उन्हात घेऊन बसायला सांगतात. काय कारण असेल बरं! मित्रांनो तर सूर्यप्रकाशामध्ये विटामिन ड जीवनसत्व असते. त्यामुळे लहान बाळाला कावीळ सारख्या त्रासाला सामोरे जावे लागत नाही

सूर्यप्रकाशातील कोमट घेऊन हे आपल्यासाठी फायदेशीर असते. सकाळचे कोवळे ऊन म्हणजे नऊ वाजेच्या आतील ऊन होय. नऊ नंतर सूर्याची अतिनील किरणे आपल्याला त्रास देतात. त्यामुळे आपल्याला चटके व उन लागण्याची संभावना असते. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये विटामिन ड जीवनसत्व आपल्याला मिळते, म्हणून काहीजण सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये फिरायला जातात. तर काही जण कोवळ्या गवतान वर झोपून सकाळच्या कोवळ्या उन्हाचा आस्वाद घेतात. त्याला एक प्रकारे बाथस्नान असेही म्हणतात. 

तर मित्रांनो जाणून घेऊयात, की सकाळचे ऊन आपल्या शरीरासाठी कशा प्रकारे फायदेशीर ठरू शकते? 

सकाळच्या कोवळ्या उन्हाचे फायदे ? 

मित्रांनाे, सकाळचे कोवळे ऊन आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर असते. पण अनेकांना माहिती नसते, चला तर मग जाणून घेऊयात. 

वाचा   कानाचे ऑपरेशन नंतर घ्यावयाची काळजी

कोवळ्या उन्हात किती वेळ बसावे ? व कोणते विटामिन मिळते ? 

मित्रांनो, सकाळच्या सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे होत असततात. त्यासाठी सकाळचे कोवळे ऊन म्हणजे, तुम्हाला नऊ वाजेच्या आतील ऊन होय. नऊ नंतर तुम्हाला ते  घातक ठरू शकते.  म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो, तो त्रास म्हणजे ऊन लागणे किंवा चटके हे लागू शकतात. तसेच सकाळच्या कोवळ्या उन्हात तुम्हाला जीवनसत्व ड हे विटामिन मिळते. ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. 

शरीरातील हाडांच्या मजबुती होते :

मित्रांनो, आपल्या शरीरातील हाडांच्या मजबुतीसाठी विटॅमिन हे फायदेशीर ठरते. ज्या लोकांची हाडे, गुडघे दुखत असेल, अशा लोकांनी सकाळचे कोवळे ऊन त्यांच्या अंगावर घ्यायला हवे. त्यामुळे त्यांच्या शरीरात विटामिन ड ची पूर्तता होते. हाडांना मजबुती येते. 

कॅन्सर सारख्या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकतात :

सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढणे, तसेच तुमच्या शरीरातील कॅन्सरच्या पेशींवर सकाळची कोवळ ऊन हे प्रतिबंध करु शकते. सकाळचे कोवळे ऊन हे आपल्या शरीरात एक प्रकारची ऊर्जा व उत्साह निर्माण करतो. त्यामुळे तुमच्या शरीरातील कॅन्सरचा धोका टळतो. 

शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होतो :

मित्रांनो आपल्या शरीराला एक प्रकारची ऊब ची गरज असते, थंडीच्या दिवसांमध्ये जर तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसले, तर तुमच्या शरीराला उबदारपणा मिळतो. थंडीच्या दिवसांमध्ये रक्त प्रवाहामध्ये सुरळीतपणा येण्यासाठी, उष्णतेची गरज असते. अशावेळी तुम्ही कोवळ्या उन्हात बसल्यामुळे, ती उष्णता तुम्हाला मिळते. त्यामुळे तुमच्या नसा या मोकळ्या होतात व रक्तप्रवाह सुरळीत चालतो. 

डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते :

आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अनेक पोषक तत्वे, तसेच व्हिटॅमिन्सची गरज असते. अशा वेळी तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हात बसले, तर तुम्हाला डोळ्यांचे आरोग्य ही जपता येते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिनची ड ची पूर्तता फायद्याचे असते. 

वयस्कर लोकांसाठी फायदेशीर ठरते :

मित्रांनो, जसे जसे वय वाढत जाते, तसे तसे आपल्याला शारीरिक तक्रारी खूप प्रमाणात जाणवतात. तसेच जे लोक वयस्कर असतात. त्यांचे गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, तसेच शरीरातील जॉइंट्स पार्ट्स दुखी, तसेच पाठदुखी या सारख्या भरपूर प्रमाणात बघावयास मिळतात. वयस्कर लोकांनी जर सकाळचे कोवळे ऊन त्यांच्या अंगावर घेतले, तर त्यांना यासारख्या समस्येवर आराम मिळतो. कारण की सकाळची कोवळी उन त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये त्यांच्या अंगाला एक प्रकारचा शेक मिळतो, आणि तो शेक त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतो व त्यांना आराम मिळतो. 

वाचा  तोंड कडू होणे या समस्येची कारणे व उपाय

त्वचा संबंधित तक्रारी दूर होतात :

सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरासाठी फायदे असतातच. तसेच सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये तुम्हाला विटामिन डी जीवनसत्त्व मिळतो. सकाळची कोवळी उन आपल्या शरीरासाठी व आपल्या त्वचेवर फायदेशीर ठरते. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसल्याने, तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. तसेच रक्त शुद्ध होते. त्यामुळे तुम्हाला त्वचेसंबंधित तक्रारी या होतात. तसेच सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये तुम्हाला उत्साह आणि ऊर्जा मिळते. तसेच सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये ऑक्सिजनची पातळी सुरळीत राहते. त्यामुळे तुमची त्वचा चमकदार व तेजस्वी राहण्यास मदत मिळेल. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये कोणते जीवनसत्व मिळते, व त्या जीवनसत्वामुळे तुम्हाला कोण कोणत्या प्रकारचे फायदे होतात, हे सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेला लेख हा तुम्हाला आवडला असेल, व आम्ही सांगितलेल्या लेखामध्ये तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर मित्रांनो, तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here