दोन वर्षाच्या बाळाचा आहार कसा असावा.

0
2157
दोन वर्षाच्या बाळाचा आहार कसा असावा
दोन वर्षाच्या बाळाचा आहार कसा असावा

 

नमस्कार मित्रांनो. लहान मुले ही जर व्यवस्थित खात-पीत असतील तर ती निरोगी राहण्यास मदत होत असते. म्हणजेच बाळाचा आहार  त्यांच्या वयानुसार व्यवस्थित प्रकारे असेल  तर ते निरोगी राहू शकतात. बऱ्याच वेळा पालकांना ही समस्या होत असते की आपला बाळ व्यवस्थित जेवण करत नाही सतत खाताना त्रास देत असतो. बाळ स्वतहून खात नसेल तर आई स्वतः भरवत असते तरी खाण्यास नकार देत असते, अशा एक ना अनेक कारणांमुळे बरेच पालक हे त्रस्त झालेली दिसून येत असतात. म्हणजेच बाळाच्या चिंतेने आई-वडील त्रस्त झाले दिसून येत असतात. बाळाचा जन्म झाल्यापासून आई बाळाची व्यवस्तीत प्रकारे काळजी घेताना दिसून येत असते. तसेच बाळाचे प्रत्येक महिन्यानुसार देखील वजन व्यवस्थित आहे का नाही हे देखील व्यवस्थित बघून घ्यायला हवे असते. बाळ कसे मोठे होत जाते तसतसे त्याचे वजन त्याच्या वयानुसार बरोबर आहे का हे देखील पालकांनी जाणून घ्यायला हवे. म्हणजे बाळ सहा महिन्याचा असताना त्याचे वजन त्यानुसार बरोबर आहे का तसेच बाळ एक वर्षाचा असताना त्याचे वजन व्यवस्थित आहे का याबद्दल पालकांनी सतत जागृत असणे गरजेचे असते.

बाळाचे वय एक वर्षाचे होते तेव्हा त्याच्या साठी कोणता योग्य आहार आपण त्याला दिला पाहिजे याबद्दल पालक जागृत असणे गरजेचे असते तसेच बाहे दोन वर्षाचा असेल तेव्हा त्याला आपण नेमका कोणता आहार दिला पाहिजे याबद्दल देखील पालकांना जागृत असायला हवे. जेणेकरून त्याच्या वयानुसार त्याची वजन उंची ही व्यवस्थित येत्या राहील. बाळाचे वजन उंची व्यवस्थित असेल तसेच बाहेर व्यवस्थित जेवण करत असेल तर तो निरोगी राहू शकतो. एक वर्षाच्या मानाने तसेच दोन वर्षाच्या मानाने आपण बाळाला नेमका कसा आहार द्यावा याबद्दल बरेच पालक त्रस्त झालेले देखील दिवसांनी येत असतात. म्हणजेच वयानुसार आपण आपल्या बालकांना काय खायला घालावे याबद्दल बरेच पालकांना कळत नसते नाहीतर ते कन्फ्युज तरी असतात. बाळाच्या वयानुसार आपण त्याला कोणते पदार्थ खाऊ घालायला हवे,याबद्दल आपल्याला माहिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, आज आपण दोन वर्षाच्या बाळाचा आहार कसा असायला हवा? याबद्दल माहिती करून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, दोन वर्षाच्या बाळाचा आहार कशाप्रकारे असायला हवा, याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

बाळाला त्याच्या वयानुसार योग्य आहार देणे का आवश्यक ठरते ?

      मित्रांनो, बाळाला त्याच्या विशिष्ट वयानुसार योग्य आहार देणे अत्यंत आवश्यक ठरत असते. कारण बाळाला त्याच्या विशिष्ट वयानुसार योग्य आहार दिले तर बाळा बाळाचे वजन व्यवस्थित राहण्यास मदत होईल. तसेच बाळाची उंची देखील योग्यरीत्या वाढण्यास मदत होईल. आणि बाळाने जर त्याच्या विशिष्ट वयानुसार योग्य आहार घेतला तर ते निरोगी राहण्यास देखील मदत होईल. आणि प्रत्येक गोष्टींमध्ये ते ऍक्टिव्ह होत जाईल. काही लहान मुले खूप हट्टी असतात. त्यामुळे ते जेवण्यास खूप नाटक करताना देखील दिसून येत असतात किंवा स्वतः जर खात नसेल आणि आई त्यांना स्वतः बनवत असेल तरीदेखील आईला त्रास देताना दिसून येत असतात. परंतु अशामुळे बाळाची तब्येत खराब होण्याची शक्‍यता असते. तसेच बरेच बांधकाम हे त्यांच्या विशिष्ट वयानुसार खूप बारीक असताना देखील दिसून येत असतात. म्हणजे त्यांचे वजन व्यवस्थित नसते आणि उंची देखील कमी जास्त प्रमाणात आढळून येत असते. अर्थात जर बाळाची विशिष्ट वयानुसार उंची वजन आणि योग्य असेल तर बाळ सुदृढ होण्यास मदत होत असते. म्हणून बाळाचा आहार त्याच्या विशिष्ट वयानुसार योग्य देणे अत्यंत आवश्यक असते.

वाचा  स्वप्नात मुलगी दिसणे शुभ की अशुभ!

दोन वर्षाच्या बाळाचा आहार कसा असायला हवा ?

  बरेच पालक हे लहान बाळाच्या विशिष्ट वयानुसार बाळाला काय खायला द्यावे ? तसेच काय खायला देऊ नये ? याचा नेमका योग्य आहार कसा असायला हवा याबद्दल कन्फ्युज असताना दिसून येत असतात. म्हणजेच त्यांच्या विशिष्ट वयानुसार आपण बाळाला व्यवस्थित प्रकारे आहार दिला तर ते सुदृढ होण्यास मदत होईल. म्हणजेच नेमका व लहान बाळाला आहार कसा द्यावा याबद्दल बऱ्याच पालकांना माहिती कमी असल्याचे दिसून येत असते. परंतु मित्रांनो याबद्दल जास्त चिंता करू नका बाळाला त्याच्या वयानुसार योग्य आहार कसा द्यावा याबद्दल तुम्हाला माहिती जाणून घेणे आवश्यक असते. दोन वर्षाच्या बाळाला आहार कसा द्यायला हवा याबद्दल आपण आता माहिती जाणून घेऊया. बरेच पालक हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लहान बाळांना डाएट चार्ट देखील बनवून घेत असतात. म्हणजेच आठवड्यातील प्रत्येक दिवसाला बाळाला कोणते विकाय द्यायला हवी याबद्दल माहिती करून घेत असतात. दोन वर्षाच्या बाळाला तुम्ही सकाळचा नाष्टा हा वेळ देणे योग्य ठरते तसेच दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण हे योग्य वेळी आणि योग्य तो आहार तुम्ही ठरवून त्यानुसार बाळाला देणे आवश्यक असते.

दोन वर्षाच्या बाळाचा नाष्टा:-

    मित्रांनो तुम्ही दोन वर्षाच्या बाळाला नियमितपणे नाष्टा द्यायला हवा. लहान मूल म्हटले की त्याच्या पोटात जागा ही कमी असते. त्यामुळे, फक्त दोन वेळ जेवण करून त्याला चालणार नाही जर तुम्ही फक्त दोन वेळा जेवण देत असतील तर बाळाच्या शारीरिक वाढ वजन-उंची ही व्यवस्थित रित्या होणार नाही. म्हणून तुम्ही दोन वर्षाच्या बाळाचा जेवणाचा टाइम टेबल हा व्यवस्थित प्रमाणे ठरवून घ्यायला हवा जेणेकरून तुमचं बाळ सुदृढ होण्यास मदत होईल.

यासाठी तुम्ही दोन वर्षाच्या बाळाला नियमित नाष्टा दिला पाहिजे. दोन वर्षाच्या बाळाला तुम्ही नाश्त्यामध्ये ए क्लास दूध देऊ शकतात त्याचप्रमाणे तुम्ही नाश्त्यामध्ये मेथीचा पराठा सोबत दही खाऊ घालू शकतात. म्हणजे आठवड्यातून प्रत्येक दिवसाला वेगळ्या प्रकारचा नाष्टा द्यायला हवा. कारण जर तुम्ही आठवड्यातील प्रत्येक दिवसाला एकच सतत तोच नाष्टा दिला तर ते लहान मुल देखील कंटाळा येईल खाण्यास नकार देत जाईल. म्हणून प्रत्येक आठवड्याला प्रत्येक दुसरा तुम्ही वेगळ्या प्रकारचा नाष्टा द्यायला हवा. त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही नाश्त्यामध्ये केळ आणि दूध हे देऊ शकतात.

वाचा   उन्हाळ्यात द्राक्ष खाण्याचे फायदे व तोटे

त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही मला इडली सांबर हे नाष्टा मध्ये देऊ शकतात. त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही नाश्त्यामध्ये लहान बाळाला मुगाची अथवा मटकीची उसळ खायला देऊ शकतात. त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही नाश्त्यामध्ये उपमा किंवा सँडविच देखील बनवून देऊ शकतात. त्याचप्रमाणे त्याच्या पुढच्या दिवशी नाश्त्यामध्ये तुम्ही आमलेट किंवा पनीर भुर्जी नाहीतर पोस्ट देखील बनवून देऊ शकतात अशा प्रकारचा जर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचा नाष्टा असल्या तर लहान मुले आवर्जून खातील.

म्हणजेच प्रत्येक दिवसानुसार वेगवेगळ्या प्रकारचा नाष्टा असल्यास लहान मुलांना खाण्यात देखील रस वाटेल. तसेच कमी नाष्ट्यात बरोबर नेहमी एक ग्लास दूध देणे आवश्यक ठरते. कारण लहान मुलांना पुरेपूर दूध मिळाले त्यांचे कॅल्शिअमचे प्रमाण वाढण्यास मदत होत असते जेणेकरून त्यांची हाडे बळकट होण्यास मदत होते.

दोन वर्षाच्या बाळाचे दुपारचे जेवण:-

दोन वर्षाच्या बाळाचा नाष्टा कसा असायला हवा हे आपले म्हणणे जाणून घेतले आहे. दोन वर्षाच्या बाळाचे दुपारचे जेवण हेदेखील आठवड्यातील प्रत्येक दिवसानुसार वेगवेगळ्या प्रकारचे त्याला द्यायला हवे, जेणेकरून त्याला खाण्यात रस निर्माण होईल. 2 वर्षाच्या बाळाच्या दुपारच्या जेवणात तुम्ही खीर चपाती, तसेच कडी फोन के हेदेखील खाऊ घालू शकतात. त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही  दुपारच्या जेवणामध्ये बाळाला हिरव्या पाले भाज्यांची भाजी-भाकरी देखील खाऊ खायला देऊ शकतात.

तसे त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही लहान बाळाला पुलाव, दुधी भोपळा पासून बनवलेल्या दशम्या चटणीसोबत नाहीतर दही सोबत अशाप्रकारे खायला देऊ शकतात. त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही लहान बाळाला दुपारच्या जेवणामध्ये डाळ भात, मसुरीच्या डाळीचे वरण भातासोबत, दहीभात किंवा छोले-पुरी अशाप्रकारे देखील जेवण देऊ शकतात. तसेच त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही लहान बाळाच्या दुपारच्या जेवणामध्ये उडदाची डाळ ची भाजी व चपाती तसेच शेवग्याच्या शेंगांची भाजी भाकरी असे देखील खाऊ घालू शकतात आणि हे पौष्टिक देखील असते. म्हणजे तुम्ही लहान बाळांना जेवण देताना नेहमी नेहमी तेच तेच न देता आलटून-पालटून जेवण द्यावे.

दोन वर्षाच्या बाळाचा संध्याकाळचा नाष्टा:-

२ वर्षाच्या लहान बाळाचा नाष्टा कसा असावा तसेच दुपारचे जेवण कसे असावे हे आपण वरीलप्रमाणे जाणून घेतलेले आहे. तर आता २ वर्षाच्या बाळाचा संध्याकाळचा नाष्टा तुम्ही कशा प्रकारे द्यायला हवे याबद्दल माहिती जाणून घेऊया. तर तुम्ही लहान बाळाला संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये स्नॅक्स युक्त पदार्थ खाऊ घालू शकतात. म्हणजेच जसे की पहिल्या दिवशी तुम्ही लहान बाळाला संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये सफरचंद देऊ शकतात. त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही लहान बाळाला संध्याकाळचा नाष्टा मध्ये गरम गरम ढोकळे बनवून खायला देऊ शकतात. त्याच्या पुढील दिवशी नाश्त्यामध्ये चिकू नाशपती,चिकू नाहीतर द्राक्ष खायला घालू शकतात. त्याच्या पुढच्या दिवशी नाश्त्यामध्ये संत्री त्याच्या पुढच्या दिवशी अननस नाहीतर टरबूज खायला दिले पाहिजे. तसेच त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही दूध बिस्किट देखील नाश्त्यामध्ये देऊ शकतात. म्हणजेच संध्याकाळ चहा नाश्ता मध्ये तुम्ही लहान मुलांना फळांचा नाश्ता द्यायला हवा.

वाचा  वजन कमी करण्यासाठी विविध व्यायामाचे प्रकार

दोन वर्षाच्या बाळाचे रात्रीचे जेवण:-

 बाळाचा संध्याकाळचा नाष्टा कसा असायला हवा हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतले. तर दोन वर्षाच्या बाळाचे रात्रीचे जेवण कसे असायला हवे याबद्दल देखील आपल्याला जाणून घ्यायला हवे. दोन वर्षाच्या बाळाच्या रात्रीच्या जेवणामध्ये त्याला सांबर भातासोबत द्यायला पाहिजे. तसेच त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही बाळाला पनीरची भाजी चपाती देऊ शकतात. त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही बाळाच्या रात्रीच्या जेवणामध्ये मटणाची भाजी आणि मक्याची भाकरी तसेच मशरूमची भाजी सोबत भाकरी देखील खाऊ घालू शकतात. त्याच्या दुसर्‍या दिवशी तुम्ही बाळाला रात्रीच्या जेवणामध्ये बटाट्याची भाजी व चपाती किंवा बटाट्याचा पराठा बटर सोबत खाऊ घालू शकतात. तसेच तुम्ही रात्रीचे जेवणामध्ये लहान बाळाला मुगडाळ युक्त खिचडी देखील खाऊ घालू शकतात. तसेच रात्रीचे जेवणामध्ये तुम्ही अंड्याची भाजी व चपाती देखील खायला घालू शकतात. म्हणजेच प्रत्येक दिवसाला नवीन नवीन पदार्थ लहान बाळाला खाऊ घातला पाहिजे त्यामुळे बाळाला खाण्याची देखील आवड निर्माण होते व तिचे तब्येत देखील चांगले होण्यास मदत होते. तसेच तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये मेथीचे धपाटे कळण्याची भाकरी दुधासोबत तसेच भेंडीची भाजी चपाती सोबत देखील खाऊ घालू शकतात.

मित्रांनो, वरील प्रमाणे तुम्ही लहान दोन वर्षाच्या बाळाला सकाळचा नाश्ता मध्ये कोणते पदार्थ खाऊन घ्यायला हवे तसेच दुपारच्या जेवणामध्ये काय द्यायला हवे संध्याकाळचा नाष्टा कसा असावा आणि रात्रीचे जेवण कशाप्रकारे दिले पाहिजे याविषयी जाणून घेतले आहे. मित्रानो तुम्ही देखील तुमच्या लहान बाळाला वरील प्रमाणे सर्व पदार्थ म्हणजेच नवीन दिवशी नवीन पदार्थ खायला देऊन बघा. यामुळे तुमच्या बाळाची खाण्याची आवड देखील निर्माण होईल तसेच तुमचं बाळ देखील सुदृढ राहण्यास मदत होईल. तसेच तुम्ही दोन वर्षाच्या बाळाचा आहार अजून कशा प्रकारे उत्तम देऊ शकते यासाठी तुम्ही डॉक्टरांना भेटून डॉक्टरांच्या साह्याने माहिती मिळवून घ्यावी.

     मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळू शकतात.

 

       धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here