नाभी सरकणे उपाय

0
1542
नाभी सरकणे उपाय
नाभी सरकणे उपाय

नमस्कार, मित्रांनो आज आपण बघणार आहोत नाभी सरकणे व त्यावर काही उपाय आपल्या शरीराचे अवयव इतके महत्त्वाचे असतात, की त्याला थोडीशी इजा झाली, तर आपल्याला खूप त्रास होतो. मग ते मार लागणे, मुके दुखणे, पडणे, खेळताना लागणे, तसेच पायात काटा जाणे, होय! असे भरपूर काही कारण असतात, जेव्हा आपल्या शरीराला इजा झाली की, आपल्याला खूप त्रास होतो. तसेच आपल्या शरीराचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे आपले पोट होय, आपल्या पोटात काही बिघाड झाला, की आपले सगळंच लक्ष त्यावर विचलित होऊन जातंय, तसेच आपल्या पोटातील केंद्रबिंदू आपली नाभी आहे. नाभी ही आपल्या शरीराच्या संतुलनावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. आपल्या शरीराचा मुख्य केंद्रबिंदु आहे, आणि नाभीला काही इजा झाली, तर आपल्याला तीव्र त्रास होतो. खूप दुखते, वेदना होतात. त्यामध्ये आपण आज हाच मुद्दा बघणार आहोत, की नाभी सरकणे म्हणजे काय? व त्यावर काही माहिती जाणून घेणार आहोतच, चला तर मग जाणून घेऊयात! 

नाभी कोणत्या कारणांमुळे सरकते?

मित्रांनो नाभीही बर्‍याच कारणांनी सरकू शकते, व ती नेमकी कोणती? चला तर मग जाणून घेऊयात! 

  • नाभी सरकण्याचे मुख्य कारण म्हणजे, तुम्ही अति जड सामान पकडणे, जर तुम्ही जड सामान पकडून जास्त वेळ उभे असाल, तर तुमच्या पोटाची नाभी सरकते. 
  • तसेच तुम्ही जास्तीत जास्त पायऱ्यांचा चढउतार केला, त्यामध्ये थकवा आल्यामुळे पोटाला जास्त ताण गेल्यामुळे नाभी सरकू शकते. 
  • जर तुम्ही जास्ती व्यायाम करत असणार आणि त्यात अचानक जास्त जड वस्तू उचलण्याचा प्रसंग आला, तर नाभी सरकू शकते. 
  • तसेच जर तुम्ही एकाच पायावर जोर देऊन जास्त वेळ उभे राहिले असाल, तर तुमची नाभी सरकू शकते. 
  • नाभी सरकायला अजून बरेच कारण आहेत, जसे की अचानक वाकणे, अचानक उठणे, अचानक धावपळ करणे, यासारख्या कारणांमुळे ही नाभी सरकू शकते. 
  • तसेच काही जणांना तिखट मसालेदार पदार्थ जास्त खाण्याची सवय असते, त्यामुळे पोटात आग होते, शिवाय त्यांची नाभी सरकू शकते. 
वाचा  झोपेत श्वास घेण्यास त्रास का होतो? कारणे आणि लक्षणे

नाभी सरकल्यास त्याची लक्षणे?

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला नाभी सरकण्याची कारणे दिलेली आहेत, आता त्यावर ची लक्षणे जाणून घेऊयात. 

  • नाभी सरकल्यास तुम्हाला पोटात तीव्र वेदना होतात. 
  • तसेच काही जणांना मळमळल्यासारखे वाटते. 
  • तसेच आजूबाजूला वळताना पोटात जाम दुखते. 
  • बेचैनी असल्यासारखे वाटते, घाम येतो. 
  • तसेच काही जणांना जुलाब होतात. 
  • तसेच काही जणांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. 
  • तसेच काही महिलांची नाभी सरकल्यावर त्यांची मासिक पाळी अनियमित येऊ शकते. 

नाभी सरकल्यावर काही घरगुती उपाय

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आपण नाभी सरकल्यावर, त्याची लक्षणे व कारणे जाणून घेतलेली आहेतच, आता त्यावर काही उपाय जाणून घेऊयात! 

बडीशोप चा वापर करून बघा

मित्रांनो नाभी सरकली, की पोटात खूप दुखते. तीव्र वेदना होतात, जुलाब होतात, कोणाला मळमळ होते, यावेळी त्यांनी बडीशोप चा वापर करायला हवा. कारण या साऱ्या गोष्टींमुळे अशक्तपणा येतो, थकवा येतो त्यासाठी

  • तुम्ही बडिशोप ची पावडर एक चमचा व गूळ अर्धा चमचा हे मिश्रण एकजीव करून, ते पाणी दिवसातून तीन वेळेस प्याल, तर त्याने तुम्हाला या सारख्या समस्येवर आराम मिळेल.

तेलाने मसाज करा

हो, नाभी सरकल्यास, तेलाने मसाज केली, की तुम्हाला शंभर टक्के फायदा मिळेल. कारण नाभी सरकल्यावर तेल हे एकमेव कारण आहे. जे नाभी जागेवर आणण्यास मदत करते.

  • त्यासाठी तुम्हाला खोबरेल तेल, तीळ तेल, राईचे तेल, आवळा तेल यापैकी कोणतेही तेल घ्यायचे आहे, व त्याने तुमच्या बेंबीच्या आजूबाजूच्या भागावर मसाज करायची आहे, आणि दिवसातून तीन ते चार वेळेस तुम्ही योग्यरीत्या मसाज केली, तर तुमची नाभी जागेवर येईल व तुम्हाला त्रास कमी होईल.

गुळाचा वापर करा

नाभी सरकल्यावर गुळाचा वापर करावा, कारण अशावेळी जर तुम्ही हलका आहार घेतला, तर तुम्हाला फायदा होईल तसेच गूळ हा पाचक असतो, नाभी सरकल्यावर तुम्ही आहारात गुळाचा समावेश करायला हवा. तसेच तुम्ही डाळ खिचडी त्यामध्ये गूळ टाकून खाल्ल्यास तुम्हाला पोटात अन्नपदार्थ हे एकदम हलके हलके वाटेल, शिवाय नाभी जागेवर येण्यास मदत होईल. 

वाचा  मन शांत ठेवण्यासाठी काय करावे या समस्येवर वेगवेगळे उपाय :-

कोरा चहा प्या

हो, नाभी सरकल्यावर खूप जणांना जुलाब होतात, मळमळ वाटते, थकल्यासारखे वाटते, अशा वेळी त्यांनी काळा चहा प्यायला हवा. त्यामध्ये त्यांनी लिंबूचा रस टाकला, तरी चालेल, काळा चहा पिल्याने पोटाला आतून शेक मिळतो व नाभी जागेवर येण्यास मदत मिळते. 

व्यायाम करा

आता तुम्ही म्हणाल, अगोदरच नाभी सरकलेली आहे, पोटात दुखत आहे, आणि आम्ही तुम्हाला व्यायाम करायला सांगतोय, तर खरच! व्यायाम केल्याने तुम्हाला खूप फायदा मिळेल. जर तुमची नाभी सरकली, अशा वेळी तुम्ही योग्य व्यायाम केले, तर नाभी जागेवर येण्यास मदत मिळते. तसेच त्यासाठी तुम्ही दोरीवरच्या उड्या खेळा, तसेच तुम्ही धनुरासन, पद्मासन, मत्स्यासन, नौकासन तसेच तुम्ही मकरासन, भुजंगासन, वज्रासन यासारखे व्यायाम करू शकतात. हे व्यायाम तुम्हाला कुठेही मोबाइलवर, तसेच गुगलवर, युट्युबवर मिळतीलच, त्याप्रमाणे त्यांच्या सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे व्यायाम करायचे आहेत. हे व्यायाम केल्याने तुमची सरकलेली नाभी जागेवर येण्यास मदत मिळते. 

 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला, तुमची नाभी कोणत्या कारणांमुळे सरकते, तसेच त्यावर ची लक्षणे व त्यावर काही घरगुती उपाय सांगितले आहेत. तसेच आम्ही सांगितलेले, घरगुती उपाय करूनही जर तुम्हाला फरक वाटत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकतात. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

धन्यवाद

नाभी मध्ये तेल टाकण्याचे फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here