नाकाचे हाड वाढणे घरगुती उपाय

0
5120
नाकाचे हाड वाढणे घरगुती उपाय
नाकाचे हाड वाढणे घरगुती उपाय

 

नमस्कार, नाकाचे हाड वाढणे म्हणजे काय? हे अनेक जणांना माहित नसते. काही  लोकांना असे वाटते की, नाकाचा शेंडा वाढणे, नाक वाकडे होणे, म्हणजे नाकाचे हाड वाढते, अशी समजूत असते. तर ते तसे नसते, नाकाचे हाड वाढणे म्हणजे  आपल्या नाकात पातळ हाडापासून एक पडदा असतो,  एक उजवीकडे आणि डावीकडे, असतो. ज्यावेळी हा पडदा वाकडा होतो, त्यावेळी आपले नाकाचे हाड वाढले, असे म्हटले जाते. मग नाकाचे हाड वाढल्यामुळे, आपल्याला अनेक समस्या येतात. जसे की सर्दी होणे, शिंका येणे, डोके दुखणे, यासारख्या समस्यांना आपणाला सामना करावा लागतो. तर मग नाकाचे हाड, नेमके कोणत्या कारणामुळे वाढते, ते बघूयात. 

नाकाचे हाड वाढण्याची कारणे :

नाकातून हाड वाढण्याची, अनेक कारणे असू शकतात, ते आपण जाणून घेऊयात. 

  • लहानपणी जर तुम्ही नाकावर पडले असाल अशा, वेळी त्यांच्या नाकाचे हाड वाढते. 
  • तसेच एखादा अपघात झाल्यावर, तुम्हाला चेहऱ्यावर जर मार लागला असेल, अशा लोकांना ही नाकाचे हाड वाढण्याची समस्या होऊ शकते. 
  • तसेच जन्माच्या वेळी नाकाच्या कूर्चामयी हाडावर दाब येतो, तेव्हा नाकाचे हाड वाढू शकते. 

 नाकाचे हाड वाढण्याचे  लक्षणे :

आपली चेहऱ्याची रचना ही नाक- कान -घसा या अवयव नी होते, जर नाकाला त्रास झाला,  तर कानात, व कानाच्या पडद्यावर ही परिणाम होतो. तसेच घशाच्या टॉन्सिल्स वर ही परिणाम होतो, आपल्या त्याचे नाक -कान- घसा हे एकाच लाईनमध्ये असल्यामुळे, त्यांचा एकमेकांशी संबंध असतो. तर मग नाकाचे हाड वाढल्यास, त्यांची कारणे व लक्षणे कोणती येथे जाणून घेऊयात. 

  • तुम्हाला सारखी-सारखी सर्दी होते, 
  • श्वास घेताना अडथळा होतो, 
  • नाकातून सारखे- सारखे पाणी येते, 
  • डोकेदुखी होते, 
  • कान दुखतात, घशामध्ये दुखते, 
  • घोरण्याची समस्या वाढते, 
  • नाकातून रक्त येतें, 
  • नाकाचे हाड वाढते, त्या वेळी अंगात ताप येतो. 
  • घशाचे व कानाचे विकार घडतात. 
वाचा  खसखस खाण्याचे फायदे जाणून घेऊयात काय आहेत?

नाकाचे हाड वाढल्यास कोणते घरगुती उपचार करावे ?

आता वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की नाकातले हाड वाढल्यामुळे तुम्हाला कोणत्या या समस्या होतात, व त्याची कारणे नेमकी कोणकोणती, आता आपण नाकातले हाड वाढल्यास, कोणते घरगुती उपाय करायला हवे? ते बघूयात. 

गाईचे शुद्ध तूप वापरून बघा :

हो, ज्या वेळी तुमचे नाकाचे हाड वाढते, अशावेळी तुम्ही घरचे गाईचे शुद्ध तूप वापरून बघायचे. त्याने तुम्हाला थोडा फायदा मिळेल. त्यासाठी तुम्ही रात्री झोपताना गाईच्या तुपाचे दोन थेंब उजव्या व डाव्या नाकात टाकावे. असे केल्यास तुमचे नाकाचे हाड वाढणे, ही समस्या हळू कमी होईल. शिवाय त्रास होणार नाही, कोरडेपणा येणार नाही, तुमच्या नाकातल्या आतील पडद्याला, ओलावा टिकून राहील. 

सुंठ व रिठा चा वापर करून बघा :

ज्यावेळी तुमचे नाकाचे हाड वाढते, अशावेळी तुम्हाला सर्दी, डोकेदुखी, सायनस सारख्या समस्या भरपूर बघावयास मिळतात. अशा वेळी जर तुम्ही सुंठ आणि रिठा पावडर वापरली, तर तुम्हाला त्याने फायदा होईल. मग ते कसे तयार करावे, त्यासाठी तुम्हाला पाच ते सहा रिठा या तीन कप पाण्यात उकळून, त्यात पाव चमचा सुंठ पावडर उकळून घ्यावे, ते तीन कप पाणी हे तुम्हाला एक होई पर्यंत उकळायचे आहे, व त्याला एका सुती कपड्याने गाळून, ते एका बाटलीमध्ये भरवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला रोज रात्री त्याची दोन ठेंब हे सात ते आठ दिवस, तुमच्या नाकात टाकायचे आहे. त्याने तुम्हाला फरक पडेल, करून बघा. 

तुळशीचा रस वापरून बघा :

तुळशी अंतीबॅक्टरियल, आंटी व्हायरल आणि ऑंटीसेप्टिक आहे. ज्यावेळी तुम्हाला सर्दी होऊन, नाकाला इन्फेक्शन होते, अशा वेळी जर तुम्ही तुळशीची पाने गरम पाण्यात उकळून, ते पाणी निम्मे होऊन, थंड करून एका बॉटलमध्ये भरून, त्याचा स्प्रे जर तुम्ही नाकाला मारला, तर तुमच्या नाकाच्या हाडाच्या शिवाय एलर्जीचे समस्या, तुम्हाला कमी होतील. 

वाचा  जेवण न जाण्याची कारणे व उपाय

नाकाचे हाड वाढल्यास कोणता व्यायाम करावा ?

ज्यावेळी नाकाचे हाड वाढते, तेव्हा आपल्याला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. जसे की श्‍वास घ्यायला त्रास, धुळीची ॲलर्जी,  शिंका येणे, नाकातून पाणी गळणे, रक्त येणे, यासारख्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. मग जर आपण एक साधा सोपा व्यायाम केला, तर त्याने आपल्याला हळू फरक पडू शकतो,  तुमचे नाकाचे हाड वाढले असेल, अशावेळी जर तुम्ही अनुलोम-विलोम चा व्यायाम केला, तर त्याने तुम्हाला फरक पडेल, करून बघा. 

ऑपरेशन करावे लागते का? 

सहसा करून नाकाच्या हाडावर घरगुती उपाय हे जास्त प्रमाणात दिसत नाही, त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला हा नक्की घ्यावाच लागतो. अशावेळी तुम्ही होमिओपॅथी पण करू शकतात. तसेच जर तुमच्या नाकाचे हाड वाढले असेल, अशावेळी तुम्हाला डॉक्टर स्प्रे देतात, त्यावर गोळ्या देतात, आणि शिवाय ते आपल्याला ऑपरेशनचा सल्ला देतात. पण ऑपरेशन करूनही ही समस्या कायमची जात नाही, तिचा त्रास होतो त्याचा त्रास थोडा होतच राहतो, तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. 

नाकाचे हाड वाढणे म्हणून नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी ? 

नेकांना प्रश्न पडतो, की नाकाचे हाड वाढले, तर किती दुष्परिणाम आपल्याला बघावयास मिळतात. मग जर नाकाचे हाड वाढले, तर मग त्यावेळी आपण नेमकी कोणती काळजी घ्यावी? चला तर मग जाणून घ्या. 

  • नियमित नाकाला शुद्ध गाईचे तूप लावावे, 
  • रोज अनुलोम-विलोम व्यायाम करावा, 
  • रोज दूध हळद प्यावे, 
  • तुळशी काळे मिरे आले दालचिनी यांचा काढा प्यावा, 
  • जेवण झाल्यावर गुळ खावा, 
  • रुमालाला निलगिरीचे तेल लावून, वास घ्यावे. 
  • नियमित गरम पाणी प्यावे, 
  • थंड पदार्थ खाऊ नका, 
  • दही खाऊ नका, 
  • हिरव्या पालेभाज्या खा.

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला नाकाचे हाड कसे वाढते, कोणत्या कारणांमुळे वाढते, त्याची लक्षणे व त्यावर काही थोडे घरगुती उपाय सांगितलेले आहे, आम्ही सांगितलेले उपायांमध्ये तुम्हाला कसली ऍलर्जी असेल, तर हे घरगुती उपाय करण्याआधी, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तसेच आम्ही सांगितले आहे की, त्यावर कोणता व्यायाम करावा, आणि आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असेल, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

वाचा  आमचूर पावडर म्हणजे काय आमचूर पावडरचे फायदे आणि वापर

 

                      धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here