चेहऱ्यावरील नको असलेले केस काढणे

0
963
चेहऱ्यावरील नको असलेले केस काढणे
चेहऱ्यावरील नको असलेले केस काढणे

           आजकाल सर्वांनाच सुंदर दिसायचे आहे. त्याकरता बरेच लोक आपल्या चेहऱ्यावर ट्रीटमेंट घेतात किंवा शस्त्रक्रिया करतात. कारण प्रत्येकाला वाटते की, आपला चेहरा आकर्षक दिसावा. आपला चेहरा इतरांपेक्षा अधिक सुंदर वाटावा. तसेच टीव्ही मधले कलाकार देखील कोट्यावधी पैसे आपले चेहऱ्यांवर खर्च करता. याच प्रकारे सर्वसामान्य स्त्रियांना देखील त्यांना त्यांचा चेहरा फार मौल्यवान असतो. तसेच सुंदर दिसण्यासाठी ते बरेचसे प्रयत्न करतात, पण बऱ्याच वेळेस चेहऱ्यावरील नको असलेले केस त्रास देऊन जातात . यामुळे चेहरा विद्रूप दिसू लागतो. सर्वांच्याच चेहऱ्यावर केस येतात असे नाही. प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. काही लोकांच्या चेहऱ्यावर केस येतात तर काही लोकांच्या चेहऱ्यावर केस येत नाही. याबद्दल आता आपण आणखीन माहिती घेऊया चला तर मग !

चेहऱ्यावर केस का येतात ?

  • अनुवांशिक असू शकते :

                   बरेच वेळेस चेहऱ्यावर केस येण्याचे एक मोठे कारण म्हणजे अनुवंशिक असू शकते. म्हणजेच तुमच्या आई वडिलांना किंवा त्यांच्या आई-वडिलांना जर चेहऱ्यावर केस असतील तर तुम्हाला कदाचित चेहऱ्यावर केस येऊ शकतात.

हे गरजेचे नाही की तुमच्या आई वडिलांना चेहऱ्यावर केस होतील तर तुम्हाला देखील चेहऱ्यावर केस येतीलच ही फक्त एक शक्यता आहे.

  • शरीरातल्या बदलांमुळे :

                 जसे आपल्या हाताची पाची बोटे सारखी नसतात तसेच प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे असते प्रत्येकाच्या शरीराची वाढ वेगवेगळी असते. म्हणून काही लोकांच्या चेहऱ्यावर केस येतात तर काही लोकांच्या चेहऱ्यावर केस येत नाही. तसेच प्रत्येकाच्या शरीरातल्या हार्मोन्सच्या बदलामुळे देखील चेहऱ्यांवर केस येण्याची शक्यता असते.

वाचा  लहान मुलांना सतत उचकी लागणे या समस्या वर घरगुती उपाय

चेहऱ्यावर केस येण्याची लक्षणे ?

 

  • शरीरावर जास्त केस असणे :

                 बरेच वेळेस जर तुमच्या शरीरावर जास्त केस असतील तर याची दाट शक्यता आहे की, तुमच्या चेहऱ्यावर देखील येऊ शकता.

  • चेहऱ्यावर केसाची लव येणे :

              बऱ्याच वेळेस आपल्या चेहऱ्यावर जर केसांची लवाले असेल म्हणजेच चेहऱ्याच्या दोन्ही बाजूस एक बारीक केसांची आली असेल. तर ही एक प्रथम पायरी किंवा सुरुवात आहे. चेहऱ्यावर केस येण्याची ही लक्षणे वेळीच ओळखून त्वरित उपचार चालू करावे.

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी काय करावे ?

              तर आपण चेहऱ्यावर केस येणे बाबत माहिती बघितली. तसेच चेहऱ्यावर केस का येतात माहिती बघितली. आता आपण यावर काही उपाय जाणून घेऊया चला तर मग

मध आणि साखर :

              तर सर्वात पहिले अर्धा वाटी पाण्यामध्ये सहा ते सात चमचे साखर टाकावी. त्यानंतर दोन चमचे मध टाकावे आणि मंद आचेवर एक गरम करावे. जसे जसे हे मिश्रण घट्ट होईल तोपर्यंत हे मिश्रण मंद आचेवर ढवळावे. त्यानंतर हे मिश्रण एक पेस्ट सारखे झाल्यानंतर थोडे कोमट असताना चेहऱ्यावर लावावे व ही पेस्ट सुकल्यानंतर चेहर्‍यावरून विरुद्ध बाजूनी खेचून काढावी. जेणेकरून चेहऱ्यावरील केस निघून जाण्यास मदत होईल.

लिंबू व सोडा :

              तुमच्या चेहऱ्यावर जर अगदी विरळ केस असतील म्हणजेच दाट केस नसतील किंवा छोटीशी केसांची लव असेल. तर एक चमचा सोडा मध्ये दोन तीन चार लिंबाचे थेंब टाकून चेहऱ्यावरच्या केस असलेल्या भागात हे मिश्रण लावावे. जर केस खूप कमी प्रमाणात असतील तर चेहऱ्यावरून एका दोन दिवसात केसं निघून जातील. तसेच चेहऱ्यावर लावतांना चेहऱ्याच्या संवेदनशील भागवतला ही पेस्ट नाही लागणार याची काळजी घ्यावी.

बेसन वापरून बघा :

               आपल्या घरामध्ये बेसन सहज उपलब्ध होणारी वस्तू आहे. तसेच याचा वापर चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी फार पुरातन वेळेपासून होत आहे. तरी आपण थोडे बेसनाचे पीठ घ्यावे त्यामध्ये दोन चमचा गुलाब जल टाकावे. त्यानंतर त्यामध्ये दोन तीन लिंबाचे थेंब टाकावे थोडं पाणी टाकून याची एक घट्ट पेस्ट बनवून घ्यावी. त्यानंतर ही पेस्ट त्वरित चेहऱ्यावरच्या केसांवर लावावे विस ते तीस मिनिटानंतर ही पेस्ट सुकून जाईल. ही पेस्ट सुकल्यानंतर चेहऱ्याची मसाज करून ही पेस्ट चेहर्‍यावरून काढावी जेणेकरून त्या पेस्ट सोबत तुमच्या चेहऱ्यावरील केस देखील निघून जाण्यास मदत होईल.

वाचा  चेहऱ्याला दही लावण्याचे फायदे

हळद वापरून बघा :

                    तर आपण हळद चा वापर करून चेहऱ्यावरील केस काढू शकतो ते कोणत्या प्रकारे चला तर मग जाणून घेऊया. सर्व प्रथम म्हणजे आपण हळदीमध्ये लिंबाचा रस टाकावा व थोडी जाडसर पेस्ट बनवून घ्यावी. तसेच हळदीची एक जाडसर पेस्ट बनवून चेहऱ्यावर ज्या ठिकाणी केस आहे त्या ठिकाणी लावावे. व तो फेस मास्क सुकल्यानंतर हळूहळू मसाज करून काढून टाकावा. हा उपाय महिन्यातून दोनदा करावा जेणेकरून चेहर्‍यावरील केस पूर्णपणे निघून जातील.

 

चेहऱ्यावरील नको असलेले केस काढतांना कोणती काळजी घ्यावी ?

 

           आपण आता चेहर्‍यावरचे केस काढण्यावर बरीचशी माहिती बघितली. तसेच चेहऱ्यावर केस का येतात याची कारणे देखील बघितली. आता आपण जाणून घेऊया चेहऱ्यावरील नको असलेले केस काढतांना कोणती काळजी घ्यावी. तर लिंबू व सोडा याचा  वापर करताना चेहऱ्याच्या इतर भागातील लिंबू व सोडा लागणार नाही याची काळजी घ्यावी. पेस्ट बनवताना लावताना जुने कपडे घालावे जेणेकरून चांगले कपडे खराब होणार नाही. तसेच कोणताही उपाय करताना त्या बद्दल पूर्ण माहिती घ्यावी त्यानंतर उपाय करावा व वरील जे काही उपाय आहेत त्यांना प्रत्येकांना एक विशिष्ट वेळ आहे म्हणून त्यावेळी मध्येच तो उपाय करावा.

 तर आपण आज चेहऱ्यावरील केस येण्या बद्दल माहिती बघितली. तसेच यावर ची कारणे देखील बघितली. आणि याच बरोबर आपण यावर काही उपाय देखील जाणून घेतले. आपण डॉक्टरांचा हि सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सल्ला किंवा अडचण असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here