डिलिव्हरी नंतर घ्यावयाची काळजी

0
1048
डिलिव्हरी नंतर घ्यावयाची काळजी
डिलिव्हरी नंतर घ्यावयाची काळजी

डिलिव्हरी नंतर घ्यावयाची काळजी

नमस्कार, मैत्रिणींनो मातृत्व म्हणजे एका आईचा दुसरा जन्म होय. ज्यावेळी एखादी महिलेची डिलिव्हरी होते. त्यावेळी तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात होते. कारण तिचा परिवार हा परिपूर्ण होतो. डिलिव्हरी नंतर  बाळंतिणीची आरोग्याची काळजी घेणे, फार महत्त्वाचे असते. कारण तिचा नवा जन्म झालेला असतो. त्यामध्ये ती फार कमजोर असते. अशक्त असते. प्रसूतीच्या वेदनांनी ती गहाळ झालेली असते. अशक्त असल्यामुळे ती फार कमकुवत होऊन जाते, आणि त्यात तिला बाळाला बघायला फार कष्ट पुरते. कारण डिलिव्हरी नंतर बाळंतिणीचे ४० ते ४५ दिवस आरोग्य जपणे, फार महत्त्वाचे असते. तसेच त्यात आपण तिचा आहार, तिला योग्य खानपान, तिच्या औषधी, तसेच तिच्या टाक्यांची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. तर अशावेळी आपण बाळंतिणीची कोणती काळजी घ्यावी ? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊया, की डिलिव्हरी नंतर बाळंतिणीची कोणती व कशा प्रकारे काळजी घ्यावी.

डिलिव्हरी नंतर कोणती काळजी घ्यावी? 

बाळंतिणीची खूप काळजी घ्यावी लागते. ती नेमकी कोणती, ती आज आपण जाणून घेऊयात.

डिलिव्हरी चे दोन प्रकार असतात. एक नॉर्मल डिलिव्हरी आणि  दुसरी सिजेरियन डिलीवरी होय. पण दोघं डिलिव्हरी नंतर बाळंतीणीची योग्य ती काळजी घ्यावी लागते. जसे की पहिले दोन दिवस ती अशक्त असते, तिला झोपूनच तिथल्यातिथे उठून थोडा आहार द्यावा लागतो. डिलिव्हरी नंतर चार ते पाच दिवसानंतर त्यांना हळू चालता फिरता येते. अशावेळी त्यांनी जास्त चाल करायची नाही, तसेच त्यांनी जास्तीत जास्त आराम करायला हवा. 

वाचा  डिलिव्हरी नंतर काय खावे?

कारण डिलिव्हरी नंतर महिला या अशक्त होऊन जातात. अशा वेळी त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी, तसेच त्यांच्यावर आपण पुरेसे लक्ष द्यायला हवे. कारण डिलिव्हरीनंतर आई आणि बाळा या दोघांना जपणे फार महत्त्वाचे असते. तसेच अजून ज्यांनी काय करायला हवे? ते आपण जाणून घेणार आहोत. 

टाक्यांची स्वच्छता ठेवावी :

डिलिव्हरीच्या वेळी महिलेला टाके येतात, अशा वेळी त्यांना त्यांची योग्य काळजी घ्यायला हवी. डॉक्टरांनी दिलेले मलम त्यांनी टाक्यांना व्यवस्थित रित्या लावायला हवेत. तसेच त्यांनी सकाळ व संध्याकाळ दोन टाईम डेटॉल चे थेंब पाण्यात टाकून, त्या पाण्यात बसायला हवेत. खासकरून ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे, अशा महिलांनी ही काळजी घ्यायची आहे. 

तसेच त्यांचे सिजेरियन झाले आहे, त्यांना टाक्यांना तर पट्टी काढल्यावर, त्यांना टाक्यांना डॉक्टरांनी दिलेला मलम लावायचा आहे. तसेच त्यांनी त्यांची टाके स्वच्छ ठेवावे. 

जड वस्तू उचलायचे नाही :

डिलीवरी झाल्यावर बाळंतिणी ला टाके येतात. अशावेळी त्यांनी त्यांच्या टाक्यांची काळजी घ्यायला हवी. अशावेळी त्यांनी जास्त जड वस्तू उचलायच्या नाहीय, कारण त्याने तुमचे टाक्यांना ताण पडून टाके तुटून जाण्याची शक्‍यता असते. तसेच त्यातून रक्त येण्याची शक्यता असते, अशा वेळी त्यांनी कोणतेही अवजड काम करायचे नाहीत. 

तिखट व मसालेदार पदार्थ खाऊ नये :

डिलिव्हरी नंतर बाळांतीन फार अशक्त होऊन जाते, त्यांच्या शरीरात एनर्जी नसते, अशा वेळी जर तुम्ही त्यांना तिखट व मसालेदार पदार्थ दिले, तर त्यांच्या पोटात आग होण्याची शक्‍यता असते. तसेच त्यांना जुलाब होतात, आणि टाके असल्यामुळे, त्यांना त्या तिखट मसालेदार पदार्थांचा खूप त्रास होतो. पोटात आग होते, शिवाय आव ही पडते. तसेच  त्याच्या बाळालाही त्याचा त्रास होऊ शकतो. बाळाला आईचे दूध पितो, त्यामुळे बाळाला ही जुलाब होऊ शकतात. अशावेळी तुम्ही त्यांना तिखट व मसालेदार पदार्थ देणे शक्यतो टाळावेत. 

वाचा  कानाच्या मागे गाठ येणे

त्यांच्या आहाराची काळजी घ्यावी :

डिलिव्हरी नंतर महिला फार अशक्त होऊन जातात. तसेच डिलीवरी नंतर त्यांना झालेला  रक्तस्रावाची, कमी तुम्हीपालेभाज्या देऊन त्यांना भरू शकतात. कारण रक्तस्राव झाल्यामुळे, या महिलांना ॲनिमिया शक्यता असते, अशावेळी त्यांनी शरीराला पुरेसे पाणी व हिरव्या पालेभाज्या खायला हव्यात. कारण हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने, बाळालाही हिरव्या पालेभाज्यांचे विटामिन्स युक्त गुणधर्म असलेले दूध मिळते. डिलिव्हरी नंतर महिलांना म्हणजेच बाळंतिणीला तुम्ही योग्य आहार द्यायला हवेत. जसेकी हिरव्या पालेभाज्या, मुगाची डाळीची खिचडी, तसेच लापसी, गुळाचा घाटा, रव्याची पातळ पेज, गावरानी तुप, तसेच हळदीचे दूध तसेच ज्वारीच्या, बाजरीच्या भाकरी, यासारख्या पदार्थांचा तुम्ही त्यांना पुरेपूर वापर करायला हवा. 

कारण त्यामधून त्यांना योग्य ते पोषक घटक द्रव्ये मिळतात. ज्यामुळे त्यांच्या शरीरात एनर्जी येते, त्यामध्ये त्यांना प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शियम, आयन, लोह यासारखे गुणधर्म त्यांना मिळतात. 

सुकामेव्याची पदार्थ खायला द्या :

प्रसुतीनंतर म्हणजे डिलिव्हरी नंतर महिलांचे शरीर हे कमजोर होऊन जाते. अशा वेळी जर तुम्ही त्यांना सुकामेव्याचे पदार्थ खायला दिलेत, तर त्यांच्या शरीराची झीज लवकर भरून होण्यास मदत मिळते. अशा वेळी तुम्ही काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, डिंकाचे लाडू यासारखे पदार्थ त्यांना खायला द्यावेत. तसेच तुम्ही यासारखे ड्रायफ्रूट्स मिसळून, त्याचा शिरा, तसेच तुम्ही त्याचे लाडू बनवून, त्यांना खायला द्यावे. म्हणजे त्यांच्या शरीराची झीज, लवकर भरून निघते. शिवाय बाळालाही दूध चांगले येते. 

बेल्टचा वापर करावा :

डिलिव्हरी नंतर महिलांचे पोट लवकर सुटते, अशा वेळी त्यांनी प्रसुतीनंतर सव्वा ते दीड महिन्यानंतर, त्यांच्या कमरेला व पोटाला बेल्ट बांधावा. जेणेकरून त्यांच्या पोटाचा घेर हा वाढणार नाही. शिवाय त्यांनी रोजचे रोज पोटाला  तिळाच्या तेलाने मालिश केली, तर पोटाचा सैलसर  पणा निघून, त्यावर आलेला काळपटपणा ही निघून जातो. शिवाय प्रसूतीनंतरच्या पोटाचे घेर वाढण्याची, समस्याही कमी होऊन जातात. 

वाचा  लहान मुलांना जुलाब होणे या समस्येवर घरगुती उपाय

प्रसूतीनंतर ताबडतोब व्यायाम करू नका :

आता हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये महिला त्यांची फिगर जपण्यामागे फार असतात. प्रसुतीनंतर लगेच पंधरा ते वीस दिवसानंतर, डाएट आणि व्यायामला सुरुवात करतात. पण तसे करू नका, प्रसूति म्हणजेच डिलेवरी झाल्यानंतर महिला व ह्या फार अशक्त होऊन जातात. कारण त्यांना शारीरिक व मानसिक कमजोरी येते, अशा वेळी जर त्यांनी ताबडतोब व्यायामाला सुरुवात केली, तर त्या अजुन कमजोर बनतात. शिवाय त्यांना प्रसूती म्हणजे डिलिव्हरी नंतर बाळाला आणि स्वतःला जपणं फार महत्त्वाचे आहे. डिलिव्हरी नंतर तुम्ही व्यायाम हा दोन ते तीन  महिन्यानंतर करू शकतात. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला सांगितले आहे  की डिलिव्हरीनंतर नेमकी कोणती काळजी घ्यायची, तसेच आम्ही सांगितलेले उपायांमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

                     धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here