दालचिनी चे फायदे

0
1141
दालचिनी चे फायदे
दालचिनी चे फायदे

नमस्कार, मित्रांनो दालचिनी ही आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. दालचिनी हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. पण त्याचा आपल्या शरीरासाठी फार गुणधर्म आहे. दालचिनी खाल्ल्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या समस्येवर आराम मिळते. तसेच दालचिनी घालून भाज्या अगदी चविष्ट आणि रुचकर लागतात, तसेच पूर्वीच्या काळापासून दालचिनीचा वापर हा औषधी वनस्पती मध्ये केला जात आहे. दालचिनी आपल्या शरीरासाठी फायदेशीरच असल्यामुळे, तुम्ही जर दालचिनी चे सेवन नियमित केले, तर तुम्हाला खूप सारे फायदे होतात. तर मग ते नेमके कोण कोणते? दालचिनी चे तुम्हाला कोण कोणते फायदे होऊ शकतात ? हे अनेक जणांना माहिती नसते, तर मग आज आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात ! 

दालचिनी पासून तुम्हाला होणारे फायदे ? 

मित्रांनो, दालचीनी पावडर खाल्ल्याने तुम्हाला खूप सारे फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊयात ! 

दालचिनी मधील घटक द्रव्य नेमके कोणकोणते असतात ? 

मित्रांनो, दालचीनी मधील घटक द्रव्य खूप जणांना माहिती नसतात. पण ती आपल्या शरीरासाठीही फायदेशीर असतात. दालचिनी मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, थायमिन, सोडियम, प्रोटीन, फॉस्फरस, विटामिन्स, कार्बोहायड्रेट इतके सारे गुणधर्म असल्यामुळे, ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे आपल्याला होणाऱ्या त्रासावर त्याचे गुण आपल्याला लागतात. 

तुम्हाला भूक लागते :

खूप लोकांच्या समस्या असतात, की त्यांना जेवण जात नाही. भूक लागत नाही, तसेच कोणताही पदार्थ रुचकर लागत नाही. त्याची चव लागत नाही, त्यामुळे त्यांना जेवण जात नाही, आणि जेवण न केल्यामुळे, तुम्ही अशक्त होतात. कमजोर होतात. अशावेळी जर तुम्ही तुमच्या आहारात दालचिनी चा उपयोग केला, तर तुम्हाला खूप सारे फायदे होतील. कारण दालचिनी मध्ये भूक वाढवण्याचे गुणधर्म असतात. तसेच पचन संस्था सुरळीत चालवण्याचे काम करते. त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होते आणि तुम्हाला भूक लागायला लागते. 

वाचा  पायाला बजरंग लेप कधी व कसा लावल्याने फायदा होतो

डोकेदुखीचा त्रास थांबतो :

बदलत्या वातावरणाचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. थंड, गरम हवेमुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर झाल्यामुळे, डोकेदुखीचा त्रास होतो. तसेच मानसिक ताण-तणाव, टेन्शन, चिंता यामुळे डोकेदुखीची समस्या होते. अशावेळी तुम्ही दालचिनीचा वापर केला, तर तुम्हाला फायदे मिळतील. त्यासाठी तुम्हाला दालचिनी पावडर घ्यायची आहे, ती पाण्यात मिक्स करून, तिचा लेप तुमच्या कपाळावर तीस मिनिटे तरी लावावा. त्यामुळे डोक्याला थंडावा ही मिळतो. शिवाय डोकेदुखीचा त्रास हा कमी होतो. 

पचनाशी संबंधित समस्या दूर होतात :

हो, ज्या लोकांना सारखे अपचन होते, ऍसिडिटी होते, अजीर्ण होते, मळमळल्यासारखे वाटते, अशा लोकांनी जर त्यांच्या आहारात दालचिनी चा उपयोग केला, तर त्यांना फायदे होतात. कारण दालचिनी ही पचनसंस्था सुरळीत ठेवण्याचे काम करते. त्यासाठी तुम्हाला दालचिनी पावडर सैंधव मीठ, जिरे पावडर, सुंठ पावडर, यांना एकत्र करून कोमट पाण्यामध्ये ते मिश्रण कालवून, पिल्यास तुम्हाला पोटातील अपचन, अजीर्ण, ऍसिडिटी, पोटफुगी, गॅसेस, यासारख्या समस्या दूर होतात. 

वजन कमी होण्यास फायदेशीर ठरते :

बदलती जीवनशैली, त्यामुळे या समस्या भरपूर प्रमाणात होतात. सतत बैठे काम, अवेळी खाणे, तेलकट पदार्थ खाणे, तसेच स्त्रियांच्या बाबतीत ह्या गोष्टी जास्त घडतात, कारण मासिक पाळीत अनियमीत येणे, अंगावर रक्तस्राव कमी जाणे, त्यामुळे त्यांचे वजन वाढीच्या समस्या होतात. अशा वेळी जर त्यांनी त्यांच्या आहारात नियमित दालचिनीचा वापर केला, तर त्यांना फायदे मिळतील. त्यासाठी त्यांना दालचिनी पावडर घालून चहा करायला हवा. तसेच त्यांनी दालचिनी पावडर त्यामध्ये +मध घालून कोमट पाण्यात पिलेत, तर त्याचे वजन कमी होण्यास मदत मिळते. 

चेहर्यावरील पुटकुळ्या जाण्यासाठी मदत मिळते :

वाढत्या, प्रदूषणामुळे तसेच धुळीची ॲलर्जी होऊन, काहीना मुरूम तसेच पुटकुळ्या यांचे प्रमाण अधिक होते. शिवाय चेहऱ्यावर काळे डागही पडतात. अशा वेळी, जर तुम्ही तुमच्या सौंदर्यासाठी तसेच, मुरुमांसाठी दालचिनी पावडर चा वापर केला, तर फरक पडेल. त्यासाठी तुम्हाला दालचिनी पावडर त्यामध्ये+ लिंबूचा रस + त्यामध्ये मध एकत्र मिश्रण करून, तुमच्या चेहऱ्यावर पुटकुळ्या डाग असलेल्या ठिकाणी लावून, पाच मिनिटे मसाज करावा. तसेच पंधरा मिनिटे राहू द्यावे. असे नियमित केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग पुटकुळ्या जाण्यास मदत मिळते. शिवाय नॅचरल स्क्रब ही होतो. 

वाचा  चिकू खाण्याचे फायदे व तोटे

सर्दी मध्ये आराम मिळतो :

सर्दी झाली की आपली चिडचिड होते, तिचा त्रास आपल्याला खूप प्रमाणात होतो. अशा वेळी जर तुम्ही सर्दी-पडसे झाल्यावर, दालचिनी पावडर चा वापर केला, तर तुम्हाला फरक पडेल. शिवाय, सर्दी-पडसे वर आराम मिळेल. त्यासाठी तुम्हाला कोमट पाण्यामध्ये, दालचिनी पावडर+ अद्रकचा रस+ मध यांचे मिश्रण एकजीव करून दिवसातून तीन वेळेस प्यायचे आहेत. त्यामुळे तुमच्या सर्दी-पडसे वर तुम्हाला आराम मिळेल. 

हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरते :

मित्रांनो, दालचिनी ही आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. तसेच तिच्या मधील घटक आपल्याला खूप पोषकतत्वे देतात. दालचिनी मध्ये कोलेस्ट्रॉल घटवण्याचे गुणधर्म असतातच, शिवाय त्यामध्ये कॅल्शियम हे मुबलक प्रमाणात असते, कॅल्शियम हे आपल्या हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरते, त्यासाठी जर तुम्ही नियमित रात्री झोपतेवेळी, दुधामध्ये एक चमचा दालचिनी पावडर टाकून ते दूध पिल्यास, तुमच्या हाडांना मजबुती मिळते. शिवाय लावचिकता ही येते. 

दालचिनी पासून होणारे दुष्परिणाम :-

मित्रांनो, कोणतीही गोष्ट प्रमाणात घ्यावी, हा प्रकृतीचा नियम आहे. जर ती प्रमाणाच्यावर वापर केला गेला, तर त्याचे साईड इफेक्ट आपल्याला होतात. हे आपण जाणून घेऊयात. दालचिनी नेहमी प्रमाणात च घ्यावीच, शिवाय दालचिनी ही उष्ण असल्यामुळे, तिला उन्हाळ्यामध्ये सेवन करणे शक्‍यतो कमी करावेत. कारण  ती उष्ण असल्यामुळे, उन्हाळ्यात तुम्ही तिचे जास्त सेवन केल्यास, तुम्हाला जुलाबसारख्या समस्या होऊ शकतात. 

चला, तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला दालचिनी चे, शरीरासाठी होणारे बहुगुणी फायदे तुम्हाला सांगितले आहेच. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये तुम्हाला, काही शंका-कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. तसेच आम्ही दिलेल्या माहितीमध्ये, तुम्हाला उपचार करण्यापूर्वी तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा, आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडले असेल, तर आम्हाला कमेंट मध्ये सांगावेत. 

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here