तोंड कोरडे पडणे ? यावर काही घरगुती उपाय

0
1940
तोंड कोरडे पडणे
तोंड कोरडे पडणे

नमस्कार, आजच्या या धावपळीच्या युगात आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही, आपण आपला आहार सुद्धा व्यवस्थित घेत नाही, त्यामुळे आपल्याला अनेक समस्या होऊ शकतात. तसेच बाहेरील जंक फूड्स, तेलकट, तुपकट, उघड्यावरचे पदार्थ, खाल्ल्याने ही त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे आपल्याला ताप येणे, सर्दी होणे, खोकला येणे, अपचन होणे, ऍसिडिटी होणे, तसेच महत्त्वाचे म्हणजेच तोंडाची चव जाऊन तोंड कोरडे पडणे. यासारख्या समस्या होऊ शकतात. बऱ्याच जणांना तोंड कोरडे पडण्याची समस्या जास्तीत जास्त प्रमाणात जाणवते. तर मग तोंड कोरडे पडण्याची नेमकी कारणे कोणती आहेत ? ते अगोदर जाणून घेऊयात ! 

तोंड कोरडे पडणे याची कारणे :

आजच्या धावपळीच्या युगात आपण स्वतःकडे लक्ष देत नाही या अभावामुळे आपले  तोंड कोरडे पडण्याच्या समस्या देखील होऊ शकतात. तसेच तोंड कोरडे पडणे, याला शास्त्रीय व वैद्यकीय भाषेत झिरोस्टोमिया असेही म्हणतात. तर मग नेमकी तोंड कोरडे पडण्याची कारणे कोण कोणती आहे ? चला तर मग जाणून घेऊयात ! 

  • सर्दी-खोकला झाल्यानंतर, तोंडाची चव जाऊन तोंड कोरडे पडू शकते. 
  • शरीरात पाण्याची कमतरता आल्यामुळे, तोंड कोरडे पडण्याची समस्या होऊ शकते. 
  • अवेळी खानपान मुळे, आम्लपित्त होऊन मळमळणे, तोंड कोरडे पडणे सारख्या समस्या होऊ शकतात. ज्या वेळी तोंड कोरडे पडते, त्यावेळी तोंडाची चवही जाते. 
  • पुरेशी झोप न झाल्यामुळे, जागरण केल्यामुळे, ही तोंड कोरडे पडण्याची समस्या होऊ शकते. 
  • जास्त काळ मोबाईलवर बोलल्यामुळे, तसेच कॉल सेंटरला काम करणाऱ्यांचे फोनवर जास्त बोलण्यामुळे, त्यानाही तोंड कोरडे पडण्याची समस्या होऊ शकतात. 
  • उन्हाळ्यात अतिशय कडक ऊन पडल्यामुळे तोंड कोरडे पडण्याच्या समस्या या भरपूर जणांना होतात. त्यासाठी आपण स्वतःची उन्हाळ्यात काळजी घेतली पाहिजे. 
  • जास्तीत जास्त तेलकट तुपकट, मसालेदार पदार्थ, खाल्ल्याने ही तोंड कोरडे पडू शकते. 
  • अमली पदार्थांचे, जसे की तंबाखू, सिगरेट, दारू, यासारखे व्यसन असलेल्यांना तोंड  कोरडे पडण्याच्या समस्या भरपूर बघावयास मिळतात. 
  • ज्यांना डायबिटीस, तसेच त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने किंवा दीर्घ आजाराने त्यांना तोंड कोरडे पडण्याच्या यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. 
  • जास्तीत जास्त औषधांचे प्रमाण घेतल्यामुळे, ही तोंड कोरडे पडण्याची समस्या होतातच. 
वाचा  गर्भधारणेदरम्यान रक्तस्त्राव होणे या समस्येची विविध कारणे व घरगुती उपचार

तोंड कोरडे पडले हे कसे ओळखावे ? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला तोंड कोरडे पडणे, याची काही कारणे सांगितलेली आहेत, तर मग आपले तोंड कोरडे पडते हे कसे ओळखावे चला तर मग जाणून घेऊयात? 

  • ज्यावेळी तुमची तोंडाची चव जाते, तुम्हाला कोणताही पदार्थ रुचकर लागत नाही. 
  •  तुमचे ओठ कोरडे पडतात, ओठांना तडा जातो, ओठांमधून रक्त येते. 
  • सारखी सारखी तहान लागणे. 
  • ताप आल्यामुळे तोंडात सारखे थुंकी येणे. 
  • तोंडात फोड होणे. 
  • गिळायला त्रास होणे. 
  • घसा दुखणे. 
  • बोलताना त्रास होणे. 
  • तोंडात लाळ चे प्रमाण कमी होणे. 

तोंड कोरडे पडल्यावर त्यावर काही उपाय :

वरील दिलेल्या माहितीमध्ये आपण तोंड कोरडे पडणे, यावर काही कारणे आम्ही सांगितलेली आहेतच. तसेच तुमचे तोंड कोरडे पडत असेल, तर हे कसे ओळखावे, तेही सांगितलेले आहेतच. तर मग आता तोंड कोरडे पडल्यावर कोणकोणते घरगुती उपचार आपण करू शकतो ? ते बघूयात ! 

पुरेसे पाणी प्यावे :

आपले शरीर हे पाण्याने व्यापलेले आहे, आपल्या शरीरात 55 ते 65 टक्के पाणी असते. जर त्याची कमतरता आली, तर तुम्हाला डीहायड्रेशन सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते, अशा वेळी आपल्याला शरीरात रक्ताची कमी, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे, तसेच तोंड कोरडे पडणे, यासारख्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. त्यासाठी तुम्ही दिवसातून किमान चार ते पाच लिटर पाणी प्यायला हवेत. माणूस एकदा अन्न विना चार ते पाच दिवस जगू शकतो, पण पाण्याविना जगू शकत नाही. फक्त पाणी पिताना तुम्हाला ते घोट घोट प्यावे लागेल. पाणी हे आपल्या शरीरासाठी जरुरी आहे. 

लिंबू पाणी पिऊन बघा :

लिंबू मध्ये विटामिन सी असते. त्यामुळे ते आपल्या आरोग्यावरही फार फायदेशीर ठरते. तसेच लिंबू ची चव आंबट असते. ज्यावेळी तुमची तोंड कोरडे पडते, तोंडाची चव जाते, त्यावेळी लिंबू हा तुमच्या तोंडाला चव देण्याचे काम करतो. त्यासाठी तुम्ही लिंबू पाणी+  मीठ+ साखर यांचे मिश्रण करून ते पाणी प्यावे. तुम्हाला त्वरित फरक जाणवेल. तसेच तुमच्या तोंडाची चव गेली असेल, त्यावेळी तुम्ही निंबु त्यावर मीठ टाकूनही, त्याचे चाटण करायला हवे, त्यामुळे तुमच्या तोंडाला चव येईल. 

वाचा  मासिक पाळी किती वर्षानंतर जाते

बडीशोप खाऊन बघा :

बऱ्याच जणांना तोंड येण्याच्या समस्या होतात. तसेच ज्या लोकांना अमली पदार्थ तंबाखू, सिगरेट, दारू, यासारखे व्यसन असते, अशा लोकांना तोंड कोरडे पडणेच्या समस्या भरपूर बघावयास मिळतात. अश्यावेळी जर तुम्ही सतत बडिशोप चा वापर तुमच्या आहारात केला, तर तुम्हाला यासारख्या समस्यांवर आराम मिळू शकतो. तसेच ज्यावेळी तुम्हाला तोंडाला चव लागत नाही, अशा वेळी जर तुम्ही बडीशोप खाल्ली, तर तुम्हाला तोंडाला चव येऊन तोंड कोरडे पडणे, या समस्यांवर तुम्हाला आराम मिळेल. 

भरपूर फळे खा :

आजकालच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या स्वतःकडे व आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत, त्याच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला अनेक आजारांना, समस्यांना तोंड द्यावे लागतात. अशावेळी जर तुम्ही तुमच्या आहारात योग्यरित्या फळे खाल्ली, तर तुम्हाला अनेक आजारांपासून सुटका मिळू शकते. जसे की तोंड कोरडे पडणे, ताप येणे, अशक्तपणा येणे, शरीरात विटामिन्स ची कमतरता होणे, मग अशावेळी जर तुम्ही तुमच्या आहारात योग्यरीत्या फळ खाल्ली, तर तुम्हाला अशा समस्यांवर आराम मिळेल. कारण फळांमध्ये विटामिन्स, कार्बोदके, प्रोटिन्स, प्रथिने, असे पौष्टिक गुणधर्म भरलेले असतात. तसेच शहाळ्याचे पाणी हे तुम्ही पिऊ शकतात. ज्या वेळी तुमचे तोंड येणे, तोंड कोरडे पडणे, तोंडाला चव जाणे, अशा समस्या असतील, अशा वेळी तुम्ही टरबूज, मोसंबी, संत्री, काकडी, द्राक्ष, यासारख्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण असते, तसेच शहाळ्याचे पाणी, उन्हाळ्यात उसाचा रस, यांचे सेवन करू शकतात. 

विटामिन-सी युक्त फळे खाल्ली, तर तुमच्या या समस्यांवर तुम्हाला त्वरित आराम मिळेल. अगदी साधा सोपा उपाय आहे, करून बघायला हरकत नाही. 

तुळशी ची पाने खा :

हो, ज्या लोकांचे तोंड कोरडे पडते, तोंडाला चव लागत नाही, अशा लोकांनी तुळशीची पाने खायला हवीत, कारण तुळशीच्या पानांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती व लिनोलीक ऍसिड असते, जे त्वचेसंबंधित आजारांवरही फायद्याचे ठरते, तसेच सर्दी-पडसे, खोकला, ताप यानंतर तोंडाची चव जाते, त्यावेळी तुळशीचे पाने ही तुम्ही तोंडात घेऊन चघळत राहावेत. त्यामुळे तुमची लाळेचे प्रमाण वाढते, आणि लाळ तयार होण्यास क्रियाशील होते, म्हणून कुठल्याही पचन संस्थेची निगडित औषधांमध्ये तुळशीची पानांचा वापर हा केला जातो. म्हणतात ना तुळशीची पाने ख आणि निरोगी रहा ! 

वाचा  पाय मुरगळणे या समस्येवर वेगवेगळी घरगुती उपाय

वेलदोडा चा वापर करून बघा :

हो, खरच तोंड कोरडे पडत असेल, तोंडाची चव जात असेल, अशावेळी तुम्ही वेलदोडा खाऊन बघा. आता तुम्ही म्हणाल, हा मसाल्याचा पदार्थ आहे. खरंच वेलदोडा खाल्ल्याने तुमच्या तोंडाला चव येते, व तो तोंड कोरडे होण्यापासून वाचवतो. कारण वेलदोड्याचा वापर हा मुखवास-सुवास तोंडाला चव येण्यासाठी वापरला जातो. तसेच वेलदोडा हा दुधामध्ये ही वापरला जातो, त्याने दुधात एक प्रकारची चव येते, तर तुमच्या तोंडाला चव नसेल, तर अशावेळी तुम्ही वेलदोड्याचा तुकडा घेऊन तोंडात चघळत रहावे. त्याने तुमच्या तोंडात लाळ ग्रंथी ही उत्तेजित होतील, व तोंड कोरडे होण्यापासून वाचेल. तसेच वेलदोडा मध्ये विटामिन सी, जीवनसत्व बी, लोह यांचे प्रमाण असल्यामुळे, तुमचा घसा कोरडा होण्यापासून हे वाचतो. 

चला, तर मग वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुमच्या तोंड कोरडे होण्याच्या समस्यांवर काय खावे? काय प्यावे? कोणती काळजी घ्यावी? हे सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या घरगुती उपचार करूनही, तुम्हाला फरक जाणवत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवावे. 

धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here