लहान बाळाचे कान फुटणे

1
3389
लहान बाळाचे कान फुटणे
लहान बाळाचे कान फुटणे

नमस्कार, मित्रांनो “लहान मुले म्हणजे देवाघरची फुले” ही मन सगळ्यांनाच माहिती आहेत. लहान मुलांमध्ये काही मुले अधिक जिद्दी असतात. तर काही शांत असतात. तसेच काही चिडखोर असतात. त्यांना जे करायचं ते करूनच घेतात. लहान मुलांना सुद्धा शारीरिक त्रास होऊ शकतो. लहान मुलांना व्हायरल इन्फेक्शन हे लवकर प्रमाणात होते. कारण त्यांची प्रतिकारशक्तीही कमी असते. तसेच लहान मुलांना सर्दी-पडसे यासारख्या समस्या भरपूर बघावयास मिळतात. सर्दी-पडसे झाल्यानंतर, लगेच लहान बाळाचे कान फुटणे, यासारख्या समस्या भरपूर प्रमाणात बघावयास मिळतात.

मोठ्यांना बोलून सांगता येते, की मला हा त्रास होतो आहे, पण लहान मुलांना सांगता येत नाही. त्यामुळे ते अगदी कोमेजून जातात. सारखे रडतात. चिडचिड करतात. मग अशावेळी आपणही कनफ्यूज होऊन जातो, की यांना काय झाले असेल, तसेच काही लहान मुलांना सर्दी झाली की, लगेच त्याचा परिणाम त्यांच्या कानावर होऊन, कानातून रक्त येणे, पाणी येणे, यासारख्या समस्या बघावयास मिळतात. त्यामुळे त्यांना डोकेदुखीचा त्रास होत असेल, आपण आज त्याच बाबतीत माहिती जाणून घेणार आहोत, की लहान मुलांचे कान कोणत्या कारणामुळे फुटतात? व त्यावर काय काळजी घ्यावी? व कोणते घरगुती उपाय करावेत? मग जाणून घेऊयात ! 

लहान मुलांचे कान फुटण्याची कारणे ? 

लहान मुलांचे कान फुटण्याची अनेक कारणे आहेत, चला तर मग जाणून घेऊयात ! 

  • जर मुलांना कफ प्रवृत्ती चा त्रास असेल, तर त्यांना कान फुटण्याची या समस्या बघावयास मिळतात. 
  • तसेच बदलत्या वातावरणामुळे, थंड, गरम हवेमुळे लहान मुलांचे कान फुटण्याची समस्या होते. 
  • लहान मुलांना थंड पाणी प्यायला आवडते. आपण जरी नाही सांगितले, तरी ते जिद्दीपणा करून पितातच, त्यामुळे त्यांना सर्दी होते,खोकला येतो व त्यांचे कान फुटतात. 
  • तसेच लहान मुलांना धुळीची ऍलर्जी होऊन, सारखे शिंका येतात व त्या इन्फेक्शन झाल्यामुळे मुलांना कान फुटण्याचे समस्या होतात. 
  • तसेच लहान मुलांना मुका मार लागणे, किंवा कुठेतरी खेळता-खेळता कानावर पडणे, यासारख्या घटनांमुळे मुलांना कान फुटणे, कान वाहणे, यासारख्या समस्या होतात. 
  • काही लहान मुलांना कानात काडी, पेन्सिल किंवा बोट घालायची सवय असते, त्यामुळे त्यांच्या कानाचा पडदा फाटू शकतो. 
  • काही लहान मुलांना गोड पदार्थ जास्त खाण्याची सवय आहे, थंड पाणी जास्त पिण्याची सवय आहे, त्याचा परिणाम त्यांच्या घशावर होतो, आणि त्यांचे टॉन्सिल्स वाढल्यामुळे, त्याचा परिणाम कानावरही होतो व कानाचा पडदा त्यातून रक्त येते, पु येतो यासारख्या समस्या बघायला मिळतात. 
वाचा  प्रसूती म्हणजे काय जाणून घेऊया

लहान मुलांचे कान फुटल्यास त्यांची लक्षणे ? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये लहान मुलांचा कान कोणत्या कारणामुळे फुटू शकतात, हे आम्ही तुम्हाला सांगितले आहेत. आता त्याची काही लक्षणे जाणून घेऊयात ! 

  • ज्यावेळी लहान मुलांचे कान वाहतात, त्यावेळी कान सुजतो. 
  • त्यांना सर्दी पडसे होते. 
  • काही मुलांच्या घशातही दुखते. 
  • काही लहान मुलांना डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. 
  • तसेच काही मुलांना ताप येऊ शकतो. 
  • ज्यावेळी लहान बाळाचे कान फुटणे सारख्या समस्या उद्भवतात, त्यावेळी कानातून चिकट असा, पिवळसर द्रव्य पदार्थ बाहेर निघतो. 
  • त्यांच्या कानात सारखा आवाज झाल्यासारखे जाणवते. 
  • काही वेळेस त्यांचा कान ठणकतो. 
  • व यासाऱ्या गोष्टींमुळे, त्यांची सारखी चिडचिड होते, जेवण करत नाही, कशातही मन लागत नाही. 

लहान मुलांचे कान वाहत असेल, तर त्यावर काही घरगुती उपाय ! 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही लहान मुलांचे कान कोणत्या कारणामुळे फुटतात,  तसेच त्याची लक्षणे दिलेले आहेत, आता त्याच्यावर काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात. 

लसुन चा तेलाचा वापर करून बघा :

जर लहान मुलांचा कान दुखत असेल, ठणकत असेल, अशावेळी तुम्ही लसुन चा तेलाचा वापर करून बघा. त्यासाठी लहान मुलांच्या कानाच्या आजूबाजूला लसुन चे तेल कापसाच्या बोळाच्या साह्याने लावावेत, त्यामुळे कानावरील सूज व ठणक हळूहळू बंद होते. तेल कानात जाता कामा नये. याची काळजी घ्यावी. कारण इन्फेक्शन झाल्यास कानाच्या पडद्याला छिद्र पडल्यास, ते तेल आत मध्ये जाऊन अजून इन्फेक्शन वाढू शकते. त्यामुळे कानातील टाकू नका, कानाच्या आजूबाजूला तेल फक्त लावा. 

बाळाचा कान गरम पाण्याच्या पिशवीने शेका :

बऱ्याच वेळेला लहान बाळाच्या कानाला सूज येते, ठणकतो दुखतो, अशावेळी जर तुम्ही गरम पाण्याच्या पिशवीने बाळाच्या कानाचे आजूबाजूचा भाग शेकला, तर त्यावर त्यांना आराम मिळतो व ठणक येण्याचा त्रास कमी होतो. 

वाचा  वारंवार भूक लागणे या समस्येची करणे व त्याचे दुष्परिणाम

खोबरेल तेलाचा वापर करू शकतात :

बऱ्याच वेळेला लहान बाळाचा कानात मळ असल्यामुळे, दुखतो. अशावेळी जर तुम्ही खोबरेल तेलाचा वापर केला, तर त्यावर तुम्हाला फायदा मिळेल. जर कानात मळ असेल, तरच खोबरे तेलाचे दोन थेंब कानात टाकावेत. अथवा कानातून पू पाणी येत असल्यास टाकू नये. त्याने मळ भिजून बाहेर निघण्यास, मदत महत्व कानाचे ठणक जाते, आणि जर कानातून पू आणि पाणी येत असेल, तर खोबरेल तेलाचा वापर करू नका. त्याने इन्फेक्शन अजून वाढू शकते. 

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कानात कोणतेही तेल टाकू नका :

हो, खूप काही जणांना सवय असते, घरच्याघरी काहीही उपचार करून, बाळाच्या कानात तेल टाकतात, किंवा पानांचा रस टाकतात, पण तसे करू नका. कानातून पू आणि पाणी येत असेल, म्हणजेच कानाच्या पडद्याला छिद्र पडले आहेत,असे असते. अशावेळी जर तुम्ही कानात काहीही तेल पाणी टाकले, तर ते छिद्रातून कानाच्या आतील भागात जाऊन, कानामध्ये बुरशी सारख्या समस्या अजून, उद्भवू शकतात. अशा वेळी तुम्ही तसे करू नका. 

डॉक्टरांना कोणत्या वेळी दाखवावे ? 

बरेचदा पालकांची अशी सवय असते, की कान दुखला, की लगेच घरगुती औषधे बाळाच्या कानात टाकतात. पण तसे करू नका, कारण कानाचे दुखणे ही अतिशय नाजूक असते. तसेच कानाचा संबंध मेंदूशी असतो. जर तुम्ही बाळाच्या कानात काही टाकले, तर तर त्यांना मेंदुज्वर होण्याची शक्यता असते. तसेच मेंदूला सूज ही येऊ शकते. तसेच कानातून सारखे पाणी आल्यास, बाळाला अशक्तपणा जाणवतो, चक्कर आल्यासारखे वाटते, अशावेळी तुम्ही बाळाला बालरोगतज्ञ कडे, तसेच नाक- कान -घसा तज्ञांकडे न्यावेत. त्यावेळी डॉक्टर बाळाची वेळीच उपचार करून, त्यांना औषधी देतील, तसेच त्या उपचारानंतरही डॉक्टर त्यांना कानात टाकायचे ड्रॉप्स देतील. 

कानातून पाणी येत असल्यास, काय काळजी घ्यावी ? 

लहान बाळाच्या कानातून पाणी येत असल्यास, काय काळजी घ्यावी ते जाणून घेऊया ! 

  • जर लहान बाळाच्या कानातून सारखे पाणी येत असेल, तर कान स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यावेत. तसेच कान सुजला असल्यास, त्याला खोबरेल तेलाने स्वच्छ पुसून घ्यावे. 
  • तसेच लहान बाळाच्या कानाला शेक द्यावेत. त्याने कानावर दुखीवर आराम मिळतो. 
  • लहान बाळाला जर बाहेर घेऊन जायचे असेल, तर त्यांच्या कानाला रुमाल बांधावा. कारण की बाहेरचे धुळीचे कण कानामध्ये जाऊन, अजून इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. 
  • डॉक्टरांच्या सल्याशिवाय कोणतेही औषध, तसेच तेल किंवा द्रव्य पदार्थ, कानात टाकू नका. त्यामुळे कानाला अजून इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. 
  • बाळाचे कान वाहत असल्यास, त्यांना थंड पदार्थ देणे, शक्यतो टाळावेत. 
  • तसेच लहान बाळाला शांत झोपू द्या. व आराम करू द्यावा. त्याने त्यांना बरे वाटते. 
वाचा  मनातली भीती घालवण्यासाठी काय करावे

 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला लहान बाळाचे कान फुटणे ,त्यावर कोणतेही घरगुती उपाय व त्यावर काय काळजी घ्यावी, हे तुम्हाला सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

धन्यवाद !

1 COMMENT

  1. mazi mulgi 3 mhinyachi aahe…….aani tichya kanatun Pani yet aahe mala sarkh…….. doctor ni drop dila aahe pn trihi MLA khup kalji vatat aahe………

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here