नमस्कार मित्रांनो. हल्लीच्या काळात एवढे प्रदूषण वाढले आहे की, या वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावरही त्याचे परिणाम होताना दिसून येत असतात. प्रदूषण वाढल्यामुळे लोकांच्या आरोग्य खराब होत असते संसर्गजन्य आजारही वाढलेले आहेत एकामुळे अनेकांना संसर्गजन्य आजार होऊ शकतात. मित्रांनो हल्ली एक समस्या खूप वाढत चाललेली आहे ती म्हणजे केस गळती. केस गळणे मागे अनेक कारणे असू शकतात. वाढते प्रदूषण आपल्या शरद जर पोषक घटकांची पोषक तत्वांची कमतरता असेल तर योग्य तो जीवनसत्त्वांचा पुरवठा न झाल्यामुळे देखील आपले केस गळू शकतात. हल्ली तर अनेकजण फॅशनच्या नावामुळे केसांना तेलही लावणे सोडून देत असतात. केस नेहमी व्यवस्थित न ठेवल्यामुळे, केसांना व्यवस्थित तेल न लावल्यामुळे देखील केस गळू शकतात. जर तुम्ही नियमित व्यायाम करत नसाल तर त्यामुळे देखील केस गळती होऊ शकते व्यायाम केल्यामुळे ब्लड सर्कुलेशन हे व्यवस्थित होत राहते शिवाय ते केसांच्या मुलांपर्यंत ही व्यवस्थित होत असते ज्यामुळे केस गळतीची समस्या येत नाही आपले केस हे करण्यात व काळभोर ही राहू शकतात. परंतु अनेकांच्या बाबतीत केस गळतीची समस्या खूप वाढत जाते आणि कालांतराने त्यांचे केसे नाहीसे होतात परिणामी टक्कल पडण्याची शक्यता असते. केस नसल्यामुळे टक्कल पडल्यामुळे अनेक लोक जगण्याची आशा देखील सोडून देत असतात. कारण केसांमुळे आपल्या शरीराचे सौंदर्य खूप वाढत असते आणि व्यक्ती हा देखील आकर्षक दिसत असतो.मित्रांनो जे लोकांना केस गळण्याची खूप समस्या असेल ज्या लोकांना टक्कल पडलेले असेल तर हल्ली असे लोकं हेअर ट्रान्सप्लांट करण्याकडे लक्ष देत असतात. अनेक जण हेअर ट्रान्सप्लांट करत असतात. तर मित्रांनो हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय? ते का करावे? कशासाठी करावे? कुठल्या व्यक्तीने करावे? याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी. तर मित्रांनो आज आपण हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय? व ते कसे करावे? या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय? व ते कसे करावे? या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!
Table of Contents
हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय? व ते कसे करावे?
अनेकांचे केस गळत असतात केस गळतीची समस्या एवढी वाढते की अगदी काहींची तर टक्कल पडत असते. टक्कल पडल्यामुळे, काही व्यक्ती ही जगण्याची आशा सोडून देत असतात. परंतु मित्रांनो आता एक नवीन सर्जरी निघाली आहे ती म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट. हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे, हे कशी प्रक्रिया आहे की ज्या ठिकाणी टक्कल पडलेले असेल तर त्या ठिकाणी केसांची रोप लावली जात असतात म्हणजेच केसांची रोपण केले जात असते. ज्या ठिकाणी विरळ केस आहेत त्या ठिकाणी केसांची रोपण केले जात असते. डोक्यावर ज्या ज्या भागात केस विरळ असतील अथवा ज्या ठिकाणी एकही केस नसेल अशा ठिकाणी केसांचे रोपण केले जात असते.
हेअर ट्रान्सप्लांट करण्याआधी केस स्वच्छ धुऊन घ्यावी लागतात. नंतर जेव्हा केसांची रोपण करायचे असते तेव्हा डॉक्टर भूल देऊन केसांचे प्रत्यारोपण करत असतात. किसन असलेल्या भागावर भूल दिल्यानंतर ब्लेडने अथवा सुईच्या साह्याने चिर पाडून केसांचे रोपण केले जात असते. या सर्जरीमध्ये पेशंटच्या डोक्यावर एका वेळी दीड हजार ते दोन हजार पर्यंत केसांची रोपण केले जात असते मित्रांनो ही प्रक्रिया सहा ते तास चालणारी प्रक्रिया असते. केसांची प्रत्यारोपण करण्यासाठी खूप कालावधी जात असतो तेव्हाच ते केसांचे रोपण हे व्यवस्थित होत असते खाली तर अनेक फसवे डॉक्टरही निघाले आहेत की जे अगदी कमी पैशांमध्ये केसांचे प्रत्यारोपण करण्याचे दावे करत असतात परंतु हे फसवे निघू शकतात. हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी50000 ते 55000 पर्यंत खर्च येत असतो. परंतु फसवे डॉक्टर तुम्हाला 25 ते 30 हजार पर्यंत खर्च सांगून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु फसव्या डॉक्टरांकडे हेअर ट्रान्सप्लांट केल्यामुळे ते दीर्घकाळ टिकत नाही शिवाय, त्यामुळे तुमचेच नुकसान होऊ शकते.
मित्रांनो हेअर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर ज्या ठिकाणी ज्या भागाला हेअर ट्रान्सप्लांट केलेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्टर मलम पट्टी लावून देतात हे मलम पट्टी काही दिवस ते तसेच ठेवण्यासाठी सांगतात. त्याचप्रमाणे तुम्हाला अँटिबायोटिक गोळ्या औषधे दिले जातात. यामुळे तुमच्या वेदना कमी होऊ शकतात. काही लोक तर तीन ते सहा दिवसानंतर लगेच कामावर हजर होत असतात. हेअर ट्रान्सप्लांट चा रिझल्ट हा तुम्हाला सहा ते सात महिन्यानंतर दिसू शकतो काही लोकांना हा रिझल्ट अगदी पाच ते सहा महिन्यांमध्ये देखील दिसून येऊ शकतो. परंतु त्यासाठी तुम्ही गोळ्या औषधे हे वेळोवेळी घेतल्या पाहिजे त्यांची वेळ न चुकवता वेळा पाळल्या पाहिजे.
हेअर ट्रान्सप्लांट कोणी करावे? : Hair Transplant Koni Karave
मित्रांनो, हेअर ट्रान्सप्लांट कोणी करावे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल नाही का? ज्या लोकांना केस गळतीची समस्या ही वारंवार होत असते, काही लोकांनी विविध प्रकारचे उपाय केल्यावरही त्यांची केस गळती थांबत असते आणि काही लोक खूप उपाय करून डॉक्टरांकडे जाऊनही त्यांची केस गळती होतच असते आणि कालांतराने त्यांना टक्कल देखील पडू शकते. तर अशा लोकांनी हेअर ट्रान्सप्लांट केले पाहिजे. जे लोकांना त्यांच्या स्काल्प वर एकही केस दिसत नाही तरी त्यांना काही प्रॉब्लेम नसतो तर अशा लोकांनी त्यांच्या मनावर अवलंबून निर्णय घ्यावेत. परंतु, ज्या लोकांना त्यांच्या डोक्याच्या स्काल्पवर पुन्हा केस हवे असतील, तर असे लोक हेअर ट्रान्सप्लांट करू शकतात.
हेअर ट्रान्सप्लांट केल्यामुळे कुठले दुष्परिणाम होतात का? : Hair Transplantche Dushprinam
हेअर ट्रान्सप्लांट केल्यामुळे काही एवढ्या समस्या उद्भवत नाहीत.हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर काही किरकोळ समस्या उद्भवू शकतात. परंतु, त्या व्यतिरिक्त अजून कोणते दुष्परिणाम होऊ शकतात याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!
- हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर काही दिवस तुम्हाला वेदना होऊ शकतात.
- हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर तुम्हाला डोळ्यांना सूज येऊ शकते.
- हेअर ट्रान्सप्लांट केल्यामुळे स्काल्प हे सुजलेले असते.
- काही वेळेस हेअर ट्रान्सप्लांट केल्यामुळे त्या ठिकाणी जंतुसंसर्ग देखील होण्याची शक्यता असते.
- हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर अनेक वेळा तुम्हाला खास देखील येऊ शकते.
मित्रांनो, हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय? ते कोणी करावे? व हेअर ट्रान्सप्लांट केल्यामुळे कोणत्या प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात? याबद्दल, आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.
धन्यवाद.