नमस्कार मित्रांनो, आज जाणून घेऊया लिंबू ताजे कसे ठेवावे. लिंबू तर सर्वांनाच माहित असेल. लिंबू मुळे आपल्या जेवणाची चव देखील वाढत असते. लिंबू आपल्या आरोग्यासाठी फारच उत्तम ठरत असतो. लिंबा मध्ये विटामिन सी चे प्रमाण हे चांगल्या प्रकारे असते. विटामिन सी हे आपल्या शरीरासाठी फारच उत्तम ठरत असते. लिंबाचे नियमित सेवन केल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही देखील चांगल्या क्षमतेने वाढण्यास मदत होऊ शकते. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही जर चांगली असेल, तर आपण अनेक आजारांपासून आपल्या स्वतःचा बचाव करू शकतो.
त्याचप्रमाणे, रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे अनेक संसर्गजन्य आजारांपासून देखील आपण दूर राहू शकतो. शिवाय, काहीजण जेवण झाल्यानंतर लिंबू युक्त पाण्याचे सेवन करत असतात. लिंबाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे आपले खाल्लेले अन्न हे लवकर पचण्यास मदत होत असते. त्यामुळे आपली पचनक्रिया देखील सुरळीत सुरू राहते. शिवाय, आपल्याला पोटदुखीचा त्रास देखील होऊ शकत नाही.
काहीजण तर सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात ही लिंबू पाण्याच्या सेवनाने करत असतात. म्हणजेच सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू मिसळून त्या पाण्याचे सेवन करत असतात. त्यामुळे, आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होत असतात. तर काहीजण लेमन टी देखील घेत असतात. मित्रांनो, लिंबाचे एक ना अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. शिवाय, लिंबाचे सेवन केल्यामुळे आपले आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होऊ शकते. त्याचप्रमाणें, नियमित लिंबूपाण्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराची त्वचा देखील चांगली राहण्यास मदत होत असते. लिंबाच्या रसाचा आपल्या चेहऱ्यासाठी देखील चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येऊ शकतो.
जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील, तर त्यासाठी लिंबाच्या रसाचा उपयोग तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग काढण्यासाठी चांगल्या प्रकारे होऊ शकते. उन्हाळ्याच्या दिवसात तर लिंबाचे सरबत हे हमखास सेवन केले जात असते. तर काहीजण हे लिंबूचे सेवन हे नियमित करत परंतु, त्यासाठी लिंबाचे जतन तरी कसे करायला हवे? हा प्रश्न देखील उपस्थित होत असतो. लिंबू हे दीर्घ काळ टिकून राहण्यासाठी आपण काय करायला हवे? असे प्रश्न अनेक जण पडलेल्या असतात. तर मित्रांनो, आज आपण लिंबू ताजे कसे ठेवावे? या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग लिंबू ताजे कसे ठेवावे या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.
लिंबू ताजे ठेवण्यासाठी काय करायला हवे ?
अनेक जण लिंबाचे सेवन नियमित करावे लागत असते. लिंबामध्ये आपल्या शरीराला उपयुक्त असे सर्व प्रकारचे घटक समाविष्ट असतात. शिवाय लिंबू मध्ये विटामिन सी चे प्रमाण देखील चांगल्याप्रकारे असते, जे आपल्या शरीरासाठी फार उत्तम ठरत असतात. लिंबू ही तर आपल्याला रोज लागणारी गोष्ट आहे. त्यामुळे लिंबू ताजे ठेवण्यासाठी आपण काय करायला हवे, याबद्दल आपल्या माहिती असायला हवी. तर मित्रांनो लिंबू चे जतन करून ठेवण्यासाठी आपण काय करायला हवे? याबद्दल आपण जाणून घेऊयात.
- लिंबूचे सेवन करणे ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण, लिंबाचे एक ना अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. परंतु, लिंबाची खरेदी करताना आपण लिंबू हे निवडूनच घेतले पाहिजे. लिंबू खरेदी करताना आपण लिंबाच्या वरचे कवच देखील व्यवस्थित प्रकारे पाहूनच घ्यायला हवे.
- काही लिंबू हे एकदम मऊ सर लागत असतात. जे लिंबू एकदम मऊसर लागत असतील अथवा एकदम नरम नरम लागत असतील, तर असे लिंबू खरेदी करू नयेत. लिंबू खरेदी करताना लिंबाला कुठलेही प्रकारचा बोटाचा नख अथवा ओरखडा असायला नकोत. कारण असे लिंबू खरेदी केल्यास आणि ते जतन करायचे म्हटल्यास तर लवकर खराब होऊ शकतात. म्हणून लिंबू खरेदी करताना लिंबाचे कवच हे कठीण व बिना ओरखड्या रहित असायला हवेत.
- लिंबू हे दीर्घकाळ ताजी रहावेत यासाठी आपण लिंबाला खोबरेल तेल व्यवस्थित काय लावून घ्यायला हवे. त्यानंतर त्यात काही काळासाठी वरतीच राहू द्यावे. आणि नंतर एका भांड्यात भरून ते फ्रिजमध्ये जतन करायला हवे. हा उपाय केल्यास तुमचे लिंबू हे 15 ते 20 दिवसांपर्यंत ताजे राहू शकतात.
- खरेदी करून लिंबू आणल्यावर ते सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे. त्यानंतर एखादा कपडा च्या साह्याने कोरडे करून घ्यावेत. आणि एखाद्या स्वच्छ पेपरमध्ये गुंडाळून त्याचे प्लिज मध्ये जतन करावे. या उपायांमुळे देखील लिंबू हे फ्रिजमध्ये ताजेतवाने राहण्यास मदत होऊ शकते.
- लिंबू हे दीर्घकाळ ताजेतवाने राहण्यासाठी तुम्ही टिश्यू पेपरचा वापर देखील करू शकतात. त्यासाठी, लिंबू हे स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावेत. आणि एका कापडाच्या साह्याने स्वच्छ पुसून टाकावेत. त्यानंतर एका डब्यामध्ये टिशू पेपर टाकून द्यावा. त्यावर तुम्ही काही लिंबू ठेवावेत. त्यानंतर त्या लिंबूवर देखील अजून एक टिशू पेपर टाकून घ्यावा. त्यावर पुन्हा काही लिंबू ठेवावेत. आणि त्या लिंबुवर देखील एक टिशू पेपर झाकून घ्यावा. आणि त्यानंतर डब्याचे झाकण लावून घ्यावे. डबाबंद झाल्यावर रेफ्रिजरेटर अथवा फ्रीजमध्ये ठेवावा. असे केल्यामुळे तुमचे लिंबू हे दीर्घकाळ ताजेतवाने राहण्यास मदत होऊ शकते.
- प्लास्टिकच्या हवाबंद पिशवीमध्ये देखील तुम्ही लिंबू साठवून ठेवू शकतात. एक प्लास्टिकची हवाबंद पिशवी घेऊन त्यामध्ये लिंबू भरून घ्यावेत. त्यानंतर लिंबू भरून झाल्यावर त्यातली एक्स्ट्रा ची हवा ही पिशवी च्या बाहेर काढून व्यवस्थित पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून घ्यावी. असे केल्यामुळे देखील लिंबू हे ताजेतवाने राहू शकतात.
- त्याचप्रमाणे तुम्ही लिंबाचे मोठ्या मोठ्या प्रकारचे तुकडे करून देखील साठवणूक करू शकतात. त्यासाठी तुम्ही प्लास्टिकची हवाबंद पिशवी घ्या. लिंबाचे मोठ्या आकाराचे तुकडे करून ते प्लास्टिकच्या हवाबंद पिशवीमध्ये भरून घ्या. त्यानंतर प्लास्टिकच्या पिशवी मधील अतिरिक्त हवाही बाहेर काढून घ्या आणि व्यवस्थित पिशवीत पॅक करून घ्यावी. त्यानंतर ते रेफ्रिजरेटर मध्ये ठेवून द्यावे. जेवण जेवतो मला लिंबाची गरज असेल तेव्हा तुम्ही लिंबाचे पिक्चर बाहेर काढून अर्धा तास ठेवावी आणि त्यानंतर त्याचा वापर तुम्ही करू शकतात.
- लिंबाचा रस काढून देखील तुम्ही त्याची साठवणूक करू शकतात. त्यासाठी लिंबाचा रस काढून एका काचेच्या बरणीमध्ये भरून द्यावा आणि काचेची भरणी व्यवस्थित पॅक करून फ्रीजमध्ये ठेवावी असे केल्यामुळे देखील तुम्हाला त्याचा वापर करता येऊ शकतो.
- तसेच, जर तुम्हाला दीर्घकाळ अथवा सात-आठ महिने लिंबू साठवून ठेवायचे असेल तर, त्यासाठी लिंबाचा रस काढून घ्यावा आणि आईस क्यूब ट्रे घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस ओतून घ्यावा. लिंबाच्या रसाचे आईस क्यूब तयार झाल्यानंतर हवाबंद पिशवीमध्ये ते व्यवस्थित पॅक करून घ्यावे. पिशवीतील अतिरिक्त हवा काढून तिला व्यवस्थित पॅक करून झाल्यावर ती रेफ्रिजरेटर मध्ये साठवून ठेवावे. जेव्हा जेव्हा तुम्हाला लिंबाचा रस ची आवश्यकता असेल, तेव्हा तेव्हा तुम्ही त्याचा वापर करू शकतात. असे केल्याने तुमचे लिंबाचा रस हा वर्षभर देखील साठवून राहू शकतो.
तर मित्रांनो, वरील प्रकारे तुम्ही दीर्घकाळासाठी लिंबाची साठवणूक करू शकतात. लिंबाचा वापर हा आपल्या आरोग्यासाठी खूपच उत्तम ठरत असतो. तसेच, लिंब हे दीर्घकाळ ताजेतवाने ठेवण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो, हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहे. वरील प्रमाणे, लिंबू दीर्घकाळ टिकवण्यासाठी तुम्ही देखील उपाय करून बघू शकतात.
मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.
धन्यवाद !