नमस्कार, घर म्हणजे सगळ्यांचे स्वप्न असते. प्रत्येकाला वाटते की, आपले एक घर असावे, छोटेसे का होईना पण स्वतःचे असावे. तसेच त्या घरामध्ये वस्तू अशा ठेवाव्यात, तशा ठेवाव्यात, हे प्रत्येकाचे स्वप्न असतात. त्यानुसार आपण ती पूर्णही करतो, पण वास्तुशास्त्रानुसार केले, तर तुम्हाला अजून सुख समाधान त्यामध्ये मिळते. पण हल्लीच्या, जागेअभावी बिल्डींग अपार्टमेंट मध्ये आपल्याला दिशाही समजत नाही, आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचे सामान वापरले, तेही समजत नाही.
आपण आपले घर योग्यरीत्या घ्यायला हवे, आणि नाहीच जमले, तर वास्तुशास्त्रानुसार काही तोडगे ही वापरायला हवेत. आज आपण बघणार आहोत, की वास्तुशास्त्रानुसार घराचा उंबरठा कसा असावा? चला तर मग जाणून घेऊयात.
Table of Contents
उंबरठा म्हणजे काय?
आता वास्तूशास्त्राचा आणि या उंबरठ्याच्या काय संबंध असेल बर? तर उंबरंबरठा म्हणजे दरवाजाच्या आतून इंट्री करताना, पायाखाली येणारी लाकडाची कमान म्हणजे, उंबरठा होय. ज्याला आपण ओलांडून येतो, त्याला उंबरठा असे म्हणतात. पूर्वीच्या काळापासून उंबरठा हा पुजला जात आहे. कोणतेही सणवार असो दिवाळी, लग्नसमारंभ, पोळा, यासारख्या सणांमध्ये उंबरठा हा पुजला जातो.
पूर्वीच्या काळाच्या लोकांच्या म्हणण्यानुसार, जर तुमचा उंबरठा चांगला पुजला गेला, तर तुमच्या घरात सुख-समृद्धी भरभरून राहते. ऐश्वर्या लागते. तसेच बाहेरील नकारात्मक विचार आपल्या घरात येत नाही, असे म्हणतात. तसेच पूर्वीचे काही लोक उंबरठा मातीची थोडी उंच अशी चपटी, पट्टी बनवायचे, व तिला शेणाने सारवायचे, आणि तिची पूजा करायचे. पण आता लाकडी उंबरठे असतात. ते लाकडी सागवानी तयार करून, त्याला गोमूत्र अर्काने व गंगाजल ने पुसून, त्यावर गोपद्म व पादुका लावून, त्याची पूजा करून, घरात गृहप्रवेश करतात. तसेच आपल्या घरात कोणाचीही एन्ट्री होते, कोणीही बाहेरचे आपल्या घरी येतात, तेव्हा त्यांच्या डोक्यात व मनात कोणत्या प्रकारचे विचार चालू असतात, हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे आपल्या घरात नकारात्मक, ऊर्जेचा प्रवेश होतो. आणि घरात कटकटी, चिडचिड, भांडणे, संपत्तीची कमतरता, यासारख्या घटना घडू शकतात. त्यासाठी जर आपण उंबरठा चांगल्या प्रकारे, योग्य रित्या दरवाजात लावला, तर आपल्या घरात बाहेरील नकारात्मक विचार घरात प्रवेश करत नाही. एक प्रकारे तुम्ही त्याला सुरक्षारक्षक, असेही म्हणू शकतात.
आपल्या घराच्या दरवाज्याचा उंबरठा चांगल्या योग्य पद्धतीने आपण लावला, तर आपल्या घरात सुख-समाधान नांदू शकते. तर उंबरठा कसा व कुठल्या दिशेला लावावा, ते जाणून घेऊयात.
उंबरठा कोणत्या लाकडाचा असावा?
घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये, व तुमच्या घरात सुख समाधान शांती लाभदायक असावी, यासाठी मुख्य दरवाजाला उंबरठा बसवणे, महत्त्वाचे आहे. आता बिल्डींग मध्ये आपारमेंट मध्ये कुठेही घर घेताना, उंबरठा आपण आपल्या मर्जीने बसवावा, मग तो कसा ते जाणून घेऊयात!
- घराचा उंबरठा हा सागवानी लाकडाचा असावा.
- घराचा उंबरठा घेताना काळा रंगाचा नसावा.
- तसेच घराचा उंबरठा हा मार्बल, सलमाईकचे, ग्रॅनाईट, किंवा जंगली लाकडे, तसेच बांबूचे लाकडांचा नसावा.
- घरात प्रवेश करताना, तुम्ही जी पायपुसणी किंवा पायदान ठेवतात, त्याचा कलर हिरवा, पिवळा, निळा व क्रिम कलर राहिला, तर अतिउत्तम, कारण ते रंग घरासाठी चांगले संकेत देतात.
- उंबरठ्याच्या बाहेर चप्पल उलट्या पडू देऊ नये, म्हणजे घरात त्यांचे शुभ संकेत नसतात, चप्पल काढताना नेहमी दरवाज्याच्या साईडला ठेवायची, दरवाजासमोर नसावी, याची काळजी घ्यावी.
- उंबरठ्यावर पाय ठेवून येऊ नये.
- घराचा मुख्य दरवाजा हा सागवानी असावा.
- घराच्या दरवाजाला ही लाइटवेट कलर असावेत, काळा रंगाचा दरवाजा नसावा.
- तसेच घरात एंट्री करताना डोअरबेल ही मधुर आवाजाची असावी, कर्कश आवाजाची नसावी.
- तसेच काही लोक घोड्याची नाल ही उंबरठ्यावर लावतात, तर ती तशी लावू नका. ती नेहमी दरवाजाच्या वर, लावू शकतात.
उंबरठा कुठल्या दिशेला असावा?
उंबरठा लावताना मुख्य दरवाजाला एन्ट्री करताना लावा. जेणेकरून बाहेरून कोणी येईल, तर ते ओलांडून येतील. दरवाजा म्हणजे घराचा मुख्य दरवाजा, हा नेहमी पूर्व-पश्चिम तसेच उत्तरेला, ईशान्येला असावा. मुख्य दरवाजा हा दक्षिणेला नसावा, आणि जर तुमच्या जागेअभावी किंवा बजेट अभावी, जर तुमचा दरवाजा हा दक्षिण मुखी असला, तर तुम्ही भिंतीच्या वर पंचमुखी हनुमानाची तसबीर लावावी.
ज्याप्रमाणे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा असतो, त्याचप्रमाणे दरवाजावर उंबरठा असावा तो नेहमी पूर्व, पश्चिम, उत्तर, ईशान्य, वायव्येस असावा. दक्षिण दिशेला नसावा.
वास्तुशास्त्रानुसार घरात कसे वागावे?
आज आम्ही तुम्हाला घराचा उंबरठा कसा व कोणत्या दिशेला व कोणत्या लाकडा पासून असावा, हे सांगितलेले आहे. तसेच घरात सुखशांती यावी, म्हणून उंबरठ्याला कोणता कलर द्यावा, हे ही सांगितले आहे. जर तुम्हाला घरात सुख शांती समाधान हवे असेल, अशावेळी जर तुम्ही काही नियम पाळले, तर तुमच घरा सुख शांती समृद्धी ने भरेल. घरात शांतचित्ताने बोलावे, कर्कश आवाजा करून बोलू नये तसेच घरात वागताना कोणाशी चिडून बोलू नये, घरात सहसा भांडणे करणे हे टाळावे, आणि घरात सकारात्मक बोलने असावेत. घरामध्ये कधीही नकारात्मक बोलने नसावेत. कारण घरात तुम्ही जे बोलतात, त्यावर तुमची वास्तू ही तथास्तु म्हणते. म्हणून घरात कधीही शुभ बोलावे, तसेच घरात सुख, शांती, समाधान, असण्यासाठी जर तुम्ही घरातल्या बाथरूमच्या खिडकीमध्ये मिठाचे खडे, एका वाटीमध्ये ठेवावेत. आणि ते दर अमावस्या व पौर्णिमेला बदलावेत. त्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर निघेल. तसेच संध्याकाळच्या वेळी तुम्ही घरात देवाजवळ दिवा लावतात, तेव्हा तुळशीजवळ आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर उदबत्ती लावावी. त्याने घरात प्रसन्न वातावरण राहते, आणि घर हसत खेळत राहते. असे काही साधे सोपे नियम आहेत, ते आपण करायला हवेत.
चला, तर आज आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की उंबरठा म्हणजे काय, तसेच घरात उंबरठा कसा व कोणत्या दिशेला लावावा, व कोणत्या लाकडापासून लावावा. हे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका असेल, तर तुम्ही एखाद्या वास्तुशास्त्रज्ञ ला त्याबद्दल विचारू शकतात. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, काही तुम्हाला शंका-कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे.
धन्यवाद