वास्तुशास्त्रानुसार घर कसे बनवावे

0
1313
वास्तुशास्त्रानुसार घर कसे बनवावे
वास्तुशास्त्रानुसार घर कसे बनवावे

घर,वास्तु,कार्यालय या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. आपण आपल्या आयुष्याची सर्व जमापुंजी हे बांधण्यात खर्च करत असतो. घर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे. कारण घरात आपण अनेक माणसांना जोडून राहत असतो.घराला घरपण यावे म्हणून अनेक आपण प्रयत्न करत असतो.घरात सगळे सुखी रहावे म्हणून देखील आपण प्रयत्न करत असतो. परंतु, कुठेतरी काहीतरी चुकत असते.अनेक प्रयत्न करून देखील घरात भांडणे,कटकटी या होत असतात. घर बांधल्यानंतर देखील अनेक अडचणी आपल्या आयुष्यात येत असतात.या सगळ्यांची कारणे नेमकी कोणती? या सगळ्या गोष्टी कशामुळे होत असतील? या विचारात आपण पडतो. आपले घर बांधण्यापूर्वी आपण वास्तुशास्त्राचा विचार करायला हवा होता का? घर बांधताना वास्तुशास्त्राचे नियम पाळले पाहिजे होते का? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात गोंधळ करत असतात. घर बांधण्यापूर्वी तसेच जागा निवडण्यापूर्वी आपल्याला प्रत्येक गोष्टींचा विचार करूनच पुढचे पाऊल उचलले पाहिजे. घर बांधताना वास्तुशास्त्राचा उपयोग केला पाहिजे का? तसेच घर बांधण्यासाठी आपण वास्तुशास्त्रानुसार  का बांधले पाहिजे? याची देखील माहिती आपणास जाणून घ्यायला पाहिजे. चला तर मग वास्तुशास्त्रानुसार घर कसे बनवावे या विषय आपण सखोल माहिती जाणून घेऊया.

 

प्लॉट निवड

स्वप्नातील घर बनवणे ही प्रत्येकाची आकांशा असते. प्रत्येक जनांस असे घर बांधण्याची इच्छा असते.जिथे ते आपल्या आठवणींना उजाळा देऊ शकतील. घर ही अशी जागा आहे की ज्या ठिकाणी राहून आपल्या मनात आपण स्वप्ने बघत असतो. अनेक गोष्टी ठरवत असतो. परंतु, या गोष्टी साकारताना, जेव्हा हे स्वप्न आपण साकारताना अनेक अडचणी निर्माण होत असतात तेव्हा आपले घर बांधताना काही चुकले तर नाही ना? हा प्रश्न देखील मनात उत्पन्न होत असतो.     घर बांधण्यापूर्वी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्लॉट निवड v घराचा मुख्य दरवाजायोग्य ठिकाणी असली पाहिजे. प्लॉट निवड करताना उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला एखादा वृक्ष तर नाही ना हे देखील बघून घेतले पाहिजे. आणि दक्षिणेकडे देखील खड्डा किंवा कोणतीही विहीर नाही नाही हे देखील खात्रीशीर बघून घ्यावे. वास्तु आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींशी निगडित असते.  त्यामुळे जागा निवडण्या आधी सगळ्या गोष्टींची खात्री करून घ्यावी. वाकडेतिकडे व प्लॉटच्या मध्यभागी प्लॉट बसका असल्यास अनेक क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनियमित आकारावर बांधकाम केल्यास आर्थिक हानी व मतभेद होण्याची शक्यता असते. समृद्धी, यश, चैतन्य,शांती यांचा प्रत्यक्ष संबंध वास्तूशी जोडला जात असतो त्यामुळे, वस्तूची निवड करताना व घराचे बांधकाम करताना योग्य ते नियोजन वास्तुशास्त्रा अनुसार केले पाहिजे. वास्तुशास्त्र म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. आपण जर घरच बांधणार आहोत तर वास्तुशास्त्राचे नियम पाळून घर बांधण्यास काही हरकत आहे ना.

वाचा  घराची अंतर्गत व बाह्य स्वच्छता कशी ठेवावी ?

वास्तुशास्त्रानुसार घर कसे बनवावे?

माती,पाणी,उजेड,वारा, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय तत्व या सर्व नैसर्गिक तत्त्वांचा अभ्यास करून त्यांचा योग्य तो मिलाफ करून वास्तूची रचना करणे म्हणजेच वास्तुशास्त्र होय.

पूर्व दिशेकडे  तोंडवळा असणारे घर शुभ मानले जाते. आदर्श घराचा मुख्य दरवाजा हा पूर्व दिशेस किंवा उत्तर  दिशेस असावा. दुसरीकडे तुमच्या घराचा उतारा हा पूर्व किंवा उत्तर दिशेला शुभ मानला जातो. घराचा संपूर्ण रूप हे  घराच्या ठेवणे वर असतं. त्यामुळे घरामध्ये काय काय ठेवायचे आहे कसे- कसे ठेवायचे आहे म्हणून घर बांधण्यापूर्वी या सर्व गोष्टींचा विचार करूनच घर बांधले पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार घर कसे बांधावे याची माहिती आपण जाणून घेऊया.

  • घराचा मुख्य दरवाजा पूर्व – ईशान्य, उत्तर – ईशान्य, पश्चिम – वायव्य किंवा दक्षिण आग्नेय याठिकाणी बसावा.
  • बोरवेल पूर्व – ईशान्य किंवा उत्तर – ईशान्य याठिकाणी असावी.
  • घर बांधताना शक्यतो पूजेची खोली स्वतंत्र काढावी.
  • पूजेच्या घरात स्वतंत्र खोली काढली तर ती वास्तूच्या पूर्व किंवा उत्तर  दिशेला काढावी.
  • वास्तूचे ब्रम्ह तत्व या ठिकाणी कोणतेही बांधकाम करू नये पण हे जागा ओपन टू स्काय अजिबात सोडू नये.
  • घर बांधताना स्वयंपाक गृह हवेशीर काढावे.
  • स्वयंपाक गृह हे वास्तूच्या अग्नी दिशेला काढावे.
  • वाहनतळ आणि पोर्च मुख्य वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात काढावे.
  • कार पार्किंग काढताना घराच्या वाया विशेष काढावी आणि जर अग्नेय दिशेला कार पार्किंग दिशा काढली तरी चालेल.
  • बाल्कनी किंवा व्हरांडा हे मुख्य वास्तूच्या पूर्व – ईशान्य किंवा उत्तर – ईशान्य भागातच असावे.
  • अडगळीची खोली ही मुख्य वास्तूच्या भोवतालच्या कंपाऊंडच्या निवृत्त कोपऱ्यामध्ये बांधली पाहिजे.
  • घरातील कुटुंब प्रमुखाचे शयन कक्ष हे मुख्य वास्तूच्या नेऋत्य दिशेला असावे.
  • घरातील मुलांचे शयन कक्ष हे मुख्य वास्तूच्या वायव्य कोपऱ्यात असावे.
  • पश्चिमेच्या मध्यम भागात किंवा दक्षिणेच्या मध्यभागी अथवा वायव्य दिशेस घरातले शौचालय पाहिजे.
  • घरातील जीना हा दक्षिण भागात अथवा पश्चिमेस नैऋत्य कोपर्‍यापर्यंत चढत जाणारा असेल तर फारच उत्तम.
  • घराचे बैठक खोली ही ईशान्य दिशेला म्हणजेच पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला काढली तरी देखील चालते.
  • बेडरूम,किचन,हॉल आणि देवघर हे सगळे वास्तुशास्त्रानुसार बांधले तर फारच उत्तम करू शकते.
  • घराभोवतालच्या परिसर हा स्वच्छ व नीटनेटका असावा.
वाचा  घरात रूम फ्रेशनर मारण्याचे फायदे

वास्तुशास्त्रानुसार घर बांधले तर, घरही सुंदर होते व अशा घरात शांतता देखील लाभते. वास्तुशास्त्रानुसार घर बांधले तर घरही चांगले दिसते आणि अनेकअडचणी देखील कमी होऊ शकतात. तसेच घरात तुटलेली भांडी ठेवू नका. घरात काचेच्या तुटलेल्या वस्तू ठेवू नयेत, त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार घर 100% असणे हे कल्पना आहे. हे आपल्याकडून कधीच शक्य होऊ शकत नाही. वास्तु मध्ये काही ना काही दोष तर हे राहणारच परंतु, वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याने घरातील वास्तुदोष हे नक्कीच कमी होऊ शकतात. म्हणून वास्तुशास्त्रानुसार घराची रचना करावी त्यामुळे, घरात सुख – शांती राहण्यासाठी मदत होते.

घर बांधल्यावर घरामध्ये मोजक्‍याच वस्तूंचा समावेश करावा. घरामध्ये फोटो ठेवताना देखील कुठले फोटो ठेवायचे हा विचार करावा. महाभारताचे  युद्धाचे चित्र,ताजमहल,नटराजाची मूर्ती, बुडणारे जहाज,जंगलातील जनावरांचे फोटो,फवारा असे चित्र असणारे फोटो घरात ठेवू नका.याने वास्तुदोष निर्माण होत असतो.

वास्तुशास्त्रानुसार घराचे रंग

वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्यावर घराच्या भिंतींना कलर देखील विचार करून लावावा. ज्याप्रमाणे आपण खाल्लेल्या अन्नाचा परिणाम हा आपल्या मनावर होतो त्याचप्रमाणे घराचे रंग हे आपल्या मनावर परिणाम करत असतात. म्हणून घरात रंग काम करत असतांना वास्तुशास्त्राच्या नियम पाळून रंग काम केले तर फारच उत्तम ठरू शकते. रंग हे ऊर्जेचे प्रसारक असतात. वास्तुशास्त्रानुसार रंग तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेवर प्रभाव पाडतात. रंग व्यक्तीला सुखी ठेवतो व स्वास्थ्य प्रदान करत असतो. तर मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घराचे रंग कसे असावे त्याची माहिती देखील आपल्याला जाणून घेणे महत्वाचे आहे चला तर मग, घर बांधताना वास्तुशास्त्रानुसार रंग घराला कसे द्यावे याची माहिती जाणून घेऊया.

  • स्वयंपाक घरातील रंग असा असावा की जो आपल्या मनाला प्रसन्न ठेवेल. म्हणून वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घराला नारंगी किंवा लाल रंग असणे तुम्हाला लाभदायक ठरू शकते. ज्यामुळे तुमचे मन कायम आनंदी राहू शकते.
  • घरातील मास्टर बेडरूमला निळ्या कलर चा रंग दिल्यास उत्तम ठरू शकते.
  • वास्तुशास्त्रानुसार गेस्ट रूमला नेहमी पांढरा कलर द्यावा. हा रंग पावित्र्य,विद्या आणि शांततेचा प्रतीक मानला जातो. असे म्हटले जाते की या रंगाचा प्रभाव व्यक्तीवर पडताच माणसाचे चित्त शांत होऊन जाते. आणि विचार करण्याच्या क्षमतेचा देखील विकास होतो.
  • वास्तुशास्त्रानुसार बाथरूम च्या भिंतीचा कलर हा पांढरा असावा. ज्यामुळे तिथे नेहमी सकारात्मक उर्जेचा संचार राहील. तसेच बाथरूममधील लादी याचा कलर देखील पांढरा असल्यास उत्तम करू शकते.
  • घरातील हॉलचा कलर हा नेहमी पिवळ्या कलरचा असावा. पिवळा रंग हे आनंदाचे प्रतीक मानले जाते. तसेच पूजा करताना विशेष करून ठेव या रंगाचा वापर केला जात असतो.
वाचा  वास्तुशास्त्रानुसार घराचे दरवाजे कसे असावेत

वास्तुशास्त्राचे नियम पाहून जर तुम्ही घराचे बांधकाम केले तर तुमच्यासाठी ते फायद्याचे ठरू शकते. आणि वास्तुशास्त्राचे नियम पाळून जर तुम्ही घराचे रंग दिले तर याचा देखील फायदा तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. तर नक्कीच मित्रांनो, तुम्ही घराचे बांधकाम असाल तर वास्तु तज्ञांचा सल्ला घेऊन घर बांधून बघा. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. आम्ही सांगितलेली वरील प्रमाणे माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्कीच आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळू शकतात.

 

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here