नमस्कार मित्रांनो तांब्याचे भांडे चे पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. तुम्ही बघितले असेल पूर्वीच्या काळी घरांमध्ये घागर, तांब्याचा हंडा, तांब्याची कळशी, तसेच तांब्याचा रांजण, या गोष्टी असायच्या, अगदी पूर्वीच्या काळी तांब्या-पितळेच्या वस्तू सगळे वापरायचे. तसेच ते तांब्याचे भांडे आणि पितळ चे भांडे अगदी चकचकीत करायचे. ते हे भांडे नियमित घासायचे. त्यामुळे त्याला चकाकी राहायची. पण हल्लीच्या काळात तांब्या-पितळाची भांडी घ्यायला, आपण नाही म्हणतो. त्याला घासायचं कष्ट पुरते त्यामुळे आपण घेत नाही. पण जर तुम्ही निंबु व चिंचेचा कोळच्या साह्याने तांबे पितळाचे भांडे घासले, तर त्यांना चकाकी ही येते आणि त्यावर लवकर डाग पडत नाही. पण आताच्या वेळी त्या गोष्टी हळू कमी होत गेलेले आहे. आता स्टीलचे भांडे, नॉनस्टिक भांडी, एल्युमिनियम ची भांडी, तसेच काचेची पॉट, यासारख्या गोष्टी वापरात जास्त दिसायला लागल्या आहेत. हल्ली आता तांब्याला सोन्याचा भाव झालाय जसा आता महाग झाला आहे. कारण त्याचे गुणधर्म फार फायदेशीर असतात. आता हळू बदलत्या काळानुसार काहीजण तांब्याच्या भांड्याचे पाणी पितात. काही जण अजूनही पूर्वीपासून तांब्याचे भांडे वापरतात. तांब्याचा नवीन प्रकारचा तांब्याचा मटका तसेच तांब्याचे बॉटल्स, जग निघाले आहेत. त्याला ग्लास सहित तुम्हाला ऑनलाईन बाजारात कुठेही मिळेल. या भांड्याचे पाणी पिण्याचे खूप सारे फायदे आहेत. पण काही जणांना त्याचे फायदे माहीत नसतात. तर आपण आज याच बाबतीत जाणून घेणार आहोत, की तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने तुमच्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात? चला तर मग जाणून घेऊयात!
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे नेमके कोणकोणते?
मित्रांनो, तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने तुम्हाला खूप सारे फायदे होतात. तर मग ते नेमके कोणते? चला तर जाणून घेऊयात.
- तुमच्या पोटाच्या विकारासाठी फायदेशीर ठरते:
हो तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित विकार म्हणजेच ऍसिडिटी, गॅस, अपचन, अजीर्ण या सारख्या समस्या असतील तर त्या वर आराम मिळतो. तसेच तुमच्या पोटामध्ये आग होत असेल जळजळ होत असेल, तर हे पाणी पिल्याने, तुम्हाला फायदे होतात. त्यासाठी तुम्हाला रात्रभर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे व सकाळी ते घोट घोट पीत रहावे. त्यामुळे तुम्हाला पचनाची संबंधित तक्रारी दूर होतात. शिवाय पोटाच्या विकारा वर आराम मिळतो.
- तुमचे वजन कमी होण्यास फायदेशीर ठरते:
सतत बैठे काम व्यायामाचा अभाव जागरण, पुरेशी झोप न होणे, अवेळी खाणे, तसेच मैद्याचे, तेलकट, बेकरी पदार्थ खाणे, त्यामुळे वजन वाढीचे समस्या भरपूर बघावयास मिळतात. अशावेळी जर त्यांनी तांब्याच्या भांड्याचे पाणी पिले, तर त्यांना खूप सारे फायदे होतील. कारण या भांड्यातील पाणी पिल्याने तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी ही कमी होते. शिवाय त्यामध्ये अँटी-इंफ्लामेंटरी गुणधर्म असल्यामुळे, शरीरातील पचनक्रिया सुरळीत होते. त्यामुळे तुम्ही रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे व सकाळी उठल्यावर ते उपाशीपोटी प्यावे. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते.
- कर्करोगाचा धोका टळतो:
मित्रांनो जर तुम्ही रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवले व सकाळी पिले तर त्यामध्ये ऑंटी बॅक्टेरियल तसेच अँटीऑक्सिडेन्ट, गुणधर्म तयार होतात. त्यामुळे शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशी जागृत होण्यापासून ते लढा देतात. त्यामुळे तुम्ही जर नियमित हे पाणी पिले, तर तुम्हाला कर्करोगाचा धोका टळतो.
- शरीराची शुद्धी होते:
हो जर तुम्ही तांब्याच्या भांड्याचे पाणी नियमित पिले, तर तुमचे शरीर शुद्ध होण्यास मदत मिळते. एक प्रकारे तुमचं शरीर डिटॉक्स होते. शरीरातील सगळी घाण बाहेर निघते. त्यासाठी तुम्हाला रात्रभर तांब्याच्या भांड्यातील पाणी भरून ठेवावे व ते दिवसा प्यावे. त्यामुळे तुमचे शरीर शुद्ध होते व तुम्ही निरोगी राहण्यास मदत मिळते. कारण त्यामध्ये अँटीऑक्सिडेन्ट गुणधर्म तयार होतात. त्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास चालना मिळते.
- थायरॉइडचा धोका टळतो:
तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्यामुळे त्याच्यात खनिजांचा मुबलक स्त्रोत होतो. तो आपल्या शरीरासाठी व घशातील ग्रंथीसाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे तुम्हाला थायरॉइडचा धोका हा टळतो, तांब्याच्या तांब्या मधील पाणी पिल्यामुळे तुमच्या थायरॉइड ग्रंथी या तयार होत नाही.
- चेहऱ्यावर सुरकुत्यांचे प्रमाण येत नाही:
हल्ली बदलत्या वातावरणामुळे तसेच ताण- तणाव, टेन्शन यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर दिसायला लागलेले आहेत. अशा वेळी जर तुम्ही नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी पिले तर ते प्रमाण कमी होते. तांब्याच्या भांड्यामध्ये अँटीऑक्सिडेन्ट चे गुणधर्म तयार होतात. त्यामुळे तुम्हाला वृद्धत्वाची लक्षणे लवकर जाणवत नाहीत. शिवाय तुमची स्किन तेजस्वी दिसण्यास मदत मिळते. त्यासाठी तुम्ही नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी पिले, तर हे फायदे तुम्हाला नक्की होतात.
- सर्दी कप सारखे समस्येवर आराम मिळतो:
नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यामुळे तुम्हाला सर्दी- पडसे, कफ यासारख्या त्रासावर आराम मिळू शकतो. त्यासाठी तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला रात्री तुळशीची पाने टाकून ठेवावीत व सकाळी उपाशीपोटी पिल्याने, तुम्हाला कफ प्रवृत्ती सर्दीचा त्रास असेल तर तो जाण्यास मदत मिळते.
- हृदयाशी संबंधित तक्रारी दूर होतात:
मित्रांनो अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यामुळे, तुमच्या हृदयसंबंधित तक्रारी दूर होतात. हल्ली वाढत्या ताणतणावांमुळे टेंशनमुळे तुमच्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा त्रास संभवतो. अशा वेळी जर तुम्ही नियमित हे पाणी पिले तर तुम्हाला यासारख्या गोष्टी टळतात, या भांड्यातील पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल सुरळीत राहते. तुमचे हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. शिवाय शरीरातील घाण डिटॉक्स होते. त्यामुळे सुदृढ राहण्यासाठी मदत मिळते.
- ॲनिमियाचा त्रास कमी होतो:
मित्रांनो तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यामुळे ॲनिमियाचा त्रास हा कमी होतो. ॲनिमिया चा त्रास म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता येणे, थकवा येणे, अशक्तपणा जाणवणे, तसेच शरीर थरथर करणे, या साऱ्या गोष्टी असतात. अशा वेळी जर तुम्ही हे पाणी पिले तर तुम्हाला ॲनिमियाचा त्रास कमी होतो. कारण तांब्याच्या भांड्याचे पाण्यामध्ये लोहाचे प्रमाण असते. ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. लोहाचे प्रमाण असल्यामुळे आपल्या शरीरात रक्त पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळते.
- तुमच्या त्वचेसाठी व केसांसाठी फायदेशीर राहते:
तांब्याच्या भांड्यातील पाणी हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. त्यामध्ये आणखी ऑक्सिडेन्टचे प्रमाण असते. तसेच त्यांचे अँटी बॅक्टरियल गुणधर्म त्यामध्ये तयार होतात. तसेच जर तुम्हाला तुमच्या सौंदर्यासाठी हे पाणी पिले तर तुम्हाला फायदे होतील. जर तुमची त्वचा रुक्ष असेल, तर तीही कमी होण्यास मदत मिळते. शिवाय केस गळतीची समस्या असतील तर त्याही थांबण्यास मदत मिळते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने होणारे तोटे?
सहसा तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यामुळे, आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. फक्त तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताना ही काळजी घ्यावी.
- तांब्याच्या भांड्याचे हे स्वच्छ असावे.
- तांब्याच्या भांड्यात हे नियमित घासले नाही तर त्यावर कॉपरची वर येते, त्यामुळे त्या पाण्यामधील गुणधर्म आपल्या शरीराला मिळत नाही.
- तसेच तांब्याच्या भांड्याचा जग किंवा ग्लास हा जमीनीवर ठेवता कामा नये. तो तुम्ही टेबलवर कपाटावर किंवा डायनिंग टेबलवर अशा जागी ठेवावे.
चला, तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यामुळे, तुमच्या शरीरात कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात, ते सांगितले आहेत. तसेच आम्ही सांगितलेली माहिती, तुम्हाला आवडली असेल व आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत.
धन्यवाद