वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची पद्धत कशी हवी

0
1040

नमस्कार, मित्रांनो आज आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची पद्धत कशी हवी प्रत्येकाला वाटते की, आपल्या दिवसाची सुरुवात एकदम छान असावी. कारण जर तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली, तर तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटते, आणि तुमचा मूड चांगला असल्यामुळे, तुमच्या कामावर ही त्याचा प्रभाव पडतो, आणि जर तुमची झोप चांगली झाली नसेल, तर तुमची चिडचिड होते, आणि घरातही चिडचिडे वातावरण राहते, आणि दिवसभर चिडचिड केल्यामुळे, तुम्हाला त्याचा शारीरिक व मानसिक त्रास होण्याची शक्यता असते. यासाठी तुमची शांत झोप व्हायला हवी. त्यासाठी आज आपण बघणार आहोत, की वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची पद्धत कशी असावी. तसेच जर तुम्हाला सकाळची सुरुवात एकदम छान हवी असेल, तसेच शांत झोप व्हावी. यासाठी तुम्ही कोणत्या दिशेत झोपावे? कसे झोपावे? तसेच झोपण्याचा बेडरूम कसा असावा. याबद्दल आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, की वास्तुशास्त्रानुसार झोपायची जागा कशी हवी, जाणून घेऊयात! 

झोपताना कोणती दिशा असावी?

आता आपण झोपण्याची दिशा कोणती असावी, हे जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात! 

  • तुम्ही झोपताना नेहमी दक्षिणेकडे डोके व उत्तरेकडे पाय येतील, अशा स्थितीत झोपावे,
  • तसेच तुम्ही पूर्वकडे डोके ही करून झोपू शकतात, पूर्व दिशा हि झोपण्यासाठी चालते. 
  •  पश्चिमेकडे पाय करून झोपावे, 
  • झोपताना पलंग हा सागवानी असावा. 
  • पलंग हा बांबूच्या लाकडांचा नसावा, तो शुभ नसतो. 
  • झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावरील सौंदर्यप्रसाधने व केसांमधील गजरा किंवा फुल असतील, तर ते काढून झोपावे. 

घरातील सदस्यांची बेडरूम कोणत्या दिशेस असावे?

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला झोपताना चे काही नियम सांगितलेले आहेत. आता आपण हल्ली बघत आहोत, की प्रत्येकाच्या घराची रचना ही वेगवेगळी असते, त्यामध्ये वन बीएचके,  टू बीएचके, थ्री बीएचके असे फ्लॅट असतात. त्यामध्ये आई-वडिलांचा एक रूम पाल्यांचा वेगळा रूम, आजी बाबांचा वेगळा रूम, अशी असतात. प्रत्येकाचे रूम्स असतात. त्यानुसार जो तो त्याच्या रूममध्ये झोपतो. आज आपण बघणार आहोत, की प्रत्येकाची रूम कोणत्या दिशेला असावे, तर जाणून घेऊया त्या बद्दल थोडी माहिती. 

  • जोडप्यांसाठी म्हणजेच आईवडिलांसाठी, किंवा  आजी बाबांसाठी, चा रूम हा दक्षिण पूर्व किंवा नैऋत्य ला असला, तरी चालेल. 
  • तसेच जर तुमचा मास्टर बेडरूम असेल, तर त्याची दिशा ही पूर्व किंवा दक्षिण असावी. झोपताना दक्षिणेकडे डोके व उत्तरेकडे पाय असले, तरी चालतील. उत्तर दिशेकडे कधीही झोपू नका, त्याने नकारात्मक ऊर्जा यांचा प्रभाव तुमच्यावर पडतो. 
  • मुलांची बेडरूम ही पूर्व दिशेला असली, तरी चालते. त्यांनी झोपताना पूर्वेकडे डोके केले तरी चालते. 
  • तसेच बेडरूममध्ये प्रत्येकाला शांत झोप यावी, यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये मोराचे पिसे लावावीत. 
  • बेडरूमला लाईट वेट फ्रेश कलर द्या. 
  • तसेच झोपताना तुमचा बेड हा बीम खाली नसावा. 
वाचा  सिझेरियन डिलिव्हरी म्हणजे काय त्याबद्दल काही शंका-कुशंका जाणून घेऊयात

उत्तर दिशेला डोके ठेवून का झोपू नये

 हे एक वैज्ञानिक कारण असे आहे, की उत्तरेकडे चुंबकीय क्षेत्र असते, उत्तर दिशेला डोके करून झोपले, तर तुम्हाला रक्तदाबाचा प्रभावही पडू शकतो. रक्तामध्ये लोहाचे प्रमाण असते,  उत्तर दिशेकडे झोपल्यावर, हे चुंबकीय क्षेत्रा द्वारे लोहाचे प्रमाण कमी होत जाते. तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता येते, व मेंदूला रक्त पुरवठा कमी होतो, तसेच तुम्हाला आरोग्याच्या तक्रारीही जाणवतात. 

दक्षिण व पूर्व दिशेला झोपल्यास कोणते फायदे होतात

झोपेसाठी दक्षिण व पूर्व दिशा अगदी चांगली असते. आता तुम्ही म्हणाल की, झोपण्यासाठी दिशा कोणती, ही असो फक्त झोप चांगली यावी. हो खरंच, हे पण असते, पण जर तुम्ही योग्य दिशेनुसार झोपले, तर तुमची झोप ही उत्कृष्ट होईल, व त्याने तुम्हाला फायदा होईल, दक्षिण दिशेला झोपल्याने तुमची झोप उत्कृष्ट रित्या होते. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही दक्षिण दिशेला झोपले, तर तुमचे आरोग्य एकदम उत्तम होते. कारण दक्षिण दिशेला झोपल्याने गाड झोप लागते, त्यामुळे तुम्ही चिंता विसरतात. मानसिक ताणतणाव विसरतात. त्याने तुमची सकाळी एकदम छान व सोपी होते. तसेच पूर्वेकडे झोपल्याने, तुम्हाला अधिक फायदे होतात. कारण पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा आहे. ज्यामध्ये सूर्य उगवतो, आणि पूर्व दिशेला झोपल्याने तुमची एकाग्रता व स्मरणशक्तीही वाढते. तसेच झोपही चांगली लागते, व तुमच्या आरोग्यामध्ये ही सुधारणा होतात, आणि ज्यावेळी तुमची सकाळ रात्रीची झोप चांगली झाली असेल, तर तुमचा दिवस हि एकदम फ्रेश व ताजातवाना वाटतो. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला झोपण्याची दिशा व त्याच्या पद्धती सांगितल्या आहेत, आम्ही सांगितलेल्या पद्धतीने मध्ये, जर तुम्हाला काही शंका  वाटत असेतील, तर तुम्ही एखाद्या वास्तु तज्ञानांही विचारू शकतात. तसेच आम्ही दिलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवावे. 

वाचा  मणक्याच्या वेगवेगळ्या आजारावर व विविध समस्यांवर वेगवेगळे घरगुती उपचार :-

 धन्यवाद

वास्तूशास्त्रानुसार देवघर कुठे असावे जाणून घेऊयात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here